सिद्धिविनायक ट्रस्टवर काँग्रेस-राष्ट्रवादीचेही सदस्य, शासकीय पदांवर पहिल्यांदाच ‘महाविकास आघाडी’

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच शासकीय पदांवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची‌ वर्णी लागली (Maha Vikas Aghadi Siddhivinayak Trust)

सिद्धिविनायक ट्रस्टवर काँग्रेस-राष्ट्रवादीचेही सदस्य, शासकीय पदांवर पहिल्यांदाच 'महाविकास आघाडी'
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 11:47 AM

मुंबई : देशभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. तर सिद्धिविनायक ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या अध्यक्षपदाला तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. (Maha Vikas Aghadi leaders elected on Sri Siddhivinayak Temple Trust)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच शासकीय पदांवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची‌ वर्णी लागली आहे. ट्रस्टमध्ये पाच पदं शिवसेनेकडे असतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी तीन पदं ठेवण्यात आली आहेत. काँग्रेसच्या राजाराम देशमुख यांचा सिद्धिविनायक ट्रस्ट सदस्यांमध्ये समावेश आहे.

पुन्हा भावोजीच!

महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ अर्थात प्रख्यात अभिनेते-सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षपदाला तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. 24 जुलै 2020 पासूनच तीन वर्षांसाठी बांदेकरांची पुनर्नियुक्ती करण्यात आल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं. आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे नेतेपदही आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

आदेश बांदेकर यांचा परिचय

आदेश बांदेकर गेली 16 वर्ष ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. महाराष्ट्रातील घराघरात जाऊन गृहिणींचा सन्मान करण्याचे काम बांदेकर अव्याहतपणे करत आहेत. त्यामुळे प्रत्येक घरातील वहिनींचे ‘लाडके भावोजी’ असे स्थान त्यांना मिळाले आहे. लॉकडाऊनमुळे ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’मधून ते घरुनच शूटिंग करत होते, मात्र नुकतेच या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष शूटिंगही सुरु झाले. याशिवाय, ताक धिना धिन, एकापेक्षा एक, हप्ता बंद, झिंग झिंग झिंगाट अशा अनेक कार्यक्रमांचे निवेदन त्यांनी आतापर्यंत केले आहे. काही मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला असून ‘सोहम प्रॉडक्शन’ ही निर्मिती संस्था ते चालवतात. (Maha Vikas Aghadi leaders elected on Sri Siddhivinayak Temple Trust)

राजकीय प्रवास 

आदेश बांदेकर यांनी सप्टेंबर 2009 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. 2009 च्या विधानसभा निवडणुका त्यांनी माहीम मतदारसंघातून लढवली, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात आपले काम चालू ठेवले. 2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राज्यमंत्रिपदाचा दर्जा

साडेतीन वर्षांपूर्वी (जुलै 2017) आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.

संबंधित बातम्या :

आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

(Maha Vikas Aghadi leaders elected on Sri Siddhivinayak Temple Trust)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.