Maharashtra News LIVE Update | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची शिक्षा, 15 हजारांचा दंड

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची शिक्षा, 15 हजारांचा दंड
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 16 Aug 2021 21:29 PM (IST)

  निलेश राणेंचा उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर गंभीर आरोप

  निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

  रत्नागिरीच्या रेस्ट हाऊसमध्ये उदय सामंत आणि किरण सामंत यांचे बॉडीगार्ड आणि कार्यकर्ते रात्रीच्या वेळी काय करतात ? असा थेट सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. संध्याकाळनंतर काम काय असतं रेस्ट हाऊसमध्ये करण्यासारखं? उशीरापर्यंत लोकं तिथून बाहेर पडतात. काय करतात आतमध्ये? हे रेस्ट हाऊस कशासाठी वापरलं जातं हे एकदा जनतेला कळूद्या. सगळा नंगा नाच सुरू आहे रत्नागिरीत रेस्ट हाऊसमध्ये.

  गेली पंधरा वर्षे सामंताना मी बघतोय मंत्री झाले तरी बदल होत नाही. तोच घाणेरडा प्रकार. रेस्ट हाऊस स्वतःच्या बापाचं असल्या सारख वापरायचं, घाणेरडे गोष्टी तीथे चालतात उशीरापर्यंत. कार्यकर्ते काय करत असतात आतमध्ये? हे लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी थांबवावं,  अन्यथा अधिकाऱ्यांच्याचं अंगावर जाणार.

 • 16 Aug 2021 20:57 PM (IST)

  नागपुरात पावसाला सुरुवात, कुठे रिमझिम तर कुठे साधारण

  नागपूर :

  नागपुरात पावसाला झाली सुरुवात

  काही भागात रिमझिम तर काही भागात साधारण पाऊस

  हवामान विभागाने दिला होता विदर्भात पावसाचा इशारा

 • 16 Aug 2021 20:16 PM (IST)

  काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात स्वतंत्र सेनानी कंटाळून निघून गेले

  – काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात स्वतंत्र सेनानी कंटाळून निघून गेले – नाना पटोले यांच्या हस्ते होणार होता स्वतंत्र सेनानीचा स्वागत – दुपारी 12 वाजे पासून ताटकळत होते कार्यक्रम स्थळी बसून – साडेतीन वाजेचा नियोजित कार्यक्रम असताना रात्री आठ पर्यंत नाना पटोले आले नाहीत कार्यक्रम स्थळी – पाटोलेंना उशीर झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला स्वतंत्र सेनानीचा स्वागत – स्थानिकानकडून स्वागत होताच नाना पटोले यांची वाट न पाहता वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानीं निघून गेले

 • 16 Aug 2021 20:15 PM (IST)

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची शिक्षा, 15 हजारांचा दंडही

  अमरावती :

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना न्यायालयाने सुनावली तीन महिन्यांनी शिक्षा, १५ हजारांचा दंडही ठोठावला

  देवेंद्र भुयार पंचायत समिती सदस्य असतांना २०१३ साली शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात केले होते तीव्र आंदोलन

  कलम 353 अंतर्गत अमरावती न्यायालयाने सुनावली शिक्षा

  तत्कालीन तहसीलदार राम लंके यांच्या विरोधात केले होते वरुड तहसील कार्यालयावर आंदोलन

 • 16 Aug 2021 17:22 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 128 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 185 रुग्णांना डिस्चार्ज

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 128 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  – दिवसभरात 185 रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधीत 15 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 6

  – 203 रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 490574

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2035

  – एकूण मृत्यू – 8853

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 479686

 • 16 Aug 2021 15:33 PM (IST)

  मनसे नेते गजानन काळे यांना लवकरच अटक होईल, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांची माहिती

  गजानन काळे यांना अटक करावी यासाठी महाविकास आघाडीच्या महिलांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

  गजानन काळे यांच्या पत्नीही महाविकास आघाडीच्या महिलांसोबत भेटल्या

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्त्रियांशी केली बातचीत

  गजानन काळे यांना लवकरच अटक होईल, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांची Tv9 ला माहिती

  राष्ट्रवादी आणि सेनेच्या महिला गजानन काळे यांना अटक करण्यासाठी आक्रमक

 • 16 Aug 2021 15:25 PM (IST)

  डॉ. भारती पवारांच्या जनआशीर्वाद यात्रेच डहाणूमधील महालक्ष्मी मंदिर परिसरात आगमन  

  पालघर : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे डहाणूमधील महालक्ष्मी मंदिर येथे आगमन

  आदिवासी तराफा नृत्याने करण्यात आले स्वागत

  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ. मनीषा चौधरी यांनी मंदिराबाहेरच केली महालक्ष्मीची पूजा

  दर्शना नंतर जनआशीर्वाद यात्रा तलासरी कडे रवाना

 • 16 Aug 2021 15:23 PM (IST)

  वीस दिवसाच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात पावसाची बॅटिंग

  गोंदिय : पंधरा ते वीस दिवसाच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात पावसाची बॅटिंग

  रखडलेल्या धान लावणीला येणार वेग

  शेतकरी सुखावला, नागरीकांची उकाड्यापासून सुटका

 • 16 Aug 2021 15:10 PM (IST)

  केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली, पण ही ओबीसींची शुद्ध फसवणूक : शरद पवार

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  केंद्राच्या निर्णयाविरोधात जनमत तयार करण्याची राष्ट्रवादीची भूमिका

  लोकसभेत सुप्रिया सुळेंनी पक्षाची भूमिका मांडल्या, त्यात त्यांनी सांगितलं , मर्यादा हटवण्याची आवश्यक आहे

  भुजबळांची मागणी, केंद्राने इम्पेरिकल डाटा द्यावा, ते करण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे, ते होत नाही तोपर्यंत काही होणार नाही, जातीनिहाय जनगणना होत‌ नाही तोपर्यंत या घटकांना न्याय मिळणार नाही

  दोन वर्षापूर्वी राज्याचे अधिकार काढून घेतले आणि आता परत दिले.

  इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यानुसार, आरक्षण मर्यादेची लक्ष्मण रेखा ओलांडावी लागेल, त्यासाठी जनमत तयार करावं लागेल

  केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली. पण ही ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे

  ताट भरुन दिले, पण केंद्राने हात बांधले

  केंद्राने राज्याला इम्पेरिकल डेटा द्यावा

  इपेरेकिल डेटा दिल्याशिवाय काही होणार नाही. ते का देत नाही हे कळत नाही. केंद्र सरकारला त्यांचं पितळ उघडं पडण्याची भिती वाटते

  जातनिहाय जनगणना केली तर अधिक स्पष्टता येईल, लहान घटकांना कुठे किती संधी आहे त्याची माहिती मिळेल

  जोपर्यंत ५० टक्के आरक्षण मर्यादा अधिकार मिळत‌ नाही तोपर्यंत आरक्षणाचा घोळ होईल

  जेवणाला निमंत्रण दिलंय पण हात बांधून ठेवलेत‌, अशी भूमिका केंद्राची आहे

  कोणत्या राज्यात किती टक्के आरक्षण, शरद पवारांनी सांगितलेली आकडेवारी

  हरियाणा- 67 राजस्थान 64 तेलंगाणा 62 त्रिपुरा 60 मणिपूर 60 दिल्ली 60 बिहार 60 पंजाब 60 केरळ 60 झारखंड 60 आंध्र 60 उत्तर प्रदेश 59.60 हिमाचल 59 गुजरात 59 पश्चिम बंगाल 55 गोवा 51 दीव दमण 51 पाँडेचरी 51 कर्नाटक 50

 • 16 Aug 2021 12:16 PM (IST)

  मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोना पॉझिटिव्ह

  मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईतील कोरोना संकट थोपवण्यात महत्वाचा वाटा असलेल्या सुरेश काकाणींना अखेर कोरोनाने गाठले, सेव्हन हिल्स रूग्णालयात चेकअपसाठी गेले होते. लक्षणे नसल्याने ते परत घरी आले असून होम क्वारंटाईन झाले आहेत.

 • 16 Aug 2021 11:57 AM (IST)

  भंगार अंगार या काय घोषणा काय देताय? पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या

  घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी झापलं, चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, चांगल्या घोषणा द्या, भंगार अंगार या काय घोषणा देतायत, हे संस्कार आहेत का आपले? पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना झापले

  भागवत कराड पंकजाच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रितमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, यात्रेआधीच राडा 

 • 16 Aug 2021 10:58 AM (IST)

  पनवेल रेल्वे स्टेशनवर मासिक पाससाठी गर्दी

  पनवेल रेल्वे स्टेशनवर मासिक पाससाठी गर्दी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणाऱ्यांची लगबग, दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास करण्याची मुभा, ऑफलाईन पडताळणी केंद्रावर तुरळक प्रवासी, ऑफलाईन पडताळणी ऐवजी ऑनलाईन पडाळणीला नागरिकांची पसंती, सोशल डिस्टन्स आणि मास्क न घातलेल्या नागरिकांना रेल्वे पोलिसांची तंबी

 • 16 Aug 2021 09:37 AM (IST)

  मंदिरं उघडण्यासाठी भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक, मंदिराबाहेर शिवलिंगाची स्थापना

  औरंगाबाद : मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर आज पुन्हा एकदा भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक, मंदिराबाहेर शिवलिंग स्थापन करून करणार सरकारचा निषेध, भाजप अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष तुषार भोसले यांच्या हस्ते मंदिराबाहेर शिवलिंगाची महापूजा, हेच शिवलिंग भाविकांना बाहेर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाजप अध्यात्मिक आघाडी कार्यकर्ते उपस्थित

 • 16 Aug 2021 08:51 AM (IST)

  Kolhapur delta plus : कोल्हापूरमध्ये डेल्टा पल्सचे 7 रुग्ण

  कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये डेल्टा पल्सचे 7 रुग्ण, कोल्हापूर शहरात 3 तर जिल्ह्यात 4 ,दिल्ली येथील लॅबमध्ये पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 डेल्टा, जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच डेल्टा वाढल्याने खळबळ, आरोग्य विभाग, प्रशासन सतर्क

 • 16 Aug 2021 08:31 AM (IST)

  Mumbai Guidelines : मुंबईत आजपासून सर्व सुरु, रात्री 10 पर्यंतची अट, दोन डोस आवश्यक

  मुंबईतील सर्व मैदाने , उद्याने , चौपट्या , समुद्र किनारे खुली होणार, सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत खुली राहतील

  हॉटेल

  हॉटेल ५० टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुली, हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक, एसी हॉटेलमधील खिडक्या उघड्या ठेवणे बंधनकारक

  दुकाने सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवता येणार दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक

  शॉपिंग मॉल

  सर्व शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक

 • 16 Aug 2021 08:22 AM (IST)

  सोलापुरात वीजग्राहकांकडे 132 कोटी 52 लाखांची थकबाकी

  सोलापूर : जिल्ह्यात 3 लाख 34 हजार 563 वीजग्राहकांकडे 132 कोटी 52 लाखांची थकबाकी. वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक घडी विस्कटल्याने  आणि अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांच्या वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग. थकबाकी वाढत असतानाच कृषीपंपाच्या चालू वीज बिलांचा देखील  भरणा होत नसल्याने महावितरणकडून वीज पुरवठा करण्याची कटू कारवाई सुरू

 • 16 Aug 2021 08:15 AM (IST)

  मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता 82 टक्के जलसाठा

  जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांत ६० ते ७० टक्के जलसाठा जमा झाला. मात्र मागील काही दिवस पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. सध्या तलाव क्षेत्रात ८२ टक्के जलसाठा जमा आहे. मुंबईत महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. जुलैअखेरीपर्यंत तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर हे प्रमुख तलाव भरून वाहू लागले, तर अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या मोठ्या तलावांमध्येही ७५ टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमध्ये मिळून सध्या ११ लाख ८० हजार ४२१ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे.

 • 16 Aug 2021 08:12 AM (IST)

  नालासोपारा येथे ट्रान्सफार्मरचा स्फोट, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

  नालासोपारा पूर्वेकडील चंदन नाका येथे महावितरणच्या ट्रान्सफार्मरचा पहाटे चारच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे समजू शकले नाही, वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

 • 16 Aug 2021 07:41 AM (IST)

  राज ठाकरे यांना पुरंदरे यांच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, प्रविण गायकवाड यांची टीका

  पुणे –

  – राज ठाकरे यांना पुरंदरे यांच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही,

  – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांची राज ठाकरेंवर टीका,

  – शरद पवारांच्या बदनामीसाठी राज ठाकरे राष्ट्रवादीवर टीका असल्याचा आरोप,

  – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता,

  – त्याला प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टद्वारे उत्तर दिलंय.

 • 16 Aug 2021 07:13 AM (IST)

  विदर्भाच्या बऱ्याच भागात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पाऊस गायब

  – विदर्भाच्या बऱ्याच भागात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पाऊस गायब

  – पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकं संकटात

  – पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस आणि धान पिकाचं मोठं नुकसान

  – मोठं आर्थिक नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

  – दोन तीन दिवसांत पाऊस आला नाही तर सोयाबीन पिकाला मोठा फटका

  – पावसाचा खंड पडल्याने विदर्भात सोयाबीन उत्पादन घटणार

 • 16 Aug 2021 07:05 AM (IST)

  नागपूर महानगरपालिकेतं भाजपचं मिशन युवा मतदार

  – नागपूर महानगरपालिकेतं भाजपचं मिशन युवा मतदार

  – भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचे आज नागपूरात ‘युवा वॅारीयर्स’ मेळावे

  – नागपूर महानगरपालिकेतंही राबवणार ‘वन बूथ २५ युथ’चा फॅार्म्युला

  – बावनकुळेच्या हस्ते आज युवा वॅारियर्स शाखांचं आज उद्घाटन

  – मनपा निवडणूकीत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपच मिशन युवा मतदार

 • 16 Aug 2021 06:43 AM (IST)

  भिमाशंकर येथे आज पहाटेची आरती मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली

  आज श्रावण मासातील दुसरा सोमवार

  बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या भिमाशंकर आज पहाटेची आरती मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली

Published On - 6:35 am, Mon, 16 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI