अहमदनगरमध्ये महाविकासआघाडीचाच बोलबाला, विखे गटासह भाजपवर माघारीची नामुष्की

राज्यातील सत्ता समिकरणांचा परिणाम स्थानिक स्तरावरही दिसण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या महाविकासआघाडीच्या प्रयोगाने अहमदनगरच्या राजकारणातही आपली छाप उमटवली (Maha Vikas Aghadi win Ahmednagar ZP Election).

अहमदनगरमध्ये महाविकासआघाडीचाच बोलबाला, विखे गटासह भाजपवर माघारीची नामुष्की
Follow us
| Updated on: Dec 31, 2019 | 11:48 PM

अहमदनगर : राज्यातील सत्ता समिकरणांचा परिणाम स्थानिक स्तरावरही दिसण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या महाविकासआघाडीच्या प्रयोगाने अहमदनगरच्या राजकारणातही आपली छाप उमटवली (Maha Vikas Aghadi win Ahmednagar ZP Election). नगरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे विखेंना मोठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे पवार कुटुंबाचे सदस्य रोहित पवार यांनीही यावर्षी नगरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सहभाग घेतलाय.

जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्हापरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. महाआघाडीतील राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपवर माघार घेण्याची नामुष्की आली. भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

महाविकास आघाडीच्या विजयानंतर अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखेंनी मात्र काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. मला पक्षाने विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आता पक्षाकडे नाराजी बोलून न दाखवता यापुढे देखील पक्षाचं असंच काम सुरू ठेवेल, असंही त्यांनी नमूद केलं.

आज (31 डिसेंबर) सकाळी महाविकासआघाडीची म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि शेतकरी क्रांतीकारी पक्ष यांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले, तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रकाश शेळके यांच्या नावाची निवड करण्यात आली. दुसरीकडे माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयामध्येही भाजपची बैठक झाली. या बैठकीला आमदार राधाकृष्ण विखे, राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

भाजपच्यावतीने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला गेला. यावेळी अध्यक्ष पदासाठी भाजपकडून सुनिता खेडकर, तर उपाध्यक्ष पदासाठी संध्या आठरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र पुरेसे संख्याबळ नसल्याचं लक्षात आल्याने भाजपने माघार घेतली. या निवडणुकीत विखेंची कोणतीही जादू चालली नाही. निवडून आलेल्या राजश्री घुले आणि प्रताप शेळके यांनी राज्य महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जास्तीत जास्त निधी आणून विकास करणार असल्याचं सांगितलं.

या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे गटाने भाजपची मदत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असलेल्या तेरा सदस्यांनी गटनेता बदलून विखेंच्या पत्नी शालिनी विखेंना चेकमेट केलं. त्यानंतर गटनेतापदी थोरात गटाचे अजय फटांगरे यांना नेमण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये विखेंचं गणित चुकणार हे स्पष्ट झालं.

भाजपच्या बैठकीमध्ये या सर्व विषयांवर चर्चा झाली. संख्याबळ जुळत नाही. जर विखे गटानं पक्षादेश पाळला नाही, तर त्यांचं सदस्यत्व रद्द होणार हे लक्षात आल्यानंतर विखे गटावर चांगलीच नामुष्की ओढावली.

भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या पदासाठी दोन नावं दिली. मात्र, ऐनवेळी या दोघांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर बिनविरोध आपलं वर्चस्व केलं. निवडणूक झाली असती, तरी महाविकास आघाडीचं पारडं जड होत. आघाडीकडे 47 संख्याबळ होतं. आता या निकालानंतर जिल्ह्याचं राजकारण बदलणार हे निश्चित झालं आहे.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.