LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 29 ऑगस्ट 2020

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 29 ऑगस्ट 2020
Picture

कोल्हापूरमध्ये कोरोनाने महापालिकेच्या तिसर्‍या कर्मचार्‍यांचा बळी

कोल्हापूरमध्ये कोरोनाने महापालिकेच्या तिसर्‍या कर्मचार्‍यांचा बळी, इस्टेट विभागातील कनिष्ठ लिपिकाचं निधन, आठवडाभरात दोघांचा बळी, महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

29/08/2020,9:59AM
Picture

हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला, 50 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला, वसमत तालुक्यातील हट्टा पोलिसांनी कंटेनर पकडला, 50 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

29/08/2020,9:57AM
Picture

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट, 24 तासात तब्बल 1329 नव्या कोरोना रुग्णांची भर

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट, 24 तासात तब्बल 1329 नव्या कोरोना रुग्णांची भर, आतापर्यंत 1 दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद, अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संसर्ग, 24 तासात 42 कोरोना रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात कोरोनामुळं आतापर्यंत 946 लोकांचा बळी, एकूण कोरोना बधितांची संख्या 26094 वर, आतापर्यंत 15855 रुग्ण झाले बरे, एकूण 9293 रुग्णांवर उपचार सुरु

29/08/2020,9:53AM
Picture

पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री 10 वाजता 9416 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग

पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री 10 वाजता 9416 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग, मुठा नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, खडकवासला धरण 100 टक्के भरल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा विसर्ग, पुणे शहराला 5 महिने पुरेल इतक्या पाण्याचा विसर्ग, पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं 100 टक्के भरण्याच्या मार्गावर

29/08/2020,9:51AM
Picture

रस्त्यावरील खड्ड्यात बसून युवा सेनेचं नागपुरात आंदोलन

रस्त्यावरील खड्ड्यात बसून युवा सेनेचं नागपुरात आंदोलन, वाठोडा रिंग रोड ते संघर्षनगर रस्त्याची दैनावस्था, रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न, खड्ड्यातील चिखलात बसून युवा सेनेचं आंदोलन, रस्त्यावरील खड्ड्यांनी नागरिकांनाही मनस्ताप, मनपातील सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी

29/08/2020,9:47AM
Picture

विदर्भात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सोयाबीन उत्पादकांचं मोठं नुकसान

विदर्भात हाती आलेलं सोयाबीनचं पीक गेलं, व्हायरसच्या संकटामुळे सोयाबीन उत्पादकांचं मोठं नुकसान, हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाईची भाजपची मागणी, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना भाजप शिष्टमंडळाचं निवेदन

29/08/2020,9:35AM
Picture

नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले

नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले, मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे दरवाजे उघडल्याने पेंच ओव्हरफ्लो, नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाचेही 14 दरवाजे उघडले, धरणातील पाणी नदीत सोडल्याने शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा, जिल्ह्यात 28 ऑगस्टपासून पावसाची दमदार बॅटिंग, मागील 24 तासांमध्ये जिल्ह्यात 52 मिमी पावसाची नोंद

29/08/2020,9:27AM
Picture

काँग्रेस खासदाराचं कोरोनाने निधन, राहुल गांधींसह पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त

29/08/2020,9:24AM
Picture

VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 29 August 2020

29/08/2020,9:24AM
Picture

वसई-विरारमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन

29/08/2020,9:23AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *