Maharashtra News LIVE Update | मलंगगड सामुहीक विनयभंग प्रकरण, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मलंगगड सामुहीक विनयभंग प्रकरण, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 04 Aug 2021 20:57 PM (IST)

  इंग्लंडला सहावा झटका, जोस बटलर बाद

  इंग्लंडला सहावा झटका, जोस बटलर बाद, बटलर 18 चेंडूत एकही धावा करु शकला नाही. बुमराहच्या बोलवर तो झेलबाद झाला.

 • 04 Aug 2021 18:53 PM (IST)

  मलंगगड सामुहीक विनयभंग प्रकरण, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

  – कल्याणमध्ये दोन दिवसांपुर्वी घडलेल्या सामुहीक विनयभंग प्रकरणात कल्याण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी
  – जोडप्यांना नेवाली पोलिसांनी घेतलं बोलावून, मलंगड परिसरात घटनास्थळी केला स्पाॅट पंचनामा
  – घटनास्थळी पोलीस पीडितांचा नोंदवला जबाब
  – या प्रकरणी पोलिसांनी आधीच छेडछाड आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला

 • 04 Aug 2021 18:49 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 249 नवे कोरोनाबाधित, 250 जणांना डिस्चार्ज

  पुणे :
  दिवसभरात २४९ पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात २५० रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
  – २१३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८८०४९.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३४८.
  – एकूण मृत्यू -८७९२.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७६९०९.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८३१२

 • 04 Aug 2021 18:01 PM (IST)

  नागपुरात दिवसभरात 5 नवे कोरोनाबाधित, तर पाच जणांची कोरोनावर मात

  नागपूर :

  नागपुरात आज 5 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  कोरोनामुळे शून्य मृत्यू

  तर 5 जणांनी केली कोरोनावर मात

  एकूण रुग्ण संख्या – 492906

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482601

  एकूण मृत्यू संख्या – 10117

 • 04 Aug 2021 17:20 PM (IST)

  सिंधुदुर्गात स्तर तीनचे निर्बंध प्रभावीपणे लागू

  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात ब्रेक द चेन अंतर्गत स्तर तीनचे निर्बंध प्रभावीपणे लागू. पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना ही सर्व दिवशी फक्त चार वाजेपर्यंतच सुरू राहणार. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश. मॉल्स, सिनेमाहॉल, नाट्यगृह व अन्य करमणुकीची ठिकाणे बंदच. रेस्टॉरंट, हॉटेल्स, होम स्टे, खानावळ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के आसन क्षमतेनुसार सुरू ठेवण्यास परवानगी. चार नंतर पार्सल सेवा. कार्यालयीन उपस्थिती फक्त ५० टक्के राहील. बाकी इतर निर्बंध आहेत तसेच राहणार.

 • 04 Aug 2021 17:18 PM (IST)

  केंद्राने आरक्षणाची वाट सुकर केली, आता राज्याने निर्णय घ्यावा : विनोद पाटील

  मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या राज्य सरकारला अधिकार देण्याच्या निर्णयामुळे आरक्षणाची वाट सुकर झाली आहे आणि मराठा तरुणांचा त्रास कमी झालाय. पण अद्याप अनेक मराठा तरुणांची अवस्था दयनीय असून त्यांचे भविष्य अंधारात आहे.
  आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी परिस्थिती अपवादात्मक नाही असे न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. मग अपवादात्मक परिस्थितीचे काय निकष आहेत यावर चर्चा करावी आणि आता राज्य सरकारने ठोस पावले उचलून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, असं मराठा समन्वयक विनोद पाटील म्हणाले.

 • 04 Aug 2021 17:16 PM (IST)

  पुण्यात चारनंतर सुरु असणारी दुकानं पालिकेकडून बंद करायला सुरुवात

  पुणे :

  चारनंतर सुरू असणारी दूकानं बंद करायला सुरुवात,

  पालिकेचे कर्मचारी बंद करतायेत दूकानं,

  पुण्यात दुकानांची वेळ 4 पर्यंतच,

  आज सातपर्यंत दूकानं सुरू ठेवण्याचा व्यापाऱ्यांनी केला होता निर्धार,

  मात्र पालिकाच करतीये दूकानं बंद,

  पालिकेतील सत्ताधारी भाजपचा व्यापाऱ्यांना पाठिंबा मात्र पालिकाच दूकानं बंद करण्याची करतेय कारवाई

 • 04 Aug 2021 17:15 PM (IST)

  राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले

  कोल्हापूर :

  राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले

  धरणातून 7112 क्यूसेक्स चा विसर्ग भोगावती नदीत सुरू

  धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने उघडले दरवाजे

 • 04 Aug 2021 17:14 PM (IST)

  नवीन नियमावली विरोधात ठाण्यातील बार अँड रेस्टॉरंट ऑनर्स असोसिएशन आक्रमक

  ठाणे : नवीन नियमावली विरोधात ठाण्यातील बार अँड रेस्टॉरंट ऑनर्स असोसिएशन आक्रमक, बार आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवून द्या या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व बार आणि रेस्टॉरंट ठेवणार बेमुदत बंद, ठाण्यातील हजारो बार आणि रेस्टॉरंट राहणार बंद, मागणी पूर्ण न झाल्यास सोमवारपासून राहणार सर्व बार रेस्टॉरंट बेमुदत बंद, आधी घेतली होती महापालिकेवर मूक मोर्चा काढण्याची भूमिका मात्र आता बेमुदत बंद ठेवण्याची भूमिका, स्वीगी, झोमॅटो च्या माध्यमातून पार्सल सेवा देखील ठेवणार बंद, नवीन नियमावलीमध्ये आमच्यावर अन्याय झाला असल्याची भावना, ठाण्यात बार आणि रेस्टॉरंट वगळता इतर दुकान रात्री १० वाजेपर्यंत सुरु मात्र बार रेस्टॉरंटला फक्त ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा

 • 04 Aug 2021 16:15 PM (IST)

  मलंगगड तरुण-तरुणींचे छेडछाड प्रकरणी निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

  शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  मलंगगड –
  – संबंधित अधिकारी मोहितेकडून माहिती घेतली
  – मेडिकलला गेले नाही
  – संस्कृती रक्षकांचा हेतू चांगला असतो, मात्र काही गैरफायदा घेतात
  – सीसीटीव्हीची व्यवस्था करणार, एकनाथ शिंदेंना कळविले
  –  पोलिसांनी आरोपींना पकडावं
  – तोकडे कपडे घातले म्हणून मारहाण केली हे कोणाचे समर्थक आहेत का याची चौकशी नेमावी का हे सरकारने ठरवावे
  – सोशल मीडिया बरोबर पोलीस महासंचालक यांना मेल लिहायला हवा होता, तो दखलपात्र तक्रार झाले असते
  – मेडिकलला गेले नाही म्हणून प्रकार झाला
  – सर्वोच्च न्यायालय सारखे न्यायाधीश होत मिडिया ट्रायल करावी का? हा प्रश्न
  – मेडिकल ला गेले नाही म्हणून तक्रार घेतली नाही की डिस्करेज केली याचा तपास करावा
  –  स्थानिकांनी तक्रार घेतली नाही तर डिजींना पत्र द्यायला हवे
  – पोलिसांचे खच्चीकरण करू नये,  पोलिसांचे नितीधैर्य खच्ची होईल असे वर्तनकन करू नये
  – प्रत्येक गोष्टीचे भांडवल करू नये, मीडिया ट्रायल करू नये
  – शिक्षा झाल्याची बातमी येत नाही, एखादी सनसनाटी असते म्हणून बातमी होते

  ऑन चित्रा वाघ –
  – चित्रा वाघ वर गुन्हा दाखल झाला तर डगमगन्याच कारण काय, असे गुन्हे दाखल होत असतात
  – माझ्याबाबत ही असे प्रसंग घडले आहेत
  – एवढं मोठं अवडंबर करण्याचं काम नाही
  – भांडवल करू नये, राजकारण मध्ये येताना भावनांचा विमा काढून यावा
  – तुम्ही का प्रश विचारतात

  ऑन संजय राठोड –
  – मला हा प्रश्न विचाराने म्हणजे औचित्य चा भंग आहे
  – मुख्यमंत्री यांनी चौकशी समिती नेमली आहे, आम्ही म्हणू तसा कायदा चालेल, असे कायद्यावर दबाव टाकू नये
  – आमच्याकडे खूप केस आहेत महिला अयोगच्या
  – त्याचे पुढे काही झाले नाही, त्या महिला कुठे याचा शोध घेतला तर मोठा विषय
  – कोर्ट तपास करेल,
  – व्यक्ती प्रसिद्ध नाही त्या प्रकरणाबाबत कोणी आवाज उठवत नाही

  – कोरोना आढावा बैठकीत पत्रकारांना विचारलेले प्रश्न संवेदनहिनतेचे लक्षण आहे

 • 04 Aug 2021 13:30 PM (IST)

  सांगलीतील नामवंत डॉक्टरची आत्महत्या 

  सांगली –

  सांगलीतील नामवंत डॉक्टरची आत्महत्या

  अदित्य हॉस्पिटलमध्ये सेवेत असणारे डॉक्टर दिपक राऊत यांची आत्महत्या

  चिंतामननगर मधील राहत्या घरी ओढणीने गळफास घेतला

  आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट, संजयनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद

 • 04 Aug 2021 13:28 PM (IST)

  एमपीएससी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे मानले आभार

  एमपीएससी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे मानले आभार,

  राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला,

  विद्यार्थ्यांनी पुढचं आंदोलन घेतलं मागे,

  9 तारखेला.विद्यार्थी पुण्यात करणार होते आंदोलन,

  एमपीएससी संयुक्त पुर्व परीक्षा अराजपत्रित गट ब परीक्षा होणार 4सप्टेंबरला ,

  एमपीएससीनं वेळापत्रक केलं जाहीर

  मात्र 2021 आणि 2022चं वेळापत्रक जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी,

  विद्यार्थ्यांनी टीव्ही 9 मराठीचे मानले आभार.

 • 04 Aug 2021 13:27 PM (IST)

  गेल्या पंधरा दिवसांपासून संसद चालू न देणाऱ्या विरोधकांवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी टीका केली

  गेल्या पंधरा दिवसांपासून संसद चालू न देणाऱ्या विरोधकांवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी टीका केली

  संसदेत शेतकरी आणि युवा वर्गाच्या तसेच महाराष्ट्रात आलेल्या पुरा संदर्भात एक विशेष चर्चा झाली पाहिजे होती परंतु विरोधकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून संसद बंद पाडत लोकशाहीचा गळा दाबलेला आहे

  विरोधकांच्या आडमुठेपणा च्या भूमिकेमुळे लोकशाहीची हत्या झालेली आहे..

  या संदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं

 • 04 Aug 2021 12:14 PM (IST)

  औरंगाबादेत क्रेडिट कार्डच्या लोनसाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

  औरंगाबाद –

  क्रेडिट कार्डच्या लोनसाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

  क्रेडिट कार्ड लोन न चुकवल्यामुळे अश्लील शिवीगाळ

  एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचे महिलेकडे थकले लोन

  20 हजार रुपयांसाठी महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

  वैतागलेल्या महिलेची पोलिसांकडे तक्रार

  तक्रारी नंतरही गुन्हेगारांवर 354 नुसार गुन्हा दाखल नाहीच

  पुष्पदीप प्रतीक सोनी असं पीडित महिलेचं नाव

  धर्मेंद्र श्रीराम कालरा यांच्या इंक्रेडीबल मॅनेजमेंट सर्व्हिस यांच्या विरोधात तक्रार दाखल

 • 04 Aug 2021 12:04 PM (IST)

  केंद्रीय पथक बेलसर गावात जाणार, दोन दिवस पथक आढावा घेणार

  पुणे –

  – केंद्रीय पथक बेलसर गावात जाणार

  – दोन दिवस पथक आढावा घेणार

  – पथकात एकूण 3 अधिकारी,

  – सौम्य लक्षणे असल्यानं जास्त भीती नाही

  – नवा विषाणू असल्याने त्याला गांभीर्याने घेतोय

  – पहिलाच रुग्ण आढळढल्याने केंद्रीय पथक आले आहेत

  – ते माहिती घेताय, चर्चा करताय

  – बैठकीनंतर ते झिका जिथं आढळून आलाय त्या गावात जाणार

  – बेलसरसह आजूबाजूच्या गावांत रक्तजल नमुने घेऊन त्याचा अभ्यास करणार आहे

  – प्राथमिक तपासणीत जास्त भीतीचे कारण नाही

 • 04 Aug 2021 12:03 PM (IST)

  वृक्षतोडीमुळे 18 बगळ्यांचा मृत्यू प्रकरण, महापालिकेला कारवाईचा ईशारा

  – महापालिकेकडून करण्यात आलेल्या वृक्षतोडीमुळे 18 बगळ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

  – वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेला कारवाईचा दिला ईशारा

  – महापालिका आयुक्तांना पत्र लिहीत आम्ही कारवाई करत असल्याच सांगत यापुढे विकासकामे किंवा ईतर कारणास्तव वृक्षतोड करतांना पालिकेकडून असे प्रकार होणार नाही याची काळजी घेण्याची केली विनंती

  – स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनूसार 1 ऑगस्टला गंगापूर रोडवरील डीके नगर परिसरात महापालिकेकडून खाया प्रजातीचे झाड़ कापण्यात आले होते

  – यामुळे झाडावरील 18 बगळे खाली पडून मृत्यूमुखी पडले होते तर 15 जखमी होऊन काही अंडीदेखिल फुटली होती

  – शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षयांची झाली होती जीवितहानी

 • 04 Aug 2021 11:45 AM (IST)

  नाशिकमध्ये हॉटेल व्यवसायिक आक्रमक

  – नाशिकमध्ये हॉटेल व्यवसायिक आक्रमक

  – प्रशासनाच्या नियमावली विरोधात आंदोलन

  – सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत हॉटेल व्यावसायाला दिलेली परवानगी हॉटेल चालकांना मान्य नाही

  – रात्री 10 पर्यंत वेळ वाढवून द्या

  – हॉटेल व्यावसायिकांची मागणी

 • 04 Aug 2021 11:44 AM (IST)

  पुणे जिल्ह्यातील खेड आणि शिरुर तालुक्यातील शेतीचे नंदनवन करणारे चासकमान धरण हे 100 टक्के क्षमतेने भरले

  पुणे –

  – पुणे जिल्ह्यातील खेड आणि शिरुर तालुक्यातील शेतीचे नंदनवन करणारे चासकमान धरण हे 100 टक्के क्षमतेने भरले

  – चासकमान धरण आणि भिमाशंकर परिसरात पाऊस सुरूच असल्याने भरले धरण,मागील वर्षी पेक्षा 25 दिवस आधिक भरले धरण

  – खबरदारीचा उपाय म्हणुन धरणाच्या पाचही दरवाजाद्वारे भिमानदी पाञात 925  क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे तर पॉवर हाऊस मधून 550 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू

  – चासकमान धरण हे 8.50 TMC क्षमता असलेलं धरण

  – प्रशासनाकडून भीमानदी काठावरच्या नागरीकांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे

 • 04 Aug 2021 11:00 AM (IST)

  औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

  औरंगाबाद –

  औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

  औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु

  भाजपचे आमदार अतुल सावे आणि संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु

  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपची जोरदार घोषणाबाजी

 • 04 Aug 2021 10:48 AM (IST)

  कल्याणमध्ये विठ्ठल कृपा हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग

  कल्याण :

  काटेमनावली परिसरतील घटना..

  विठ्ठल कृपा हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग

  हॉस्पिटल च्या चेंजिंग रूम मध्ये पंखा जळाल्याने पसरला होता धूर…

  हॉस्पिटल मधील 3 रुग्णांना दुसऱ्या खाजगी हलविण्यात आले…

  जीवित हानी काही नाही

 • 04 Aug 2021 10:48 AM (IST)

  कामिका एकादशी निमित्ताने पंढरी नगरी दुमदुमली

  पंढरपूर –

  कामिका एकादशी निमित्ताने पंढरी नगरी दुमदुमली

  श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल

  श्री विठ्ठल मंदिर बंद असल्याने नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेवून भाविक मानत आहेत समाधान

  येणाऱ्या भाविकांची केली जात आहे कोरोना टेस्ट

  अषाढी यात्रेच्या काळात संचारबंदी असल्याने यात्रेला येता आले नाही म्हणून या कामिका एकादशीला भाविकांनी पंढरपुरात केली गर्दी

 • 04 Aug 2021 10:46 AM (IST)

  प्रबोधन या पाक्षिकाचं‌ राज्य सरकार शताब्दी वर्ष साजरं करणार

  प्रबोधन या पाक्षिकाचं‌ राज्य सरकार शताब्दी वर्ष साजरं करणार

  मुख्यमंत्र्यांचे आजोबा केशव सीताराम ठाकरे हे प्रबोधन पाक्षिकाचे निर्माते

  १६ ऑक्टोबरपासून पाक्षिकाचं शताब्दी वर्ष

  प्रबोधनच्या शताब्दीसाठी २७ लाखांचे खर्च येणार

 • 04 Aug 2021 10:46 AM (IST)

  अहमदनगर स्वस्तात सोन्याचे अमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात नगर तालुका पोलिसांनसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

  अहमदनगर स्वस्तात सोन्याचे अमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात नगर तालुका पोलिसांनसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

  चंद्रपुर येथील एका इसमास अज्ञात दरोडेखोरांनी तब्बल ७ लाख ५० हजार रोख रुपयांना गंडा घातला होत

  याप्रकरणी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता

  त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या अट्टल 5 गुन्हेगारांना केली अटक

  नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

 • 04 Aug 2021 10:45 AM (IST)

  कोयनेचा पाणी विसर्ग बंद, धरणाचे सहाही दरवाजे केले बंद

  कराड

  कोयनेचा पाणी विसर्ग बंद

  धरणाचे सहाही दरवाजे केले बंद

  तेरा दिवसांनंतर दरवाजे केले बंद

  पावसाने उघडीप दिल्याने पाणी विसर्ग बंद

  23 जुलै पासुन सहा दरवाजे उघडुन सुरु होता कोयना नदी पात्रात विसर्ग

  धरणात 85.88 पाणीसाठा

  धरणात 20,440 क्युसेक पाणी आवक सुरु

  फक्त पायथा वीजगृहातुन 2,100 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदी पात्रात सुरु

 • 04 Aug 2021 10:44 AM (IST)

  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पुर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाची परवानगी

  एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पुर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाची परवानगी,

  आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा,

  4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पुर्व परीक्षा,

  एमपीएससीनं काढलं परिपत्र

  कोरोनामुळं परीक्षा 9 एप्रिल रोजी पुढे ढकलण्यात आली होती

  मात्र आता 4सप्टेंबरला होणार पुर्व परीक्षा ….

 • 04 Aug 2021 08:50 AM (IST)

  बुलडाणा जिल्ह्यात कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता, दुकाने रात्री 8 पर्यंत राहणार सुरु

  बुलडाणा

  जिल्ह्यात कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता, दुकाने रात्री 8 पर्यंत राहणार सुरू,

  जिल्ह्यातील धार्मिक स्थळे मात्र बंदच,

  दरम्यान शनिवारला दुपारी 3 पर्यंतच दुकाने सुरु राहतील, तर रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने 3 पर्यंत सुरु राहील,

  अन्य दुकाने या दिवशी बंद राहतील, जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

 • 04 Aug 2021 08:49 AM (IST)

  बारामतीत पंचायत समिती आणि आरोग्य विभागाकडून घरोघरी कोरोना चाचणी

  बारामती :

  – पंचायत समिती आणि आरोग्य विभागाकडून घरोघरी कोरोना चाचणी

  – काल दिवसभरात १२४२ जणांची ॲंटिजेन चाचणी

  – बारामती शहर आणि तालुक्यात सुरु आहे तपासणी मोहिम

  – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी..

 • 04 Aug 2021 08:48 AM (IST)

  आज लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे सोलापूर शहरात लसीकरण नाही

  सोलापूर – आज लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे शहरात लसीकरण नाही

  काल एकच दिवस झाले लसीकरण

  आज पुन्हा लसीकरण मोहीम झाले ठप्प

 • 04 Aug 2021 08:47 AM (IST)

  ब्रम्हगिरी उत्खनन प्रकरण, जिल्हा खनिज कर्म अधिकारी आनंद पाटील यांची तडकाफडकी बदली

  नाशिक –

  ब्रम्हगिरी उत्खनन प्रकरण

  जिल्हा खनिज कर्म अधिकारी आनंद पाटील यांची तडकाफडकी बदली

  उत्खननाचा वाद शासन दरबारी गेल्याने बदली..

  तळीये गावातील दुर्घटने नंतर शासनाकडून हालचाल..

  विभागातील अनेक प्रकरण बाहेर येण्याची शक्यता

 • 04 Aug 2021 08:45 AM (IST)

  सोलापुरात म्हशी पळविण्याचा कार्यक्रम आयोजित करणे पडले महागात, दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल

  सोलापूर –

  म्हशी पळविण्याचा कार्यक्रम आयोजित करणे पडले महागात

  दीडशे जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

  अक्कलकोट रस्ता महालक्ष्मी मंदिर ते कर्णिकनगर या मार्गावर रविवारी सायंकाळी म्हशी पळविण्याचा कार्यक्रम केला होता आयोजित

  आधी दहा जणांव गुन्हा त्यानंतर आता दीडशे जणांवर गुन्हा दाखल

  चार म्हशी पोलिसांनी ताब्यात घेऊन पालिकेच्या कोंडवाडा विभागात ठेवल्या

  आषाढ महिन्या निमित्त आयोजित केला जातो म्हशी पळविण्याचा कार्यक्रम

  जेलरोड  पोलिसात गुन्हा दाखल

 • 04 Aug 2021 08:43 AM (IST)

  काल लागलेल्या दहावीच्या निकालात फीज न भरलेल्या विद्यार्थ्यांचे गुण कमी

  – फी भरली नाही म्हणून CBSE शाळांनी विद्यार्थ्यांचे सूड घेतले का?

  – काल लागलेल्या दहावीच्या निकालात फीज न भरलेल्या विद्यार्थ्यांचे गुण कमी

  – नववीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीत अंतर्गत मूल्यमापनात केवळ ७० टक्के गुण

  – गुण कमी मिळाल्याने पालकांमध्ये प्रचंड नाराजी

  – दहावीमध्ये कमी गुण देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याच्या शाळांवर कारवाईची मागणी

 • 04 Aug 2021 08:33 AM (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोविशिल्ड’ लसीची टंचाई, आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

  पिंपरी-चिंचवड

  – ‘कोविशिल्ड’ लसीची टंचाई आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

  – ‘कोविशिल्ड’ लसीची टंचाई कायम असून आजही ‘कोविशिल्ड’चा पुरेसा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार

  – 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना आज ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे

  – किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार

 • 04 Aug 2021 08:32 AM (IST)

  अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात मेडिकलच्या विद्यार्थिनींचा विनयभंग

  अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात मेडिकलच्या विद्यार्थिनींचा विनयभंग

  तोकडे कपडे घातल्यानं टोळक्याचं कृत्य

  पोलिसांचा कॅमेरासमोर बोलायला नकार – स्क्रिप्टमध्ये मेंशन केलं आहे

 • 04 Aug 2021 08:31 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात 14 ते 45 वयोगटासाठी तूर्तास सरसकट लसीकरण नाही

  कोल्हापूर

  जिल्ह्यात 14 ते 45 वयोगटासाठी तूर्तास सरसकट लसीकरण नाही

  पुढचे काही दिवस फक्त नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार

  जिल्ह्यात अडीच लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

  पहिला डोस पूर्ण झालेल्यांना वेळेत दुसरा डोस देण्यासाठी प्रशासनाची धडपड

  18 ते 45 वयोगटातील लोकांना पहिला डोस साठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

  पुरेशी लस आणि दुसऱ्या दुसऱ्या डोस चे लाभार्थी कमी झाल्या नंतर मिळणार लस

 • 04 Aug 2021 08:30 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयात १० टक्के खाटा मुलांसाठी राखीव असणार

  – नागपूर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयात १० टक्के खाटा मुलांसाठी राखीव असणार

  – मुलांसाठी राखीव असलेल्या १० टक्के खाटा ॲाक्सीजनने सुसज्ज असतील

  – नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांची माहिती

  – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन तयार

 • 04 Aug 2021 08:30 AM (IST)

  नागपूर मेट्रोच्या एमडीवर आता मेडीकल बील घोटाळ्याचा आरोप

  – नागपूर मेट्रोच्या एमडीवर आता मेडीकल बील घोटाळ्याचा आरोप

  – एमडी ब्रीजेश दिक्षीत यांचे एका वर्षात तब्बल ६४ लाखांचे मेडीकल बिल.

  – ब्रिजेश दीक्षित यांचे तीन वर्षाच सव्वा कोटी पेक्षा जास्त रुपयांचे मेडीकल बेल

  – नागपूर मेट्रोच्या इतर संचालकांचेही लाखो रुपयांचे मेडीकल बिल

  – मेट्रोत मेडीकल बिलाचा घोटाळा झाल्याचा प्रशांत पवार यांचा आरोप

  – मेट्रोतील मेडीकल बिल घोटाळ्याच्या ED चौकशीची मागणी

  – कोट्यवधीचे मेडिकल बिल घेतलेल्या मेट्रोच्या संचालकांना नेमका कुठला आजार?

  – जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांचा सवाल

  – ‘मेट्रोच्या रोगी संचालकांना घरचा रस्ता दाखवण्याची केली मागणी’

  – आरोपांवर मेट्रोकडून कुठलीही प्रतिक्रिया नाही

 • 04 Aug 2021 08:29 AM (IST)

  आजरा बसस्थानकाच्या नवीन इमारतीतील वीज जोडणीचे काम शिवसैनिकांनी थांबवले

  कोल्हापूर

  आजरा बसस्थानकाच्या नवीन इमारतीतील वीज जोडणीचे काम शिवसैनिकांनी थांबवले

  बस स्थानक आसन काम निकृष्ट दर्जाच होत असल्याचा शिवसैनिकांचा आरोप

  कामाच्या दर जाऊन शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना धरल धारेवर

  कामाच्या स्ट्रक्चरल ऑडिट ची मागणी

  नवीन इमारतीला लागलेली गळती काढा मगच वीज जोडणी करा

  दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा विचारला सवाल

  बांधकाम योग्य दर्जाचे झाल्याशिवाय पुढील काम न करू देण्याचा दिला इशारा

 • 04 Aug 2021 08:29 AM (IST)

  कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे नागपुरातही होणार निदान

  – कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे नागपुरातही होणार निदान

  – डेल्टा प्लसच्या तपासणीसाठी नागपूर मेडीकलचा पुढाकार

  – सध्या नमुने पुण्याच्या एनआयव्ही किंवा इतर ठिकाणी पाठवले जातात

  – तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमिवर डेल्टा प्लसच्या नमुन्यांची नागपुरात तपासणी होण्याची शक्यता

  – मेडीकल प्रशासनाचे प्रयत्न सुरु

 • 04 Aug 2021 08:28 AM (IST)

  रात्री 10 पर्यंत बार उघडे ठेवण्याची परवानगी द्या, नाशिक जिल्हा बार हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी

  नाशिक – रात्री 10 पर्यंत बार उघडे ठेवण्याची परवानगी द्या..

  जिल्ह्या बार हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी

  जिल्ह्यातील 1000 बार अँड रेस्टॉरंट चालकांची कोंडी झाल्याची भावना..

  आज जिल्हाधिकार्यना भेटून देणार निवेदन..

  निर्बंध शिथिल झाल्यानंतर बार अँड रेस्टॉरंट आलं देखील सूट देण्याची मागणी..

 • 04 Aug 2021 08:28 AM (IST)

  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुफान गर्दी

  सोलापूर – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुफान गर्दी

  सोशल डिस्टसिंगचा उडाला फज्जा

  भाजीपाला खरेदी विक्री लिलावासाठी गर्दी

 • 04 Aug 2021 08:27 AM (IST)

  मनसुख हिरेनच्या हत्येसाठी 45 लाखाची दिली गेली होती सुपारी – एनआयए

  एंटीलिया बॉम्ब स्फोट प्रकरण

  मनसुख हिरेनच्या हत्येसाठी 45 लाखाची दिली गेली होती सुपारी

  एनआईए तर्फे मंगळवारी विशेष न्यायालयात दिली गेली आहे माहिती

  मनसुख हत्या प्रकरणातले आरोपीनी हत्येसाठी दिली दिलेत 45 लाख

  कारण मनसुख एंटीलिया बॉम्ब स्फोट प्रकरणात महत्वाचा होता

  ह्या प्रकरणातले अटक आरोपी आहेत अत्यन्त खतरनाक एनआईए वकीलांची माहिति

  4 ते 5 साक्षीदाराना धमकी दिली गेली असल्याने ते पुढे येत नाही कारण त्यांच्या जीवितास धोका आहे

 • 04 Aug 2021 07:56 AM (IST)

  ब्रेक द चेन आदेशानंतर नागपुरातील व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी

  – ब्रेक द चेन आदेशानंतर नागपुरातील व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी

  – संतप्त व्यापारी करणार पालकमंत्र्यांच्या घराचा किंवा कार्यालयाला घेराव

  – सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

  – पुढील दोन ते तीन दिवसांत व्यापारी न्यायालयात याचिका दाखल करणार

  – हॅाटेल, लॅान, मंगल कार्यालयाची वेळ वाढवून देण्याची मागणी

 • 04 Aug 2021 07:55 AM (IST)

  पुण्यातील व्यापारी आज निर्बंध झुगारून संध्याकाळी 7 पर्यंत दुकानं खुली ठेवणार

  पुणे –

  – पुण्यातील व्यापारी आज निर्बंध झुगारून संध्याकाळी 7 पर्यंत दुकानं खुली ठेवणार,

  – सरकरच्या नियमानुसार 4 पर्यंत दुकानं बंद करण्याचा आदेश,

  – मात्र कोरोना रुग्ण संख्या कमी असताना सरकार शिथिलता देत नसल्यामुळे व्यापारी आक्रमक,

  – यासंदर्भात पुण्यातील व्यापाऱ्यांनी काल सरकार विरोधात घंटा नाद आंदोलन केले होते.

 • 04 Aug 2021 07:54 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयात 10 टक्के खाटा मुलांसाठी राखीव असणार

  – नागपूर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयात 10 टक्के खाटा मुलांसाठी राखीव असणार

  – मुलांसाठी राखीव असलेल्या 10 टक्के खाटा ॲाक्सीजनने सुसज्ज असतील

  – नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांची माहिती

  – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन तयार

 • 04 Aug 2021 07:54 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात 14 ते 45 वयोगटातील साठी तूर्तास सरसकट लसीकरण नाही

  कोल्हापूर

  जिल्ह्यात 14 ते 45 वयोगटातील साठी तूर्तास सरसकट लसीकरण नाही

  पुढचे काही दिवस फक्त नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार

  जिल्ह्यात अडीच लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

  पहिला डोस पूर्ण झालेल्यांना वेळेत दुसरा डोस देण्यासाठी प्रशासनाची धडपड

  18 ते 45 वयोगटातील लोकांना पहिला डोस साठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

  पुरेशी लस आणि दुसऱ्या दुसऱ्या डोस चे लाभार्थी कमी झाल्या नंतर मिळणार लस

 • 04 Aug 2021 07:49 AM (IST)

  सेंट्रल बॅलन्स गेलेल्या बसच्या धक्क्याने दुचाकी चालक जखमी

  औरंगाबाद –

  सेंट्रल बॅलन्स गेलेल्या बसच्या धक्क्याने दुचाकी चालक जखमी

  औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद रोडवरील धक्कादायक प्रकार

  सेंट्रल बॅलन्स गेल्यामुळे बस चालत होती तिरपी

  तिरप्या बसचा धक्का लागून अनेक दुचाकी चालक जखमी

  तिरप्या बसचा धक्का लागल्यामुळे एका तरुणाने केला व्हिडीओ शूट

  धुळे आगारच्या तिरप्या बसमुळे अनेक अपघाताला निमंत्रण

  तिरप्या बसमुळे दुचाकी चालकांचे अपघात होत असतानाही बस ड्रॉइव्हरने बस दामटली

 • 04 Aug 2021 07:39 AM (IST)

  स्मार्ट सिटी नागपुरात डेंग्युचा विळखा, 350 रुग्ण, सहा जणांचा मृत्यू

  – स्मार्ट सिटी नागपुरात डेंग्युचा विळखा

  – नागपूर शहरात ३५० रुग्ण, सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

  – गेल्या सात दिवसांत डेंग्यूचे तब्बल ११७ रुग्ण वाढले

  – काल दिवसभरात मनपाकडून ८,३२५ घरांचं सर्वेक्षण

  – ८,३२५ घरांपैकी ३६५ घरांमध्ये आढळून आल्या डेंग्युच्या अळ्या

 • 04 Aug 2021 07:38 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही कमिटी नाही

  नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही कमिटी नाही

  – नागपूर जिल्ह्यात समित्यांच्या वाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेस नाराज

  – राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

  – मंत्री नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्याबद्दल व्यक्त केली नाराजी

  – ‘महाविकास आघाडीच्या ठरवलेल्या सुत्रानुसार समित्यांचं वाटप नाही’

  – राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा आरोप

 • 04 Aug 2021 07:38 AM (IST)

  गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण बंद असताना आज पुण्यात लसीकरणाला सुरुवात

  पुणे –

  – गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण बंद असताना आज पुन्हा लसीकरणाला सुरुवात,

  – सरकारकडून महापालिकेला मिळालेत कोव्हीशील्डचे १८ हजार डोस,

  – शहरातील आज ६० ठिकाणी कोव्हीशील्ड तर ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसीकरण होणार,

  – महापालिकेचे २०० केंद्र असल्याने प्रत्येक केंद्रावर १०० डोस द्यायचे असले तरी किमान २० हजार डोसची आवश्‍यकता असते.

  – पण महापालिकेला कोव्हीशील्डचे १८ हजार डोस मिळाल्याने लसीकरण केंद्रांची संख्या घटवली आहे,

  – महापालिकेच्या ६० दवाखान्यांमध्ये कोव्हीशील्डचे प्रत्येकी २०० डोस उपलब्ध करून दिल्याने १२ हजार डोसचे वाटप करण्यात आले,

  – उर्वरित ६ हजार डोस महापालिकेतर्फे विविध घटकांसाठी केल्या जाणाऱ्या लसीकरणासाठी वापरण्यात येणार.

 • 04 Aug 2021 07:01 AM (IST)

  पुणे शहराला मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला मंजूर

  पुणे –

  – पुणे शहराला मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला मंजूर,

  – महापालिका हद्दीत नव्याने आलेल्या 23 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मुळशी धरणामधून 5 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी द्यावे असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य,

  – हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार,

  – पुण्याची लोकसंख्या वाढत असल्याने पाणी कोटा वाढवावा अशी मागणी गेल्या काही वर्षापासून महापालिका करत आहे,

  – महापालिका हद्दीपासून सुमारे 40 किलोमीटर लांब असलेल्या मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाची मान्यता मिळावी यासाठी हालचाली सुरू.

 • 04 Aug 2021 06:52 AM (IST)

  कामिका एकादशी निमित्ताने  पंढरपूर येथील सावळ्या  विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक सजावट

  आज कामिका एकादशी निमित्ताने  पंढरपूर येथील सावळ्या  विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे.

  ही सजावट बार्शी येथील विठ्ठल भक्त श्रीकांत गणगले यानी केलीय.

  श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा, सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु, आष्टर, ग्लेंडर ,  केशरी झेंडु , निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे ,पिवळा झेंडु  ,कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस , गुलाब , शेवंती ,ड्रेसिना ,औरकेड  अशा विविध आकर्षक अशा  फुलांची आरास करण्यात आली आहे.

  यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे

 • 04 Aug 2021 06:49 AM (IST)

  मद्यधुंद तरुणीचा पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात धिंगाणा

  – मद्यधुंद तरुणीचा पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात धिंगाणा,

  – रस्त्यावर झोपून वाहतूक अडविण्याचा केला प्रयन्त,

  – रात्री 11 वाजताची घटना,

  – पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न,

  – दरम्यान अद्याप तरुणीवर गुन्हा दाखल नाही.

  – हि तरुणी नेमकी कोण आहे याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

 • 04 Aug 2021 06:48 AM (IST)

  कोंडी शिवारात नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत

  सोलापूर जिल्ह्यातील उत्तर  तालुक्यातील कोंडी शिवारात नागरिकांना बिबट्याची चांगलीच दहशत बसली आहे, गाव शिवारात बिबट्या फिरत असल्याच्या मतावर गावकरी ठाम असून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, या सगळ्यामुळे गावकऱ्यामध्ये चांगलीच दहशत पसरली आहे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI