LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 19 ऑगस्ट 2020

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 19 ऑगस्ट 2020
Picture

मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

19/08/2020,11:15AM
Picture

सोलापूरमध्ये व्याजाच्या रकमेसाठी तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

सोलापूरमध्ये व्याजाच्या रकमेसाठी तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, 50 हजार रुपये कर्ज आणि व्याजाच्या रकमेसाठी नगरसेवक किसन जाधव यांच्यासह 5 जणांकडून प्रवीण जाधव यांना मारहाण

19/08/2020,11:09AM
Picture

यांचंही ठरलं! जो बिडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, डेमोक्रॅटिक पक्षाची अधिकृत घोषणा

19/08/2020,11:08AM
Picture

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळीत 4 इंचाने घट

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळीत संथगतीने घट, सांगलीजवळ 4 इंचने पातळी कमी, आज 38.6 फूट पाणी पातळी, पुढील 3 दिवस अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क 150 घरांमधील स्थलांतरीतांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आदेश

19/08/2020,10:57AM
Picture

VIDEO: 36 जिल्हे 72 बातम्या | 19 August 2020

19/08/2020,11:07AM
Picture

दरवर्षीचा नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष टळला

नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष यंदा टळणार, नियमानुसार जायकवाडी धरण 65 टक्क्यांवर भरल्याने नाशिक नगरमधील धरणातून पाणी सोडण्याची गरज नाही, नाशिकमधील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा, यंदा नाशिकमध्ये अद्याप मुसळधार पावसाची प्रतीक्षा असताना जायकवाडी धरण 65 टक्क्यांवर भरले

19/08/2020,10:27AM
Picture

मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोना, 35 दिवस मृत्यूशी लढा देत कोव्हिडची लढाई जिंकली

19/08/2020,10:27AM
Picture

यवतमाळचा 'शेतकरीमित्र' ते साताऱ्यातील दुष्काळमुक्ती; पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची धडाकेबाज कारकीर्द

19/08/2020,10:27AM
Picture

मुंबईत विनापरवाना आणि अनावश्यक वाहनांवर मुंबई पोलिसांची नजर

मुंबईत विनापरवाना आणि अनावश्यक वाहनांवर मुंबई पोलिसांची नजर, अनावश्यकपणे रस्त्यावर दिसल्यास कठोर कारवाई करुन वाहने जप्त, वांद्रे येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त, प्रत्येक वाहनांची तपासणी, सकाळपासून 41 वाहनं जप्त, 31 जणांना दंड

19/08/2020,10:25AM
Picture

सहकारी बँका वाचवा, शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

19/08/2020,10:23AM
Picture

रायगडमध्ये वरंध घाटात एकेरी वाहतूक सुरु राहणार

रायगडमध्ये वरंध घाटात एकेरी वाहतूक सुरु राहणार, गणेश भक्तांसाठी सामाधानकारक बातमी, 2 दिवसापूर्वी वरंध घाटात दरडी पडल्याने मार्ग बंद करण्यात आला होता, संध्याकाळी 5 नंतर हा मार्ग सर्व वाहतुकीला बंद असणार

19/08/2020,10:20AM
Picture

VIDEO: 4 मिनिटे 24 हेडलाईन्स

19/08/2020,10:23AM
Picture

औरंगाबाद शहाराजवळचा ऐतिहासिक हर्सूल तलाव ओव्हरफ्लो

औरंगाबाद शहाराजवळचा ऐतिहासिक हर्सूल तलाव ओव्हरफ्लो, तब्बल 14 वर्षांनी भरलेला हर्सूल तलाव ओव्हरफ्लो, तलावाच्या सांडव्यातून जोरदार पाण्याचा प्रवाह, सांडव्याचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

19/08/2020,10:18AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *