Maharashtra News LIVE Update | नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर निलंबित

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर निलंबित
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 23 Aug 2021 20:16 PM (IST)

  नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर निलंबित

  नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर अखेर निलंबित झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे अखेर निलंबन झाल्याने या संपूर्ण प्रकरणात वैशाली झनकर यांना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी वैशाली वीर यांच्या विरोधात तीन वेळा निलंबनाचा प्रस्ताव पाठवून ही निलंबन होत नसल्याने शिक्षण विभागाच्या कामकाजा बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र या लाचखोर प्रकरणात पोलीस आणि न्यायालयीन कोठडी सूनवल्यानं निलंबनाची करावाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मज्जाव असल्याचं घटनेत नमूद असल्याचा आधार घेत हे निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान वैशाली वीर यांना आजच जामीन मंजूर झाला आणि आजच त्यांचं निलंबन झाल्याने वैशाली वीर यांना मोठा धक्का समजला जातो आहे

 • 23 Aug 2021 19:48 PM (IST)

  येत्या 27 ऑगस्टला संरक्षणमंत्री राजनाथसिंह पुणे दौऱ्यावर

  पुणे :

  – येत्या २७ ऑगस्टला संरक्षणमंत्री राजनाथसिंह पुणे दौऱ्यावर,

  – कल्याणसिंह यांच्या निधनामुळे राजनाथसिंह यांचा आजचा पुणे दौरा स्थगित करण्यात आला होता,

  – राजनाथसिंह यांच्या हस्ते ऑलम्पिक मेडल विजेत्या खेळाडूंचा सम्मान होणार आहे,

  – शिवाय राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्मी स्टेडियमला नीरज चोप्रा यांचे नाव दिले जाणार.

 • 23 Aug 2021 18:21 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 97 नवे कोरोनाबाधित, 233 जणांना डिस्चार्ज

  पुणे :
  दिवसभरात ९७ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात २३३ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत १०रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५.
  – २०५ रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९१९५९.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १९३६.
  – एकूण मृत्यू -८८९०.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८११३३.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५७७८

 • 23 Aug 2021 17:05 PM (IST)

  आम्ही आठ दिवसांची मुदत देतो, जीआर बदला, नाहीतर.. : राजू शेट्टी

  कोल्हापूर :

  राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया :

  एक महिना होऊन गेला सरकारने पूरग्रस्तांना मदत दिली नाही

  म्हणून आम्ही आठ दिवसांचा मुदत दिली आहे

  पंचनामे झाले आहेत, नुकसानीचा आकडा आला आहे

  आता जीआर बदला

  1 सप्टेंबरला आम्ही चिखली ते नरसिंहवाडी पर्यंत दिंडी काढणार

  नरसिंहवाडी इथे जलसमाधी घेणार

  जिल्ह्यातील मंत्र्यांनी कारण नसताना या मोर्चाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला

  त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आम्ही ईडी ला घाबरत नाही

  आता राजकीय निर्णय घेण्याची वेळ नाही

  राजकारण आमचं साधन आहे साध्य नाही

  आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहे

  आम्ही आजही महाविकास आघाडीचा घटक आहे पण त्यांचा गुलाम नाही

  जे चुकीच असेल ते बोलणारच

 • 23 Aug 2021 17:03 PM (IST)

  नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांना अखेर जामीन मंजूर

  – अखेर नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांना जामीन मंजूर
  – दर सोमवारी नाशिकच्या ACB कार्यालयात चौकशीसाठी लावावी लागणार हजेरी
  – न्यायालयाने अटी-शर्तींवर केला जामीन मंजूर
  – शिक्षण संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी तब्बल 8 लाखांची घेण्यात आली होती लाच
  – ठाणे ACB ने नाशिकमध्ये सापळा रचून केली होती कारवाई

 • 23 Aug 2021 17:02 PM (IST)

  नारायण राणे यांच्या जनसंवाद यात्रेच्या आयोजकांवर वसई-विरार, नालासोपाऱ्यात 6 गुन्हे दाखल

  वसई विरार :

  नारायण राणे यांच्या जनसंवाद यात्रेच्या आयोजकांवर वसई-विरार, नालासोपाऱ्यात 6 गुन्हे दाखल

  वसई, विरार, तुलिंज, वालीव, माणिकपूर, अर्नाळा या पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 प्रमाणे 6 गुन्हे आयोजकांवर दाखल करण्यात आले आहेत.

  शनिवारी नारायण राणे यांची वसई विरार नालासोपाऱ्यात काढली होती जनसंवाद यात्रा

  विनापरवाना गर्दी जमा करणे, सार्वजनिक आरोग्यास घोका निर्माण करणे, गर्दीत मास्क न वापराने, जमावबंदी आदेश झुगारने, विना परवाना ढोल ताशा केल्या प्रकरणी झाले आहेत गुन्हे दाखल

 • 23 Aug 2021 15:22 PM (IST)

  राजेश टोपेंना कोणतीही जबाबदारी दिली तरी काम चांगलं करतात : सुप्रिया सुळे

  राजेश टोपे डॉक्टर नाहीत ते इंजिनिअर आहेत,

  राजेश टोपेंना कोणतीही जबाबदारी दिली तरी काम चांगलं करतात,

  मात्र कोव्हीडच्या काळात राजेशनं जे काम केलं ते कौतुकास्पद आहे,

  खासदार सुप्रिया सुळेंनी राजेश टोपेंच केलं कौतुक,

  कोव्हीडच्या काळात महाविकास आघाडी सरकाचं काम चांगल

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच आभार,

  देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झालं हे मी नाही केंद्र सरकारचा रिपोर्ट सांगतो, सुप्रीया सुळे यांची प्रतिक्रिया

 • 23 Aug 2021 15:18 PM (IST)

  पारंपरिक दहिदंडीला परवानगी द्या, भाजप नेते आशिष शेलार यांची मागणी

  काही गणेशोत्सव मंडळांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली त्याच पद्धतीने दहिदंडी उत्सवाची परंपरा अखंड रहावी म्हणून पारंपरिक पद्धतीने दहिदंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, असे भाजपा नेते आशिष शेलार यांनी सांगितले.

  लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहिदंडीला शासनाने परवानगी द्यावी. कोरोनाची परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत. त्यांना गर्दी न करता आप-आपल्याला विभागात पारंपरिक पध्दतीने कमी उंचीच्या दहिदंडीला परवानगी शासनाने द्यावी. उत्सवावर पुर्णपणे बंदी असू नये. उत्सवांची परंपरा कायम राहिल अशी भूमिका शासनाने घ्यावी, असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आज याबाबत बैठक व्हावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती. मात्र सोलापूर दौऱ्याच्या प्रवासात असल्याने त्या़ना बैठकीत सहभागी होता आले नाही.

 • 23 Aug 2021 12:36 PM (IST)

  नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांचा एक दिवसीय लाक्षणिक संप

  नाशिक

  – नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांचा एक दिवसीय लाक्षणिक संप

  – सराफ व्यावसायिकांना HUID प्रणाली मान्य नाही

  – हॉलमार्किंगच केलं स्वागत

  – जिल्ह्यातील 7 हजार सराफ व्यवसायिक संपात सहभागी

  – सराफ बाजारात आज कडकडीत बंद

  – केंद्र सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा सराफ व्यावसायिकांची मागणी

 • 23 Aug 2021 12:36 PM (IST)

  चार दिवसाच्या विश्रांती नंतर भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी

  भंडारा

  – चार दिवसाच्या विश्रांती नंतर भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी

  – चार दिवसच्या विश्रांती नंतर भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे .

  – मागील चार दिवसा पासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती.

  पाऊस न आल्याने दमट वातावरण निर्माण झाले होते.आज जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस आल्याने दमट वातावरणा पासून नागरिकांना मोकळा श्वास मिळाला आहे.

 • 23 Aug 2021 12:00 PM (IST)

  राणेंच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग भाजपमय, ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर

  सिंधुदुर्ग –

  राणेंच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग भाजपमय, ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर

  केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राणे पहिल्यांदाच तळकोकणातील त्यांच्या होमपीचवर येणार

  25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत नारायण राणेंची जनआर्शिवाद यात्रा सिंधुदुर्गात

  राणेंच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गात ठिकठिकाणी समर्थकांनी लावले लक्षवेधी बॅनर

  सध्याच्या घडीला शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या सिंधुदुर्गात राणेंकडून जनआर्शिवाद यात्रेच्या निमित्ताने मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार असून कार्यकर्त्यांमधे उत्साह

  शिवसेनेच्या काळात रखडलेला विकास राणे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा दिसेल

  कोकणचा विकास फक्त राणे साहेबचं करतील आणि कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची धमक फक्त राणें साहेबांमधेचं

  कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना

 • 23 Aug 2021 11:58 AM (IST)

  अनिल देशमुखचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल

  अनिल देशमुखचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल

  दोन्ही पीए देशमुख मनी लांड्रिंग प्रकरणात संजी दोघे आहेत अटकेत

  पुढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी होणार

 • 23 Aug 2021 11:56 AM (IST)

  मुलानेच आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार

  सोलापूर –

  मुलानेच आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार

  सोलापुरातल्या शेळगी परिसरातील घटना

  दीड वाजण्याच्या सुमारास वंदना एकनाथ पुणेकर या 48 वर्षीय महिलेच्या डोक्यावर लोखंडी फुकारी मारून खून झाल्याची घटना

  मयत वंदना कोळेकर यांचा मुलगा अतुल कोळेकर यास जोडभावीपेठ पोलिसांनी घेतले ताब्यात

 • 23 Aug 2021 11:55 AM (IST)

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज कोल्हापुरात आक्रोश मोर्चा

  कोल्हापूर :

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज कोल्हापुरात आक्रोश मोर्चा

  पूरग्रस्त शेतकऱ्यांना जादा नुकसान भरपाईची प्रमुख मागणी

  पिक कर्ज माफ कराव, पूरग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफी द्यावी, कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील 103 पुलांवर कमानी पूल बांधावेत, भूस्खलन झालेल्या भागात पुनर्वसन करावे यादेखील मागण्या

  दसरा चौकातून दुपारी बारा वाजता होणार मोर्चाला सुरुवात

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा

 • 23 Aug 2021 11:55 AM (IST)

  नाशिकच्या मेनरोड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम

  – नाशिकच्या मेनरोड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम

  – रस्त्यावर थाटलेली दुकान मनपा अतिक्रमण विभागाने गुंडाळली

  – मेनरोड,शालिमार,या भागात किरकोळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहन चालकांना येतोय अडथळा

  – पोलिसांची मदत घेत मनपा कर्मचार्यांनी राबवली मोहीम

  – दुकानातील साहित्य जमा करून घेत असल्याने दुकानदारांची उडाली धावपळ

 • 23 Aug 2021 11:51 AM (IST)

  नागपुरात ज्वेलरी व्यापाऱ्यांनी पुकारला सांकेतिक बंद, दुकानं बंद ठेऊन सरकारच्या धोरणाचा निषेध

  नागपूर –

  ज्वेलरी व्यापाऱ्यांनी पुकारला सांकेतिक बंद

  सगळी दुकान बंद ठेऊन केला जात आहे सरकार च्या धोरणाचा निषेध

  आम्ही होलमार्किंग च स्वागत करतो मात्र HUID आम्हाला स्वीकार नाही
  म्हणत पुकारला बंद ,

  आज सांकेतिक बंद आहे मागण्या मान्य न झाल्यास केलं जाणार मोठं आंदोलन

 • 23 Aug 2021 09:49 AM (IST)

  रत्नागिरीत कोस्टगार्ड येथे नोकरीचे आमिष दाखवत तरुणांना 65 लाखांचा गंडा

  रत्नागिरी –

  कोस्टगार्ड येथे नोकरीचे आमिष दाखवत तरूणांना 65 लाखांचा गंडा

  रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त तरूणांची फसवणूक

  2017 ते 2019 या दोन वर्षाच्या कालावधीत फसवणूक

  तक्रारीनंतर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 • 23 Aug 2021 09:47 AM (IST)

  रत्नागिरी-रिफायनरीच्या नवीन जागेबाबत MIDC, उद्योगमंत्रालय सकारात्मक

  रत्नागिरी-रिफायनरीच्या नवीन जागेबाबत MIDC, उद्योगमंत्रालय सकारात्मक

  बारसू-सोलगांवमध्ये रिफायनरीकरता चाचपणी सुरू

  खात्रीलायक सूत्रांची माहिती

  संबंधित विभागाचे मंत्री देखील सकारात्मक असल्याची माहिती

  ‘पण, कंपनीला अद्याप अधिकृतपणे कोणताही निरोप नाही’

 • 23 Aug 2021 09:46 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील जटवाडा घाटात कोसळली दरड, जटवाडा घाटातील रस्ता बंद

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्यातील जटवाडा घाटात कोसळली दरड

  काल दुपारच्या सुमारास कोसळली दरड

  दरड कोसळल्यामुळे जटवाडा घाटातील रस्ता झाला बंद

  चार दिवसंपासूनच्या सततच्या पावसामुळे कोसळली दरड

  सुदैवाने दरड कोसळीत कुठलीही जीवित्त हानी नाही

 • 23 Aug 2021 09:46 AM (IST)

  औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सर्व विभाग येणार एकाच छताखाली

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सर्व विभाग येणार एकाच छताखाली

  बांधली जाणार नवीन जिल्हा परिषद इमारत

  37.83 कोटी रुपयांची 4 मजली नवीन असेल प्रशासकीय इमारत

  इमारत बांधकाम निविदेच्या दर सूचीला मान्यता देण्यासाठी आज होणार सर्वसाधारण सभा

  ठरावाला मान्यता मिळाल्यास तात्काळ दिले जातील कार्यारंभ आदेश

  कार्यारंभ आदेशानंतर दुसऱ्या दिवसापासून नियोजित जागेवरील जुन्या इमारतीच्या पाडापाडीला होईल सुरुवात

 • 23 Aug 2021 07:36 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना लसीबाबत एक महिन्याची चिंता मिटली

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना लसीबाबत एक महिन्याची चिंता मिटली

  जानकीदेवी बजाज फाउंडेशन कडून औरंगाबादला 1 लाख 15 हजार लसी उपलब्ध

  सीएसआर फंडातून 1 लाख 15 हजार लसी उपलब्ध

  तर शासनाकडून आठवड्याला मिळतायत 15 ते 20 हजार लसी

  एक महिन्यासाठी औरंगाबादची लस टंचाई मिटली

 • 23 Aug 2021 07:36 AM (IST)

  सोनाली मटण हॉटेल हत्या प्रकरण, संशयित आरोपी अतुल पिठेकरचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू

  नाशिक –

  सोनाली मटण हॉटेल हत्या प्रकरण

  संशयित आरोपी अतुल पिठेकरचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू

  हृदयविकाराच्या झटक्याने कारागृहातच मृत्यू

  19 वर्षीच्या अतुल सोनाली हॉटेल हत्या प्रकरणातील संशयित आरोपी

 • 23 Aug 2021 07:35 AM (IST)

  रविवारी पुणे विभागात जवळपास 50 हजार अतिरिक्त प्रवाशांनी केला प्रवास

  पुणे

  राखीपौर्णिमेनिमित्ताने एसटीने प्रवास करणाऱ्याच्या संख्येत मोठी वाढ

  रविवारी पुणे विभागात जवळपास 50 हजार अतिरिक्त प्रवाशांनी केला प्रवास

  रविवारी पुणे विभागात जवळपास एकूण दीड लाख प्रवाशांनी केला प्रवास

 • 23 Aug 2021 07:34 AM (IST)

  पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी 75 हजार 749 विद्यार्थ्यांची नोंदणी

  पुणे

  इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निवडण्याच्या पर्यायाची मुदत रविवारी रात्री संपली

  पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी 75 हजार 749 विद्यार्थ्यांची नोंदणी

  तर जवळपास 58 हजार 768 विद्यार्थ्यांची प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण

  आता पहिल्या नियमित फेरीची अंतिम गुणवत्ता यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार

  पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 311 कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी नोंदणी

  याद्वारे शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेशासाठी एक लाख 11 हजार 205 जागा उपलब्ध

  अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या 67 हजार 131 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक, तर 66 हजार 274 विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरीफाय

  येत्या शुक्रवारी पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार

  यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत

 • 23 Aug 2021 07:32 AM (IST)

  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आत्मदाहनाचा प्रयत्न

  औरंगाबाद –

  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आत्मदाहनाचा प्रयत्न

  विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न..

  पदाधिकऱ्याने अंगावर घेतले पेट्रोल ओतून..

  रोजंदारी कामगारांना विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न..

  रोजंदारी कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळण्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्यांने केला आत्मदहनाचा प्रयत्न..

 • 23 Aug 2021 06:40 AM (IST)

  बीकेसी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा

  बीकेसी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांच्या मोठी रांग

  जवळपास रात्री 8 ते 10 वाजेपासून नागरीक रांगेत आहेत

  रात्रभर इथे लसीकरणासाठी नागरिक रांगेत झोपले

  सकाळी 7 ला रांगेत असलेल्या नागरिकांना आत मध्ये घेण्यात येणार आहे

  सकाळी 9 वाजता लसीकरण सुरु होणार आहे

  त्याकरिता नागरिक रात्र रांगेत बसले किंवा झोपले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI