Maharashtra News Omicron LIVE Update | तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश

| Updated on: Dec 09, 2021 | 7:20 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ओमिक्रॉन संदर्भातील अपडेटस, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या -

Maharashtra News Omicron LIVE Update | तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉन वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आज राज्य सरकार कोणते निर्णय घेते याकडे राज्याचं लक्ष लागलंय.कर्नाटक पाठोपाठ गुजरातनंतर महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron)  वेरिएंटचे  10 रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला. तर, पिपंरी चिंचवडमध्ये 6 आणि पुण्यात आणि मुंबईत  2 असे महाराष्ट्रात एकूण 10 रुग्ण आढळलेत. तर, राजस्थानमध्ये  9 रुग्ण आढळले आहेत. राजधानी नवी दिल्लीतही एक रुग्ण आढळून आला आहे. गोव्यातही ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे.  महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Dec 2021 01:32 PM (IST)

    तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश

    तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. दुर्घटनेनंतर तीन लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. सीडीएस बिपीन रावत , त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी सूत्रांची माहिती आहे.

  • 08 Dec 2021 01:31 PM (IST)

    सर्व जागांवर निवडणूक घ्या: छगन भुजबळ

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी एका वेळी सगळी निवडणूक घेण्याची परवानगी द्यावी, किंवा निवडणूक पुढं ढकलावी याबाबत निर्णय घ्यावा. जात पडताळणी प्रमाणं सगळ्या जागांवर निवडणूक व्हावी आम्ही त्यानंतर तुम्हाला इम्पिरिकल डाटा देऊ, असा प्रस्ताव असल्याच छगन भुजबळ म्हणाले.

  • 08 Dec 2021 12:47 PM (IST)

    UP निवडणुकीसाठी प्रियांका गांधींकडून काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

    गेल्या  दोन वर्षात जिथं गेली तिथं महिला त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. महिला हक्कांसाठी लढत आहेत, त्यांच्या पाठिशी उभं राहण्याच्या भूमिकेतून जाहीरनामा जाहीर करत आहेत. आम्ही जाहीरानामा सहा विभागात तयार केला आहे. स्वाभिमान, स्वावलंबन, शिक्षा, सन्मान, सुरक्षा आणि आरोग्य या विभागात जाहीरनामा आहे. राजकारणातील महिलांचं प्रमाण 40 टक्के आहे ते आम्ही 50 टक्केवर नेण्याचा प्रयत्न करु, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

    विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महिलांच्या उमदेवारीचं प्रमाण वाढेल, असं  प्रियांका गांधी म्हणाल्या. नव्या सरकारी धोरणानुसार सरकारी नोकरीत महिलांना 40 टक्के जागा आरक्षित असतील. 20 लाख रोजगार देण्याचं जाहीर केलं आहे त्यातील 8 लाख जागा महिलांसाठी राखीव असतील. 50 लाखापर्यंतची उलाढाल असलेल्या उद्योगांना करातून सूट दिली जाईल, असं प्रियांका गंधी म्हणाल्या.

  • 08 Dec 2021 12:30 PM (IST)

    ठाकरे कॅबिनेटची महत्त्वाची बैठक

    राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.  या बैठकीत ओबीसी आरक्षण निर्णय ओमिक्रॉनचे संकट आणि एसटी संप बाबत मेस्मा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी राखीव असलेल्या 27टक्के जागांवर निवडणूक घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारवर जोरदार टीका होऊ लागली. विरोधक देखील आक्रमक झाले आहे. त्याचमुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाबाबत आज कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते. याचसोबत राज्यावर येऊ घातलेले ओमायक्रॉंन या  विषाणूचे संकट यावर देखील मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली असून, हे संकट रोखायचे कसे आणि आणखी कशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील यावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 08 Dec 2021 12:07 PM (IST)

    सर्वजण मिळून मुंबईच्या सहकाराला नवी दिशा देऊ: प्रसाद लाड

    आज मुंबई जिल्हा बँकेच्या सदंर्भात राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक राजकीय अभिवनिवेश बाजूला ठेऊन निवडणूक व्हावी, ही आमची भूमिका आहे. राज ठाकरे यांना या कारणासाठी भेटलो. राज ठाकरे जिल्हा बँक निवडणुकीत आमच्यासोबत येतील. बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा आहे. मी प्रविण दरेकर यांच्याशी त्यांचा संवाद करुन दिला. प्रविण दरेकर त्यांची भेट घेण्यासाठी येतील, असं प्रसाद लाड म्हणाले.

    भाजप आणि मनसे यांच्यातील युतीचा प्रश्न हा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस घेतील. मी जिल्हा बँकेच्या संदर्भात भेटलो आहे. सर्व पक्षांनी राजकीय भूमिका बाजुला ठेऊन बँकेसाठी प्रयत्न करत आहोत. सर्वजण मिळून मुंबईच्या सहकाराला नवी दिशा देऊ, असंं  प्रसाद लाड म्हणाले.

  • 08 Dec 2021 11:00 AM (IST)

    संजय राऊत प्रियंका गांधी यांच्यात 7 वाजता बैठक

    आज सायंकाळी 7 वाजता काँग्रेस केंद्रीय नेत्या- सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा आणि शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांच्यात बैठक

    10 जनपथ येथे होणार बैठक

    प्रियंका गांधी-वढेरा आणि संजय राऊत यांच्या बैठकीत राष्ट्रीय राजकारणावर होणार चर्चा

    संजय राऊत यांनी काल घेतली होती काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय राऊत यांची भेट, राष्ट्रीय राजकारणाबरोबरच विविध विषयांवर झाली बैठकीत चर्चा

  • 08 Dec 2021 10:52 AM (IST)

     ठराविक ठिकाणी निवडणूक होणार , ठराविक ठिकाणी नाही, हा लोकशाहीचा अपमान: प्रीतम मुंडे

    ज्यांनी मला निवडून दिलं त्यांची मी प्रवक्ता आहे, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

    राज्य सरकारकडून आरक्षणाबाबत अपेक्षा आहेत

    इमपीरिकल डेटा गोळा करायची जबाबदारी राज्य सरकारची होती - हे कोर्टाचे ताशेरे

    राजेश टोपे म्हणतात निवडणूक थांबवावी, मी त्यांचे अभिनंदन करते -

    ठराविक ठिकाणी निवडणूक होणार , ठराविक ठिकाणी नाही, हा लोकशाहीचा अपमान

  • 08 Dec 2021 10:07 AM (IST)

    शिवसेनेचे आमदार डॉ.तानाजीराव सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात खडाजंगी

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार डॉ.तानाजीराव सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात खडाजंगी

    आमदार सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत खासदार ओमराजे यांना चांगलेच धारेवर धरले

    सम-समान निधी वाटप, प्रशासकीय मान्यता न घेता महावितरण विभागाने केलेली 5 कोटींची कामे

    महावितरणची कामे कोण केली ? ठेकेदार कोण यासह अन्य मुद्देवर खडाजंगी

    कामे तुम्हीच करा? तुम्हीच ठरवा ? असे सावंत यांनी खासदार ओमराजे यांना सुनावले

    महावितरणची बिले काढल्यास थेट मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार

  • 08 Dec 2021 09:49 AM (IST)

    प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटतोय

    राहुल गांधी यांची माझी नेहमी भेट होत असते. महाराष्ट्राच्या घडामोडीसंदर्भात राहुल गांधी माझ्याकडून भेट घेत असतात. प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटतोय. त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत त्यामुळं भेटायला काही हरकत नाही. त्यांनी भेटण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार आज त्यांना भेटणार आहे.

    मी पक्षाचा शिवसैनिक आहे, त्यामुळे इकडे बसून जे काय करतो ते त्यांच्या आदेशानं करत असतो. घडामोडी ज्या घडतात ज्यात आम्ही सहभागी होत असतो ती उद्धव ठाकरेंना देत असतो, असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंचं काय म्हणनं आहे ते सांगतीलचं ना, ते लवकरच तुमच्याशी संवाद साधतील. महाराष्ट्रात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, लहान घटक पक्ष यांच्या साथीनं सरकार चालवतो. हा मिनी यूपीएचा प्रयोग हा क्रांतिकारक आहे. देशात याची चर्चा सुरु आहे.

    शरद पवार यांच्याशी काल माझी चर्चा झाली. राहुल गांधी यांना भेटण्यापूर्वी शरद पवार यांच्याशी चर्चा केली.

    प्रियांका गांधी या काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत. निर्णय प्रक्रियेत त्या सहभागी असतात. त्यांना आमच्याशी एका विषयावर चर्चा करायची असेल तर आमचं ते कर्तव्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.

    यूपीए अधिक मजबूत व्हायला पाहिजे  हे सगळ्यांचं म्हणनं आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी एका चांगल्या भावनेनं सांगितलं आहे. जेव्हा आपण एखादी लढाई लढतो त्यावेळी गट तट असं न करता जी आघाडी आहे ती मजबूत करायला हवी, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

    राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला असल्यास शरद पवार यांनी पुढाकार घेऊ नये, असं नाही. शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता देशात नाही. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली तेव्हा देखील हा  विषय समोर आला होता.

    देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तर, शरद पवार यांची देखील भूमिका आहे, असं राऊत म्हणाले.

    चंद्रकांत पाटील यांना इतक गांभीर्यानं का घेताय. चंद्रकांत पाटील यांची विधानं नैराश्यातून येतात. माझी उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल, त्यांच्या तब्येतीच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं संजय राऊत म्हणाले. विरोधी पक्षाच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं राऊत  म्हणाले.

    राज्यसभेचे 12 खासदार जिथं आंदोलन करत आहेत. तिथं आम्ही आज जाणार आहे. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार उद्या तिथं जातील, असं राऊत म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमच्या खासदारांचं निलंबन झालं, असंही ते म्हणाले.

  • 08 Dec 2021 09:22 AM (IST)

    मालेगाव सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या 15 ते 20 नातेवाईकांचा धिंगाणा

    मालेगाव सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांचा धिंगाणा

    आयसीयू जवळ थांबू नका सांगितल्याचा आला राग

    नातेवाईकांकडून हॉस्पिटल ची तोडफाड

    15 ते 20 जणांनी येऊन घातला धिंगाणा

    रुग्णालयातील खुर्च्या,कुंड्यांची केली तोडफोड

    रुग्णालयात झालेल्या गोंधळामुळे काही काळ तणाव

    पोलिसांनी 3 जणांना घेतले ताब्यात

  • 08 Dec 2021 09:05 AM (IST)

    शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात चंद्रकांत पाटलांचं फलटणमध्ये खोचक वक्तव्य

    सातारा: फलटण येथील भाजपच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जहरी टीका

    भाजपाच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणा-यांनी देशाच्या राजकारणात जायची स्वप्न पाहू नयेत चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला.

    शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात चंद्रकांत पाटलांच खोचक वक्तव्य

  • 08 Dec 2021 08:45 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक स्थगित

    नागपूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक स्थगित..

    सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी संदर्भातील आदेशांचा परिणाम..

    जिल्ह्यात एकूण 90 ठिकाणी ग्रामपंचायत पोटनिवडणूक होणार आहे..

  • 08 Dec 2021 08:28 AM (IST)

    उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार

    उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार

    काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज दुपारी बारा वाजता जाहीरनामा प्रसिद्ध करणार

    महिलांसाठीच्या जाहीरनाम्यात काय असणार राजकीय वर्तुळाचं लक्ष

    पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक

    प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर

    आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थिनींसाठी प्रियंका गांधी काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष

  • 08 Dec 2021 07:52 AM (IST)

    प्राजक्त तनपुरे अनिल देशमुखांच्या वाटेनं, किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचा नवा नेता

    ठाकरे सरकारचे मंत्र्यांचे अनेक घोटाळाचे ऊद्योग बाहेर येत आहेत, यशवंत जाधव, अजित पवार, अनिल परब आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावर काय कारवाई होणार याच्या लाॅजिकल कंक्लुजनवर शोधणार…

    - शरद पवार काय करू शकतात हे राज्याच्या जनतेला कळेल… लाखो शेतकर्यांचे सहकारी साखर कारखाने एनसीपीच्या नेत्यांच्या नावाने वळवले… राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेच्या नावाने ट्रांसफर केला… 100 कोटीची संपत्ती 13 कोटीत दिली, तीच संपत्ती त्याने अनिल देशमुख यांना पास ऑन केली, असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला .

  • 08 Dec 2021 07:47 AM (IST)

    पर्यटनावर गेलेल्या नागपूरातील नगरसेवकांना करावी लागणार RTPCR चाचणी

    - पर्यटनावर गेलेल्या नागपूरातील नगरसेवकांना करावी लागणार RTPCR चाचणी

    - नगरसेवकांना RTPCR चाचणी करण्याच्या भाजपने दिल्या सूचना

    - विधानपरिषद निवडणूकीत घोडेबाजार टाळण्यासाठी भाजप नगरसेवकांचं पर्यटन

    - चंद्रशेखर बावनकुळेंच्या समर्थनार्थ ३०० पेक्षा जास्त नगरसेवक गेले पर्यटनाला

    - नागपूर विधानपरिषद निवडणूकीसाठी १० तारखेला मतदान

  • 08 Dec 2021 07:44 AM (IST)

    विशाळगडावरील पूल तब्बल दहा वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

    विशाळगडावरील पूल तब्बल दहा वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

    24 मीटर खोल दरीत उभारला 21 मीटरचा वक्राकार पूल

    नवा पुल ग्रामस्थ तसेच पर्यटकासाठी ठरतोय वरदान

    मात्र अडचणींवर मात करत बांधलेल्या पुलाकडे सरकारच दुर्लक्ष

    वाढीव बिल तर नाहीच पण कामाची दखल ही घेतली नसल्याची कंत्राटदाराची खंत

  • 08 Dec 2021 07:24 AM (IST)

    डिसेंबर अखेर राज्यात पहिल्या डोसचं 100 टक्के लसीकरण पूर्ण करणार 

    डिसेंबर अखेर राज्यात पहिल्या डोसचं 100 टक्के लसीकरण पूर्ण करणार

    राज्याच्या आरोग्य विभागाचा मानस,

    राज्यात पहिल्या डोसचं लसीकरण पुर्ण करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला

    दिवसाला 10 लाख लसीकरणाचं उद्दिष्ट तर प्राप्त लसीपैकी 60 टक्के लसी या पहिल्या डोससाठी राखीव 40 टक्के दूसऱ्या डोससाठी,

    राज्यात 18 वर्षावरील लाभार्थींची संख्या ही 9 कोटी 14 लाख 35 हजार इतकी आहे,

    त्यापैकी 7 कोटी 65 लाख नागरिकांना मिळाला पहिला डोस

    1 कोटी 47 लाख लोकांना पहिला डोस मिळणे बाकी,

    डिसेंबर अखेर राज्य 100 टक्के लसवंत करणार राज्य आरोग्य विभागाची माहिती .

  • 08 Dec 2021 07:09 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेत ओबीसींच्या 35 जागा धोक्यात

    - नागपूर महानगरपालिकेत ओबीसींच्या 35 जागा धोक्यात

    - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्याने जागा धोक्यात

    - ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांची चिंता वाढली

    - ओबीसी उमेदवारांना खुल्या प्रवर्गात लढवावी लागणार निवडणूक

    - सध्या नागपूर मनपात भाजपचे 61 तर काँग्रेसचे 13 नगरसेवक ओबीसी

  • 08 Dec 2021 07:09 AM (IST)

    लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा करणारे आरोग्य अधिकारी निलंबित

    लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा करणारे आरोग्य अधिकारी निलंबित

    सिद्धनाथ वडगाव आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी निलंबित

    डॉ. चित्रा बिराडे असं निलंबित आरोग्य अधिकार्‍याचे नाव

    लसीकरण मोहिमेतील खराब कामगिरी केल्यामुळे निलंबित

    औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ निलेश गटाने यांनी केलं आरोग्य निलंबन

    लसीकरणासाठी थेट आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित केल्यामुळे खळबळ

  • 08 Dec 2021 06:11 AM (IST)

    यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा

    यवतमाळ- यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकास लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा

    एका गुन्ह्यात आरोपीला जामीन देण्यासाठी मागितली होती 10 लाखाची लाच

    7 लाखात झाली होती तडजोड याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर शहानिशा करून केला एसीबी यवतमाळने गुन्हा दाखल ।

    पोनि अनिल घुगल व खाजगी व्यक्ती विदूत वसानी, विशाल माकडे या तिघांवर झाला गुन्हा दाखल

Published On - Dec 08,2021 6:09 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.