LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...

[svt-event title=”अशोक चव्हाणांचा एनआरसी विरोधातील आंदोलनात सहभाग” date=”20/01/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ] एनआरसी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांचा सहभाग, नांदेडमध्ये 8 दिवसांपासून आंदोलन सुरू, रात्री उशिरा मुंबईहून नांदेडला आलेले चव्हाण थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी, चव्हाणांच्या सहभागाने आंदोलकांच्या हुरुपात वाढ [/svt-event]

[svt-event title=”पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या मुलाची सीएए, एनआरसी विरोधात निदर्शनं करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार” date=”20/01/2020,8:04AM” class=”svt-cd-green” ] पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट यांची सीएए, एनआरसी विरोधात निदर्शनं करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार, डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, निदर्शकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप, आंदोलनासाठी निदर्शकांना परवानगी दिल्याची पोलिसांची माहिती, या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल नाही [/svt-event]

[svt-event title=”आमदार संजय सिरसाटांसह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल” date=”20/01/2020,7:58AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आमदार संजय सिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, सातारा देवळाईतील रस्ते कामाच्या कंत्राटावरून अनेक दिवसांपासून वाद, शनिवारी (18 जानेवारी) कोकणवाडी येथे आमदार सिरसाटांच्या कार्यालयासमोर दोन्ही गटातील जोरदार हाणामारीनंतर गुन्हे दाखल [/svt-event]

[svt-event title=”साईबाबा जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार” date=”20/01/2020,7:50AM” class=”svt-cd-green” ] साईबाबा जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज मुख्यमंत्री ठाकरेंसोबत मंत्रालयात दुपारी 2 वाजता बैठक, शिर्डीकर थोड्याच वेळात मुंबईकडे रवाना होणार [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर शहरातील झी बाजार या दुकानाला भीषण आग” date=”20/01/2020,7:48AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर शहरातील झी बाजार या दुकानाला भीषण आग, आझाद बगीच्याजवळील घटना, झी बाजार कपडे, खेळणी आणि गृहपयोगी वस्तूंचं मोठं दुकान, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू [/svt-event]

[svt-event title=”पैलवान मारुती जाधव ‘ठाणे महापौर चषका’चा मानकरी” date=”20/01/2020,7:46AM” class=”svt-cd-green” ] पैलवान मारुती जाधव ‘ठाणे महापौर चषका’चा मानकरी, महिला खुला गटातून कोल्हापूरची सृष्टी भोसले पहिली, राज्यस्तरीय ठाणे महापौर चषक स्पर्धेत खुल्या गटातील विजेत्या मल्लास 1,25,000/- रुपये, ठाणे महापौर केसरी किताब, चांदीची गदा आणि सन्मान पट्टा प्रदान [/svt-event]