Pooja Chavan case | संजय राठोड यांच्या समर्थनार्थ रॅली, समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप

संजय राठोड याच्या समर्थनार्थ महंत आणि बंजारा समाज एकवटला आहे. (Banjara community support Sanjay Rathore)

Pooja Chavan case | संजय राठोड यांच्या समर्थनार्थ रॅली, समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप
संजय राठोड यांच्या समर्थनार्थ अशा प्रकारे रॅली काढण्यात आली
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 4:32 PM

यवतमाळ : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. हा मुद्दा विरोधी पक्षांनी लावून धरल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे. विरोधकांकडून राठोड यांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी होत आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे बंजारा समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप होत आहे. या अनुषंगाने संजय राठोड याच्या समर्थनार्थ महंत आणि बंजारा समाज एकवटला असून बंजारा समाजाने यवतमाळमधील दिग्रस येथे रॅली काढली आहे. तसेच या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदनसुद्धा दिले आहे. (Mahant and Banjara community have come together in support of Sanjay Rathore)

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर ऑडिओ क्लीपमधील आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचाच आहे असा दावा अनेकांकडून करण्यात येतोय. भाजपने तर थेट संजय राठोड यांचे नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या सर्व कारणांमुळे मागील काही दिवसांपासून संजय राठोड चर्चेत आले. मात्र भाजप तसेच विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाज पुढे आला आहे. त्यांनी पूजा चव्हाणला श्रध्दांजली वाहिली. तसेच पोहरादेवी इथल्या सुनील महाराज आणि जितेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली वसंत शास्त्री पुतळ्यापासून रॅली काढण्यात आली. त्यांनतर महंत सुनील महाराज यांच्या उपस्थित तहसील कार्यालयात तहसीलदारांना राठो यांच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

संजय राठोड यांचा राजीनामा?

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, संजय राठोड यांनी मुंख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला असल्याचे सांगितले जात असले तरी हे वृत्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फेटाळले आहे.

संबंधित बातम्या :

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे

पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचं: दीपक केसरकर

Pooja Chavhan case : पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार

(Mahant and Banjara community have come together in support of Sanjay Rathore)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.