कोकण रेल्वे मार्गावर मडगाव-मुंबई फेस्टिव्हल ट्रेन धावणार

दसऱ्याच्या मुहूर्तावर ही गाडी धावणार असल्याने कोकणावासीयांची चांगली सोय होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर मडगाव-मुंबई फेस्टिव्हल ट्रेन धावणार

रत्नागिरीः दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर मडगाव-मुंबई फेस्टिव्हल ट्रेन धावणार आहे. विशेष म्हणजे सणासुदीत या गाडीच्या एकूण 16 फेऱ्या होणार आहेत. मडगाव स्टेशनमधून ही गाडी दररोज संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे. तर मुंबईहून ही गाडी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ही गाडी धावणार असल्याने कोकणावासीयांची चांगली सोय होणार आहे. (madgaon Special train for dussehra)

तत्पूर्वी गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. पण त्या रेल्वेला चाकरमान्यांचा थंड प्रतिसाद मिळाला होता. गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वेनं विशेष रेल्वे सेवा सुरू केली होती. गणेशोत्सवात 182 रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलेले होते. या सर्व ट्रेन कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार होत्या. पण त्याला प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. काही प्रवाशांनी वैद्यकीय प्रमाणापत्र घेऊन तर काहींनी स्वॅब टेस्ट करून या रेल्वेतून प्रवास केला होता.

नवरात्र सुरू होण्यापूर्वी रेल्वे वेगवेगळ्या झोनमध्ये सोयीस्कररीत्या 39 जोड्यांनी गाड्या चालवल्या होत्या. या गाड्यांमध्ये बहुधा एसी स्पेशल, राजधानी, शताब्दी आणि दुरांतोचा समावेश होता. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खासगी भाडेतत्त्वावरील प्रमुख रेल्वे तेजस सुरू झाली होती. त्यापैकी पहिल्यांदा तेजस दिल्ली ते लखनौदरम्यान धावली, दुसऱ्या फेरीत अहमदाबाद ते मुंबईदरम्यान धावली. तेजस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी झाली असून, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे मंडळाने इतर विशेष 78 गाड्या चालविण्यास परवानगी दिली होती. ज्या गाड्यांची प्रवाशांकडून जास्त मागणी आहे, अशा मार्गांवरील या गाड्या निवडल्या गेल्या होत्या. कोरोनाच्या संकटात उत्तराखंड आणि महाराष्ट्रात विविध निर्बंध लादण्यात आले होते, त्यामुळे या राज्यांसाठी रेल्वेगाड्यांची संख्या फारच मर्यादित होती. या विशेष रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीत हरिद्वार ते डेहराडून ते मुंबईदरम्यान गाड्या चालविण्यास परवानगी देण्यात आली होती. ठाकरे सरकारनं हळूहळू लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली नसली तरी अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकलनं प्रवास करता येतोय.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

सोमवारपासून पुणे लोकलला हिरवा झेंडा, पहिली ट्रेन लोणावळ्यासाठी रवाना होणार

Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, 12 सप्टेंबरपासून 80 स्पेशल ट्रेन सुरु होणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *