LIVE: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिवार वाडा बंद करण्याचा निर्णय

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर... (Live Updates of Important News of the day)

LIVE: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिवार वाडा बंद करण्याचा निर्णय
Picture

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिवार वाडाही बंद करण्याचा निर्णय

16/03/2020,9:35AM
Picture

नाशिकमध्ये अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

नाशिकमध्ये अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार, नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर निफाड तालुक्यातील चांदोरी येथील घटना, मृत बिबट्या 5 ते 6 महिन्यांचा नर, रस्ता ओलांडताना रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

16/03/2020,9:01AM
Picture

नाशिकमध्ये वणीच्या चैत्रोत्सवावर कोरोनाचं सावट

नाशिकमध्ये वणीच्या चैत्रोत्सवावर कोरोनाचं सावट, आज जिल्हा प्रशासनाची सप्तश्रृंगी देवी संस्थानच्या विश्वस्तांसोबत महत्वपूर्ण बैठक, यात चैत्रोत्सवाबाबत निर्णय होणार

16/03/2020,8:59AM
Picture

'कोरोना'शी लढण्यासाठी महापालिका सज्ज, मुंबई-पुण्यात घरोघरी सर्वेक्षण

16/03/2020,8:59AM
Picture

गुजरातमध्ये काँग्रेसच्या चार आमदारांचा राजीनामा, राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्याच्या स्वप्नाला सुरुंग

16/03/2020,8:58AM
Picture

वडिलांकडून अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, पीडिता 4 महिन्यांची गर्भवती

16/03/2020,8:58AM
Picture

पुण्यात संचारबंदीचा प्रस्ताव, तुळशीबाग तीन दिवस बंद

16/03/2020,8:57AM
Picture

अहमदनगरमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

16/03/2020,8:57AM
Picture

पुण्यात आजपासून घरोघरी कोरोना सर्वेक्षण

16/03/2020,7:58AM
Picture

पुण्यात 8 ठिकाणी संचारबंदीचा प्रस्ताव

पुण्यात 8 ठिकाणी संचारबंदीचा प्रस्ताव, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय, पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसराचा समावेश, पालिका आयुक्तांकडून जिल्हाधिकारी आणि पुणे पोलिस आयुक्तांना प्रस्ताव, प्रस्तावावर आज निर्णय होणार

16/03/2020,7:44AM
Picture

पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग आजपासून तीन दिवस बंद

पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग आजपासून तीन दिवस बंद, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यापारी असोसिएशनचा निर्णय, विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांचे आवडीचे ठिकाण, तुळशीबागेतील ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन निर्णय, विश्रामबाग पोलिसांच्या आवाहनाला व्यापारी असोसिएशनचा सकारात्मक प्रतिसाद

16/03/2020,7:42AM
Picture

कोल्हापूरमध्ये एसटी बसच्या अपघातात 1 ठार, 27 जखमी

कोल्हापूरमध्ये पादचाऱ्याला चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी बस झाडावर आदळली, अपघातात 1 जण ठार, तर 27 जण जखमी, कोल्हापूरमधील कळंबा पेट्रोल पंपाजवळील घटना, बस कोल्हापूरहून गारगोटीला जात होती

16/03/2020,7:40AM
Picture

कोल्हापूरमधील सिपीआरच्या आयसोलेशन कक्षात कोरोना संशयित वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूरमधील सिपीआरच्या आयसोलेशन कक्षात कोरोना संशयित वृद्धाचा मृत्यू, मुळचा उत्तर प्रदेशचा प्रवासी दिल्ली हरियाणा असा प्रवास करत कोल्हापूरमध्ये आला होता, सबंधित वृद्ध कोरोना सदृश्य लक्षण आढळून आल्यानं रुग्णालयात दाखल होता, कोरोना चाचणीचा अहवाल येणे बाकी, अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार

16/03/2020,7:37AM
Picture

शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्याकडून राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांच्या स्विय सहायकाच्या कानशिलात

शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्याकडून राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचे स्विय सहायक प्रशांत भोईर यांच्या कानशिलात, जातीवाचक शिवीगाळीचाही आरोप, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्याविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, आजी आणि माजी आमदार दोघेही एका लग्न समारंभात आले असतानाचा घटना

16/03/2020,7:34AM
Picture

पालघरमध्ये डहाणू तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के

पालघरमध्ये डहाणू तलासरी परिसरात भूकंपाचे सत्र सुरुच, 12.12 मिनिटांनी आणि 12.35 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के

16/03/2020,7:33AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *