“मी स्वतःच्या घरात राहतो, धनंजय मुंडे भाड्याच्या घरात राहतात”- महादेव जानकर

सांगली : धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारने धनगर समाजाला फसवलेलं नाही‌. मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य पातळीवरचा होता, मात्र धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली. सांगली येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या …

“मी स्वतःच्या घरात राहतो, धनंजय मुंडे भाड्याच्या घरात राहतात”- महादेव जानकर

सांगली : धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारने धनगर समाजाला फसवलेलं नाही‌. मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य पातळीवरचा होता, मात्र धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली. सांगली येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर जानकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“माझ्यावर टीका करणाऱ्या धनंजय मुंडे यांना मी उत्तर द्यावं, एवढे धनंजय मुंडे मोठे नाहीत. मला उत्तर द्यायचचं असेल तर मी शरद पवारांच्या टीकेला देईल”, असे वक्तव्य जानकरांनी केले.

“मी स्वतःच्या घरात राहतो, धनंजय मुंडे भाड्याच्या घरात राहतात”, असे वादग्रस्त विधान जानकरांनी केले.

माहिती अधिकार टाकून लोकांना त्रास देणारे, ब्लॅकमेल करणारे, वाळू तस्करी करणारे आणि गुंडगिरी करणारे  पदाधिकारी आमच्या पक्षात नकोत. अशा त्रास देणाऱ्या लोकांना पक्षात घेऊ नका, पक्षातून हद्दपार करा अशी  तंबी महादेव जानकरांनी कार्यकर्त्यांना दिली.

सांगलीचे रासपचे पूर्वीचे जिल्हाध्यक्ष बोगस निघाले, असे सांगत तत्कालीन अध्यक्ष गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता जानकर यांनी बोचक टीका केली. पूर्वी जत, आटपाडी, खानापूरपुरता मर्यादित होता असेही जानकरांनी सांगितले.

आरएसएसचे काम फार चांगले आहे. मी त्यांचं प्रशिक्षण घेतल्यावर मला कळलं की, मी फार छोटा आहे. आरएसएसमध्ये संघटन, कष्ट, त्याग मोठा आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *