शाहू महाराज आज जिवंत असते, तर CAA आणि NRC चा कायदा फाडला असता : हसन मुश्रीफ

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर ...

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:54 AM, 19 Jan 2020
शाहू महाराज आज जिवंत असते, तर CAA आणि NRC चा कायदा फाडला असता : हसन मुश्रीफ

[svt-event title=”शाहू महाराज आज जिवंत असते, तर CAA आणि NRC कायदा फाडला असता : हसन मुश्रीफ” date=”19/01/2020,1:25PM” class=”svt-cd-green” ] शाहू महाराज आज जिवंत असते, तर CAA आणि NRC च्या कायद्याचा कागद फाडून टाकला असता, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य, मागील 5 वर्षातील कोल्हापूरच्या विकास कामाचा बॅकलॉग भरण्याचंही आश्वासन [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेचे माजी मंत्री डॉ तानाजी सावंत यांची नाराजी कायम” date=”19/01/2020,1:22PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेचे माजी मंत्री डॉ तानाजी सावंत यांची नाराजी कायम, सावंत यांची उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजरी, मंत्रिपद न मिळाल्याने सावंतांची नाराजी, पालकमंत्री शंकर गडाख यांच्या उपस्थितीत बैठक [/svt-event]

[svt-event title=”वरळीतील समाजकल्याण विभागाच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन” date=”19/01/2020,1:04PM” class=”svt-cd-green” ] वरळीतील समाजकल्याण विभागाच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन, शनिवारी (18 जानेवारी) रात्री 8 वाजल्यापासून आंदोलन सुरू, अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याकडून दखल नाही [/svt-event]

[svt-event title=”सामाजिक एकतेचा संदेश देत विरारमध्ये एकता दौड” date=”19/01/2020,8:50AM” class=”svt-cd-green” ] सामाजिक एकतेचा संदेश देत विरारमध्ये एकता दौड, 6 वर्षांपासून 60 वर्षांपर्यंतच्या मुलं-मुली, महिला-पुरुषांचा सहभाग [/svt-event]

[svt-event title=”शिर्डी बंदचा साईभक्तांना फटका” date=”19/01/2020,7:48AM” class=”svt-cd-green” ] साईंच्या जन्मभुमीच्या वादानंतर शिर्डी बंद, बंदमुळे भाविकांची गैरसोय, साई मंदिराकडे जाण्यासाठी वाहनंच उपलब्ध नाही, नाश्त्यासाठी भाविकांची परवड, साईबाबा संस्थानच्या सेवेवरही ताण [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूरातील मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला चंद्रपूर पोलिसांकडून अखेर बेड्या” date=”19/01/2020,7:45AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूरातील मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी सपना शुटर उर्फ युनिता टाकला चंद्रपूर पोलिसांकडून अखेर बेड्या, हिमाचल प्रदेशातील नानक येथून शुक्रवारी अटक, न्यायालयाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी, आरोपीकडून मानवी तस्करीबाबत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना राजीनामा देण्याचे आदेश” date=”19/01/2020,7:55AM” class=”svt-cd-green” ] सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांना राजीनामा देण्याचे आदेश, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा निर्णय, दोन्ही पदाधिकाऱ्यांना भाजपकडून दीड वर्षांसाठी संधी [/svt-event]