लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित; आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय

365.16 हेक्टर परिसरात एवढे क्षेत्र असून, 77.69 हेक्टर परिसरात खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. विशेष म्हणजे लोणार सरोवराचा जागतिक नावलौकिक आहे. लोणार ‘रामसर’ पाणथळ स्थळ घोषित झाल्यामुळे जागतिक स्तरावर त्याला मोठी प्रसिद्धी मिळणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:55 PM, 13 Nov 2020
लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित; आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय

मुंबई: मला सांगताना आनंद होत आहे की, लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे. मी 2004 मध्ये हे सरोवर पहिल्यांदा पाहिले होते, सर्वांना आकर्षित करेल, असे ते दृश्य होते. जैवविविधता, पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे, असंही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी अधोरेखित केले आहे. (Lonar Lake Is Now Declared As Ramsar Wetland Area; Aditya Thackeray Big Decision)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टिपलेले लोणार सरोवराचे काही फोटो पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यावेळीच त्यांनी लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. लोणार अभयारण्य हे 8 जून 2000 साली निर्माण झाल्याचं सांगितले जाते. 365.16 हेक्टर परिसरात एवढे क्षेत्र असून, 77.69 हेक्टर परिसरात खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. विशेष म्हणजे लोणार सरोवराचा जागतिक नावलौकिक आहे. लोणार ‘रामसर’ पाणथळ क्षेत्र घोषित झाल्यामुळे जागतिक स्तरावर त्याला मोठी प्रसिद्धी मिळणार आहे.

इराणमधील रामसर शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता. 1975 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने 1982 पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे. आतापर्यंत जगात 2200 पाणथळ स्थळ असल्याची नोंद आहे. ‘रामसर’ संकेस्थळावर 11 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित करण्यात आलेल्या पाणथळ स्थळाच्या यादीत भारतातील दोन स्थळांचा समावेश आहे. यात उत्तर प्रदेशातील आग्रा येथील केथमलेक सरोवर आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा समावेश आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लोणार हे खाऱ्या पाण्याचे तळे येत आहे. लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळ घोषित केल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने लोणार सरोवर परिसर पावन झाल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. विशेष म्हणजे दिल्लीतील श्रीराम वनगमन संस्थेच्या सदस्यांशी संशोधनाच्या दृष्टीने लोणार येथे दोन वर्षांपूर्वी भेट दिली होती. दरम्यान, लोणार सरोवर परिसराची त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसह, लक्ष्मण, सीता यांनी यात्रा केल्याची आख्यायिका सांगितली जाते. स्कंदपुराण, पद्मपुराण, रामायणासारख्या ग्रंथातून लोणारचे सरोवर हे कृतयुगामध्ये निर्माण झाल्याचे संदर्भ आहेत.

संबंधित बातम्या

प्लॅस्टिकप्रमाणे आवाजी फटाक्यांवर कायमची बंदी आणा, सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी

शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे आदित्य ठाकरेंची भेट

(Lonar Lake Is Now Declared As Ramsar Wetland Area; Aditya Thackeray Big Decision)