LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

Live Updates, LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग
Live Updates, LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग, माझगाव भागातील इमारतीच्या नवव्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी

17/02/2020,1:00PM
Live Updates, LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा स्वीकारला

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सचिवालयात दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला, रविवारी 16 फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली

17/02/2020,11:23AM
Live Updates, LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

दहावी बारावीच्या परीक्षेसाठी पीएमपीच्या जादा बसेस

पुणे : बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून, या काळात जास्तीत जास्त बस मार्गांवर सोडण्याबाबत पीएमपीच्या सर्व 14 आगारांना सूचना, बसच्या देखभाल दुरुस्तीवर नेहमीपेक्षा अधिक लक्ष, गर्दीच्या स्थानकांवर विशेष अधिकारी नियुक्त करुन विद्यार्थ्यांसह सर्व प्रवाशांना बस उपलब्ध होण्यावर भर, पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांची माहिती

17/02/2020,9:01AM
Live Updates, LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

ट्रॅव्हल्सच्या डिकीचा दरवाजा उघडा राहिल्याने अपघात, वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर : ट्रॅव्हल्सच्या डिकीचा दरवाजा उघडा राहिल्याने अपघात, वृद्धाचा मृत्यू, परसू चोरगे असं मृत वृद्धाचं नाव, चंदगडहून निघालेल्या या ट्रॅव्हल्सची डिकी चुकून उघडी राहिली, दुचाकीची दरवाजाला धडक होऊन अपघात

17/02/2020,8:57AM
Live Updates, LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

कोल्हापुरात तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

कोल्हापूर : कंदलगावमधील तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू, प्रज्ञेश कोले असं मुलांचं नाव, प्रज्ञेश मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता

17/02/2020,8:54AM
Live Updates, LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

सायन उड्डाण पूल अद्यापही बंद, मुंबईकरांना ट्रॅफिक जॅमचा फटका

मुंबई : सायन उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम 14 फेब्रुवारीपासून सुरु, 17 फेब्रुवारीला हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार हेता, मात्र तांत्रिक कारणांमुळे पूल अद्यापही बंद, या निर्णयाचा फटका मुंबईकरांना बसतोय, अर्धा ते एक तास मुंबईकरांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागणार, अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ट्रॅफिक जॅम

17/02/2020,8:52AM
Live Updates, LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

गडचिरोलीत गतीमंद तरुणीवर अतिप्रसंग, तरुणी गर्भवती, पाचजण पोलिसांच्या ताब्यात

गडचिरोली: जिल्हयातील आरमोरी गावातील गतीमंद तरुणीवर वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांकडून अतिप्रसंग, तरुणी गर्भवती झाल्याने प्रकार उघड, तरुणीवर अत्याचार करणाऱ्या पाच जणांवर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नराधम पोलिसांच्या ताब्यात

17/02/2020,8:47AM
Live Updates, LIVE : मुंबईतील जीएसटी भवनमध्ये आग

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्ड्यात, एका मित्राचा मृत्यू

जळगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटून भीषण अपघात, अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू, तीन मित्र गंभीर जखमी

17/02/2020,8:43AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *