Maharashtra News LIVE Update | पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळ सहा वाहनांचा विचित्र अपघात, 3 जण जागीच ठार, 2 जखमी

| Updated on: Aug 03, 2021 | 11:35 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळ सहा वाहनांचा विचित्र अपघात, 3 जण जागीच ठार, 2 जखमी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Aug 2021 08:46 PM (IST)

    पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळ सहा वाहनांचा विचित्र अपघात, 3 जण जागीच ठार, 2 जखमी

    सातारा:

    पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळ धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात

    ट्रकने उडवलेल्या वॅगनार कारमधील 3 जण ठार

    साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या 6 वाहनांना ट्रकने ठोकले

    खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल

    अपघातात 2 जखमी असल्याची प्राथमिक माहिती

  • 03 Aug 2021 06:02 PM (IST)

    मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून तळीये दरडग्रस्तांना 11 लाखांची मदत

    रायगड :

    मनसे आमदार राजू पाटील यांनी केली तळीये दरडग्रस्तांना 11 लाखांची मदत.

    महाड, पैलादपुर मध्ये २२ जुलै रोजी झालेल्या भुसख्खंलन दुर्घटनेत 84 लोकांचा मृत्यू झाला होता.

    आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या नातेवाईकांची तळीये गावात जाऊन भेट घेतली आणि विचारपूस केली.

    यावेळी तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून अकरा लाखाची मदत करण्यात आली त्या रकमेचा चेक ग्रामपंचायतीचा नावाने सरपंचाकडे सुपूर्द करण्यात आला.

    यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते मनोज चव्हाण जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड उपजिल्हा अध्यक्ष चेतन उतेकर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

  • 03 Aug 2021 04:17 PM (IST)

    पुणे मनपाचा राज्य सरकारला दणका

    पुणे मनपाचा राज्य सरकारला दणका

    23 गावांचा विकास आरखडा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या महानगर नियोजन समितीला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती,

    नियोजन समितीत स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश न केल्यानं उच्च न्यायालयाने दिली स्थगिती,

    पीएम आरडीएचाच आराखडा मान्य करा राज्य सरकारने मनपाला सांगितलं होतं,

    मात्र डीपी ही महापालिकाचं करणार ही भूमिका पालिकेनं घेतली

    आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर आज हा निकाल देण्यात आलाय

  • 03 Aug 2021 03:01 PM (IST)

    रस्त्यावरील खड्डे प्रश्नी भाजप महिला आघाडी आक्रमक, ठाकुर्ली पुलावरील खड्डे भरून व्यक्त केला प्रशासनाचा निषेध

    यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीमधील अंतर्गत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या ठाकुर्ली पुलावर जागोजागी खड्डे पडलेत. त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते तसेच या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. पावसाने आठवडाभराची उघडीप देऊन देखील प्रशासनाकडून  या पुलावरील खड्डे बुजवण्यात न आल्याने आज भाजपा महिला आघाडी तर्फे महिला कार्यकर्त्यांनी मातीचा भराव टाकून खड्डे बुजवत प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी प्रशासनाने रस्ते दुरुस्तीच्या कामांना लवकर सुरुवात केली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला

  • 03 Aug 2021 03:01 PM (IST)

    पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय

    नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले.

  • 03 Aug 2021 01:01 PM (IST)

    महापुरामुळे पाणीबाणी सुरु असताना कोल्हापुरातील तरुणांचा मात्र टँकरच्या पाण्यावर रेन डान्स

    कोल्हापूर

    महापुरामुळे पाणीबाणी सुरु असताना कोल्हापुरातील तरुणांचा मात्र टँकरच्या पाण्यावर रेन डान्स

    कोल्हापुरातील सुभाष नगरमधील प्रकार

    शंभर ते दीडशे तरुणांनी धरला डॉल्बीच्या ठेक्यावर ताल

    महापूर आणि कोरणा संकट काळात तरुणाईचा बेजबाबदारपणा

  • 03 Aug 2021 12:21 PM (IST)

    सर्व नियमात बसताना पुण्याच्या बाबतीत दुजाभाव का? - महापौर मुरलीधर मोहोळ

    महापौर मुरलीधर मोहोळ -

    - सर्व नियमात बसताना पुण्याच्या बाबतीत दुजाभाव का?

    - महापौर मुरलीधर मोहोळ यांचा राज्य सरकारला सवाल

    - पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं तर मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतायत

    - पुण्याच्या बाबतीत राजकारण होत की काय असं चित्र दिसतंय

    - आजच्या व्यापारी आंदोलनाला आमचा पाठींबा असणार आहे

  • 03 Aug 2021 12:20 PM (IST)

    पुण्यातील व्यापाऱ्यांचा आंदोलनाला सुरुवात

    - पुण्यातील व्यापाऱ्यांचा आंदोलनाला सुरुवात

    - राज्य सरकार विरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक

    - पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

    - राज्य सरकारच्या निषेधार्थ घंटा नाद आंदोलन

  • 03 Aug 2021 11:57 AM (IST)

    नागपुरात तरुणाची आत्महत्या, पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

    - नागपुरात महेश राऊत या 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या

    - काल पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

    - १०० नंबरवर फेक कॅाल केला म्हणून पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

    - हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतली घटना

    - मारहाण करणाऱ्या पोलीसांवर कारवाईची मागणी

    - नातेवाईक पोहोचले हुडकेश्वर पोलीस स्टेशन परिसरात

  • 03 Aug 2021 11:41 AM (IST)

    खासगी शांळाच्या शुल्कात 15 टक्के कपातीचा निर्णय

    खासगी शांळाच्या शुल्कात 15 टक्के कपात निर्णय झाला

    पण अजून अंमलबजावणी नाही

    पालकांमध्ये सभ्रंमाच वातावरण

  • 03 Aug 2021 11:04 AM (IST)

    मोहोळ दुहेरी खून प्रकरणी आरोपींना अटक

    सोलापूर -

    मोहोळ दुहेरी खून प्रकरणी आरोपींना अटक

    कर्नाटक राज्यातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या

    शिवसैनिक विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर यांचा अपघाताआडुन झाला होता खून

    कर्नाटक राज्यत लपून बसलेल्या 5 संशयित आरोपींना पोलिसांनी केली अटक

    संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे आणि संदीप सरवदे आरोपींची नावे

  • 03 Aug 2021 11:03 AM (IST)

    लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिर खुली करा - आचार्य तुषार भोसले

    नाशिक -

    लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिर खुली करा

    भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांची शासनाकडे मागणी

    श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करण्याची मागणी

    सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?

    मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारला जातो

    - आचार्य तुषार भोसले

  • 03 Aug 2021 11:02 AM (IST)

    निर्बंध शिथिल झाल्यानंतर औरंगाबादच्या बाजारपेठेत गर्दी

    औरंगाबाद -

    निर्बंध शिथिल झाल्यानंतर औरंगाबादच्या बाजारपेठेत गर्दी

    पैठण गेट मार्केट मध्ये सकाळपासून गर्दीला सुरुवात

    होटेल, कपडे, स्टेशनरीच्या दुकानात गर्दीला सुरुवात

    यापूर्वी 50 टक्के क्षमतेने सुरू होती बाजारपेठ

    सायंकाळी चार नंतर करावे लागत होते शटर डाऊन

    निर्बंध शिथिल झाल्यानंतर बाजारपेठेत चैतन्य

  • 03 Aug 2021 11:02 AM (IST)

    औरंगाबादेत खाजगी रुग्णालयांचा कृत्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका, बायोवेस्ट कचरा फेकला रस्त्यावर

    औरंगाबाद -

    खाजगी रुग्णालयांचा कृत्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका, बायोवेस्ट कचरा फेकला रस्त्यावर

    वापरलेले सिरीन, काचेच्या बाटल्या, इंजेक्शन, सलाईनच्या सुया फेकल्या उघड्यावर

    जनावरे आणि लहान मुलांचा याचा मोठा धोका निर्माण

    खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगीतील प्रकार,जाधव हॉस्पिटल नावाच्या कचऱ्यात सापडल्या पावत्या

    याआधी ही औरंगाबाद जिल्ह्यात सर्रासपणे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा बायोवेस्ट कचरा फेकला जातो रस्त्यावर

  • 03 Aug 2021 11:01 AM (IST)

    सोलापुरात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

    सोलापूर -

    कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

    दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरात लसीचा पुरवठा

    शहरातील 17 लसीकरण केंद्रावर पुन्हा लसीकरण

    दहा वाजता होणार लसीकरणाला सुरुवात

    एक तास आधीच नागरिकांची लसीकरणासाठी उपस्थित

  • 03 Aug 2021 11:00 AM (IST)

    राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे अखेर नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात

    नाशिक -

    राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे अखेर नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात

    ताजने अखेर पोलिसांना शरण

    ताजने याने नवीन बिटको कोव्हीड रुग्णालयाची केली होती वाहनाने तोडफोड

  • 03 Aug 2021 11:00 AM (IST)

    बाभूळगाव तालुक्यातील महिला बचत गटांना फिरते अर्थसहाय्य न देणाऱ्या कृषी पर्यवेक्षकाला पायदळ फिरवून महिलांनी केले अभिनव आंदोलन

    यवतमाळ -

    बाभूळगाव तालुक्यातील महिला बचत गटांना फिरते अर्थसहाय्य न देणाऱ्या कृषी पर्यवेक्षकाला पायदळ फिरवून महिलांनी केले अभिनव आंदोलन

    महिला बचतगट आणि प्रहार संघटनेने केले अभिनव आंदोलन

    फिरता निधी देण्यासाठी कृषी अधिकारी करत होता टाळाटाळ

  • 03 Aug 2021 10:59 AM (IST)

    रिफायनरीच्या मुद्यावरुन कोकणात घडामोडी कायम

    रत्नागिरी -

    रिफायनरीच्या मुद्यावरुन कोकणात घडामोडी कायम

    राजापूर तालुक्यातील विलये गावचे तहसीलदार यांना निवेदन

    रिफायनरी समर्थनर्थ केलेला ठराव रद्द करण्याची मागणी

    यापूर्वी याच ग्रामपंचायतनं केलंय रिफायनरीचं समर्थन

  • 03 Aug 2021 10:51 AM (IST)

    उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी

    उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी

    काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुन्हा एकदा आगमन

    पावसामुळे वातावरणात निर्माण झाला गारवा

  • 03 Aug 2021 08:45 AM (IST)

    बिबट्या सदृश प्राण्याने हल्ल्या करुन खिलार गाईच्या वासराचा पाडला फडश्या

    सोलापूर -

    बिबट्या सदृश प्राण्याने हल्ल्या करुन खिलार गाईच्या वासराचा पाडला फडश्या

    तर  म्हशीच्या रेडक्याला केले जखमी

    मोहोळ तालुक्यातील शिरपूर येथील घटना

    लिंबाजी ताकमोगे यांच्या शेतातील घटना

  • 03 Aug 2021 08:44 AM (IST)

    ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा सामान्य पाऊस पडणार

    ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा सामान्य पाऊस पडणार,

    हवामान विभागानं वर्तवला मासिक दिर्घकालीन अंदाज,

    ऑगस्ट महिन्यात या अंदाजानुसार सरासरी पाऊस हा 428. मी.मी असतो मात्र यापेक्षा ही कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय,

    ऑगस्ट महिन्यात उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश,दक्षिण छत्तीसगढ, त्यालगतचा विदर्भाचा काही भाग,अरुणाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार,

    हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी हा अंदाज वर्तवलाय....

  • 03 Aug 2021 08:43 AM (IST)

    बेलसरमध्ये झिकाचे रुग्ण आढळल्यानं जेजुरीकरांची चिंता वाढली

    पुरंदर :

    बेलसरमध्ये झिकाचे रुग्ण आढळल्यानं जेजुरीकरांची चिंता वाढली

    - जेजुरी व परिसरातील गावांमध्ये सर्वेक्षण करण्याची मागणी..

    - गेल्या दोन महिन्यांपासून जेजुरी परिसरात डेंग्यु, चिकन गुनिया आजारानं घातलं थैमान..

    - जेजुरीतील ग्रामीण रुग्णालय उरले केवळ कोरोना उपचार आणि लसीकरणापुरतेच..

    - ग्रामीण रुग्णालयात इतर आजारांवर उपचार बंद असल्याने नागरीक संतप्त..

  • 03 Aug 2021 08:41 AM (IST)

    झिका व्हायरस बाधित बेलसर या गावाची तपासणी करण्यासाठी आज केंद्रातून पथक येणार

    पुणे जिल्ह्यातील पुरंदर या ठिकाणी आढळलेल्या झिका व्हायरस बाधित बेलसर या गावाची तपासणी करण्यासाठी आज केंद्रातून पथक येणार

    तीन जणांच पथक बेलसर गावाची करणार पाहणी,

    दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं पाठवलं पथकं,

    दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालय स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ञांचा समावेश आहे...

    बेलसर गावाची पाहणी करून केंद्राला देणार अहवाल.

  • 03 Aug 2021 08:40 AM (IST)

    बारामतीत जिवे मारण्याची धमकी देत मंगळसुत्र हिसकावले

    बारामती :

    - जिवे मारण्याची धमकी देत मंगळसुत्र हिसकावले..

    - उंडवडी सुपे येथे शेतात काम करणाऱ्या महिलेचं मंगळसुत्र हिसकावले..

    - वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

    - आरोपी सीसीटीव्हीत कैद; लक्ष्मी गवळी या महिलेनं दिली फिर्याद..

    - तिघांनी केली मंगळसुत्र चोरी, पोलिसांकडून शोध सुरु..

  • 03 Aug 2021 08:39 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात म्युकर मॅक्रोसिसचा कहर सुरुच, आतापर्यंत आढळले 1,231 रुग्ण

    औरंगाबाद -

    औरंगाबाद जिल्ह्यात म्युकर मॅक्रोसिसचा कहर सुरूच

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळले 1231 रुग्ण

    तर आजपर्यंत 155 रुग्णांचा झाला मृत्यू

    गेल्या दीड महिन्यात 41 रुग्णांना गमवावे लागले प्राण

    म्युकर मायक्रोसिस चा मृत्यूदर 15 टक्के असल्यामुळे चिंता

    तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर म्युकर मायक्रोसिसचा वाढला धोका

  • 03 Aug 2021 08:38 AM (IST)

    झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात हाय अलर्ट

    औरंगाबाद -

    झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात हाय अलर्ट

    पुण्यातील झिका व्हायरस नंतर औरंगाबादेत सर्व्हेक्षण सुरू

    संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवणार पुण्याला

    औरंगाबाद शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ताप रुग्णांचे केले जाणार सर्व्हेक्षण

    झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर डास निर्मुलन मोहीम राबवण्याच्याही केल्या सूचना

  • 03 Aug 2021 08:37 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होण्याऐवजी वाढलीय

    पुणे -

    - जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होण्याऐवजी वाढलीय,

    - यामुळे ग्रामीण भागाचा बाधित दरही कमी येत नसल्याने निर्बंध उठवण्यास प्रशासनाला अडचणी,

    - जिल्ह्यातील ४२ गावांत कोरोनाबाधित वाढत असल्याने या गावात संपूर्ण लॉकडाऊन,

    - शिवाय या गावातील प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना,

    - ग्रामीण भागाचा रुग्णबधितांचा दर आणि हॉटस्पॉट गावांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे धडक सर्वेक्षण मोहीम हाती,

    - गेल्या आठवड्यात हॉटस्पॉट गावे ही १०० च्या आत होती. मात्र, आता ती १०९ वर पोहचलीय

    - ग्रामीण भागाचा बाधित दर हा ५ च्या खाली अद्यापही आलेला नाही.

  • 03 Aug 2021 08:36 AM (IST)

    सोलापुरात ग्रामीण भागात तपासणीसाठी जिल्हा परिषदेचे खास पथक

    सोलापूर -

    ग्रामीण भागात तपासणीसाठी जिल्हा परिषदेचे खास पथक

    जिल्ह्यातील ग्रामपंचायत ,आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळासह, पंचायत समितीच्या कार्यालयांना अचानक भेटी देण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती

    पथकाच्या तपासणीच्या अहवालानुसार संबंधित कर्मचाऱ्यांसह, विस्ताराधिकारी, गटविकास अधिकारी यावर होणार प्रशासकीय कार्यवाही

    पोलीस दलातील विशेष शाखेच्या धर्तीवर पथकाची नियुक्ती करण्यात येणार

    मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले विशेष पथकाची नियुक्ती

  • 03 Aug 2021 08:36 AM (IST)

    नाशकात ट्रेलरला कंटेंरची मागून धडक

    नाशिक - ट्रेलरला कंटेंरची मागून धडक

    महामार्गावरील उड्डाणपुलावर भीषण अपघात

    अपघातात कंटेनरचा अक्षरशः चुराडा..

    सुदैवाने उड्डाणपुलावरून कंटेनर न पडल्याने मोठा अपघात टळला..

    कंटेनर चालकासह तिघे जण जखमी..

    नाशिक मुंबई महामार्गावर काही काळासाठी झाली वाहतूक कोंडी

  • 03 Aug 2021 08:35 AM (IST)

    शिरोळ तालुक्यातील 42 गावांनी क्रांतिदिनी दिला आंदोलनाचा इशारा

    कोल्हापूर

    शिरोळ तालुक्यातील 42 गावांनी क्रांतिदिनी दिला आंदोलनाचा इशारा

    पूर बाधित गावातील नागरिकांचा गावातच स्थलांतर करण्याची प्रमुख मागणी

    ग्रामस्थांचा गाव सोडून स्थलांतरीत व्हायला नकार

    शेतीला हेक्टरी सव्वा दोन लाखाच्या नुकसान भरपाईचे केली मागणी

    दोन दिवसात निर्णय न झाल्यास 9 ऑगस्ट ला शिरोळ तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा

    तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

  • 03 Aug 2021 08:34 AM (IST)

    शहरातील 17  लसीकरण केंद्रावर आज होणार लसीकरण

    सोलापूर -

    शहरातील 17  लसीकरण केंद्रावर आज होणार लसीकरण

    लसीचा पुरवठा झाल्यामुळे होणार लसीकरण

    दोन दिवसापासून लसीकरण मोहीम होती ठप्प

  • 03 Aug 2021 08:33 AM (IST)

    नाशकात सलग चौथ्या दिवशी लसीकरण बंद

    नाशिक - शहरात सलग चौथ्या दिवशी लसीकरण बंद..

    गेल्या महिन्यात फक्त 9 दिवस झाले लसीकरण

    शहराला दररोज 10 हजार डोस ची आवश्यकता

    नागरिकांचा प्रतिसाद मात्र डोस नसल्याने गोंधळ

  • 03 Aug 2021 08:20 AM (IST)

    पुणे शहरात कोरोना संसर्गाचा टक्का घसरला

    पुणे -

    - शहरात कोरोना संसर्गाचा टक्का घसरला,

    - प्रथमच जुलैमध्ये महिनाभर सरासरी कोरोना प्रसाराचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी,

    - फेब्रुवारी महिन्यात काही दिवस अशी स्थिती होती, पण त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने नवे उच्चांक प्रस्थापित केले,

    - जुलै महिन्यात शहरात कोरोनाच्या प्रसाराच्या दराबरोबरच मृत्यूच्या संख्येतही घट,

    - दुसऱ्या लाटेत ज्या वेगाने मृत्युदर आणि रुग्णसंख्या वाढली, त्याच वेगाने ती कमी

  • 03 Aug 2021 08:19 AM (IST)

    नाशकात डेंग्यू, चिकनगुनियाचा अहवाल पाठवण्याची खाजगी लॅबला सक्ती

    नाशिक - डेंग्यू,चिकनगुनिया चा अहवाल पाठवण्याची खाजगी लॅब ला सक्ती..

    महापालिका आयुक्तांचे खाजगी लॅब चालकांना आदेश..

    योग्य निदान करण्यासाठी महापालिका करणार फेरतपासणी..

    डेंग्यू बाबत जनजागृती मोहीम राबवण्याचे आयुक्तांचे आदेश..

    कोरोना काळात झाला तसा गोंधळ टाळण्यासाठी महापालिकेचे आदेश

  • 03 Aug 2021 08:00 AM (IST)

    नागपुरात रेमडेसवीरचा काळाबाजार करणाऱ्या वॅार्डबॅायला पाच वर्षे कारावास

    नागपूर -

    - रेमडेसवीरचा काळाबाजार करणाऱ्या वॅार्डबॅायला पाच वर्षे कारावास

    - वॅार्डबॅाय शेख आरीफ शेख रफीक पाच वर्षे कारावाची शिक्षा

    - सत्र न्यायालयाचा निर्णय, सरकारने तपासले १३ साक्षिदार

    - रेमडेसवीर काळाबाजार प्रकरणात १० दिवसांत दुसरी शिक्षा

    - पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये होता गुन्हा दाखल

  • 03 Aug 2021 07:53 AM (IST)

    प्रवासी संख्या वाढू लागल्यामुळे पीएमपीच्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय

    पुणे -

    - प्रवासी संख्या वाढू लागल्यामुळे पीएमपीच्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय,

    - उद्यापासून सुमारे ११०० बस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धावणार,

    - लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे,

    - सध्या दररोज सुमारे चार लाख २५ हजारांहून अधिक प्रवासी पीएमपीतून प्रवास करीत आहेत,

    - त्यामुळे दररोज ७० ते ७५ लाख रुपये पीएमपीच्या तिजोरीत जमा.

  • 03 Aug 2021 07:53 AM (IST)

    नाशकात जिल्ह्यात सरासरी पेक्षा 50 टक्के पाऊस

    नाशिक - जिल्ह्यात सरासरी पेक्षा 50 टक्के पाऊस

    गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलक्या सरी

    5 तालुके अद्याप कोरडेच..

    तर धरण क्षेत्रांत मोठा पाऊस झाल्याने समाधान..

    दारणा, भावली , नांदूरमध्यमेशवर मधून पाण्याचा विसर्ग सुरू

  • 03 Aug 2021 07:51 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात 2 लाख 34 हजार मतदारांचे नावं होणार डिलिट

    - नागपूर जिल्ह्यात 2 लाख 34 हजार मतदारांचे नावं होणार डिलिट

    - मतदार यादीत फोटो नसल्याने नावं होणार डिलिट

    - फोटो नसलेले आतापर्यंत ११३४८ नावं वगळली

    - मतदार यादीतील प्रत्येक मतदारांची फोटो आयडी आवश्यक

    - निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदाराचा फोटो केला बंधनकारक

    - फोटो नसलेल्या मतदारांची नाव वगळण्याचं काम सुरु

  • 03 Aug 2021 07:50 AM (IST)

    महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना हाय कोर्टात बसला दणका

    औरंगाबाद -

    महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना हाय कोर्टात बसला दणका

    अधिकार नसताना फेरफार प्रकरणाला अब्दुल सत्तार यांनी दिली होती स्थगिती

    फेरफार प्रकरणी अब्दुल सत्तार यांना हायकोर्टात मागावी लागली माफी

    अब्दुल सत्तार यांच्या माफीवर समाधानी नसल्याचं हाय कोर्टाचं स्पष्टीकरण

    अब्दुल सत्तार यांनी कायद्याच्या तत्वाचे पालन करण्याचे कोर्टाने दिले आदेश

    औरंगाबाद जवळील जमीन प्रकरणात फेरफारला अब्दुल सत्तार यांनी बेकायदेशीर दिला होता स्थगिती आदेश

    स्थगिती आदेशानंतर तक्रारदारांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव

  • 03 Aug 2021 07:50 AM (IST)

    नाशकात निर्बंधात शिथिलता, सोमवार ते शुक्रवार,सर्व दुकानांना रात्री 8 पर्यंत परवानगी

    नाशिक -

    निर्बंधात शिथिलता

    सोमवार ते शुक्रवार,सर्व दुकानांना रात्री 8 पर्यंत परवानगी

    मॉल्स होणार खुले मात्र मल्टिप्लेक्स राहणार बंद

    रविवारी फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी

    सर्व खाजगी आणी सरकारी कार्यालयांना, पूर्ण क्षमतेनं काम करण्यास परवानगी

    उद्यान,मैदान खुले करण्यास परवानगी

    हॉटेल्स दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेनं सिटिंग परवानगी

    पार्सल व्यवस्था नियमित सुरू

  • 03 Aug 2021 07:49 AM (IST)

    शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना आज ‘कोविशिल्ड’चा फक्त दुसरा डोस मिळणार

    पिंपरी चिंचवड

    -शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना आज ‘कोविशिल्ड’चा फक्त दुसरा डोस मिळणार

    -पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना आज ‘कोविशिल्ड’चा फक्त दुसरा तर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे

    - किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार

  • 03 Aug 2021 07:48 AM (IST)

    राजगुरूनगर येथील लोकअदालतीत साडेचार हजार प्रकरणे निकाली

    पुणे

    -राजगुरूनगर येथील लोकअदालतीत साडेचार हजार प्रकरणे निकाली

    -ह्या लोकअदालती मध्ये प्रलंबित व दाखलपूर्व 16,103 प्रकरणापैकी 4524 प्रकरणात तडजोड

    -तर तब्बल 16 कोटी 64 लाख 93 हजार रुपयांची वसुली,आतापर्यंतची हिबसर्वत मोठी रक्कम

    -दाखलपूर्व प्रकरणात बँक रिकव्हरी, वीज वितरण,पाणीपट्टी,घरपट्टी आदी प्रकरणात तडजोड

    -तर कोर्टातील प्रलंबित दाव्यामध्ये तडजोड योग्य फौजदारी खटले,धनादेश कलम 138,मोटार अपघात,कौटुंबिक वाद इतर दिवाणी खटले आदी स्वरूओची प्रकरणे ठेवण्यात आली होती

  • 03 Aug 2021 07:26 AM (IST)

    सोलापूर  ग्रामीण भागात तपासणीसाठी जिल्हा परिषदेचे खास पथक

    सोलापूर  ग्रामीण भागात तपासणीसाठी जिल्हा परिषदेचे खास पथक

    जिल्ह्यातील ग्रामपंचायत ,आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळासह, पंचायत समितीच्या कार्यालयांना अचानक भेटी देण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती

    पथकाच्या तपासणीच्या अहवालानुसार संबंधित कर्मचाऱ्यांसह, विस्ताराधिकारी, गटविकास अधिकारी यावर होणार प्रशासकीय कार्यवाही

    पोलीस दलातील विशेष शाखेच्या धर्तीवर पथकाची नियुक्ती करण्यात येणार

    मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले विशेष पथकाची नियुक्ती

  • 03 Aug 2021 07:25 AM (IST)

    जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होण्याऐवजी वाढलीये

    पुणे -

    - जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होण्याऐवजी वाढलीये

    - यामुळे ग्रामीण भागाचा बाधित दरही कमी येत नसल्याने निर्बंध उठवण्यास प्रशासनाला अडचणी,

    - जिल्ह्यातील ४२ गावांत कोरोनाबाधित वाढत असल्याने या गावात संपूर्ण लॉकडाऊन,

    - शिवाय या गावातील प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना,

    - ग्रामीण भागाचा रुग्णबधितांचा दर आणि हॉटस्पॉट गावांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे धडक सर्वेक्षण मोहीम हाती,

    - गेल्या आठवड्यात हॉटस्पॉट गावे ही १०० च्या आत होती. मात्र, आता ती १०९ वर पोहचलीय

    - ग्रामीण भागाचा बाधित दर हा ५ च्या खाली अद्यापही आलेला नाही.

  • 03 Aug 2021 07:25 AM (IST)

    पंढरपूर ,माळशिरस, माढा सांगोला या तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या

    सोलापूर -- पंढरपूर ,माळशिरस, माढा सांगोला या तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या

    माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील रुग्ण वाढीचा वेग पाहता संचारबंदी लावण्याचा प्रशासनाचा विचार

    रात्रीपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त नाही

    शहरातील रुग्ण संख्या कमी असली तरी नव्या आदेशाची पालिका आयुक्तांना प्रतीक्षा

  • 03 Aug 2021 07:24 AM (IST)

    पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात होणार उपायुक्तांचा जनता दरबार

    पिंपरी चिंचवड

    -प्रत्येक पोलीस ठाण्यात होणार उपायुक्तांचा जनता दरबार

    -पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मधील प्रत्येक पोलीस ठाण्यात दर आठवड्याला पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार

    -त्यामुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रारींचे निवारण न झाल्यास पोलीस उपायुक्त कार्यालयात न जाता जनता दरबारात जाऊन आपल्या तक्रारी मांडता येणार आहेत

    -परिमंडळ 2 चे उपायुक्त आनंद भोईटे यांची माहिती

  • 03 Aug 2021 07:23 AM (IST)

    राज्य सरकारकडून महापालिकेला लसीचा पुरवठा उपलब्ध झालेली नसल्याने शहरातील लसीकरण आज बंद

    पुणे -

    - राज्य सरकारकडून महापालिकेला लसीचा पुरवठा उपलब्ध झालेली नसल्याने शहरातील लसीकरण आज बंद,

    - फक्त सात ठिकाणी कोव्हॅक्सिनचे २ हजार ३०० डोस उपलब्ध असणार आहेत,

    - कमला नेहरू रुग्णालयात परदेशात जाणारे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५०० डोस देण्यात उपलब्ध.

  • 03 Aug 2021 06:58 AM (IST)

    नागपुरात निर्बंध शिथील, पण हॅाटेल चारपर्यंतचं राहणार उघडे

    - नागपुरात निर्बंध शिथील, पण हॅाटेल चारपर्यंतचं राहणार उघडे

    - राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे हॅाटेल व्यावसायीक नाराज

    - ‘सरकार व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप’

    - नागपूरातील व्यापाऱ्यांनी केला आरोप

    - हॅाटेल रात्रीपर्यंत सुरु ठेवणार असल्याचा हॅाटेल चालकांचा इशारा

  • 03 Aug 2021 06:50 AM (IST)

    नागपुरात तापाचे रुग्ण वाढले

    - नागपुरात तापाचे रुग्ण वाढले

    - गेल्या १५ दिवसांत शहरात तापाचे एक हजारपेक्षा जास्त रुग्ण

    - नागपूर महानगरपालिकेने केले ९६ हजार घरांचे सर्वेक्षण

    - शहरात ५९२९ घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

    - नागपूर शहरात मनपाचा झोननिहाय सर्वे सुरु

  • 03 Aug 2021 06:44 AM (IST)

    मलंगगड परिसरात उल्हासनगरचं डम्पिंग येणार

    मलंगगड परिसरात उल्हासनगरचं डम्पिंग येणार
    जागेच्या मोजणीदरम्यान ग्रामस्थांचा विरोध
    आमदारांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
  • 03 Aug 2021 06:43 AM (IST)

    अकोल्यात शगुन कॅटरर्सच्या मालकाची फाशी घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे

    अकोल्यात शगुन कॅटरर्सच्या मालकाची फाशी घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे

    अकोला शहरातील जुने शहरातल्या जयहिंद चौक परिसरात 34 वर्षीय अल्पेश अरविंद उपाध्याय असं आत्महत्या केलेल्या व्यक्तिचं नाव असून शगुन कॅटरर्स नावाने कॅटर्स चालवायचा

    मृतकाजवळ सुसाइड नोट मिळाली असून या प्रकरणी जुने शहर पोलीस तपास करीत आहेत.

    सध्या पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले

    कोरोनाच्या काळातं या तिघांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं सुसाइड नोट नमूद केले असल्याची प्राथमिक माहिती

Published On - Aug 03,2021 6:29 AM

Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.