LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

Picture

'विखेंना ती गोष्ट मनाला लागली'

राधाकृष्ण विखे पाटील नाराज झालेत ही वस्तूस्थिती आहे. ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली. पण त्याचा परिणाम आघाडीवर होणार नाही. आम्ही राष्ट्रवादीचा प्रचार करु, राष्ट्रवादी आमचा प्रचार करेल. नगरच्या बाबतीत थोडा वेगळा विषय आहे, त्याबाबत मार्ग काढू. पक्षातल्या नेत्यांमध्ये कुठलीही नाराजी नाही. राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा झाल्यावर निर्णय होईल.

14/03/2019

Picture

14/03/2019

Picture

पवारांचा विखेंना टोमणा

राधाकृष्ण विखे पाटील अजून काँग्रेसमध्ये आहेत याचा आनंद आहे, पवारांच्या वक्तव्याने दु:ख झाल्याच्या विखेंच्या प्रतिक्रियेवर शरद पवारांचा टोमणा

14/03/2019
Picture

ईशान्य मुंबईची जागा रिपाईंला मिळावी, रामदास आठवलेंची अमित शाहांकडे मागणी, मी राजसभेत आहे पण मला लोकसभा लढायची आहे – रामदास आठवले

14/03/2019

Picture

डॉ. सुजय विखे नगरच्या शिवसेना कार्यालयात दाखल, माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि पदाधिकारी यांची भेट घेतली, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीला सुरुवात

14/03/2019
Picture

#मुंबई – महाराष्ट्रातील भाजपची पहिली उमेदवार यादी 16 मार्चला जाहीर होणार, पहिल्या यादीत 17-18 जणांची नावे, 5-6 जागांच्या नावांवर खल सुरुच

14/03/2019
Picture

गडकरींच्या मतदारसंघात पंतप्रधानांच्या प्रचार सभा

नागपूर : नितीन गडकरींच्या मतदारसंघात नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेणार, नागपूर आणि अमरावतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती, गेल्या लोकसभेत 2 लाख 80 हजार मतांची आघाडी होती, यावेळेस त्यापेक्षा जास्त आघाडी मिळणार, नाना पटोले माझे मित्र होते आताही आहेत, त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा, नितीन गडकरींचं नागपुरात वक्तव्य

14/03/2019
Picture

नागपुरात गडकरी-प्रभू भेट

नागपूर – केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू नितीन गडकरी यांच्या भेटीला, सुरेश प्रभू नागपुरातील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल, थोड्याच वेळात दोन्ही नेत्यांनध्ये बैठक, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक

14/03/2019
Picture

पवारांकडून उमेदवारांची चाचपणी

पवारसाहेब स्वतः उमेदवार यादीची शेवटची चाचपणी करत आहेत. सर्व जागांचा फायनल आढावा घेतला जात आहे. लवकर उमेदवार यादी जाहीर केली जाईल. मित्रपक्षांनाही योग्य न्याय दिला जाईल – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

14/03/2019
Picture

प्रशांत किशोर 'मातोश्री'वर

मुंबई : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत ‘मातोश्री’वर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु, लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा सुरु, मतदारसंघांमधील बलस्थानं आणि कमतरता यावर चर्चा सुरु

14/03/2019
Picture

नितेश राणे आणि जानकर यांची भेट रद्द

नितेश राणे आणि महादेव जानकर यांची आजची भेट रद्द, चौथ्या आघाडीबाबत नाही तर सिंधुदुर्गात उमेदवारांसाठी ही भेट होणार होती, मात्र भेटीची बातमी लिक करुन चुकीचा मेसेज गेल्याने नितेश राणेंकडून भेट रद्द

14/03/2019
Picture

मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची पुण्यात संयुक्त बैठक

पुणे : भाजप-शिवसेनेच्या संयुक्त बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी पुण्यात, भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली कटूता दूर करण्याचा प्रयत्न, दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक, पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदार संघांतील दोन्ही पक्षांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार

14/03/2019
Picture

बारामतीच्या जागेचा तिढा सुटणार?

पुणे : बारामतीच्या लोकसभेच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महादेव जानकर चर्चा करणार, जानकरांनी भाजपकडून निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह, फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यावर जानकर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

14/03/2019
Picture

प्रियांका-राहुल यांचा प्रचार दौरा सुरु

नवी दिल्ली : प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रचार दौऱ्याला आजपासून सुरुवात, प्रियांका गांधी उत्तरप्रदेशच्या लखनौमधून प्रचारला सुरुवात करणार, तर केरळच्या कोझीकोड येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या प्रचाराला सुरुवात, तामिळनाडूच्या नागरकोईल आणि कन्याकुमारीमध्येही राहुल गांधी यांची प्रचार सभा

14/03/2019
Picture

सोलापुरातून भाजपकडून दिलीप कांबळे?

सोलापूर : भाजपकडून समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे यांची चाचपणी, सोलापुरातून उमेदवारीसाठी कांबळे यांना विचारणा करण्यात आली, कांबळेंनी अद्याप निर्णय कळवला नसल्याची माहिती, सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने दिलीप कांबळे यांच्या नावाचा विचार

14/03/2019
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *