Maharashtra Breaking News LIVE : सिक्कीम विधानसभेत आता विरोधी पक्षच नसणार
Maharashtra Election News LIVE : आज 31 ऑक्टोबर 2024. दापोली विधानसभा मतदार संघात राजकीय आरोप-प्रत्यारोप. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

राज्यात सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. काल निवडणूक अर्जांची छाननी झाली. अनेक ठिकाणी प्रचारसभा होत आहेत. यातून आराप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच उमेदवारी न मिळाल्याने नाराज असणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा नॉट रीचेबल होते. आता त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्याशी संपर्क झालेला असला तरी श्रीनिवास वनगा तीन दिवस नंतर अद्यापही घरी परतलेले नाहीयेत. या शिवाय अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत. आर. आर. आबांची लेक स्मिता पाटील यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
LIVE NEWS & UPDATES
-
भाजपचे आमदार ब्रह्मसिंग तन्वर यांनी ‘आप’मध्ये केला प्रवेश
तीन वेळा भाजपचे आमदार ब्रह्मसिंह तंवर यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. अरविंद केजरीवाल यांनी स्वतः तन्वर यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. ब्रह्मसिंह तन्वर 1993 आणि 1998 मध्ये मेहरौली आणि 2013 मध्ये छतरपूरमधून आमदार राहिले आहेत. याआधी ते तीनवेळा नगरसेवकही होते.
-
लडाख : दिवाळीनिमित्त भारत आणि चीनच्या सैन्याने एकमेकांना मिठाई दिली
पूर्व लडाखमध्ये दिवाळीनिमित्त भारत आणि चीनच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) एकमेकांना मिठाई दिली.
-
-
नेपाळमध्ये मोठा अपघात, टिप्पर अपघातात 2 भारतीयांचा मृत्यू
नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. टिप्पर अपघातात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. नेपाळमधील संखुवासभा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
-
उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली
उत्तर कोरियाने गुरुवारी नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (KCNA) ने सांगितले की, किम जोंग उन यांच्या आदेशानुसार गुरुवारी ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचे उड्डाण याआधी केलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा जास्त होते.
-
सिक्कीम विधानसभेत आता विरोधी पक्षच नसणार
सिक्कीम विधानसभेत आता विरोधी पक्षच नसणार अशी स्थिती झाली आहे. विधानसभेतील सर्वच्या सर्व 32 आमदार आता सत्ताधारी पक्षाचे असणार आहेत.
-
-
आशिष शेलार यांनी माहिती दडविली – वर्षा गायकवाड
आशिष शेलार यांनी आपल्या उमेदवारी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. काँग्रेस या प्रकणारत राज्य निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
-
जरांगे यांची सर्व धर्मियांची बैठक संपन्न
मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाची बैठक संपन्न झाली आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र येणार अशी घोषणा झाली आहे.
-
विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्याला राजकीय राड्याची परंपरा आहे. प्रत्येक निवडणुकीत हे राजकीय राडे पाहायला मिळतात. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे.
-
ठाकरे गटाच्या उमेदवारास हृदयविकाराचा झटका
चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. प्रभाकर सोनवणे हे जळगाव येथून चोपड्याला प्रचारासाठी जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
-
काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे सेनेत येणार
कोल्हापूर विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी त्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
-
राज ठाकरे यांच्यासोबत बोलणी सुरु- फडणवीस
राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. क्षेत्रिय अस्मितेला भाजपचं समर्थन राहिलं आहे. पण त्यासोबत राष्ट्रीय अस्मिता आहे. त्याचा स्वीकार व्हावा. ही राष्ट्रीय अस्मिता म्हणजे हिंदुत्व आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारलं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्यासोबत बोलणी सुरु आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
-
राज्यात महायुतीचे सरकार येणार- फडणवीस
राज्यातील जनतेच्या मनात विश्वास होत आहे. महायुतीचं सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. नामांकन पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म आले होते. त्याबाबत शिंदे यांच्या घरी बैठक झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
-
ऐन दिवाळीत सामान्य लोकांची वाहनांची तोडफोड
ऐन दिवाळीत सामान्य लोकांची वाहनांची तोडफोड झाली. पिंपरी चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र थांबलेले नाही. स्थानिक गुंडांनी हैदोस घालत केली 8 ते 10 वाहनांची तोडफोड करण्यात आली. दहशत पसरविण्यासाठी सर्व सामन्यांची वाहनं लक्ष करण्यात आली.चिंचवड मधील थेरगाव परिसरातील मध्य रात्री नंतर ही घटना घडली.
-
आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही -मनोज जरांगे पाटील
गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल तुमच्यावर अन्याय होणार नाही मात्र न्याय होईल. महाराष्ट्रात आणि देशातील सर्व जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. दिवाळीचा एक दिवसाचा आयुष्याला कधीच पुरत कायमचा आनंद मिळण्यासाठी एक एक मतदान करा घराच्या बाहेर पडा. तुमच्या लेकरांचे आणि जातीच्या बाजूने मतदान करा तरच कल्याण होणार आहे खरी दिवाळी आनंदाची होणार आहे. यांना धडा शिकवा, आपल्या लेकराला ज्यांनी तळपायाला लागलं त्यांची मया आता करू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
-
संजय राऊत यांचा राज ठाकरे यांच्यावर आरोप
आमदार निवडून येण्यासाठी मनसे नेते राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
-
अमरावती जिल्ह्यात भाजप व महायुतीला बंडखोरीचा फटका
अमरावती जिल्ह्यात भाजप व महायुतीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वच मतदार संघात आठ पैकी सहा मतदारसंघात बंडखोर उमेदवार रिंगणात आहे. भाजपचे 8,काँग्रेस 2 व ठाकरे गटाचे 1 बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
-
टोलमाफी करून शेवटचा मास्टरस्ट्रोक मारला
लेक लाडकी योजना आणि लाडकी बहीण योजना आणली. त्याच्या श्रेयवादाचा काहीच विषय नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर टोलमाफी करून शेवटचा मास्टरस्ट्रोक मारल्याचे ते म्हणाले.
-
मराठा आंदोलकांनी विचारला आमदारांना जाब
आमदार तुषार राठोड यांना मराठा आंदोलकांनी जाब विचारला. मुखेड तालुक्यातील होनवडज येथे आंदोलकांनी त्यांना विरोध केला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत विधानसभेत आरक्षणाबाबत प्रश्न का मांडत नाही म्हणत विरोध केला.
-
Maharashtra News: डोंबिवली पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवली विधानसभेचे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकत्र
महायुतीचे भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण, राजेश मोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार दिपेश मात्रे एकत्र एकाच मंचावर दिसले… मात्र महायुतीच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीचा उमेदवारांकडे पाहणं देखील टाळल
-
Maharashtra News: अमरावती जिल्ह्यात भाजप व महायुतीला बंडखोरीचा फटका बसणार…
अमरावती जिल्ह्यात सर्वच मतदार संघात आठ पैकी सहा मतदारसंघात बंडखोर उमेदवार रिंगणात… भाजपचे 8, काँग्रेस 2 व ठाकरे गटाचे 1 बंडखोर उमेदवार… मोर्शी-वरुड मतदार संघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत…
-
Maharashtra News: गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात अवकाळी पावसामुळे भात शेतीला खूप मोठा नुकसान
सध्या भातशेतीची कापणीची वेळ असून दिवाळी सणाच्या आदल्या दिवशी अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट.. दक्षिण भागातील अहेरी सिरोंचा या तालुक्यातील अनेक भागात भात व कापूस शेतीचे नुकसान… ऑक्टोबर शेवट किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या भागात भात शेतीची कापणी होत असते…
-
Maharashtra News: डोंबिवली फडके रोड दिवाळी पहाट
डोंबिवली फडके रोड दिवाळी पहाट कारेक्रमात रवींद्र चव्हाण उपस्थित… गणरायचं दर्शन घेत संस्कृतीत कारेक्रमाचा घेत आहे आनंद
-
वसई नालासोपारामध्ये शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या विरोधात वसई नालासोपारामधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. वसई विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस च्या उमेदवारा विरोधात शिवसेना उबाटा गटाचे विनायक निकम यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. वसई आणि नालासोपारा शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ असताना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या एकाधिकारशाही मुळे हे मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. पक्षाचा आदेश मानून आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेवून, आघाडीच्या उमेदवारांचे काम करणार, मात्र पक्षप्रमुखांनी आमचे म्हणणे एकूण घेवून, जिल्हाप्रमुख पंकज देशमुखांचा राजीनामा घ्यावा, शिवसैनिकांची एकमुखाने मागणी केली आहे.
-
महायुतीला बंडखोरीचा फटका?
अमरावती जिल्ह्यात भाजप आणि महायुतीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात आठ पैकी सहा मतदारसंघात बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे 8,काँग्रेस 2 व ठाकरे गटाचे 1 बंडखोर उमेदवार आहेत. मोर्शी-वरुड मतदार संघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. मोर्शी वरुड मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे दोन्ही उमेदवार रिंगणात आहेत. मैत्रीपूर्ण आणि बंडखोर उमेदवार असल्याने भाजप तसंच महायुतीच्या उमेदवाराची चिंता वाढली आहे.
-
श्रीनिवास वनगा अद्यापही घरी परतलेले नाहीत
नॉट रीचेबल असलेले श्रीनिवास वनगा तीन दिवसनंतर अद्यापही घरी परतलेले नाहीयेत. काल रात्री कुटुंबीयांना भेटल्यानंतर पुन्हा कुठे तरी नातेवाईकांकडे गेल्याच सांगण्यात येत आहे, असं सध्या घरी कुणीही नसल्याचं सांगितलं जात आहे. वनगा नक्की कधी परततील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि घरी परतल्यानंतर प्रसार माध्यमांशी कधी संवाद साधतील हे स्पष्ट होणार आहे. सध्या घरासमोरील गेट बंद असून कुणाला ही आत सोडलं जातं नाहीये.
-
अमरावती तरुणीवर सामूहिक अत्याचार
रागाने घराबाहेर पडलेल्या तरुणीवर पाच जणांचा सामूहिक अत्याचार झाला आहे. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे. 25 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराने अमरावती शहर हादरलं आहे. पाच आरोपींना अटक झाली आहे. चारचाकी गाडीत बसून युवकाने दारू पिऊन तरुणीवर बलात्कार झाला आहे. सर्व आरोपी अमरावती शहरातील आहेत.
Published On - Oct 31,2024 8:16 AM
