Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Maharashtra Ssc, Hsc Exam Result Date 2021 : एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:47 PM, 21 Jan 2021
Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 'या' दिवशी होणार

मुंबईः कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यानं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होतंय. एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. (Maharashtra Ssc Hsc Board Exam And Result Date 2021 )

आता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केलीय. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. 12 वी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल आणि 10 वी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.


कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. राज्यात इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून, 18 जानेवारी 2021 रोजी 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत आणि 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या

Maharashtra School reopens | राज्यातील शाळा याच महिन्यात सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना तारीख सांगितली

Maharashtra Ssc Hsc Board Exam And Result Date 2021