मतदानाची शाई दाखवा, बिलात 20 टक्के सूट मिळवा

कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. या निमित्ताने मतदान केल्याची शाई दाखवा आणि बिलात 20 टक्के सूट मिळवा, अशी ऑफर एका कोल्हापूरच्या प्रसिद्ध म्हावरा हॉटेलने ग्राहकांना दिली आहे. भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका… या उत्सवात जास्तीत …

मतदानाची शाई दाखवा, बिलात 20 टक्के सूट मिळवा

कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. या निमित्ताने मतदान केल्याची शाई दाखवा आणि बिलात 20 टक्के सूट मिळवा, अशी ऑफर एका कोल्हापूरच्या प्रसिद्ध म्हावरा हॉटेलने ग्राहकांना दिली आहे.

भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका… या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी अनेकांकडून वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न करण्यात येतात. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र कित्येकदा मतदार या प्रक्रियेपासून लांब राहतात. अनेक सुशिक्षित नागरिक मला काय करायचंय अशा भावनेतून मतदान करत नाही. अशा नागरिकांना जागृत करावे, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी कोल्हापूरच्या म्हावर हॉटेलने मतदारांना अनोखी ऑफर दिली आहे.

कोल्हापूरच्या झणझणीत मिसळ, चमचमीत माशांवर ताव मारा आणि बिलावर 20 टक्के सूट मिळवा अशी या हॉटेलची ऑफर आहे. मात्र या ऑफरसाठी हॉटेलतर्फे एक अट ठेवण्यात आली आहे. ती अट म्हणजे ग्राहकांच्या बोटावर मतदान केल्याची शाई असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला बिलावर 20 टक्के सूट मिळू शकते.

कोल्हापूरच्या चौरंगी कॉम्प्लेक्सजवळ म्हावरा या हॉटेलमध्ये उद्या फक्त एका दिवसासाठी ही ऑफर ग्राहकांना देण्यात येणार आहे. मतदान हा जसा प्रत्येकाचा अधिकार आहे तसा ते प्रत्येकाचं कर्तव्यही आहे. तुमचं एक मत या देशाचा भविष्य घडवण्यासाठी महत्वाचे आहे. याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे, तसेच देशभरातील मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी एक दिवसीय उपक्रम ठेवण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *