Maharashtra News LIVE Update | जळगाव जिल्ह्यासाठी मोठा दिलासा, प्रथमच जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | जळगाव जिल्ह्यासाठी मोठा दिलासा, प्रथमच जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 05 Aug 2021 22:26 PM (IST)

  पेगॅसस स्पायवेअर संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका, कोर्टाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

  मुंबई : पेगॅसस स्पायवेअर संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका

  महाराष्ट्र राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांच्या इस्राईल  दौऱ्यायाबाबत हायकोर्टात याचिका

  सदर इस्त्राईल दौरा हा पेगॅसस स्पायवेअर प्रकरणाशी संबंधित होता का ?

  याचिकेत अशा आशयचा प्रश्न उपस्थित केला गेला आहे

  चीफ जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस जीएस कुलकर्णी यांच्या डिव्हिजन बेंचसमोर याचिकेवर सुनावणी नंतर कोर्टाने डीजीआयपीआर आणि महाराष्ट्र सरकारला पाठविली नोटीस

  राज्य सरकार सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना चार आठवड्यांत उत्तर देण्याचे मुंबई हायकोर्टाने दिले निर्देश

 • 05 Aug 2021 19:56 PM (IST)

  चिपळूण-पोसऱ्यातील दुर्घटनाग्रस्त 50 लोकांचं अलोरे येथे स्थलांतर, घरांत पाणी आणि वीज नसल्यामुळे लोकांचे मोठे हाल 

  रत्नागिरी : चिपळूण-पोसऱ्यातील दुर्घटनाग्रस्त 50 लोकांचं अलोरे येथे स्थलांतर

  स्थलांतर केलेल्या घरांत पाणी आणि वीज नसल्यामुळे दुर्घटनाग्रस्त लोकांचे मोठे हाल

  प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा दुर्घटना ग्रस्त लोकांना मोठा फटका

  गैरसोय असल्यामुळे याठिकाणी राहायचं कसं असा मोठा प्रश्न

  19 कुटुंबातील जवळपास 50 लोकांची मोठी गैरसोय

  काँग्रेसचे जेष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी खेडच्या प्रांतांना घेतले फैलावर

 • 05 Aug 2021 19:08 PM (IST)

  नागपुरात आज 12 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपुरात आज 12 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  कोरोनामुळे मृत्यू शून्य

  तर 4 जणांनी केली कोरोनावर मात

  एकूण रुग्णसंख्या -492918

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482605

  एकूण मृत्यूसंख्या – 10117

 • 05 Aug 2021 19:04 PM (IST)

  जळगाव जिल्ह्यासाठी मोठा दिलासा, प्रथमच जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

  जळगाव : जळगाव जिल्ह्यासाठी मोठा दिलासा

  22 मे 2020 नंतर प्रथमच जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

  कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात चर्चेत असलेला जळगाव जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात

 • 05 Aug 2021 19:03 PM (IST)

  नाशिकमध्ये दिवसभरात आढळले 97 नवे रुग्ण

  नाशिक : आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 89

  आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 97

  नाशिक मनपा- 033

  नाशिक ग्रामीण- 062

  मालेगाव मनपा- 000

  जिल्हा बाह्य- 002

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8525

  आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 01

  नाशिक मनपा- 00

  मालेगाव मनपा- 00

  नाशिक ग्रामीण- 01

  जिल्हा बाह्य- 00

 • 05 Aug 2021 18:44 PM (IST)

  वसईत मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, करण तिवारी असे मृत मुलाचे नाव

  – वसईत एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

  – बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पोहत असताना बुडून झाला मृत्यू

  – करण तिवारी (वय 16 ) असे बुडालेल्या मुलाचे नाव असून तो नालासोपारा पूर्व शिर्डी नगरचा रहिवाशी आहे

  – वसई पूर्व मधूबन परिसरात आज सायंकाळी 4 च्या सुमारास घडली घटना

  – वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बुडालेल्या मुलाचा मृतदेह शोधण्यात मिळविले यश

 • 05 Aug 2021 18:28 PM (IST)

  चंद्रकांत पाटील घेणार राज ठाकरेंची भेट, भेटीकडे सर्वांच लक्ष

  चंद्रकांत पाटलांनी आणि राज ठाकरे यांची भेट

  भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांच लक्ष

  मनसे आणि भाजपमधील वाढत्या जवळीकीनंतर दोन नेत्यांची होणार भेट

  राजकारणामध्ये एकच गोष्ट कायम राहत नाही, उद्याची भेट ही केवळ राजकीय विचारांची देवाण-घेवाण- चंद्रकांत पाटील

  उद्या सकाळी ११:३० वाजता मी भेटणार, राजकारणावरही चर्चा होईल- चंद्रकांत पाटील

 • 05 Aug 2021 18:25 PM (IST)

  उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाची बैठक

  मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाची बैठक

  मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित

  सांस्कृतिक कार्य विभागाचीदेखील आढावा बैठक

  मंत्री अमित देशमुख उपस्थित

 • 05 Aug 2021 18:17 PM (IST)

  सोलापुरात रुग्णवाहिका चालकाला मारहाण

  सोलापूर – रुग्णवाहिका चालकाला मारहाण

  कोव्हिडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला मारहाण

  शिवशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात येत होती मोफत रुग्णवाहिका सेवा

  मोफत रुग्णवाहिका सेवा का देता म्हणून इतर खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून मारहाण

  सोलापूर महानगरपालिकेच्या आयडिएच दवाखान्या समोरील घटना

  अजय जाधव असे मारहाण झालेल्या रुग्णवाहिका चालकाचे नाव

 • 05 Aug 2021 17:28 PM (IST)

  रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत करा, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची मागणी

  रत्नागिरी -रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत करा

  – नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र

  आंबा घाटात अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही बंद आल्यामुळे मार्ग सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर करावेत

  आजपासून छोट्या वाहनांची वाहतूक सुरू

  मात्र जड वाहनांना बंदी कायम

 • 05 Aug 2021 17:27 PM (IST)

  आंदोलन करणाऱ्या नाशिकमधील रेस्टॉरंट चालकांवर पोलिसांची कारवाई

  नाशिक – आंदोलन करणाऱ्या नाशिकमधील रेस्टॉरंट चालकांवर पोलिसांची कारवाई

  – 13 हॉटेल चालकांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

  – मनाई आदेश असताना कोरोनाकाळात आंदोलन केल्याप्रकरणी कारवाई

  रेस्टोरंट चालक संतप्त

 • 05 Aug 2021 16:12 PM (IST)

  सचिन वाझेचा जामीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळला

  मुंबई : अँटेलिया स्फोटक प्रकरणात अटक आरोपी सचिन वाझेचा जामीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळला

  न्यायलयाचा वेळ वाया गेल्याबाबत न्यायधिशांनी दर्शविली नाराजी

  मात्र एनआयएने आरोप पत्रदाखल करन्यासाठी एक महिन्याचा जो अतिरिक्त वेळ मगितला गेला होता, त्याला न्यायल्याने दिली मंजुरी

 • 05 Aug 2021 16:10 PM (IST)

  पुण्यात चार वाजून गेले तरीही व्यापाऱ्यांची दुकाने सुरूच

  पुणे -पुण्यातील लक्ष्मी रोडवरील व्यापाऱ्यांची दुकाने सुरू

  -चार वाजून गेले तरीही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहेत

  -दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत पुण्यातील व्यापारी ठाम

 • 05 Aug 2021 12:29 PM (IST)

  बीडीडी चाळीतल्या पोलिसांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

  तुमच्या भावना तुमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक सेतू निर्माण करायचा म्हणून या ठिकाणी आलोय. मी मुख्यमंत्र्यांशी गृहमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करेन. पोलीस आयुक्तांशी बोलेन. सध्या कोरोना काळात शिफ्टिंग शक्य नाहीये. शिफ्टिंगसाठी ज्या जागा सुचवण्यात आल्यात त्या याहीपेक्षा खराब आहेत. या निर्णयाला स्थगिती द्यायला हवी. बीडीडी चाळीतल्या पोलिसांना आम्ही संरक्षण दिल होत. भलेही या सरकारने त्याच भूमिपूजन केलं होतं पण आम्ही टेंडर काढलं निम्म्याहून जास्त प्रक्रिया आम्ही पार पाडली. त्याची अंमलबजावणी आता सुरुय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 • 05 Aug 2021 12:15 PM (IST)

  कल्याण, तरुण तरुणी मारहाण प्रकरण, पाच आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

  कल्याण, तरुण तरुणी मारहाण प्रकरण

  पाच आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

  पाचपैकी तीन अल्पवयीन

  आरोपींची नावे सोमनाथ वाघ, अशोक वाघ

  सर्व आरोपी हे कुशीवली गावचे रहिवासी

  हिल लाईन पोलिसांची माहिती

  मलंगगड परिसरातील रविवारी कुशीवली गावात घडला होता प्रकार

 • 05 Aug 2021 12:07 PM (IST)

  मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात आज महत्वाची सुनावणी

  मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात आज महत्वाची सुनावणी

  वक़िलाना लोकल प्रवास , पत्रकाराना लोकल मध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळावी ह्यासाठी वकील आणि पत्रकार संघटने तर्फे केली गेली आहे माँगणी

  सर्वसामान्य लोकांना लोकल प्रवास संदर्भात ही केली गेली आहे माँगणी

  मुख्य न्यायाधीश व न्या. जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपिठापुढे एकत्रितपणे होणार आज काही वेळात शुरू होणार सुनावणी

 • 05 Aug 2021 11:32 AM (IST)

  राज्यपाल यांचा नांदेड परभणी, हिंगोली दौरा, तिन्ही जिल्हाच्या पालकमंत्र्यांनी दौरात जाण्याचे टाळले

  राज्यपाल यांचा नांदेड परभणी हिॅगोली दौरा

  तिन्ही जिल्हाच्या पालकमंत्र्यांनी दौरात जाण्याचे टाळले

  राज्यपाल दौरा दरम्यान पालकमंत्री उपस्थितीत राहण अपेक्षित पण महाविकास आघाडीचे तीन पालकमंत्री अनुउपस्थितीत राहणार

 • 05 Aug 2021 11:31 AM (IST)

  केंद्रीय पथक बेलसरमध्ये दाखल

  बारामती :

  – केंद्रीय पथक बेलसरमध्ये दाखल

  – पुरंदर तालुक्यातील बेलसर गावांमध्ये सापडला होता झिकाचा रुग्ण

  – गावातील परिस्थितीबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सुरू

  – बेलसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू आहे बैठक

  – केंद्रीय पथकाकडून घेतली जातेय माहिती

 • 05 Aug 2021 10:36 AM (IST)

  मलंगगड भागातील तरुणीला मारहाण आणि विनयभंग प्रकरण, 5 जणांना अटक

  अंबरनाथ :

  मलंगगड भागातील तरुणीला मारहाण आणि विनयभंग प्रकरण

  अखेर ५ आरोपींना उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी केली अटक

  पाच आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश

  अटक आरोपी कुशिवली परिसरतीलच राहणारे

 • 05 Aug 2021 09:10 AM (IST)

  परभणीच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी आंचल गोयल आज स्वीकारणार पदभार

  परभणी –

  परभणी जिल्हाधिकारी पदभार वाद प्रकरण

  परभणीच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी आंचल गोयल आज स्वीकारणार पदभार

  आंचल गोयल यांच्या परभणी जिल्हाधिकारी पदी नेमणुकीवरून झाला होता मोठा वाद

  स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंचल गोयल यांच्या नियुक्तीला केला होता विरोध

  तर सर्वसामान्य नागरिकांनी आंचल गोयल यांच्या नियुक्तीसाठी सुरू केले होते आंदोलन

  अखेर आज आंचल गोयल परभणी जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारणार पदभार

  आंचल गोयल या कडक शिस्तीच्या आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून आहे ओळख

 • 05 Aug 2021 08:52 AM (IST)

  बस स्थानकातील सुरक्षेच्या संदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

  औरंगाबाद –

  बस स्थानकातील सुरक्षेच्या संदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल..

  काही दिवसांपूर्वी बस स्थानकावरून अपंग विद्यार्थ्यांला 500 रुपयांसाठी टाकले होते जीवे मारून ..

  बस स्थानकावर सुरक्षा वाढवण्याची विनंती केली असता विभाग नियंत्रकानी याची दखल घेतली नाही..

  बस स्थानके सुरक्षित नसल्याने औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल..

  पुढील सुनावणी होणार 9 ऑगस्ट ला..

 • 05 Aug 2021 08:51 AM (IST)

  औरंगाबाद महानगरपालिकेचे मिशन भंगार हटाव जोरात सुरु

  औरंगाबाद –

  औरंगाबाद महानगरपालिकेचे मिशन भंगार हटाव जोरात सुरु..

  वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या बेवारस वाहनांना केले जातेय जप्त..

  आतापर्यंत रस्त्यावर उभी असणारी 21 वाहने जप्त तर 26 हजारांचा लावला दंड..

  3 दिवसात 21 बेवारस आणि नियम बाह्य वाहने केले जप्त..

  बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळे तर अपघातांना होते आमंत्रण..

 • 05 Aug 2021 08:27 AM (IST)

  18 बगळ्यांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदाराला नोटीस

  नाशिक – 18 बगळ्यांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदाराला नोटीस

  घटना का झाली याबाबत सविस्तर खुलासा करण्याचे आयुक्तांचे आदेश

  खुलासा समाधानकारक नसेल तर तातडीने त्यावर कारवाई करण्याचे आदेश ..

  गंगापूर रोड परिसरात झाड पाडल्याने झाला होता बगळ्यांचा मृत्यू

  पर्यावरण प्रेमींच्या विरोधात नंतर महापालिकेने बजावली ठेकेदाराला नोटीस

 • 05 Aug 2021 08:26 AM (IST)

  पुणे महापालिकेची खोटे बिल काढल्याप्रकरणी उपअभियंता निलंबित

  पुणे –

  – महापालिकेची खोटे बिल काढल्याप्रकरणी उपअभियंता निलंबित,

  – भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालायाच्या परिसरात कामे न करता ठेकेदाराला बिल आदा केल्याप्रकरणी उप अभियंता बाळासाहेब टुले निलंबित,

  – तर कनिष्ठ अभियंता सिमरन पिरजादे यांची खातेनिहाय चौकशी सुरू,

  – दरम्यान यापूर्वी ज्या ठेकेदारांना काळ्यायादीत टाकले आहे, त्यांच्याकडून पैशाची वसुली लवकरच सुरू होणार,

  – पादचारी मार्गाची दुरुस्ती, काँक्रिटीकरण, नवीन पादचारी मार्ग तयार यासह इतर कामात अनागोंदी झाल्याची तक्रार आल्यानंतर याची तपासणी करण्यात आली.

 • 05 Aug 2021 08:23 AM (IST)

  पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील रस्त्यांची दुरुस्ती महापालिका करणार

  पुणे –

  – महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील रस्त्यांची दुरुस्ती महापालिका करणार,

  – या गावातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत.

  – खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून खास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर,

  – याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल, प्रशासनाकडून स्पष्ट,

  – जून महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारने पुणे ग्रामीणमधील २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

 • 05 Aug 2021 08:23 AM (IST)

  सोलापूर महापालिकेत स्वतंत्र गट म्हणून निर्णय घेण्यास मान्यता मिळण्याच्या प्रस्तावासाठी पालिका आयुक्तांचा शासनाकडे प्रस्ताव

  सोलापूर –

  महापालिकेत स्वतंत्र गट म्हणून निर्णय घेण्यास मान्यता मिळण्याच्या प्रस्तावासाठी पालिका आयुक्तांचा शासनाकडे प्रस्ताव

  शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण रुग्णसंख्या व्यापाऱ्यांची मागणी आदी बाबींचा यात उल्लेख

  शहरात कोरोना संसर्ग कमी होत असताना निर्बंध कडक असल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याची प्रस्तावातील माहिती

  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्यानुसार पश्चिम महाराष्ट्रात सोलापुरातील  संसर्ग कमी आहे त्यामुळे सोलापूरातील निर्बंध शिथिल करावेत अशी व्यापाऱ्यांची मागणी

 • 05 Aug 2021 08:22 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला वेग येणार

  कोल्हापूर

  जिल्ह्यात उद्यापासून 18 वर्षा वरील नागरिकांच्या लसीकरणाला वेग येणार

  21 सत्रात राबवली जाणार लसीकरण मोहीम

  एका केंद्रावर एका दिवशी 200 डोस देण्याचं आरोग्य विभागाच नियोजन

  मात्र त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार

  जिल्ह्यात आता पर्यंत 12 लाख 3 हजार 35 जणांनी घेतला पहिला डोस तर 6 लाख 38 हजार 169 जणांचा दुसरा डोस पूर्ण

 • 05 Aug 2021 08:07 AM (IST)

  मालवाहतुकीची सोलापूर रेल्वेची रेकॉर्डब्रेक कामगिरी

  सोलापूर –

  मालवाहतुकीची सोलापूर रेल्वेची रेकॉर्डब्रेक कामगिरी

  रेल्वेने जुलै महिन्यात केली  साखर व सिमेंटची 0.52 मिलियन टन वाहतूक

  मागील वर्षाच्या तुलनेत 27 .59 टक्के वाढ

  मालवाहतूकिमुळे रेल्वे प्रशासनाला 39 कोटी 48 लाख रुपयांचे उत्पन्न

  मागील वर्षाच्या तुलनेत 35.21 टक्केने उत्पन्न वाढ

 • 05 Aug 2021 08:06 AM (IST)

  यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पामधील चारही धरणांमध्ये आतापर्यंत समाधानकारक पाऊस

  पुणे –

  – यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पामधील चारही धरणांमध्ये आतापर्यंत समाधानकारक पाऊस

  – त्यामुळे धरणात ९४ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा,

  – गेल्या सात वर्षांच्या तुलनेत जून आणि जुलै महिन्यात पडलेला पाऊस कमीच,

  – सन २०१५ पासून आतापर्यंत जून आणि जुलै या पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांचा विचार केल्यास धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदापेक्षा जास्त पावसाची नोंद,

  – शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.

  – टेमघर धरण परिसरात दोन हजार मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात १५०० मि.मी.,

  – तर खडकवासला धरण परिसरात ४५० मि.मीपेक्षा जास्त पावसाची नोंद

  – त्यानुसार या चारही धरणांच्या परिसरात यंदा आतापर्यंत सरासरी एवढय़ा पावसाची नोंद.

 • 05 Aug 2021 08:06 AM (IST)

  ‘ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन’

  – ‘ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन’

  – ‘२०१८ मध्ये ओबीसींसाठी ३६ वसतीगृह बांधण्याचा निर्णय हवेत’

  – ‘ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंनी केली होती वसतीगृहाची घोषणा’

  – एक महिन्यात ओबीसींचे वसतीगृह यन केल्यास आंदोलनाचा इशारा

  – राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्य सरकारवर टीका

  – ‘राज्य सरकार ओबीसींच्या बाबतीत फक्त आश्वासनं देतात’

  – मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे वसतीगृह झालेत, मग ओबीसींचे का नाही?

  – राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा सवाल

  – ‘महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत ओबीसी हिताचा एकंही शासन निर्णय नाही’

  – दोन वर्षांत ओबीसी समाजाला काहीही मिळालं नाही

 • 05 Aug 2021 08:05 AM (IST)

  पुण्यात चारनंतर दुकानं सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार

  पुणे –

  – शहरात चारनंतर दुकानं सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार,

  – पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती,

  – कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करणार,

  – पोलिसांनी तपशील नोंदविले असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार.

 • 05 Aug 2021 08:04 AM (IST)

  जेजुरीत साथीच्या आजारांच्या सर्वेक्षण आणि तपासणीला सुरुवात

  पुरंदर : जेजुरीत साथीच्या आजारांच्या सर्वेक्षण आणि तपासणीला सुरुवात..

  – आरोग्य विभाग, जेजुरी नगरपरिषद अणि ग्रामीण रुग्णालयाकडून होणार सर्वेक्षण..

  – जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात केली जाणार तपासणी आणि उपचार..

  – जेजुरीत मागील दोन महिन्यांपासून चिकन गुनिया आणि डेंग्यूचे थैमान..

  – जेजुरी नगरपरिषदेनेही उपाययोजनांचा वेग वाढवला..

  – स्थानिक पातळीवरच उपचार मिळणार असल्यानं नागरीकांना दिलासा..

 • 05 Aug 2021 07:19 AM (IST)

  नागपुरात रिकाम्या प्लॅाटवर पाणी साचल्यास किंवा गवत लाढल्यास दंडात्मक कारवाई

  – नागपुरात रिकाम्या प्लॅाटवर पाणी साचल्यास किंवा गवत लाढल्यास दंडात्मक कारवाई

  – डेंग्यूला आळा घालण्यासाठी नागपूर महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

  – खाली प्लॅाट स्वच्छ करण्याचा खर्चंही प्लॅाटधारकाकडून वसूल केला जाणार

  – नागपूर शहरात दीड लाख खाली भुखंड

  – २५ ते ३० टक्के खाली प्लॅाटवर पाणी साचलं आणि गवत वाढलं

  – खाली प्लॅाटवर पाणी साचून राहील्यामुळे वाढला डेंग्यूचा धोका

 • 05 Aug 2021 07:18 AM (IST)

  महेश राऊत यांच्या आत्महत्येची गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी सुरु

  – महेश राऊत यांच्या आत्महत्येची गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी सुरु

  – काल दिवसभरात पाच जणांचे नोंदवले बयाण

  – पोलिसांनी मारहाण केल्यानंतर अपमानीत झाल्याने महेश यांनी केली होती आत्महत्या

  – दोषींवर कारवाई करण्यासाठी पालकमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

  – चार्ली कमांडो किशोर सेनाड आणि प्रविण आलम यांनी केली होती मारहाण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI