AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीची घोषणा झाली, पण दुबार मतदारांचं काय करणार? निवडणूक आयोगाने समोर आणला डबल स्टारचा तोडगा!

नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दुबार मदारांविषयीही राज्य निवडणूक आयोगाने एक तोडगा काढला आहे.

निवडणुकीची घोषणा झाली, पण दुबार मतदारांचं काय करणार? निवडणूक आयोगाने समोर आणला डबल स्टारचा तोडगा!
voter list dual voter
| Updated on: Nov 04, 2025 | 4:32 PM
Share

Local Body Election Date : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं आहे. आज (4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची घोषणा केली. या घोषणेनुसार आता राज्यात एकूण 246 नगपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यात 15 नव्या नगरपंचायती आहेत. दरम्यान, या निवडणुकीची घोषणा होण्याआधी महाविकस आघाडी तसेच मनसेने मतदार याद्यांत घोळ आहे. अनेक मतदार दुबार आहे, असा आरोप करत मतदार याद्या स्वच्छ करा आणि मगच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणू घ्या, अशी मागमी केली होती. विरोधकांच्या याच आक्षेपाला झुगारून आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. सोबतच दुबार मतदारांचा घोळ मिटावा यासाठी एक तोडगा काढला आहे.

मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर मतदारांना त्यांचे नाव शोधता येईल. याशिवाय मतदारांच्या सोईसाठी एक विशेष अॅपही विकसित करण्यात आले आहे. या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधता येईल. सोबतच त्यांच्या मतदान केंद्राचाही शोध घेता येईल. उमेदवार कोण आहे, त्यांच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत याचाही शोध मतदारांना घेता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

काढला डबल स्टारचा तोडगा

तसेच, मतदार याद्यांतील संभाव्य दुबार नावांचीही राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या त्यांच्या सिस्टिमवर एक टूल विकसित केले आहे. याच टूलच्या मदतीने प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य मतदाराच्या नावापुढे डबल स्टार दिसेल, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

नाव, फोटो, पत्ता तपासला जाणार

जिथे-जिथे मतदाराच्या नावापुढे डबल स्टार आलेले आहेत, तिथे तिथे संबंधित अधिकारी प्रभागामध्ये, मतदान केंद्रामध्ये तो मतदार कुठे मतदान करेल याची माहिती घेईल. त्याचे नाव, लिंग, फोटो, पत्ता सर्व बाबी तपासल्या जातील. ज्या मतदान केंद्रामध्ये दुबार मतदाराला मतदान करायचे आहे, त्या मतदान केंद्रावर त्याला मतदान करायची सोय असेल. अन्य मतदान केंद्रावर त्या मतदाराला मतदान करता येणार नाही.

मतदाराकडून लिहून घेतले जाणार प्रतिज्ञापत्र

ज्या मतदाराच्या नावापुढे डबल स्टार आलेले आहे आणि त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रांवर त्याच्या नावापुढे डबल स्टार दाखवले जाईल. असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल. मी या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रावर मतदान केलेले नाही, तसेच अन्य मतदान केंद्रावरही मतदान करणार नाही असे मतदाराकडून लिहून घेतले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?.
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज.
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी.
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?.
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल.
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान.
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्...
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्....
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?.
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा.
रूपाली ठोंबरे पाटलांनंतर रूपाली चाकणकर अजितदादांच्या भेटीला, कारण काय?
रूपाली ठोंबरे पाटलांनंतर रूपाली चाकणकर अजितदादांच्या भेटीला, कारण काय?.