जगातील सर्वाधिक लांबीचा काचेचा स्कायवॉक अमरावतीत, नवनीत राणांकडून पाहणी

अमरावतीच्या चिखलदरा येथे लवकरच जगातील सर्वाधिक लांबीचा काचेचा स्कायवॉक उभारला जाणार (Longest Glass Bridge in Amravati) आहे.

जगातील सर्वाधिक लांबीचा काचेचा स्कायवॉक अमरावतीत, नवनीत राणांकडून पाहणी
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 10:08 AM

अमरावती : विदर्भाचं काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे लवकरच जगातील सर्वाधिक लांबीचा काचेचा स्कायवॉक उभारला जाणार (Longest Glass Bridge in Amravati) आहे. चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात या स्कायवॉकचा समावेश करण्यात आला आहे. नुकतंच अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी या स्कायवॉकच्या बांधकामाची पाहणी केली.

अमरावतीमध्ये चिखलदरा येथे स्कायवॉकची सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. या स्कायवॉकची लांबी 500 मीटर इतकी असणार आहे. आतापर्यंत त्याचे 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्कायवॉकसाठीचे एकूण बजेट 34 कोटी रुपये आहेत. या स्कायवॉकचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे.

चिखलदऱ्यात होणारा हा पूल भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक असणार आहे. चिखलदरातील गोराघाट पॉईंटपासून ते हरीकेन पॉंईंटपर्यंत हा स्कायवॉक असेल. सध्या या प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरु (Longest Glass Bridge in Amravati) आहे.

हा स्कायवॉक भारतातील पहिला आणि जगातील तिसरा हा गगनभरारी पूल असणार आहे. या स्कायवॉकने दोन मोठ्या टेकड्यांना जोडलं जाणार आहे. हा स्कायवॉक पूर्णपणे काचेचा असणार आहे. यामुळे चिखलदऱ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांकरिता एक नवं आकर्षण निर्माण होणार आहे.

स्कायवॉकचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या भागात पर्यटकांची संख्या वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडकोद्वारे विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये देशातून पर्यटकांची गर्दी वाढेल, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली.

या जगात स्वित्झर्लंड आणि चायना या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक हा 397 मीटरचा आहे. तर चीनमधील स्कायवॉक 360 मीटरचा आहे. त्यामुळे चिखलदरा येथे होत असलेला स्कायवॉक हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्कायवॉक असणार आहे. चिखलदरा येथे होणारा हा स्कायवॉक 500 मीटर असेल. त्यासाठी 34 कोटी रुपये लागणार (Longest Glass Bridge in Amravati) आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.