Maharashtra assembly elections: महाराष्ट्रात या जागांवर होणार कांटे की टक्कर?

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. याशिवाय तिसरी आघाडी देखील मैदानात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशा अनेक जागा आहेत जेथे कांटे की टक्कर होऊ शकते. मागच्या निवडणुकीत येथे अतिशय कमी फरकाने विजय आणि पराभव झाले होते. कोणत्या होत्या त्या जागा जाणून घ्या.

Maharashtra assembly elections: महाराष्ट्रात या जागांवर होणार कांटे की टक्कर?
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 9:50 PM

यंदा तीन विरुद्ध तीन अशा दोन आघाड्या एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र इतरही अनेक घटक स्वतंत्रपणे मैदानात आहेत. अशात काही हजार मतं किती निर्णायक ठरतात. 2019 ला किती ठिकाणी अटीतटीचे निकाल लागले. शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादीसोबत भाजपची महायुती., विरुद्ध ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेसच्या महाविकासआघाडीत यंदा प्रमुख लढत आहे. मात्र त्यात तिसरी आघाडी, वंचित आघाडी, मनसे आणि जरांगे फॅक्टर यामुळे काय घडेल याबाबत मोठी उत्सुकताही आहे.

2019 ला वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला अनेक जागांवर फटका बसला होता., यंदाही राजकीय समीकरणांच्या खिचडीनं एक-एक मतांसाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. 2019 च्या निकालात तब्बल 37 जागा अशा होत्या, जिथं उमेदवाराच्या जय-पराजयाचं गणित अवघ्या 500 पासून ते 5 हजार मतांनी ठरवलं.

काँग्रेसनं जवळपास 5 हजारांच्या आतल्या फरकानंच 4 जागा जिंकल्या. शिवसेनेनं त्याच फरकानं 4 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी 8 जागांवर अटीतटीच्या लढतीत विजय ठरली 2 पुरस्कृत अपक्ष मिळून भाजपला तब्बल 18 जागांवर निसटता विजय मिळाला.

इंदापुरात राष्ट्रवादीचा फक्त 3110 मतांनी विजय झाला होता. वडगाव शेरीत 4975 मतांनी, कोपरगावात 822 मतांनी. बीडमध्ये 1984 च्या फरकानं. चंदगडात 4385 मतांनी, घनसावंगीत 3409 मतांनी, सिन्नरमध्ये 2072 मतांनी आणि मोरगावात फक्त 718 मतांनी राष्ट्रवादीनं विजय खेचून आणला होता.

अक्कलकुवात काँग्रेस 2096 मतांनी, रिसोडमध्ये 2141, राजुरात 2501 तर नांदेड दक्षिणमध्ये 3592 मतांनी काँग्रेस विजयी ठरली. तर शिवसेनेचे उमेदवार चांदिवलीत फक्त 409 मतांनी, सांगोल्यात 768 च्या फरकानं, पाचोऱ्यात 2084 आणि कलिनात 4931 मतांनी विजयी झाले.

भाजप माळशिरसमध्ये 2590 मतांनी, पुणे कँन्टोमेंटमध्ये 5012 नं…दौंडमध्ये 746, उल्हासनगरात 2004, मूर्तीजापुरात 1910, माण-खटावमध्ये 3043, श्रीगोंद्यात 4750, खडकवासल्यात 2595, जिंतूरमध्ये 3717, चाळिसगावात 4287, अकोला पश्चिममध्ये 2593, नागपूर दक्षिणेत 4013, नागपूर मध्यमध्ये 4008, यवतमाळमध्ये 2253, अर्णीत 3153 आणि शिवाजीनगरात 5124 मतांनी भाजपचे उमेदवार विजयी ठरले होते. त्यामुळे यंदा इतकी राजकीय समीकरणं असताना अनेक जागांवर निकालाचं गणित रंजक ठरण्याची चिन्ह सर्वाधिक आहेत.

महाराष्ट्रात आता निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नेते सामान्य लोकांमध्ये जाऊन जनसंपर्क वाढण्याचा प्रयत्न करत आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांचा असणार आहे. कारण या निवडणुकीत अशा अनेक जागा आहेत जिथे कांटे की टक्कर होऊ शकते. अतिशय कमी फरकाने विजय किंवा पराभव होऊ शकते. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य.
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?.
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?.
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?.
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका...
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका....