Maharashtra News Omicron LIVE Update |पंढरपूर दर्शनवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला बुलडाण्यात अपघात 

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ओमिक्रॉन संदर्भातील अपडेटस, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या -

Maharashtra News Omicron LIVE Update |पंढरपूर दर्शनवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला बुलडाण्यात अपघात 
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

कर्नाटक पाठोपाठ गुजरातनंतर महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron)  वेरिएंटचे  10 रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला. तर, पिपंरी चिंचवडमध्ये 6 आणि पुण्यात आणि मुंबईत  2 असे महाराष्ट्रात एकूण 10 रुग्ण आढळलेत. तर, राजस्थानमध्ये  9 रुग्ण आढळले आहेत. राजधानी नवी दिल्लीतही एक रुग्ण आढळून आला आहे. गोव्यातही ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे.  महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 07 Dec 2021 21:39 PM (IST)

  पंढरपूर दर्शनवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला बुलडाण्यात अपघात 

  बुलडाणा : पंढरपूर दर्शनवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात

  मेटॅडोरमधील 35 भाविक जखमी

  मेरा खुर्द फाट्याजवळ घडली घटना

  चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

  जखमी भाविक चिखलीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

  सर्व जखमी जळगाव जामोद तालुक्यातील

 • 07 Dec 2021 19:40 PM (IST)

  राज्य सरकारच्या वॅार्ड संरचना आणि वॅार्डसंख्या वाढीच्या विरोधात हायकोर्टात याचिका

  मुंबई : राज्य सरकारच्या वॅार्ड संरचना आणि वॅार्डसंख्या वाढीच्या विरोधात हायकोर्टात याचिका

  2011 च्याच लोकसंख्येचा आधार घेत वॅार्डसंख्या वाढवली

  यापुर्वी 2017 मध्येच वॅार्ड रचनेत झाले होते फेरबदल

  त्यामुळ लगेच 2022 ला फेरबदल कशासाठी ?

  संबंधित निर्णय असंवैधानिक असून 2017 च्याच वॅार्डरचनेनुसार निवडणूक घ्यावी यासाठी केली हायकोर्टात याचिका

  भाजप नगरसेवक आणि राजश्री शिरवडकर यांनी केली राज्य सरकार आणि निवडणूक आयुक्त यांच्याविरोधात याचिका दाखल

 • 07 Dec 2021 18:36 PM (IST)

  राहुल गांधी यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली : राहुल गांधी

  नेता नंतर ठरवता येईल. सध्या सक्षम विरोधक उभा करायला हवा, अस शरद पवार म्हणतात. हे मत त्यांच योग्य आहे. राहुल गांधी यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली. पण या चर्चाचा गोषवारा उद्धव ठाकरे यांच्याकडे देईल. त्यानंतर त्यांनी परवानगी दिली तर मग मी सविस्तर सांगेन, असं राहुल गांधी म्हणाले.

 • 07 Dec 2021 18:33 PM (IST)

  देशात एकच विरोधी फ्रंट असावे असे राहुल गांधी यांचं मत : संजय राऊत

  संजय राऊत माध्यमांशी बोलत आहेत. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीबद्दल राहुल गांधी यांन उत्सुकता असते. राहुल गांधी यांचा मुंबईचा दौरा आहे. त्यावेळी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतील. देशामध्ये विरोधी पक्षाचं एक मजबूत संघटन उभं राहावं. देशात एकच विरोधी फ्रंट असावे असे राहुल गांधी यांचं मत आहे. दिल्लीतील सरकारला पर्याय म्हणून वेगवेगळ्या आघाडी न करता एकच आघाडी असावी, असे आमचे मत आहेत.

 • 07 Dec 2021 18:14 PM (IST)

  बुरुंडी देशात तुरुंगाला लागली आग, 38 जणांचा होरपळून मृत्यू, 69 जण गंभीर जखमी

  बुरुंडी : पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी या देशातील तुरुंगात लागलेल्या आगीत 38 जण ठार झाले आहेत. तर या आगीत एकूण 69 गंभीर जखमी झाले आहेत. या आगीवर बुरुंडी देशाचे उपराष्ट्रपती यांनी सविस्तर माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:00 वाजता ही आग लागली. या आगीत राजधानी गिटेगा या शहराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे

 • 07 Dec 2021 18:09 PM (IST)

  पालघर जिल्ह्यातील तलासरी नगरपंचायतीच्या 17 प्रभागाकरिता 21 डिसेंबर रोजी मतदान

  पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 प्रभागाकरिता 21 डिसेंबर रोजी मतदान

  आज 7 डिसेंबर रोजी नामनिर्देशपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

  तलासरी नगरपंचायतमधील 17 प्रभाग करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 92 उमेदवारी अर्ज दाखल,

  8 डिसेंबर रोजी छाननी तर 13 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेंनंतर चित्र स्पष्ट होणार

 • 07 Dec 2021 16:55 PM (IST)

  नाशिकमधील त्रंबकेश्वरच्या पुरोहितांमध्ये तुंबळ हाणामारी, 7 जणांना अटक

  नाशिक – त्रंबकेश्वरच्या पुरोहितांमध्ये तुंबळ हाणामारी

  पूजेला आलेला यजमान पळवा पळवीच्या कारणावरून झाली हाणामारी

  हाणामारीत धारदार शस्त्रास्त्रांचा वापर

  7 जणांना पोलिसांनी केली अटक

  परराज्यातून आलेल्या पुरोहितांकडून कृत्य

  त्रंबकेश्वरच्या पुरोहितांचा संबंध नसल्याचा पुरोहित संघाचा दावा

 • 07 Dec 2021 16:46 PM (IST)

  अशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, गृहमंत्री न्याय देतील असं मला वाटतं : किशोरी पेडणेकर

  मुंबई : आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्य वर मी दोन ते तीन दिवस वाट बघितली त्यांनी कोणतीही माफी मागितली नाही. हा अपमान मुंबईकरांचा प्रथम नागरिक म्हणून झालेला आहे. हा समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असं मी पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलं आहे. त्यांनी महिलांची आणि प्रथम नागरिक म्हणून माफी मागितली पाहिजे. राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. आशिष शेलार यांच्याकडून ध चा मा झाला आहे; तो भाजपच्या आयटी सेलनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टमुळे. शब्दाचा अर्थ काय होतो हा त्यांनाही माहिती आहे. अशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून महिला आयोग आणि गृहमंत्री न्याय देतील असं मला वाटतं, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेर यांनी म्हटलंय.

 • 07 Dec 2021 13:13 PM (IST)

  ओबीसी राजकीय आरक्षणावर केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम सुरु : प्रीतम मुंडे

  सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयात काय म्हटलं आहे ते पाहिलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर वारंवार केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम सुरु आहे. राज्य सरकारनं ओबीसी आरक्षण यापूर्वी का टिकून होतं पाहायला हवं, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

 • 07 Dec 2021 13:05 PM (IST)

  कल्याण ,केडीमसी क्षेत्रात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 318

  कल्याण ,केडीमसी क्षेत्रात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 318

  ट्रेस झालेल्या नागरिकांची संख्या 306

  12 नागरिकांपैकी काहींचे पत्ते अपूर्ण तर काहींची घरे बंद, काहींचे दूरध्वनी बंद

  बंद आढळून आलेल्या घरांच्या पत्त्यांवर पालिकेचा आरोग्य विभाग पुन्हा भेट देणार

  आतापर्यंत 9 रुग्ण पॉझिटिव्ह, 8 आरटीपीसीआर तर 1 ओमीक्रोन पॉझिटिव्ह

  केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांची माहिती

 • 07 Dec 2021 12:52 PM (IST)

  नवाब मलिक यांच्या विरोधात अखेर औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल

  नवाब मलिक यांच्या विरोधात अखेर औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल

  समीर वानखेडे यांची आत्या गुंफाबाई भालेराव यांनी केली तक्रार दाखल

  नवाब मलिक यांच्यावर आट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

  कलम 156/3 नुसार गुन्हा दाखल करण्याची जिल्हा न्यायालयात मागणी

  औरंगाबाद पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे समीर वनखेडेच्या नातेवाईकांची कोर्टात धाव

 • 07 Dec 2021 12:11 PM (IST)

  ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाच्या बाजूनं सरकार सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आपली बाजू मांडणार

  – राज्य सरकार 13 तारखेला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आपली बाजू मांडणार

  – ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाच्या बाजूनं सरकार सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आपली बाजू मांडणार

  – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

  – 2017 मध्ये भाजपमुळे ओबीसी आरक्षण गेलंय, त्यामुळे भाजपने जनतेची माफी मागावी

  – केंद्र सरकारकडे असलेला इम्पेरीकल डाटा भाजपने आणुन द्यावा

  – राज्य आयोगाला इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी विलंब लागतोय

  – कोरोनामुळे इम्पेरीकल डाटा गोळा करायला वेळ लागेल

 • 07 Dec 2021 12:03 PM (IST)

  मुंबई महानगरपालिका ठरवून गडबड, अफरातफर, बनवाबनवी आणि गोंधळाची स्थिती निर्माण करतेय: आशिष शेलार

  मुंबई महानगरपालिका ठरवून गडबड, अफरातफर, बनवाबनवी आणि गोंधळाची स्थिती निर्माण करत आहे. मी आज आपणासमोर कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये काय चाललेय हे जनतेसमोर आणणं आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकार परिषद घेतलीय. याविषयी 6 सप्टेंबर  2021 आणि 2 ऑक्टोबर  2021 या दोनवेळेला पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. त्यावेळेला राज्याच्या प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. हा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. देवेंद्र फडणवीसांनी गती दिलेल्या प्रकल्पामध्ये अनागोंदी आणि अफरातफरी सुरु आहे.

  मी उपस्थित केलेले सर्व प्रश्न असे होते की प्रकल्प व्यवस्थापक असलेले कन्सलंटट आणि प्रोजेक्ट कन्सलटंट असो त्यांना मदत केली जाते . महापालिकेकडून अधिक पैसा खर्च केला जात आहे. त्यांना अवास्तव बिलं दिली जात आहेत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

 • 07 Dec 2021 11:34 AM (IST)

  वरळीतील बाळाचं पालकत्व आम्ही स्वीकारणार: किशोरी पेडणेकर

  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळाला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. बाळावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. त्या बाळाचे पालक आम्ही आहोत. नुसत्या बोंब मारुन संवदेना दाखवता येत नाही. ज्या कंपनीचा तो सिलेंडर होता त्या कंपनीशी संपर्क केला. आमच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या जीवावर उदार होऊन जखमींना बाहेर काढलं.  पोदारमध्ये नेलं, तिथून ती रुग्णवाहिका कस्तुरबाला न्यायचं होतं. रुग्णवाहिका नायरला नेण्यात आली. वरळीतील सिलेंडर स्फोटात आई वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कारवाई करण्यात आलं आहे. आई आणि मुलगी यांना कस्तुरबाला आणलं गेलं. त्यांना 56 टक्के भाजलं होतं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण अपयश आलं

 • 07 Dec 2021 11:25 AM (IST)

  भाजपनं दोन हजार लोकांवर करोडो रुपये खर्च केले: छोटू भोयर

  महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर सर्व मतदारांच्या संपर्कात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार भोयर हे गायब आहेत अशा बातम्या पेरण्यात आल्या आहेत. ही सार्वजनिक निवडणूक आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ज्या लोकांशी संपर्क करायला हवा त्यांच्या संपर्कात मी आहे. कालपासून काही लोक अफवा पसरवत आहेत. जेव्हा त्यांचा लक्षात आलं की ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी केली.

  भाजपनं ही निवडणूक कशी लढवावी,काँग्रेसनं ही लढवावी कशी हा प्रश्न आहे. कालच पत्रकांराशी बोलणार होतो. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ही निवडणूक मी निश्चितपणे जिंकल्यात जमा आहे. तीन दिवसांत काय होईल हे माहिती नाही.

  भाजपनं पंधरा दिवस 2 हजार लोकांच्यावर करोडो रुपये खर्च केले आहेत.

 • 07 Dec 2021 11:04 AM (IST)

  54 टक्के लोकसंख्येवर अन्याय होतोय , राजकीय पक्षांनी विचार करायला पाहिजे

  इम्पिरिकल डाटा गोळा करताना निश्चितपणे वेळ लागणार आहे. कोरोनाचे विविध वेरिएंट येत आहेत, त्यामुळं घरोघरी जाऊन डाटा कसा गोळा करावा हा प्रश्न आहे. भारत सरकारनं जणगणना सुरु केलेली नाही. न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासमोर डाटासंदर्भात प्रलंबित आहे. निवडणुका तोंडावर असताना 54 टक्के लोकसंख्येचे मतदार कसे पाठवायचे नाहीत, असा प्रश्न आहे. राज्यातील आणि देशातील 54 टक्के लोकांवर अन्याय होतोय हे राजकीय पक्षांनी ध्यानात घ्यायला पाहिजे.

  शासनानं घेतलेले निर्णय हे योग्य प्रकारे न्याय मिळावा यासाठी म्हणून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी अधिक जागरुक राहायला हवं. कदाचित त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात त्यांना महत्व देऊन हे काम मार्गी लावायला पाहिजे त्यात ते कमी पडत आहेत. आम्ही जो आयोग नेमला त्यामध्ये त्यांनी त्यांची जबाबदारी आणि ओबीसींच्यावरील अन्याय लक्षात घेता केवळ पत्र न लिहीता, त्यांनी प्रशासनाबरोबर बसून मार्ग काढून करावा. त्यांनी मागितलेला निधी योग्य असेल. काही गोष्टी आमच्यासमोर येत नाहीत. त्यांचं प्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरु असतो. अखेरच्या वेळी त्या बाबी आमच्या समोर येतात.

  निवडणूक आयोग आहे, राज्याचा निवडणूक आयोग आहे त्यांनी याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी, ती संविधानिक स्वायत्त संस्था असल्यानं आम्ही त्यांना सांगू शकत नाही. ओबीसींवर अन्याय होऊ नये याची नोंद निवडणूक आयोगानं घेतली पाहिजे.

  ओबीसी आयोग, निवडणूक आयोग, प्रशासन, शासन यामधील लोक यांनी नोंद घ्यायला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले. ओमिक्रॉनमुळं भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. कोर्टानं आम्हाला वेळ द्यावा किंवा भारत सरकारनं डाटा द्यावा, अशी मागणी केली आहे.

  54 टक्के लोकसंख्येवर अन्याय होता कामा नये. 13 तारखेला डाटा मागण्यासाठीची च्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.

  दुर्दैव हे आहे की आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांचं सहकार्य होत आहे. धुळ्याचे राहुल वाघ आणि आणखी एक जण कोर्टात जात आहेत. ओबीसी आरक्षणाविरोधात मोठमोठे वकील नेमले जात आहेत. नेमके यामागचं इंगित काय आहे. याचा देखील विचार करायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय भारताला लागू आहे. इतर राज्यांमध्ये काय स्थिती आहे. तिथलं आरक्षण रद्द झालंय की महाराष्ट्रातील आरक्षण रद्द झालंय हे तरी सांगितलं पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.

  मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. ते इतरांशी बोलत आहेत.

 • 07 Dec 2021 10:35 AM (IST)

  कोरोना आणि ओमिक्रॉनबाधितांना क्वारंटाईन करण्यासाठी महापालिकेला हॉटेल मिळेना

  परदेशातून आलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह किंवा ओमिक्रॉन बाधित नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी महापालिकेला हॉटेल मिळेना झालंय. त्यामुळे केंद्र आणि राज्यसरकारच्या गाइडलाइन्सप्रमाणे परदेशातून आलेल्या नागरिकांना ‘कोविड केअर सेंटर’ मध्येच क्वारंटाईन करावे लागणार आहे.  निर्बंध शिथील झाल्यानंतर हॉटेलचालकांनी पुन्हा एकदा जम बसवायला सुरूवात केली, अशा परिस्थितीत पुन्हा ‘ओमिक्रॉन’ संशयितांना येथे ठेवण्याला ते तयार नाहीत.

 • 07 Dec 2021 10:25 AM (IST)

  NIV मध्ये ओमिक्रॉन विषाणू विलग करण्याची प्रक्रिया सुरु

  ओमिक्रॉन विषाणुसंदर्भात दिलासा देणारी महत्वाची बातमी,

  पुण्यातील आयसीएम आरच्या एनआयव्हीमध्ये संशोधकांकडून विषाणू विलग करण्याची प्रक्रीया सुरू,

  डोंबिवलीतील पॉझिटिव्ह तरुणाच्या जिनोमिक सिक्वेंसिगमधील ओमिक्रॉन विषाणू केला जाणार विलग,

  कृत्रिम संवर्धन करून लसीची परिणामकारकता तपासली जाणार ,

  कोव्हीशील्ड आणि कोव्हँक्सीन ओमिक्रॉन व्हेरीयंटवर किती प्रभावकारी तपासलं जाणार

  संवर्धन प्रयोग यशस्वी झाल्यास मिळणार मोठा दिलासा,

  एन आयव्हीमध्येच विषाणू विलग केला जाणार सूत्रांची माहिती

 • 07 Dec 2021 09:47 AM (IST)

  महाराष्ट्रातील मविआ म्हणजे मिनी यूपीए, संजय राऊतांचं वक्तव्य

  शिवसेना यूपीएत जाणार या चर्चा मीडियामध्ये आहेत. आमच्यात या चर्चा झाल्या नाहीत. आम्ही ते न्यूजपेपर आणि माध्यमातून पाहतो. राहुल गांधी यांना भेटणार आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. तिन्ही पक्षात संवाद असावा म्हणून राहुल गांधी दिल्लीत असले तर त्यांच्याशी भेटून चर्चा करतो.

  महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, देशातील वातावरण यासंदर्भात चर्चा होते. पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी शिवसेना गोव्यात निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले.

  भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन आघाड्या स्थापन केल्या जातात. यूपीए काय किंवा एनडीए काय भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येतात. एनडीएमध्ये राम मंदिराला विरोध असणाऱ्या पक्षांचा सहभाग होता.

  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यूपीए संदर्भात निर्णय घेतील. यूपीएनं समर्थपणानं एकत्र येऊन विरोधकांनी ताकद निर्माण केली पाहिजे, असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं मत आहे. महाराष्ट्रात मिनी यूपीएचा प्रयोग सुरु आहे.  महाराष्ट्रात काँग्रेससोबत एकत्र आहोत. संसदेत एकत्र आहोत. लोकसभा आणि राज्यसभेत निर्णय घेताना एकत्र आहोत.

  गोव्यात तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवणार ही नवी माहिती असून तुमच्याकडून मिळतेय, असं संजय राऊत म्हणाले. गोव्यात टीएमसीसोबत शिवसेना जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

  महाराष्ट्र आणि गोव्याचं भावनिक आणि सांस्कृतिक नातं आहे. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची काय ताकद आहे हे आम्हाला माहिती आहे. गोव्यातील निर्णयासंदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठरवतील. आम्ही यापूर्वी गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत लढलो होतो, त्यामध्ये यश आलं नव्हतं.

  प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात आहेत. त्या दिल्लीत आल्यावर त्यांच्याशी भेट होईल, असं संजय राऊत म्हणाले.

 • 07 Dec 2021 09:29 AM (IST)

  राज्यात 19 हजार एसटी कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले

  राज्यात 19 हजार एसटी कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले

  आज कर्मचाऱ्यांचा होणार पगार,

  मात्र स्वारगेट डेपोतील एकही कर्मचारी अजून कामावर नाही,

  खाजगी आणि शिवशाही बसेसच्या माध्यमातून वाहतूक सुरू

  लालपरी अजूनही डेपोतचं,

 • 07 Dec 2021 08:54 AM (IST)

  सोलापूरमध्ये नव्या रुग्णवाहिका चालकांच्या प्रतीक्षेत धूळखात पडून

  सोलापूरमध्ये नव्या रुग्णवाहिका चालकांच्या प्रतीक्षेत धूळखात पडून

  महापालिकेला आमदार आणि भांडवली निधीतून मिळालेल्या नव्या सहा रुग्णवाहिका आणि चार शववाहिका चालकाविना पडून

  कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बेहाल झालेल्या पालिका प्रशासनाने अजूनही धडा घेतला नसल्याचे झाले स्पष्ट

  ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात असतानाच पालिका चालकांच्या प्रतीक्षेत

  सामान्य प्रशासन विभागाकडे 22 चालकांची मागणी केल्याची पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांची माहिती

 • 07 Dec 2021 08:36 AM (IST)

  आरोग्य विभाग भरतीतील पेपरफुटीप्रकरणी मराठवाड्यातून पाच जण चौकशीसाठी ताब्यात

  आरोग्य भरतीतील पेपरफुटीप्रकरणी आणखी पाच संशयित आरोपींना चौकशीसाठी पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात,

  मराठवाड्यातून पाच जण चौकशीसाठी घेतलं ताब्यात

  आतापर्यंत 6 जणांना केली अटक, पुणे सायबर पोलिसांकडून पेपर फुटी प्रकरणाची कसून चौकशी,

  आरोग्य विभागातील कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती ..

 • 07 Dec 2021 08:07 AM (IST)

  ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने भाजप आक्रमक

  ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने भाजप आक्रमक

  भाजपच्या ओबीसी सेल कडून आज राज्यभरात ठीक ठिकाणी आंदोलन

  कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केली जाणार निदर्शने

  स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 12 वाजता होणार आंदोलन

  राज्य सरकारने इम्पिरीकल डाटा न दिल्यानेच न्यायालयाने स्थगिती दिल्याचा आरोप

 • 07 Dec 2021 07:53 AM (IST)

  इंग्लंडवरुन नागपुरात आलेल्या मायलेकींना कोरोनाची लागण

  – इंग्लंडवरुन नागपुरात आलेल्या मायलेकींना कोरोनाची लागण

  – मायलेकीला एम्समध्ये केलं दाखल, प्रकृती स्थिर

  – विदेशातून आल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याने वाढली चिंता

  – नमुने ओमिक्रॅानच्या पार्श्वभुमिवर जनुकीय चाचणीसाठी पाठवणार

  – २९ नोव्हेंबरला मायलेकी आल्या नागपूरात

  – संपर्कातील इतरांचीही होणार कोरोना चाचणी

 • 07 Dec 2021 07:28 AM (IST)

  राज्यात ओमिक्राॅनचा शिरकाव झाला असताना रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी

  राज्यात ओमिक्राॅनचा शिरकाव झाला असताना रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी

  गेल्या चौविस तासात जिल्ह्यात कोरोनाचा नवीन रुग्ण नाही

  300 हून अधिक चाचण्यानंतर एकही रुग्ण नाही

  जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 96.11 टक्के

 • 07 Dec 2021 07:20 AM (IST)

  विदेशातून नागपूरात आलेले 30 जण गेले कुठे? पोलीसांकडून शोध सुरु

  – विदेशातून नागपूरात आलेले 30 जण गेले कुठे? पोलीसांकडून शोध सुरु

  – 175 प्रवाशांपैकी 30 जणांचा अद्यापंही शोध सुरु

  – विदेशातील प्रवाशांना शोधण्यासाठी नागपूर मनपा घेत आहेत पोलीसांची मदत

  – दिल्ली मुंबईवरुन आलेल्यांपैकी 4 जण पॅाझीटीव्ह, 24 तासांत 11नवे कोरोनाबाधीत

  – ओमाक्रॅानच्या पार्श्वभुमीवर नागपूर प्रशासन अलर्टवर

  – तिसऱ्या लाटेसाठी नागपूरात रुग्णालयातील बेडची संख्या वाढवणं गरजेचं

 • 07 Dec 2021 07:02 AM (IST)

  Omicron update: ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हायरिस्क देशांची संख्या 11 वर, नियमावलीत सुधारणा

  राज्य शासनाच्या 30 नोव्हेंबरच्या नियमावलीत एकूण 2 हाय रिस्क देशांचा समावेश होता आणि ती संख्या वाढून हाय रिस्क देशांची संख्या 11 वर पोहोचली आहे.

  अशी आहे नियमावली –

  > सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक.

  > चाचणीमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळल्यास सक्तीचे क्वारंटनाईन.

  > शासनाच्या नियमांनुसार उपचार घ्यावे लागणार.

  > तसेच,रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत घ्यावे लागणार उपचार.

  > प्रवाशाची चाचणी निगेटिव्ह आल्यास सात दिवसांचं होम विलगीकरण.

  > त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा चाचणी करण्यात येईल.

 • 07 Dec 2021 06:12 AM (IST)

  सेल्फीच्या नादात भिवंडीत इमारतीवरुन खाली पडून 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

  भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या टेरेसवरून खाली पडल्याने मोहम्मद उबेद शेख या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. सेल्फीच्या नादात मुलाचा तोल जाऊन पडल्याची पोलीस सूत्रांची माहिती .

Published On - 6:07 am, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI