Maharashtra News LIVE Update | माजी खासदार राजू शेट्टी यांची राज्य सरकारवर सडकून टीका

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | माजी खासदार राजू शेट्टी यांची राज्य सरकारवर सडकून टीका
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 01 Aug 2021 23:08 PM (IST)

  माजी खासदार राजू शेट्टी यांची राज्य सरकारवर सडकून टीका

  पर्यटनासाठी पूरग्रस्त भागामध्ये पाहणी करू नये, माजी खासदार राजू शेट्टी यांची राज्य सरकारवर सडकून टीका
  2019 तत्कालीन सरकारने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत केली होती. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये
  पूरग्रस्त भागामध्ये पंचनामे करताना दुजाभाव करू नये. सरकारने पंचनामे बाजूला ठेवून भरीव मदत करावी
 • 01 Aug 2021 19:54 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या सांगली दौरा, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार, कोकण, कोल्हापूर नंतर आता मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा

 • 01 Aug 2021 19:51 PM (IST)

  बदलापूर-वांगणीदरम्यान कोयना एक्सप्रेस बंद पडली

  बदलापूर-वांगणीदरम्यान कोयना एक्सप्रेस बंद पडली, इंजीनमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल, दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु

   

   

 • 01 Aug 2021 19:08 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या कर्जमाफीचे अभिनंदन करावे : गुलाबराव पाटील

  जळगाव :

  देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या कर्जमाफीचे अभिनंदन करावे

  आम्ही पूरग्रस्तांना आणि कर्जमाफी ही आधीपेक्षा चांगली केली आहे.

  मदतीचे निकष अधिप्रमाणे असले तरी आमची मदत चांगली आहे

  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर

 • 01 Aug 2021 16:05 PM (IST)

  नागपुरात गॅंगरेपची घटना, दोन दिवसांपूर्वीची घटना

  नागपूर :

  नागपुरात एका मुलीवर गॅंगरेपची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. संबंधित घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत घटनेची नोंद आहे. नागपुरात दोन दिवसांपूर्वी एक मुलगी घरातून निघून गेली असल्याची प्राथमिक माहिती

 • 01 Aug 2021 15:30 PM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यात 8 कोरोनामुक्त, 9 नवीन कोरोनाबाधित

  गडचिरोली जिल्हयात आज 09 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 8 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30603 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29800 वर पोहचली. तसेच सध्या 59 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकूण 744 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.19 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

 • 01 Aug 2021 15:03 PM (IST)

  पनवेलमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या पुतळ्याचे दहन

  पनवेल :

  पनवेलमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या पुतळ्याचे दहन

  वेळ आली तर सेना भवन तोडण्याच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक झाले आक्रमक

  कळंबोली शहरात महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन

  निषेध नोंदवत पुतळा जाळत प्रसाद लाड यांच्या विरोधात घोषणाबाजी

 • 01 Aug 2021 13:11 PM (IST)

  वेळ पडली तर शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या प्रसाद लाड यांची सुरक्षा वाढवली

  वेळ पडली तर शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या प्रसाद लाड यांची सुरक्षा वाढवली

  – घर आणि ऑफिसबाहेर साध्या वेशात पोलिसांचा बंदोबस्त

  – काल रात्री आले होते धमकीचे काॅल

  – संध्याकाळी पक्षाच्या आदेशाने सायन इथल्या कार्यालयात बोलावली जिल्हा स्तरीय बैठक

  – नितेश राणे बैठकीला ऊपस्थित राहणार

  – मनपा निवडणूक आणि आलेल्या धमकीबाबत पुढची रणनिती ठरणार

  सूत्रांची माहीती

 • 01 Aug 2021 11:39 AM (IST)

  अंबरनाथच्या डेंटल कॉलेज कोव्हिड सेंटरमध्ये नाश्त्यात आढळलं ‘फ्राय झालेलं पाखरू’

  अंबरनाथच्या डेंटल कॉलेज कोव्हिड सेंटरमध्ये नाश्त्यात आढळलं ‘फ्राय झालेलं पाखरू’

  साबुदाण्याच्या खिचडीत आढळलं पाखरू

  सुदैवाने हा नाश्ता एका चालकाच्या वाट्याला आला होता

  पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता नाश्ता उघडल्यानंतर त्यात पाखरू पडलं असावं, असा केला दावा

  तर चालकाच्या म्हणण्यानुसार नाश्ता उघडल्यानंतर त्यात शिजलेलं पाखरू आढळलं

 • 01 Aug 2021 10:06 AM (IST)

  कोल्हापुरात जबरदस्तीने घरात घुसून चाकुचा धाक दाखवत अनोळखीकडून विवाहित महिलेवर अत्याचार

  कोल्हापूर :

  जबरदस्तीने घरात घुसून चाकुचा धाक दाखवत अनोळखीकडून विवाहित महिलेवर अत्याचार

  कोल्हापूर जवळील पाचगाव मधल्या केएमटी कॉलनीतील परिसरातील धक्कादायक घटना

  कृत्या नंतर नराधम घराला बाहेरून कडी लावून पसार

  घटनेमुळे खळबळ,करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  कामा निमित्त पती सह भाड्याने राहत होती पीडित महिला

 • 01 Aug 2021 10:05 AM (IST)

  बिबट्याचा मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद, येवला तालुक्यातील महालखेडा येथील घटना

  – बिबट्याचा मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद

  – येवला तालुक्यातील महालखेडा येथील घटना

  – अमोल धूळसुदर या तरुण शेतकऱ्यांने कुत्र्याच्या शिकारीच्या तयारीत असलेल्या बिबट्याला केले मोबाईल कॅमेऱ्यात कैद

  – उस आणि मका शेताजवळील रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

  – पिंजरा लावून बिबट्याला कैद करण्याची केली येवला वन विभागाकडे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मागणी

 • 01 Aug 2021 09:30 AM (IST)

  मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, 3 लाखाच्या 10 दुचाकी जप्त

  पिंपरी चिंचवड

  -मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक,3 लाखाच्या 10 दुचाकी जप्त

  -निगडी पोलिसांनी ट्रान्सपोर्टनगर मध्ये कारवाई करत त्याच्याकडून 3 लाख दोन हजार रुपये किंमतीच्या 10 दुचाकी जप्त

  – रफिक मोहम्मद रशिद अली शेख, नीरज शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

 • 01 Aug 2021 09:28 AM (IST)

  महापुरामुळे धुळे, कोल्हापूर शहरात खासगी आणि सरकारी मालमत्तेचे मोठं नुकसान

  कोल्हापूर

  महापुरामुळे धुळे, कोल्हापूर शहरात खासगी आणि सरकारी मालमत्तेचे मोठं नुकसान

  नुकसानग्रस्त कामांसाठी जवळपास दीडशे कोटींची गरज

  निधीसाठी महापालिकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  रस्ते,सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पंपिंग स्टेशन आणि ड्रेनेज लाईन चे सर्वाधिक नुकसान

  महापालिकेच्या 24 मालमत्तांचा 3 कोटी 53 लाखांचे नुकसान तर 35 भागातील रस्त्यांची चाळण

 • 01 Aug 2021 09:06 AM (IST)

  यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जन्मदात्या आईवर मुलाने केला अत्याचार

  यवतमाळ –

  यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जन्मदात्या आईवर मुलाने केला अत्याचार

  वणीच्या ब्राम्हणी गावात राहणाऱ्या विकृत मुलाने आईवर केला अत्याचार

  आईने विष प्राशन करून आत्महत्येचा केला प्रयत्न ,

  पोलिसात गुन्हा दाखल

 • 01 Aug 2021 09:04 AM (IST)

  सोलापूर आज शहरात लसीकरण मोहीम नाही

  सोलापूर –

  आज शहरात लसीकरण मोहीम नाही

  लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरण मोहीम नाही

  आठवड्यातून एक दोन दिवसांचा अपवाद वगळता वारंवार होत आहे लसीचा तूटवडा

 • 01 Aug 2021 09:04 AM (IST)

  भाई गणपतराव देशमुख यांच्या अंत्य यात्रेत चोरट्यानी केली हातसफाई

  सोलापुर-

  भाई गणपतराव देशमुख यांच्या अंत्य यात्रेत चोरट्यानी केली हातसफाई

  सात ते आठ जणांची सोन्याची चेन लांबवली

  तर चार ते पाच जणांची पाकिटे केली लंपास

  सांगोला पोलिसात रात्री उशिरा या घटनेची नोंद

 • 01 Aug 2021 09:03 AM (IST)

  सोलापुरात कलेक्टर कचेरीत दफन करण्याचा इशारा देताच कब्रस्थानला मिळाली जागा

  सोलापूर -कलेक्टर कचेरीत दफन करण्याचा इशारा देताच कब्रस्थानला मिळाली जागा

  बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी गावातील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी नव्हती जागा

  गावात हाजद्दीन शेख या 55 वर्षीय व्यक्तीचे झाले होते निधन

  गावात दफनभूमीसाठी जागा नसल्याने थेट कलेक्टर कचेरीत दफन करण्याचा मुस्लिम बांधवानी दिला होता इशारा

  प्रशासनाने तत्परतेने गावात पाहणी करून गट क्रमांक 14 मधील जागा करून दिली उपलब्ध

 • 01 Aug 2021 08:24 AM (IST)

  पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात आढळला राज्यातला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण

  पुणे

  पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात आढळला राज्यातला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण

  २७ ते २९ जुलै या कालावधीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डेंग्यू चिकनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या पथकाने बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ४१ संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासले

  त्यामध्ये ५० वर्षीय महिलेला झिका विषाणूची बाधा झाल्याचे झाले स्पष्ट

  महिला चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग

  महिला सध्या पूर्णपणे बरी झालेली असून, कोणतीही लक्षणे नाहीत, तिच्या घरामध्येही कोणाला लक्षणे नाहीत

 • 01 Aug 2021 08:23 AM (IST)

  पुणे शहरात निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच

  पुणे

  पुणे शहरात निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच

  तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात तिसऱ्या स्तरातील नियम लागू केल्याने पुण्यात निर्बंध वाढले

  शहरात यापुढेही आत्तापर्यंतचे नियम लागू राहणार

  महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भात शनिवारी सायंकाळी काढले आदेश

 • 01 Aug 2021 08:21 AM (IST)

  खडकवासला धरणात आत्तापर्यंतचे सर्वात जास्त गढूळ पाणी

  पुणे :

  खडकवासला धरणात आत्तापर्यंतचे सर्वात जास्त गढूळ पाणी

  मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात माती खडकवासला धरणात वाहून आल्याने पाणी गढूळ होण्याचे प्रमाण तब्बल २०० नेफोलोमॅट्रीक टर्बिडीटी युनिटने वाढले

  आत्तापर्यंत पावसाळ्यात एवढे गढून पाणी कधीही आलेले नव्हते

  याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ नये यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांवर मोठ्याप्रमाणात औषधांचा वापर

 • 01 Aug 2021 08:19 AM (IST)

  कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास रुग्णांना उपचारासाठी खाटा कमी पडू नये यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु

  पुणे :

  कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास रुग्णांना उपचारासाठी खाटा कमी पडू नये यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु

  या अंतर्गत शहर व जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ८१ हजार खाटांचे नियोजन

  नियोजित एकूण खाटांपैकी लहान मुलांसाठी ६ हजार १६५ खाटा राखीव ठेवण्यात येणार

  विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती

 • 01 Aug 2021 08:01 AM (IST)

  मुंबईत आज ढगाळ वातावरण

  – मुंबईत आज ढगाळ वातावरण

  – काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळणार

  – मुंबई शहरातील वरळी, हाजी अली, नेपिअन सी रोड परिसरात रात्रीपासून पावसाच्या तुरळक सरी

 • 01 Aug 2021 07:50 AM (IST)

  नागपूर मेट्रोच्या झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशनला असतील 20 मजले

  नागपूर मेट्रोच्या झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशनला असतील 20 मजले

  नागपुरात आधुनिक, पर्यावरण पूरक, स्वस्त आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करतानाच, महा मेट्रो शहराचा कायापालट देखील करीत आहे.

  याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशाचे भौगोलिक मध्य असलेल्या झिरो माईल स्मारकाजवळ २० मजली इमारतीच्या बांधकामाकरता महा मेट्रोने निविदा काढली आहे.

  महा मेट्रोच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरचा भाग असलेले झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशन याच इमारतीत स्थित असेल.

  या २० मजल्यांपैकी पैकी २ भूमिगत मजले पार्किंग करता आणि ऊर्वरित १८ मजले इतर विविध कामांकरिता वापरले जातील.

  भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ८९.८१ मीटर उंच स्टेशन बांधण्याची परवानगी महा मेट्रोला दिली आहे.

  महा मेट्रोच्या पार्किंग व व्यावसायिक बांधकामा करण्याच्या धोरणांतर्गत पीपीपी मॉडेल वर आधारित या वस्तूचे बांधकाम होणार आहे.

 • 01 Aug 2021 07:43 AM (IST)

  पर्यटन स्थळांवर गर्दी न करण्याचे नाशिक पोलिसांचे आवाहन

  – पर्यटन स्थळांवर गर्दी न करण्याचे नाशिक पोलिसांचे आवाहन

  – अनेक पर्यटक नियम तोडून गाठतात पर्यटन स्थळ

  – नाशिक शहरालगत असलेल्या सोमेश्वर धबधब्यावर काल पर्यटकांनी केली होती मोठी गर्दी

 • 01 Aug 2021 07:42 AM (IST)

  घरोघरी लागलेले कूलर डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले

  नागपूर  –

  घरोघरी लागलेले कूलर डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

  पथकाद्वारे १ हजार ९५९ घरांमधील कूलर्सची तपासणी करण्यात आली.

  त्यात २०३ कूलर्समध्ये डेंग्यूची अळी आढळून आली.

  डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी घरातील कूलर कोरडे करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

  शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण सुरू आहे.

  शनिवारी शहरातील ६ हजार ४९७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.

  त्यात २८२ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.

  १२३ जणांच्या रक्ताचे नमुने तर २० जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत.

  सर्वेक्षणादरम्यान कूलर हे डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसून आले.

 • 01 Aug 2021 07:40 AM (IST)

  धावत्या कारमध्ये स्टंट बाजी करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांचा दणका, तिघांवर गुन्हे दाखल

  धावत्या कार मध्ये स्टंट बाजी करणार्यांना वाहतूक पोलिसांचा दणका

  तिघांवर वेगवेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल

  स्टंटबाजी चे विडिओ केले होते आरोपीवर सोशल मीडियावर व्हायरल

  कार च्या नंबर वरून पाटविण्यात आली ओळख

  रामलाल राठोड ,नागेश जोगेकर , अमोल काकडे यांच्या वर करण्यात आला गुन्हा दाखल

  मिहान मधील डब्लू बिल्डिंग परिसरात करत होते स्टंटबाजी

 • 01 Aug 2021 07:27 AM (IST)

  नाशिक शहरात 15 ऑगस्ट पासून नो हेल्मेट,नो पट्रोल मोहीम

  – नाशिक शहरात 15 ऑगस्ट पासून नो हेल्मेट,नो पट्रोल मोहीम

  – पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी वाहन चालकांना केले हेल्मेट घालण्याचे आवाहन

  – दुचाकीवरील होणाऱ्या अपघातांची संख्या,त्यात हेल्मेटची गरज लक्षात घेता आयुक्तांचा निर्णय

  – सर्व पेट्रोल पंप चालकांना दिल्या सक्त सूचना

 • 01 Aug 2021 06:37 AM (IST)

  महाड शहरातील पथदिवे चालु करण्यात प्रशासनाला यश

  रायगड

  महाड शहरातील पथदिवे चालु करण्यात प्रशासनाला यश

  २२ जुलै रोजी झालेला महापुर व भुसखंल्लन चा मोठा फटका महाड शहरसह ग्रामिण भागात पहायला भेटत असुन मागील 8 दिवस महाड मधील जनतेने विना विज काढली आहे.

  या वेळेस मेणबत्यांची मोठी मागणी व पुरवठा येथील जनतेला मदत कार्यातुन झाला.

  परंतु आता प्रशासनाला महाड शहरातील रस्ते व गल्ल्यामध्ये असलेले पथदिप काही प्रमाणात चालु करण्यात यश आले आहे.

  त्यामुळे मागील 8-9 दिवस रात्रीही अधांरातुन चालण्याविना कोणताही पर्याय महाड करांकडे नव्हता.

  परंतु आता महाड शहरातील तसेच पुरप्रभावित भागातील पथदिवे प्रशासनाने काही प्रमणात चालु केले असले तरी अद्याप पर्यंत रात्रभर विजपुरवठा अद्याप चालु झाला नाही.

 • 01 Aug 2021 06:36 AM (IST)

  महाड शहरात रात्रीही चिखल साफ सफाईची कामे

  रायगड

  महाड शहरात रात्रीही चिखल साफ सफाईची कामे

  २२ जुलै रोजी झालेल्या पुरा मध्ये महाड शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे प्रशासनाने यांत्रीक तसेच मजुर लावुन चिखल साफ सफाई चालु केली.

  मात्र ९ दिवस होऊनही अद्याप महाड शहरातील चिखल साफ झाली नसल्याने रात्रीही JCB च्या सहाय्याने शहरातील रस्ते व गल्लीबोळ साफसफाई मोहीम प्रगतीपथावर आहे.

  शहरातील अनेक भागातील रस्ते, नाले, गटारे साफ सफाई मोहीम चालु असल्याचे समोर आले आहे.

  प्रशासनाने जिल्ह्यातुन तसेच जिल्हा बाहेरुन सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्रे मागवुन रस्त्यावरील चिखल तसेच पुरामध्ये शहरात झालेला कचरा साफ सफाई मोहीम रात्रीही मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI