Maharashtra News Live Update : सांगोला-मिरज मार्गावर करांडेवाडी येथे भीषण अपघात

| Updated on: Aug 02, 2021 | 11:58 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News Live Update : सांगोला-मिरज मार्गावर करांडेवाडी येथे भीषण अपघात
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Aug 2021 10:43 PM (IST)

    सांगोला-मिरज मार्गावर करांडेवाडी येथे भीषण अपघात

    पंढरपूर : सांगोला-मिरज मार्गावर करांडेवाडी येथे भीषण अपघात

    ट्रक आणि कारची समोरासमोर धडक

    तीन जणांचा जागीच मृत्यू तर तेरा जण जखमी

    अपघातातील मयत आणि जखमी सर्व गुलबर्गा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती

  • 02 Aug 2021 10:02 PM (IST)

    पुरंदर तालुक्यातील निरा येथे आढळले कोरोनाच्या डेल्टा प्रारुपाचे दोन रुग्ण 

    पुरंदर : पुरंदर तालुक्यातील निरा येथे आढळले डेल्टाचे दोन रुग्ण

    – निरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आढळले दोन रुग्ण

    थोपटेवाडी येथील 14 वर्षीय मुलासह एका 48 वर्षीय महिलेला झाली डेल्टाची लागण

    25 जणांची करण्यात आली होती तपासणी, त्यातील दोघेजण डेल्टाबाधित

    – दोघांवरही उपचार सुरु

    – नागरिकांनी न घाबरता तपासणी करुन घेण्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांचे आवाहन

  • 02 Aug 2021 09:47 PM (IST)

    बेकायदा बैलगाडा शर्यत भरविल्याप्रकरणी साताऱ्यात सात जणांवर गुन्हा दाखल 

    सातारा: बेकायदा बैलगाडा शर्यत भरविल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

    कोरोना संसर्ग आणि जमावबंदीचे आदेश झुगारून बैलगाडा पाहण्यासाठी आलेल्या अज्ञात 100 ते 150 जणांवरदेखील गुन्हे दाखल

    धोंडेवाडी गावालगत बैलगाडी शर्यतबंदी आदेशाचे उल्लंघन करत ग्रामस्थांनी भरवल्या होत्या बैलगाडा शर्यती

    शर्यत पाहण्यासाठी परिसरातील शेकडो लोकांची होती उपस्थिती

    खटाव तालुक्यातील मायनी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

  • 02 Aug 2021 09:46 PM (IST)

    नवी मुंबईत दोन बहिणींनी केली आत्महत्या, सागरदर्शन सोसायटीमधील घटना

    नवी मुंबई : दोन संख्ख्या बहिणींनी केली आत्महत्या

    ऐरोली मधील राहत्या घरात गळफास लावून केली आत्महत्या

    लक्ष्मी पंत्री 33 वय आणि स्नेहा पंत्री 26 वय असं आत्महत्या केलेल्या बहिणींचे नाव

    हॉल आणि बेडरूममध्ये पंख्याला घेतला गळफास

    ऐरोली सेक्टर 10 मधील सागरदर्शन सोसायटीमधील घटना

    कोरोना काळात आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली असल्याचा संशय

  • 02 Aug 2021 08:00 PM (IST)

    सरकारच्या नव्या गाईडलाईनवर पुण्यातील व्यापारी नाराज, सरकारने निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरणार 

    पुणे - सरकारच्या नव्या गाईडलाईनवर पुण्यातील व्यापारी नाराज

    - सरकारने निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरणार

    - सरकारच्या विरोधात व्यापारी उद्या घंटा नाद आंदोलन करणार

    - शिवाय आमच्यावर खटले भरले तरी चालेल मात्र बुधवारपासून दुकानं खुली करणार

  • 02 Aug 2021 07:22 PM (IST)

    इंदापुरात अवैध वाळू उपसा करणार्‍या बोटींवर मोठी कारवाई 

    इंदापूर : अवैध वाळू उपसा करणार्‍या बोटींवर मोठी कारवाई

    इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात कारवाई

    महसूल व पोलीस प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा करणार्‍या नऊ बोटी उद्ध्वस्त

    जिलेटीनच्या सहाय्याने केलेल्या उद्ध्वस्त

    वाळू चोरांचा 1 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल नष्ट

    दोन दिवसापूर्वी उजनी पाणलोट क्षेत्रात झाली होती अशीच कारवाई

  • 02 Aug 2021 07:21 PM (IST)

    नागपुरात आज 3 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट -

    नागपुरात आज 3 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    मृत्यू संख्या शून्य

    तर 9 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्ण संख्या - 492892

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 482587

    एकूण मृत्यू संख्या - 10117

  • 02 Aug 2021 06:56 PM (IST)

    कल्याणमध्ये ठिकठिकाणी कचरा साचल्याने पसरली दुर्गंधी, कचरा उचलला नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा 

    कल्याण : पालिकेच्या नयोजन शून्य कचरा मोहिमेचे तीन तेरा

    ठिकठिकाणी कचरा साचल्याने पसरली आहे दुर्गंधी

    वारंवार तक्रार करुनदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष

    माजी नगरसेवकासह नागरीकांनी कचरा पेटवून प्रशासनाचा केला निषेध

    कचरा उचलला नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा

  • 02 Aug 2021 05:54 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 57 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

    नाशिक कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 80

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 57

    नाशिक मनपा- 026

    नाशिक ग्रामीण- 030

    मालेगाव मनपा- 000

    जिल्हा बाह्य- 001

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 8520

    आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 03

    नाशिक मनपा- 01

    मालेगाव मनपा- 00

    नाशिक ग्रामीण- 02

    जिल्हा बाह्य- 00

  • 02 Aug 2021 05:52 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 142 नव्या कोरोना रुग्णांची वाढ 

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 142 कोरोना रुग्णांची वाढ

    - दिवसभरात 243 रुग्णांना डिस्चार्ज

    - पुण्यात करोनाबाधीत 7 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 2

    - 218 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 487563

    - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2306

    - एकूण मृत्यू -8779

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज-  486478

  • 02 Aug 2021 05:29 PM (IST)

    पुण्यातील तुळशीबाग मार्केटमध्ये खरेदीसाठी पुणेकरांची तुफान गर्दी

    पुणे - पुण्यातील तुळशीबाग मार्केटमध्ये खरेदीसाठी पुणेकरांची तुफान गर्दी

    - पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली

    - महिलांच्या खरेदीसाठी तुळशीबाग मार्केट प्रसिद्ध

    - शनिवार आणि रविवार बंद असल्यामुळे आज खरेदीसाठी महिलांची गर्दी

    - राज्य सरकारच्या आदेशानुसार मार्केट 4 वाजता बंद केले

  • 02 Aug 2021 05:12 PM (IST)

    दुकानं रात्री 8 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी द्या, पुण्यातील निर्बंधांविरोधात व्यापारी आक्रमक  

    पुणे - पुण्यातील निर्बंधांविरोधात व्यापारी आक्रमक

    - मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाने लवकर आदेश काढावेत

    - दुकानं 8 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळावी

    - अन्यथा उद्यापासून दुकानं खुली ठेवणार

    - पुणे शहर लेव्हल 2 मध्ये असताना लेव्हल 3 आणि 4 चे निर्बंध का ? व्यापाऱ्यांचा सवाल

  • 02 Aug 2021 05:07 PM (IST)

    तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात भारतीय मागे नाहीत हे जगाला दाखवून दिलं: नरेंद्र मोदी

    तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात भारतीय मागे नाहीत हे जगाला दाखवून दिलं: नरेंद्र मोदी

  • 02 Aug 2021 05:06 PM (IST)

    आर्थिक व्यवहारांसाठी पैशांऐवजी ई-रुपीचा वापर करता येणार: नरेंद्र मोदी

    सरकारचं नाही तर सामान्य संस्था किंवा संघटना कोणत्याही व्यक्तीच्या आजारामध्ये, शिक्षणामध्ये किंवा दुसऱ्या कामासाठी एखाद्याला मदत करायची असेल तर लोक पैशांच्या ऐवजी ई-रुपीचा वापर करु शकतात. यामुळे व्यक्तीनं ज्या कारणासाठी पैसे दिले आहेत त्या कारणासाठी त्याचा वापर होईल.

    ई-रुपी हे एक प्रकारे व्यक्तीला ज्या कारणासाठी खर्च करायचा आहे त्यासाठी वापरलं जाईल. ज्यासाठी याचा लाभ दिला जात आहे त्यासाठीचं हे वापरलं जाईल.

    पहिल्यांदा आपल्या देशात काही लोक तंत्रज्ञान ही केवळ श्रीमंतांची बाब असल्याचं म्हटलं जात होतं. भारत हा गरिब देश आहे, भारतान तंत्रज्ञानासाठी काय काम केलं. आमच्या सरकारनं तंत्रज्ञानाला मिशन बनवलं. काही लोकांनी, राजकीय नेत्यांनी या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं. जनतेनं त्यांना नाकारलं आहे आणि त्यांना चुकीचं ठरवलं आहे.

  • 02 Aug 2021 04:52 PM (IST)

    ई-रुपीमुळं डिजीटल व्यवहार, डीबीटीला प्रोत्साहन

    देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना ई-रुपी लाँंच होत आहे. आज देशात डिजीटल गर्वनन्सचं रुप समोर आलं आहे. ई-रुपी व्हाऊचर देशातील डिजीटल व्यवहार , डीबीटी ला मजबूत करण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे.

  • 02 Aug 2021 04:48 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-रुपीचं लाँचिंग

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-रुपीचं लाँचिंग करण्यात आले आहे. ई-रुपीद्वारे मुंबईतील  एका कोरोना  लसीकरण केंद्रावर महिलेनं लस खरेदी केली.

  • 02 Aug 2021 04:33 PM (IST)

    कोकणातील पूरपरिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश : हुसेन दलवाई

    चिपळूण - कोकणातील पूरपरिस्थिला कोकणातील नेतेच जबाबदार

    साताऱ्यात उपमुख्यमंत्री 100 कोटी जाहीर करतात, मात्र कोकणात मुख्यमंत्री स्वतः येऊनही केवळ 10 हजाराची मदत ?

    कोकणातील पूरपरिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश

    सरकारने ज्या पद्धतीने मदत केली त्याबद्दल हुसेन दलवाई यांची सरकारवर नाराजी

    सरकारने तातडीने कोकणाला 300 कोटींचं पॅकेज जाहीर करायला हवं

    प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांची राज्य सरकारवर टीका

  • 02 Aug 2021 03:45 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस सुरू

    या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मिळणार जीवदान

    तर जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीपातळीत होणार वाढ

  • 02 Aug 2021 03:07 PM (IST)

    पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क

    पुणे -

    - पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क

    - बेलसर गावात आणि परिसरात १३ टीम कुटुंबाचे सर्वेक्षण करत आहेत

    - आतापर्यंत १६ गरोदर महिला सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलेत

    - स्थलांतरित व्यक्तीची रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार

    - गप्पी मासे सोडले जाणार आहेत

  • 02 Aug 2021 02:44 PM (IST)

    कोयना धरणाचा कोयना नदीतील पाणी विसर्ग केला कमी

    कराड -

    कोयना धरणाचा कोयना नदीतील पाणी विसर्ग केला कमी

    धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग 50 हजाराहुन 10 हजार क्युसेक केला

    धरणात 13,993 क्युसेक पाणी आवक सुरु

    कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कमी

    कोयना धरणाचे सहा दरवाजे 10 फुटावरुन 01.6 वर

    कोयना धरणात 84.77 टीएमसी पाणीसाठा

    धरणातुन 9,895 क्युसेक पाणी विसर्ग सुरु

  • 02 Aug 2021 02:37 PM (IST)

    शिर्डी नगरपंचायत सत्ताधाऱ्यांवर उपोषणाची वेळ

    शिर्डी नगरपंचायत सत्ताधाऱ्यांवर उपोषणाची वेळ

    भाजप नगरसेवकांचे महावितरण कार्यालयासमोर उपोषण

    घरगूती , हॉटेल व्यवसायिक आणि छोट्या दुकानदारांची विज तोड सुरू असल्याने सुरू ‌केले आमरण उपोषण

    शिर्डीचे अर्थकारण ठप्प असताना विज वितरणचा तुघलकी निर्णय

    विज बिल भरण्यास मुदत द्यावी

    विज तोड करू नये अशी उपोषणकर्त्यांची मागणी

    साईमंदिर बंद असल्याने मंदिर सुरू होईपर्यंत मुदत द्यावी

    ग्रामस्थांकडून नगरसेवकांच्या उपोषणास मोठा पाठींबा

  • 02 Aug 2021 12:48 PM (IST)

    मनसे आणि भाजप युतीचे चंद्रकांत दादांचे संकेत

    मनसे आणि भाजप युतीचे चंद्रकांत दादांचे संकेत

    राज ठाकरे खरं बोलतात, त्यांनी मला क्लीप पाठवली

    दोन दिवसात त्या़ची भेट होईल

    मी ती क्लीप ऐकली आणि माझं म्हणणं मी त्यांच्यासमोर ठेवेन

    मुझे तो आम से मतलब किससे मिली क्या मतलब

    मेरे को क्लीप मिली मैने सुनी

    मी एकटा निर्णय घेणार नाही

    आमची पार्टी या संदर्भात निर्णय घेणार

    आता युती ही ऑनस्पॉट घेणार नाही

    मनसेच परप्रांतीयांना होणारा विरोध ही अडचण आहे,

    ही अडचण दूर झाली तर मी ओके देईन

  • 02 Aug 2021 12:44 PM (IST)

    केवनाळ गावातील 13 वर्षीय साक्षीला भेटण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर केईएम रुग्णालयात दाखल

    पोलादपूर इथे दरड कोसळलेल्या केवनाळ गावातील 13 वर्षीय साक्षीला भेटण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर केईएम रुग्णालयात दाखल..

    १३वर्षीय साक्षीवर केईएम रुग्णालयात साक्षीवर सुरू आहेत ऊपचार…

    दरड कोसळताना नवजात बाळाचा वाचवला जीव.. पण जीव वाचवण्याची पाय गमावून मोजावी लागली किंमत…डावा पाय घुडग्याखालून गमवावा लागला..

    साक्ष ही अत्यंत गरीब कुटूंबातील, सरकारने तिच्या या शौर्याची दखल घ्यावी, तीला पुढील ऊपचारात मदत करावी अशी कुटूंबियांची मागणी.

  • 02 Aug 2021 12:08 PM (IST)

    प्रसाद लाड यांच्या विरोधात सहार एयरपोर्ट इथे आंदोलन सुरू

    मुंबई :

    - प्रसाद लाड यांच्या विरोधात सहार एयरपोर्ट इथे आंदोलन सुरू

    - भारतीय कामगार सेनेचे सरचिटणिस संतोष कदम यांच्या नैतृत्वात आंदोलनाला सुरवात

    - प्रसाद लाड यांच्या विरोधात जोरदार घेषणाबाजी आणि नारेबाजी

    - जय शिवाजी जय भवानीचा गजर

    - शिवसेना स्टाईल आंदोलन सुरू

  • 02 Aug 2021 12:04 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंकलखोप येथे पूरग्रस्तांशी संवाद साधला

    आपत्तीत तुम्हाला पायावर उभे करायची जबाबदारी आहे.

    ही अतिवृष्टी होण्याअगोदरपासून या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.

    कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा.

    पावसाळ्या नंतर येणारे आजार होणार नाहीत यासाठी प्रशासनास सूचना दिली आहे.

    सर्वांची निवेदने मी घेत आहे, सर्वांच्या सूचनांचा स्वीकार करणार

    उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करू

    पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी मुख्यमंत्री, मंत्री येणार आणि चौकशी करून जाणार, असेच आयुष्य जगायचे का ?

    अतिवृष्टीचा इशारा येताच या भागातील लोकांचे प्रशासनाने लगेच स्थलांतर केले, जीव जाऊ दिले नाहीत.

    हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार

  • 02 Aug 2021 11:06 AM (IST)

    नवी मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणात, डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर्सचा नवा उच्चांक

    नवी मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणात, डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स (गतिरोधक) चा नवा उच्चांक

    अनधिकृत गतिरोधक बांधून सर्वोच्च न्यायालयाचे आदेशांचे उल्लंघन

    ठाणे, कल्याण, डोंबिवली पाठोपाट नवी मुंबई शहर हे स्पीड ब्रेकर्स बांधून वाहनचालकांना विनाकारण त्रास

    गतिरोधक बनवताना सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे आय आर सी. च्या नियमावलीचे उल्लंघन, संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार का?

    स्वच्छ सर्वेक्षणा दरम्यान डांबरीकरणामुळे वाढलेली गतिरोधकांची संख्या विना माहिती फलकासह कसे?

    नियम फक्त सामान्य जनतेसाठीच का? प्रशासनाने बांधलेल्या रस्त्याला नियम का नाही

  • 02 Aug 2021 11:05 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत

    पूर परिस्थितीत बाधित झालेल्या कसबे डिग्रज गावातील ग्रामस्थांनी आता शासकीय मदत लवकरच मिळाली अशी मागणीही केली आहे.

    सरकारी दौरे नेत्यांचे दौरे होत आहेत आता मतदार लवकरच अपेक्षित आहेत असाही इथल्या उपसरपंच यांनी सांगितलय

  • 02 Aug 2021 11:04 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले

    यावेळी कृषी, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी स्वागत केले

    यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार नितीन बानुगडे- पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदी मान्यवर उपस्थित होते

  • 02 Aug 2021 11:02 AM (IST)

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा लस टंचाई

    औरंगाबाद -

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा लस टंचाई

    शहरात फक्त 600 लसींचे डोस शिल्लक

    दुसरा डोस घेण्यासाठी लाखो नागरिक वेटिंगवर

    लस नसल्यामुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुरळक गर्दी

    एका लसीकरण केंद्रावर फक्त 200 जणांना दिले जातायत डोस

    टोकन वाटप करून नागरिकांना दिला जातायत डोस

    लसींचा दुसरा डोस मिळत नसल्यामुळे अनेक नागरिक हवालदिल

  • 02 Aug 2021 08:04 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापण्याचा महावितरणचा सपाटा

    - नागपूर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापण्याचा महावितरणचा सपाटा

    - एक महिन्यात महावितरणने ९८८६ वीज कनेक्शन कापले

    - ९८८६ कनेक्शन कापूनंही जिल्हयात २८६ कोटींची थकबाकी

    - नागपूर जिल्हयात अद्यापंही साडेचार लाख वीज ग्राहकांवर थकबाकी

    - कोरोनामुळे लोक आर्थिक संकटात, वीजेची थकबाकी वाढली

  • 02 Aug 2021 08:04 AM (IST)

    नाशकात कोरोनाचे निर्बंध फक्त कागदावरच

    नाशिक -

    निर्बंध फक्त कागदावरच

    विकेंड लॉकडाऊनलाही सुरु होता पंचवटी परिसरातील न्यू पंजाब बार

    रात्रि गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकला छापा

    बार केला सील, परवाना रद्दची प्रक्रिया सुरु

    काही महिन्यांपूर्वीही या बारवर झाली होती कारवाई

    स्थानिक पोलिसांची संशयास्पद डोळेझाक असल्याची चर्चा

  • 02 Aug 2021 08:03 AM (IST)

    भंडाऱ्यातील तांदूळ भ्रष्टाचारात काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या टोळीचा हात- भाजप खासदार सुनील मेंढे यांचा खळबळजनक आरोप

    भंडाऱ्यातील तांदूळ भ्रष्टाचारात काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या टोळीचा हात- भाजप खासदार सुनील मेंढे यांचा खळबळजनक आरोप

    - धानाच्या जिल्ह्यात सडका तांदूळ रेशनला.

    - राज्याबाहेरील निकृष्ट दर्जाच्या तांदळाची रेषांमध्ये विक्री

    - तांदूळ घोटाळ्याचा विषय केंद्रात उचलण्याची खासदार सुनील मेंढे यांची ग्वाही.

    -पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात तांदूळ भ्रष्टाचाराचा मोठा रॅकेट

    -विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्या आरोप सत्य आहे. -रेशनद्वारे खाण्यायोग्य नसलेल्या तांदळाचा पुरवठा पूर्व विदर्भातील गरजू नागरिकांना होत आहे.

  • 02 Aug 2021 07:53 AM (IST)

    नाशकात झाडावर कुऱ्हाड चालवल्याने 15 बगळ्यांचा गेला जीव

    नाशिक -

    झाडावर कुऱ्हाड चालवल्याने 15 बगळ्यांचा गेला जीव..

    गंगापूर रोड परिसरात घडली धक्कादायक घटना..

    वनविभागाने जप्त केले ठेकेदाराचे साहित्य..

    दोन इमारतींमधल्या वादात पक्षांचा गेला बळी..

    पक्षीप्रेमींनी व्यक्त केला संताप..

    प्रकरणाच्या चौकशीची मागणी

  • 02 Aug 2021 07:46 AM (IST)

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक

    कोल्हापूर:

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक

    आरक्षणा व्यतिरिक्त केलेल्या इतर मागण्या संदर्भात सरकारने खासदार संभाजीराजे यांना दिलेलं आश्वासन पाळावं

    अन्यथा 9 ऑगस्टपासून संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडणार

    सकल मराठा समाजाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे पत्र

    एमपीएससी विद्यार्थ्यांचे नियुक्तीबाबत दिलेली मुदत संपली

    राज्य सरकार सकल मराठा समाज आणि संभाजी राजांची फसवू आणि विश्वास घात करत असल्याचा आरोप

  • 02 Aug 2021 07:43 AM (IST)

    दीड वर्षांनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज आजपासून होणार सुरु

    नाशिक -

    दीड वर्षांनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज आजपासून होणार सुरू

    सकाळी 11 ते संध्याकाळी 6 अशा पूर्ण वेळ होणार कामकाज

    वकिलांना मिठा दिलासा

    मात्र गर्दी झाल्यास निर्बंध पुन्हा लागू होण्याची शक्यता

  • 02 Aug 2021 07:36 AM (IST)

    सोलापूर शहरात आज लसीकरण मोहीम नाही

    सोलापूर -

    आज शहरात लसीकरण मोहीम नाही

    शासनाकडून लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे लशीकरण म्हणून टप्प

    दोन दिवसाचा अपवाद सोडला तर वारंवार होत आहे लसीकरण ठप्प

  • 02 Aug 2021 07:35 AM (IST)

    हुतात्मा एक्सप्रेस 31 ऑगस्टपर्यंत रद्द

    सोलापूर -

    हुतात्मा एक्सप्रेस 31 ऑगस्टपर्यंत रद्द

    गेल्या वर्षभरात अनेकदा तांत्रिक कारणामुळे तर कधी लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या हुतात्मा एक्सप्रेसच्या प्रवासासाठी आणखीन महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा

    31 ऑगस्टपर्यंत हुतात्मा एक्सप्रेस बंद असणार

    तांत्रिक कारणाने हुतात्मा एक्सप्रेस बंद असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती

  • 02 Aug 2021 07:34 AM (IST)

    विदर्भात गेल्या 24 तासांत सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

    - विदर्भात गेल्या २४ तासांत सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

    - विदर्भातील ११ जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९ रुग्ण, दोन मृत्यू

    - पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तिव्रतेनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद

    - विदर्भात सध्या कोरोनाचे ५१० सक्रिय रुग्ण

    - विदर्भातील ११ ही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात

  • 02 Aug 2021 07:34 AM (IST)

    गावात कोरोना रुग्ण आढळल्याने सिन्नरमध्ये आणखी 4 शाळा बंद

    नाशिक - गावात कोरोना रुग्ण आढळल्याने सिन्नरमध्ये आणखी 4 शाळा बंद..

    खबरदारी म्हणून जिल्ह्यातील 11 शाळा आतापर्यंत केल्या आहेत बंद..

    ऍक्टिव्ह रुग्ण संख्येत सिन्नर तालुका अग्रेसर..

    तालुक्यातील 68 शिक्षकांच्या टेस्ट चे रिपोर्ट अद्याप प्रलंबित

    आजपासून आणखी चाचण्या करण्याचे आदेश

  • 02 Aug 2021 07:33 AM (IST)

    भीमा कोरेगाव आयोगाची आजपासून सुनावणी

    भीमा कोरेगाव आयोगाची आजपासून सुनावणी,

    2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत चालणार सुनावणी

    पुण्यात होणार सूनावणी ,

    ऑनलाईन पद्धतीने होणार सुनावणी,

    आज भीमा कोरेगाव दंगलीतील साक्षीदारांचा नोंदवला जाणार जबाब,

    भीमा कोरेगाव आयोगातील दोन सदस्यांसमोर होणार सुनावणी,

    जयनारायण पटेल सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश कलकत्ता उच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलाय भीमा कोरेगाव आयोग,

    रेखाताई साहेबराव शिवले आणि प्रल्हाद इश्वर गायकवाड या दोन साक्षीदारांचा नोंदवला जाणार जबाब,

    कोरोनामुळे आयोगाचं कामकाज बंद ठेवण्यात आलं होतं मात्र आजपासून सुनावणीला होणार सुरुवात ...

  • 02 Aug 2021 07:00 AM (IST)

    नागपुरातील मेडीकल आणि मेयो रुग्णालय डेंग्यूच्या विळख्यात, 15 विद्यार्थी आणि निवासी डॅाक्टरांना डेंग्यू

    - नागपुरातील मेडीकल आणि मेयो रुग्णालय डेंग्यूच्या विळख्यात

    - मेडीकल, मेयो रुग्णालयातील 15 विद्यार्थी आणि निवासी डॅाक्टरांना डेंग्यू

    - मेडीकल आणि मेयोच्या वस्तीगृह परिसरात साचते पाणी

    - नागपूरात डेंग्यू साथीचा विळखा, झपाट्याने वाढत आहेत रुग्ण

    - मेडीकल आणि मेयोच्या वस्तीगृहाची जबाबदारी बांधकाम विभागाकडे

    - बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याने डेंग्यूचा प्रकोप

  • 02 Aug 2021 06:47 AM (IST)

    संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

    संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

    नवी मुंबई भाजपा आणि गणेश नाईक चारीटेबल ट्रस्टतर्फे मदतीचा ओघ

    वाढदिवसानिमित्त कोणीही बॅनर आणि होर्डिंग लावू नये आणि वाढदिवस साजरा करू नये

    त्याऐवजी कोरोना पीडितांना आणि पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन

  • 02 Aug 2021 06:46 AM (IST)

    अणदूरचे संस्थापक सचिव सि. ना. आलुरे गुरुजी यांचे निधन

    तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव सि. ना. आलुरे गुरुजी यांचे आज पहाटे साडेतीन वाजता अल्पशा आजाराने सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात निधन झाले. अंत्यविधी आज दुपारी तीननंतर अणदूर येथे होईल.

Published On - Aug 02,2021 6:35 AM

Follow us
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.