Maharashtra News LIVE Update | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन मेस्मा लावण्यावर निर्णय : अनिल परब

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटस जाणून घ्या टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर

Maharashtra News LIVE Update | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन मेस्मा लावण्यावर निर्णय : अनिल परब
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अजूनही सुरुच असून अनिल परब (Anil Parab) यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा सुरु असून त्यावर आज तोडगा निघतो का हे पाहावं लागणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) राज्यसभेच्या (Rajya Sabha) बारा खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे.   यासोबतच महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 03 Dec 2021 22:33 PM (IST)

  मुंबई पालिकेत अण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेर भाजप-सेना नगरसेवकांमध्ये तुफान राडा

  मुंबई महानगरपालिकेत तुफान राडा

  अण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेर भाजप-सेना नगरसेवकांमध्ये तुफान राडा

  दोन्ही पक्षांकडून घोषणा देण्यात आल्या

  नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्कळजीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेला

  या घटनेचा भाजपकडून निषेध करण्यात आला

  स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घटनेचा निषेध करत कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली

  मात्र भाजप यामध्ये राजकारण करतंय अशी टीका शिवसेनेने केली

 • 03 Dec 2021 18:13 PM (IST)

  अॅक्नश प्लॅन रेडी आहे, तो सांगायचा नसतो, अंमलबजावणी झाली की दिसेलच : अनिल परब

  आम्ही महिन्याभरापासून सहानुभूतीची भूमिका घेतली होती. पण एक महिना झाला तरी संप मिटत नाहीये. त्यामुळे जनता सरकारला विचारत आहेत. त्यामुळे अॅक्नश प्लॅन रेडी आहे. तो सांगायचा नसतो. अंमलबजावणी झाल्यानंतर तो समजेलच. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन तो लवकरच अमलात आणला जाईल. काही विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीयेत. काही लोकांना रुग्णालयात जायचं असतं. पण एसटी नसल्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत. त्याची नोंद होत नाहीये पण तशा घटना घडत आहेत. संप मिटला पाहिजे. सगळ्या कर्मचाऱ्यांनी कामावर यावं. आवाहन करुनही भूमिकेवर ठाम असतील तर सरकारला आपली भूमिका कठोर करावी लागेल.

 • 03 Dec 2021 18:09 PM (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्यावर कारवाई केली जाणार : अनिल परब

  संप संपला तरी आता केलेली कारवाई मागे घेतली जाणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगत आहे. यानंतर केलेली कारवाई परत घेतली जाणार नाही. जी कारवाई करायची ती करेल पण आता राज्यातील जनतेला न्याय देण्याची वेळ आली आहे. आता सध्या एकोणीस हजार कर्मचारी कामावर आहेत. सध्या बाराशे गाड्या धावल्या आहेत. कामावर येणाऱ्या कर्माचाऱ्यांना कोणतेही बंधन नाही. आता कर्मचाऱ्यांना अडवणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे. अडवणूक करणाऱ्या लोकांवर जोपर्यंत कारवाई केली जाणार नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहील. त्यामुळे आता अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार. कायदेशीर प्रक्रियेचा भाग हळूहळू पूर्ण होईल. तशीतशी कारवाई होईल.

 • 03 Dec 2021 18:06 PM (IST)

  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन मेस्मा लावण्यावर निर्णय : अनिल परब

  एखादा कामगार कामावर येणाऱ्या कामगाराला अडवणार असेल तर कडक कारवाई केली जाईल. कोणचीही परवा न करता त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कायद्यात जे कठोर कायदे आहेत, ते लावले जातील. मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो. एसटी ही अत्यावश्यक सेवेत येतो. माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती आणि खरी माहिती याच्यात फरक आहे. मेस्मा कायदा एसटी महामंडळाला लागू शकतो. एसटी ही अत्यावश्यक सेवा आहे. नागरिकांना वेठीस धरलं जातंय. मुलांना शाळा, कॉलेजमध्ये जायचं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तालुका आणि गावाचा कनेक्ट तुटला आहे. मेस्मा लावावा का यावर शासन गंभीर विचार करत आहेत. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मेस्मा कायदा लावावा की नाही त्यावर विचार करावा लागेल.

 • 03 Dec 2021 18:02 PM (IST)

  कर्मचाऱ्यांना कामावर यायचंय, त्यांना घरी जाऊन शिवीगाळ केली जातेय : अनिल परब

  जे कामगार कामावर येत आहेत. जर उद्या विलीनीकरण होईल तेव्हा आता कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही, अशीदेखील अफवा पसरवली जात आहे. पण ते चुकीचे आहे. विलीनीकरणाचे आदेश आल्यानंतर सर्वांनाच त्याचा लाभ होईल. काही कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. पण काही कर्मचाऱ्यांना घरी जाऊन शिवीगाळ केली जात आहे.  काही ठिकाणी त्यांच्याशी अर्वाच्य भाषा वापरली जात आहे. या सर्वाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. विलीनीकरणी मागणी ज्या व्यासपीठावर करायची त्याच व्यासपीठावर करा. जनतेला वेठीस धरू नका.

 • 03 Dec 2021 17:59 PM (IST)

  पगारवाढ फसवी असल्याची अफवा : अनिल परब

  मुंबई : अनिल परब माध्यमांशी बोलत आहेत. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. विलीनीकरण्याच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. मात्र कोर्टाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा केली जाईल. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर हाय कोर्टाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत महामंडळाने अत्यंत चांगली पगारवाढ दिली आहे. ही पागर फसवी आहे, ही पागरवाढ काही दिवसांत परत घेतली जाईल, अशा बातम्या दिल्या जात आहेत. पण हे सगळं काही चुकीचं आहे. मी पगारवाढीचा तक्ता पहिल्या दिवशी समोर ठेवला होता. पगाराची स्लीप त्याचनुसार येईल.

 • 03 Dec 2021 17:03 PM (IST)

  सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी गावात शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

  औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी गावात शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

  शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली खळबळजनक घटना

  पत्नीने विहिरीत उडी घेऊन तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

  सततच्या नापिकीला कंटाळून दांपत्याने टोकाचे पाऊल उचल्याची चर्चा

 • 03 Dec 2021 16:12 PM (IST)

  ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार 

  मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार

  गुन्हा दाखल करण्याची मागणी

  राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप.

  पंकज पांडेय भाजप युवा जिल्हाध्यक्ष मीरा भाईंदर यांनी दिली तक्रार

  मुंबई दौऱ्यादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप

 • 03 Dec 2021 16:11 PM (IST)

  परिवहनमंत्री अनिल परब यांची एसटीतील अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

  मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांची एसटीतील अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

  संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यासंदर्भात बैठकीत होणार चर्चा

  मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात बैठक सुरू

  एसटीचे राज्यातील सर्व विभाग नियंत्रकही व्हीसीद्वारे बैठकीत सहभागी

  पाचच्या सुमारास पत्रकार परिषद होईल

 • 03 Dec 2021 15:48 PM (IST)

  स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी मनसे पदाधिकाऱ्यांची भावना : संदीप देशपांडे

  मुंबई : भाजपसोबत जाण्याबाबतची चर्चा झाली

  मात्र स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची भावना होती

  सर्व ठिकाणी पक्षाची परिस्थिती चांगली आहे

  संदीप देशपांडे यांची माध्यमांना माहिती

  महाराष्ट्रातील सर्व नेते आणि सरचिटणीस यांची 2 तास बैठक झाली

  सर्व बाबींवर विस्तृत चर्चा झाली

  मागणी महापालिका निवडणुकीबाबत रणनीतीचीदेखील चर्चा झाली

  विभागवार मेळावे, बैठका राज ठाकरे घेणार आहेत

  14 तारखेपासून त्याची सुरुवात असणार आहे

  राज ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार

  मुंबईत विभागनिहाय मेळावे नेते घेतील

  संदीप देशपांडे यांची माहिती

  कोरोनाकाळात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काम केलं रस्त्यावर उतरून काम केलं

  हॉस्पिटलचे बिल कमी करण्याचे काम केलं

  आमचे कार्यकर्ते  कोरोना पॉझिटिव्ह आले, काहींचा मृत्यू झाला

  संदीप देशपांडे यांची माहिती

 • 03 Dec 2021 15:30 PM (IST)

  राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी

  जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची आज निवड करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान निवडीनंतर राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीशअण्णा पाटील यांच्यासह आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत आनंद साजरा केला.

 • 03 Dec 2021 13:30 PM (IST)

  भिवंडी एसटी आगारातील बस कर्मचारी संप 23 व्या दिवशी ही सुरु

  भिवंडी एसटी आगारातील बस कर्मचारी संप 23 व्या दिवशी ही सुरु

  43 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तर रोजंदारीवरील 17 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई

 • 03 Dec 2021 13:29 PM (IST)

  नांदेडमध्ये दंगल घडविणाऱ्या घटनेतील तीन आरोपींना अटक

  नांदेडमध्ये दंगल घडविणाऱ्या घटनेतील तीन आरोपींना अटक

  तीनही आरोपी रजा अकादमीचे सदस्य

  त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंद दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी झाली होती दंगल

  आतापर्यंत 80 आरोपींना पोलिसांनी केली अटक

 • 03 Dec 2021 12:14 PM (IST)

  नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा पहिला बळी, आंदोलनात सहभागी असलेल्या वाहकाचा मृत्यू

  नांदेड –

  नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा पहिला बळी

  आंदोलनात सहभागी असलेल्या वाहकाचा मृत्यू

  आंदोलना दरम्यान काल आला हृदयविकाराचा झटका

  शहरातील खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार

  उपचारादरम्यान आज सकाळी झाला मृत्यू

  दिलीप विठ्ठलराव वीर अस मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव

 • 03 Dec 2021 12:13 PM (IST)

  आतापर्यंत 18 हजार 882 कर्मचारी कामावर रुजू झाले

  आतापर्यंत 18 हजार 882 कर्मचारी कामावर रुजू झाले

  73 हजार 384 कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत , ते संपात सहभागी आहेत

  9 हजार 141 कर्मचारी आता पर्यंत निलंबित करण्यात आले आहेत

  एस्टीचे एकूण 93 हजारावर कर्मचारी आहेत

 • 03 Dec 2021 12:12 PM (IST)

  गडचिरोली नागरिकांनी येणार्‍या संभाव्य कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी

  जिल्हाधिकारी संजय मीना –

  गडचिरोली नागरिकांनी येणार्‍या संभाव्य कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे

  येणारा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक अधिकारी व विभागाची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली

  यावेळी जिल्ह्यात मास्क ना वापरणारा व्यक्तींवर पाचशे रुपये दंड टाकण्याचे नियम जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले

  जिल्ह्याचा संसर्ग झाल्यास आवश्यक बेडसे पुरवठा, वेंटीलेटर तसेच मनुष्यबळाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यास आरोग्य विभागाला आदेश देण्यात आले

  यावेळी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आला की लसीकरणासाठी स्वतः पुढे येऊन कोरोना लसीकरण घ्यावे

 • 03 Dec 2021 09:13 AM (IST)

  नवी दिल्ली लोकसभेत काल ऐतिहासिक चर्चा

  नवी दिल्ली लोकसभेत काल ऐतिहासिक चर्चा

  रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत सुरू होती चर्चा

  मध्यरात्री लोकसभेचे कामकाज तहकूब

  आजपासून सभागृहात पुन्हा चालणार चर्चा

  काल दिवसभरात 74 खासदारांनी चर्चेत घेतला सहभाग

 • 03 Dec 2021 09:13 AM (IST)

  दक्षिण आफ्रिकेतून औरंगाबादेत आलेला विद्यार्थी निघाला कोरोना निगेटिव्ह 

  दक्षिण आफ्रिकेतून औरंगाबादेत आलेला विद्यार्थी निघाला कोरोना निगेटिव्ह

  आफ्रिकेतील एक विद्यार्थी शिक्षणासाठी आला औरंगाबादेत

  अहवाल निगेटिव्ह येताच विद्यापीठात केले क्वारंटाईन

  अन्य देशातून आलेल्या 18 जणांची चाचणी केल्याचा आज मिळणारा अहवाल

  निगेटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यावर आरोग्य विभागाचे बारीक लक्ष

 • 03 Dec 2021 08:57 AM (IST)

  आजही पुण्यात एसटीचा संप सुरुच

  पुणे

  आजही पुण्यात एसटीचा संप सुरुच

  स्वारगेट आणि शिवाजीनगर डेपोतुन शिवशाही, शिवनेरीसह खासगी बस मधून प्रवासी वाहतूक सुरु

 • 03 Dec 2021 08:57 AM (IST)

  देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

  देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

  दौऱ्यात ग्रामीण भागातील पक्ष कार्यालयासह पुणे शहर भाजपच्या कार्यालयाचं करणार उद्घाटन

  महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस पक्षाच्या कार्यक्रमासाठी पुण्यात,

  चंद्रकांत पाटलांसह,हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर लावणार कार्यक्रमाला हजेरी,

  संध्याकाळी 5.30 मिनीटांनी होणार पक्ष कार्यालयाचं उद्घाटन

 • 03 Dec 2021 08:17 AM (IST)

  परराज्यातील गांजा खरेदी-विक्री करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला वाकड पोलिसांकडून अटक

  पिंपरी चिंचवड –

  – परराज्यातून गांजा आणून त्याची खरेदी विक्री करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केलीय

  -त्यांच्या कडून 20 किलो गांजासह 7 लाख 24 हजार 875 रुपयांचा मुद्देमाल।जप्त करण्यात आलाय

  -या प्रकरणी अशोक भापकर, सुनील खाडप, प्रवीण गाडे, रविराज केदार यांना अटक करण्यात आलीय

 • 03 Dec 2021 08:17 AM (IST)

  परळी शहरावर धुक्याची चादर

  परळी शहरावर धुक्याची चादर

  बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेले पाचवा क्रमांकाचे वैजनाथ ज्योतिर्लिंग धुक्यात

  आज पहाटेपासूनच रिमझिम पाऊस व खराब वातावरणामुळे शहरावर धुक्याची चादर

  अशा वातावरणामुळे शेतकऱ्यांची फळ बागायतदार शेतकऱ्यांची वाढली चिंता

 • 03 Dec 2021 08:10 AM (IST)

  साऊथ आफ्रिकेमधून आलेल्या कुटुंबाला कोरोनाची लागण

  साऊथ आफ्रिकेमधून आलेल्या कुटुंबाला कोरोनाची लागण

  एकाच कुटुंबातील चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

  काल दुपारी कुटुंबीय आले जयपूरमध्ये

  दोन मुलांसह पती-पत्नी पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ

  राजस्थान युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये 4 जण विलगीकरण कक्षात दाखल

 • 03 Dec 2021 07:38 AM (IST)

  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली नागपुरातील पुराणवृक्षाची दखल

  – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली नागपुरातील पुराणवृक्षाची दखल

  – नागपूरच्या सीताबर्डी भागातील 208 वर्ष जुने पिंपळ वृक्ष बांधकामासाठी तोडण्याची बिल्डर ने मागितलीय परवानगी

  – महापालिकेच्या उद्यान विभागानं जाहिरात देऊन झाड तोडण्यावर मागितलेय आक्षेप

  – पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी केलाय झाड तोडायला विरोध

  – स्थानिक अधिकाऱ्यांकडून वृक्षाबाबत मागितली माहिती

  – झाडाचे जतन कसे करता येईल का यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश

 • 03 Dec 2021 07:24 AM (IST)

  पुण्यात काल पासून पावसाची पूर्ण विश्रांती

  पुणे

  पुण्यात काल पासून पावसाची पूर्ण विश्रांती

  मात्र, संपूर्ण शहरात पसरलयं मोठ्या प्रमाणात धुकं

  हवेतल्या गारठ्यातही वाढ

 • 03 Dec 2021 07:24 AM (IST)

  नाशकात अ.भा.मराठी साहित्य संमेलन आजपासून होणार सुरू

  नाशिक –

  आज पासून भरणार साहित्यिकांचा मेळा

  नाशकात अ.भा.मराठी साहित्य संमेलन आजपासून होणार सुरू

  3 दिवस रंगणार साहित्यिकांचा मेळा

  संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांची मात्र अनुपस्थिती

  प्रकृती अस्वस्थतामूळे येणार नसल्याचे स्पष्ट

  ग्रंथ दिंडीने होणार कार्यक्रमाची सुरुवात

 • 03 Dec 2021 07:12 AM (IST)

  ‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करा

  – ‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करा

  – नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या सुचना

  – विभागीय आयुक्तांनी केली मेयो, मेडिकल, एम्समधील प्रकल्पांची पाहणी

  – बांधकामासह आवश्यक सुविधा 10 दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना

  – ‘मेयो’मध्ये ऑक्सिजनचे दोन पीएसए प्लांट बसविण्यात येत आहेत

  – दर आठवड्याला ऑक्सिजन ऑडीट करण्याच्या सूचना

 • 03 Dec 2021 07:04 AM (IST)

  औरंगाबाद शहरावर धुक्याची चादर, बीबी का मकबरा हरवला धुक्यात

  औरंगाबाद शहरावर धुक्याची चादर

  ऐतिहासिक बीबी का मकबरा हरवला धुक्यात

  दोन दिवसांपासून खराब वातावरणामुळे शहरावर धुक्याची चादर

  ढगाळ वातावरणासह शहरातील तापमानात कमालीची घट

  औरंगाबाद शहराचा पारा उतरला 17 अंशाच्या खाली

 • 03 Dec 2021 07:04 AM (IST)

  अवकाळी पावसाची रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांती

  रत्नागिरी- अवकाळी पावसाची जिल्ह्यात विश्रांती

  काल सायंकाळनंतर पावसाची रिपरिप थांबली

  आजही हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला दिलाय ऑरेंज अलर्ट

  सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान

 • 03 Dec 2021 06:36 AM (IST)

  जळगाव महापालिका इन अॅक्शन मोड

  जळगाव –

  जळगाव महापालिका इन अॅक्शन मोड

  कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानांवर कारवाईची मोहिम

  दहा दुकानांदारांना दंडाची नोटीस

 • 03 Dec 2021 06:15 AM (IST)

  काळजी करण्याची गरज नाही.. भाजप निवडणूक जिंकणारच: देवेंद्र फडणवीस

  डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती निमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी नगरसेवकांसोबत बैठक घेतली त्यानंतर त्यांनी कार्यकर्ता मेळावा देखील घेतला. यावेळी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना सूचना केली. काळजी करण्याची गरज नाही. येणाऱ्या निवडणुकीत मी स्वतः येणार आहे.. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आणि आपण जिंकणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  काही दिवसांपूर्वी भाजपच्या 3 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणखी काही नागरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांसोबतची गुप्तबैठक ही महत्वाची मानली जात आहे.

Published On - 6:12 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI