LIVE: वाढीव वीज बिलाविरोधात नागपुरात भाजप आक्रमक, 100 पेक्षा जास्त ठिकाणी आंदोलनं

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: वाढीव वीज बिलाविरोधात नागपुरात भाजप आक्रमक, 100 पेक्षा जास्त ठिकाणी आंदोलनं
Picture

वाढीव वीज बिलाविरोधात नागपुरात भाजप आक्रमक, 100 पेक्षा जास्त ठिकाणी आंदोलनं

वाढीव वीज बिलाविरोधात नागपुरात भाजप आक्रमक, नागपुरात आज 100 पेक्षा जास्त ठिकाणी भाजपचं आंदोलन, छत्रपती चौकातील आंदोलनात ‘नितीन राऊत मुर्दाबादच्या घोषणा’, खासदार महात्मे आणि भाजप नेते ओमप्रकाश यादव यांचाही आंदोलनात सहभाग, फिजीकल डिस्टन्सिंग पाळत ठिकठिकाणी आंदोलने

04/07/2020,11:30AM
Picture

उस्मानाबादमध्ये आज जनता कर्फ्यू, बाजारपेठेतील सर्व दुकाने आस्थापना बंद

उस्मानाबादमध्ये आज जनता कर्फ्यू, बाजारपेठेतील सर्व दुकाने आस्थापना बंद, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी कारवाईसाठी रस्त्यावर, जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

04/07/2020,11:27AM
Picture

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकट असतानाही मंत्र्यांसाठी वाहनखरेदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकट असतानाही मंत्र्यांसाठी वाहनखरेदी, 6 इनोव्हा खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, शिक्षण अपर सचिव आणि कार्यालयीन वापरासाठी एक अशा एकूण 6 गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर

04/07/2020,11:22AM
Picture

VIDEO : Mumbai Monsoon | मुंबई, उपनगरात जोरदार पाऊस

04/07/2020,11:21AM
Picture

भेळ खायला उदयनराजेंच्या 'जलमंदिर पॅलेस'मध्ये गेलो होतो : विजय वडेट्टीवार

04/07/2020,11:21AM
Picture

वर्ध्यात नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू

वर्ध्यात नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू, दोन महिला एक पुरुषासह एका चिमुकल्याचा समावेश, नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने घटना, आष्टा रोडवरील सोनेगाव येथील घटना, शेतातील काम करुन परत जात असतानाची घटना

04/07/2020,11:08AM
Picture

नाशिक छगन भुजबळ ठक्कर डोममधील कोरोना सेंटरची पाहणी करणार

नाशिक छगन भुजबळ ठक्कर डोममधील कोरोना सेंटरची पाहणी करणार, ठक्कर डोममध्ये 300 खाटांचे क्वारंटाई सेंटर, या सेंटरला नागरिकांचा विरोध झाला होता

04/07/2020,11:06AM
Picture

VIDEO : टॉप 9 न्यूज- 4 July 2020

04/07/2020,11:05AM
Picture

ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला, पोराने PUBG गेममध्ये 16 लाख उडवले

04/07/2020,11:04AM
Picture

पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन

04/07/2020,11:04AM
Picture

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्य वाटप करताना संसर्ग, 25 जूनला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न, श्वास घेण्यात अडचण येत असल्याची तक्रार, आज अखेरचा श्वास

04/07/2020,9:46AM
Picture

चेंबूर कुर्ला सायन परिसरात पावसाला सुरुवात, हवामान खात्याकडून 48 तास अतिवृष्टीचा इशारा

04/07/2020,8:31AM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज महानगर आजपासून 8 दिवस बंद

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज महानगर आजपासून 8 दिवस बंद, प्रशासनाच्या वतीने कर्फ्यू जारी, वाळूज महानगर औद्योगिक वसाहतीत कोरोना रोखण्यासाठी निर्णय, वाळूज, बजाजनगर, रांजणगाव जोगेश्वरी, वडगाव या परिसरात कडकडीत बंद, एमआयडीसीतील कंपन्या वगळता सर्व व्यवहार बंद

04/07/2020,8:25AM
Picture

वसई-विरार क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 220 रुग्ण

04/07/2020,8:24AM
Picture

हिंगोलीत रात्री उशिरा आलेल्या अहवालात 12 नव्या व्यक्तींना कोरोनाची लागण

हिंगोलीत रात्री उशिरा आलेल्या अहवालात 12 नव्या व्यक्तींना कोरोनाची लागण, 8 रुग्ण कोरोनामुक्त, वसमत आणि सेनगाव तालुक्यातील 8 रुग्ण कोरोनामुक्त, तर, हैद्राबाद/औरंगाबाद येथून कळमनुरी/वसमत व हिंगोली तालुक्यात परतलेल्या 12 जणांना नव्याने कोरोनाची लागण, हिंगोलीतील कोरोनाबधितांची संख्या 289 वर, यापैकी 248 जणांना डिस्चार्ज, 41 रुग्णांवर उपचार सुरु

04/07/2020,8:22AM
Picture

पुण्यात कोरोना आटोक्यात न आल्यास परिणाम भोगावे लागतील, अजित पवारांकडून अधिकारी धारेवर

04/07/2020,8:09AM
Picture

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 1199 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 1199 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत 26 हजार 143 बाधित रुग्ण, काल 792 रुग्णांना डिस्चार्ज, 16 हजार 156 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात दिवसभरात 16 बाधित रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत 822 कोरोना बाधित रुग्ण दगावले, पुणे मनपा हद्दीत शुक्रवारी दिवसभरात 807 नवीन बाधित रुग्ण, आतापर्यंत 19, 849 बाधित रुग्ण, दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत 685 मृत्यू, 619 रुग्णांना डिस्चार्ज, एकूण 12,290 कोरोनामुक्त, सध्या पुण्यात 6874 सक्रिय रुग्ण, तर 389 गंभीर असून 59 व्हेंटिलेटर

04/07/2020,8:06AM
Picture

नागपूरच्या कारागृहात कोरोनाचा कहर सुरुच

नागपूरच्या कारागृहात कोरोनाचा कहर सुरुच, काल दिवसभरात कारागृहातील 42 कैद्यांना कोरोनाची लागण, नागपूर कारागृहातील कोरोना रुग्णसंख्या 96 वर, नागपूर जिल्ह्यात काल दिवसभरात 58 नव्या रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 1681 वर, गेल्या 3 दिवसांत जिल्ह्यात 176 कोरोना रुग्ण, काल 29 जणांना डिस्चार्ज, आतापर्यंत 1311 जण कोरोनामुक्त

04/07/2020,8:04AM

Live updates Important news

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *