LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 11 जुलै

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 11 जुलै
Picture

बीड जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा कहर, 20 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

बीड जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा कहर, 20 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, बीड तालुक्यातील 8 जणांचा समावेश, एका 9 वर्षीय मुलालाही संसर्ग, परळीत 4, गेवराईत 6, आष्टी आणि केजमध्ये प्रत्येकी एक रुग्ण, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 210 वर, संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान

11/07/2020,10:42AM
Picture

रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही : के. सी. पाडवी

पालकमंत्री के सी पाडवी यांच्याकडून नंदूरबारच्या कोरोना स्थितीचा आढावा, कडक उपाययोजना करण्याच्या सूचना, रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यशासन त्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन, कोरोना काळात कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

11/07/2020,10:31AM
Picture

धुळे शहरातील महाकाली मंदिराजवळ 35 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून

धुळे शहरातील महाकाली मंदिराजवळ 35 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून, नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जात असताना प्रकार उघड, पोलिसांकडून तपास सुरु

11/07/2020,10:19AM
Picture

नवी मुंबईमध्ये रुग्णांना ऑक्सिजन,व्हेंटिलेटर मिळत नसल्याचा आरोप

नवी मुंबईमध्ये रुग्णांना ऑक्सिजन,व्हेंटिलेटर मिळत नसल्याचा आरोप, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी करत भाजपची ‘वुई निड ऑक्सिजन‘ मोहिम, डाॅक्टरांबरोबर रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सुविधा पुरवणार, भाजप नगरसवेकांचा पुढाकार

11/07/2020,10:16AM
Picture

VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 11 July 2020

11/07/2020,10:09AM
Picture

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार

11/07/2020,10:08AM
Picture

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

11/07/2020,10:07AM
Picture

तुम्ही या सरकारचे 'हेड मास्टर' आहात की 'रिमोट कंट्रोल'? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

11/07/2020,10:06AM
Picture

VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 11 July 2020

11/07/2020,10:06AM
Picture

धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण, WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक

11/07/2020,10:04AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *