Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगलीत दिवसभरात 1124 कोरोनाबाधितांची नोंद, म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या 295 वर

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 03 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगलीत दिवसभरात 1124 कोरोनाबाधितांची नोंद, म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या 295 वर
corona virus

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 8 हजार 753 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 8 हजार 385 जणांनी कोरोनावर मात केलीय. एकूण 58,36,920 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 1 लाख 16 हजार 867 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.01% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 03 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 03 Jul 2021 22:50 PM (IST)

  सांगलीत दिवसभरात 1124 कोरोनाबाधितांची नोंद, म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या 295 वर

  सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 1124 कोरोना रुग्ण आढळले

  म्युकरमायकोसिस – एकूण रुग्ण 295, आज आढळलेले रुग्ण 2, आज मृत्यू – 1

  जिल्ह्यात आज कोरोनामुळे 12 रुग्णांचा मृत्यू

  जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 4120 वर

  अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 9880

  आज 935 जण आज कोरोना मुक्त

  आजअखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 1,34,911 वर

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद 1,48, 911 वर

 • 03 Jul 2021 18:55 PM (IST)

  अमरावतीत दिवसभरात 43 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एक मृत्यू

  अमरावतीत दिवसभरात 43 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

  एका रुग्णाचा कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू

  आज 32 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  जिल्ह्यात आतापर्यंत 96106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

  आतापर्यंत 1555 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

  94179 रुग्णानी केली आतापर्यंत कोरोनावर मात

 • 03 Jul 2021 15:22 PM (IST)

  कोरोना रुग्णसंख्येत घट, पुण्यातील सीओईपी मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर बंद

  पुण्यातील सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद

  रुग्णसंख्या घटल्यानं महापालिकेनं घेतला निर्णय

  दुर्देवाने शेवटच्या रुग्णाचा मात्र मृत्यू

  कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत 3009 रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं, त्यापैकी 1909 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 654 जणांचा मृत्यू झाला

  गरज पडली तर जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू केलं जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

 • 03 Jul 2021 11:45 AM (IST)

  औरंगाबाद शहरात आजपासून पुन्हा एकदा विकेंड लॉकडाऊनला सुरुवात

  औरंगाबाद शहरात आजपासून पुन्हा एकदा विकेंड लॉक डाऊन ला सुरुवात झाली आहे. त्यानुसार औरंगाबादच्या पैठण गेट मार्केट मध्ये दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत.

 • 03 Jul 2021 11:26 AM (IST)

  सोमवारी सर्व दुकाने सुरू ठेवणारच, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी आंदोलन करून व्यक्त केला निर्धार

  कोल्हापूर

  सरकारचा निर्णय काहीही असो, सोमवारी सर्व दुकाने सुरू ठेवणारच

  कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी आंदोलन करून व्यक्त केला निर्धार

  व्यापाऱ्यांनी अजून किती दिवस नुकसान सहन करायचं असा सवाल

  कारवाई केली तरी सामूहिक जबाबदारी घेऊ पण आता थांबणार नाही

  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

 • 03 Jul 2021 10:24 AM (IST)

  देशात 24 तासांत 44 हजार111 नवे रुग्ण, 738 जणांचा मृत्यू

  दिल्ली –

  देशात 24 तासात नवे रूग्ण – 44,111

  देशात 24 तासात मृत्यू – 738

  देशात 24 तासात डीस्चार्ज – 57,477

  एकूण रूग्ण – 3,05,02,362

  एकूण मृत्यू – 4,01,050

  एकूण डीस्चार्ज – 2,96,05,779

  एकूण एक्टीव्ह रूग्ण – 4,95,533

  एकूण लसीकरण – 34,46,11,291

  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

 • 03 Jul 2021 08:06 AM (IST)

  नागपुरात कोरोनापेक्षा म्युकरमायकोसिचा मृत्यूदर सहापट

  – नागपुरात कोरोनापेक्षा म्युकरमायकोसिचा मृत्यूदर सहापट

  – विदर्भातील म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू नागपूर जिल्ह्यात

  – नागपुरात करोनाचा मृत्यूदर १.५९ टक्के, म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर सहा पट

  – नागपूर जिल्हयात म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर ९.५७ टक्के आहे.

  – नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत म्युकरमायकोसिसचे १ हजार ६०८ रुग्ण आढळले

  – जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या
  रुग्णांचा १५४ रुग्णांचा मृत्यू

 • 03 Jul 2021 07:50 AM (IST)

  नागपूर जिल्हयात 36 टक्केच लसीकरण, डेल्टा प्लसला कसं रोखणार?

  – नागपूर जिल्हयात 36 टक्केच लसीकरण, डेल्टा प्लसला कसं रोखणार?

  – पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी

  – गेल्या सहा महिन्या दोन्ही डोस मिळून १५,३६,८४१ जणांनी घेतली लस

  – जिल्ह्यात केवळ ३,४३,६६४ लोकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

  – जिल्हयात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांचं प्रमाणे केवळ आठ टक्के

  – १८ ते ४४ वयोगटातील केवळ ८९६३ जणांनी घेतला दुसरा डोस

 • 03 Jul 2021 07:35 AM (IST)

  तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापार्‍यांचे दुकानात जावून लसीकरण करण्यात येणार

  पुणे –

  – तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापार्‍यांचे दुकानात जावून लसीकरण करण्यात येणार,

  – महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार,

  – ही मोहिम गुरुवारपासून लसीच्या उपलब्धतेनुसार राबविली जाणार,

  – याशिवाय दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे,

  – अतिरीक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती.

 • 03 Jul 2021 07:35 AM (IST)

  नागपुरात शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं सुरु राहणार

  – शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं सुरु राहणार

  – औषधी, किराणा, भाजीपाला दुकानं चार पर्यंत सुरु राहणार

  – राज्य सरकारच्या आदेशाअंतर्गत निर्णय

  – ५ ते १२ जुलैसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले आदेश

  – पुढील आठवड्यात दुपारी ४ नंतर खेळण्यावर निर्बंध

  – पुढील आठवड्यात दुपारी चार नंतर हॅाटेलमधून पार्सल सेवा बंद

 • 03 Jul 2021 07:33 AM (IST)

  नागपूर जिल्हयात 36 टक्केच लसीकरण, डेल्टा प्लसला कसं रोखणार?

  – नागपूर जिल्हयात ३६ टक्केच लसीकरण, डेल्टा प्लसला कसं रोखणार?

  – पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी

  – गेल्या सहा महिन्या दोन्ही डोस मिळून १५,३६,८४१ जणांनी घेतली लस

  – जिल्ह्यात केवळ ३,४३,६६४ लोकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

  – जिल्हयात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांचं प्रमाणे केवळ आठ टक्के

  – १८ ते ४४ वयोगटातील केवळ ८९६३ जणांनी घेतला दुसरा डोस

 • 03 Jul 2021 07:11 AM (IST)

  दुसरी लाट ओसरु लागल्यानं पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद

  पुणे –

  – दुसरी लाट ओसरू लागल्यानं जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद

  – जम्बोमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या

  – पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय 15 जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते

  – त्यानंतर 22 मार्चपासून जम्बो पुन्हा सुरू करण्यात आले

  – दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण 3009 रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते

  – महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांची माहिती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI