Maharashtra News Omicron LIVE Update | मुंबईतल्या जमिनी विकू नका हा विचार शरद पवारांनी मांडला: संजय राऊत

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या -

Maharashtra News Omicron LIVE Update | मुंबईतल्या जमिनी विकू नका हा विचार शरद पवारांनी मांडला: संजय राऊत
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 13, 2021 | 8:49 AM

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron)  वेरियंटचे  17 रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी राज्यातील 6 रुग्ण बरे झाले आहेत.  तर, राजस्थानमध्ये  9 रुग्ण आढळले आहेत. राजधानी नवी दिल्लीतही एक रुग्ण आढळून आला आहे. गोव्यातही ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे.  महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 11 Dec 2021 09:40 PM (IST)

  ओवेसी

  धर्मनिरपेक्षतेमुळे आपल्याला आरक्षण मिळालं का?

  थ्री इन वन सरकार आरक्षण विसरली

  तीन लोक दाबून खातात

  स्वातंत्रलढ्यात सहभागी न झालेले राष्ट्रवाद सांगतात

  किती मुसलमान ग्रॅज्युएट झाले आहेत

  मुस्लिम शिक्षण का घेऊ शकत नाही

  प्राथमिक शाळेत केवळ 23 टक्के मुसलमान मुली शिक्षण घेत आहेत

  महाराष्ट्रात 83 टक्के मुसलमानांकडे जमिन नाही

  20 टक्के मुसलमान वर्षाला केवळ 25 हजार कमवतात

  4 टक्के मुसलमान ग्रॅज्युएट झाले आहेत

 • 11 Dec 2021 09:30 PM (IST)

  ओवेसी

  मुस्लिम आरक्षणासाठी आजची सभा आहे

  तिरंगा रॅलीमुळे मविआ सरकारला अडचण का आली

  हे सरकार आता तिरंग्याविरोधात झालंय याची खंत

  तिरंगा म्हणजे भारताची ओळख

  शिवसेना राष्ट्रवाद विसरली का?

  आपण सर्व एकत्र येऊन काम करुयात

  समाजाच्या यशासाठी एकत्र लढा हवा

  राहुल गांधी मुंबईत आल्यावर जमावबंदी लागेल का?

 • 11 Dec 2021 09:20 PM (IST)

  मुंबई

  चांदिवलीतील एमआयएम आरक्षणावरील सभेत ओवेंसींचे भाषण सुरु

 • 11 Dec 2021 08:59 PM (IST)

  इम्तियाज जलिल

  उच्च न्यायालयाचा निर्णय येऊनही हे सरकार आम्हाला आरक्षण का देत नाहीत? २०१४ ते २०१९ पर्यंत मी विधानसभेत होतो तेव्हा काँग्रेस, राष्ट्रादी आदी पक्षांचे नेते मुस्लिम आरक्षणासाठी भाषणं देत होते. प्रश्न विचार होते. पण 2019 नंतर सत्तापालट झाली. आता सत्तेत आलेत. विरोधात होते तेव्हा भाजपला मागत होते ज्यांचं मुस्लिमांशी काही देणंघेणं नव्हतं. पण आत सत्तेत तुम्ही आहात, तुम्हाला तिथे पोहोचवण्यात आम्हा मुस्लिमांचाही हात आहे. पण सत्तेत आल्यानंतर विचार बदलला. आम्ही वाट पाहिली, पण नाही. आता आम्ही घोषणा केली की तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही येतोय. तेव्हा त्यांनी पोलिसांना पुढे केलं. सरकार हमसे डरती है, इसलिए पुलिस को आगे करती है... आम्ही येऊ नये म्हणून कोण खेळ खेळत होतं हे माहिती आहे.

 • 11 Dec 2021 08:51 PM (IST)

  इम्तियाज जलिल

  मुस्लिमांचा वापर कसा केला जातो. मुस्लिमांना एखाद्या खेळण्याच्या वस्तूप्रमाणे कसं वापरलं जातं हे दाखवून देणार आहोत. निवडणुकीपुरताच मुस्लिमांचा विचार केला जातो. यावेळीच आम्ही पुन्हा का आंदोलन करत आहोत? कारण, नगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत. आता ते लोक पुन्हा तुमच्याकडे मत मागायला येणार आहेत.

  कुठे आहे 93 हजार एक जमीन? कुणी कुणाला वाटली, कुणी कुणाला विकली? ८ महिने झाले महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा सदस्य होऊन. या काळात 9 एफआयआर दाखल केल्या आहेत. जे विचार करत होते की आम्हाला कोण रोखू शकतं. आम्ही सर्वांना विकत घेऊ शकतो. त्यांना काय माहिती बाजारात कुत्र्यांची पिल्लं विकली जातात, आम्ही नाही. बाजारात सिंह विकले जात नाहीत... त्यातील एक स्टेजवर आहे.

  मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या व्यक्तीला पूर्ण जग पाहतोय. संपूर्ण देशात कोण एक व्यक्ती आपल्या हक्काचा आवाज उंचावतोय. त्याच्या बाजूला जाऊन बसण्याचं भाग्य मला आज तुमच्या कृपेमुळं लाभलं.

 • 11 Dec 2021 08:40 PM (IST)

  इम्पिताज जलिल

  आता शिवसेनाही मुस्लिमांच्या बाजूने बोलते मराठ्यांप्रमाणे मुस्लिमांनी मैदानात उतरावे

  निवडणुकीनंतर मुस्लिमांना विचारलं जात नाही मुस्लिमांच्या जागा गेल्या कुठे?

 • 11 Dec 2021 08:31 PM (IST)

  मुंबई 

  एम्तियाज जलिल लाईव्ह

  अखेर मुंबईत पोहोचलोच - जलिल

  त्यांनी पूर्ण ताकद लावली

  मी मुंबईत पोहचू नये यासाठी प्रयत्न झाले

  हमारी आवाज पर छा गयी इतनी बौखलाहट

  ये तो सिर्फ गुर्राना था... अभी दहाड बाकी है

 • 11 Dec 2021 07:45 PM (IST)

  पुणे

  दिवसभरात 86 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात 97 रुग्णांना डिस्चार्ज. - पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03 एकूण 04 मृत्यू. -83 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 507579 - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 778 - एकूण मृत्यू -9108 -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 497693 - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6192

 • 11 Dec 2021 07:14 PM (IST)

  पुणे

  आज राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही,

  आतापर्यंत राज्यात 17 रुग्णांची नोंद,

  7 जणांना मिळाला डिस्चार्ज,

  आणखी 51 जणांचे अहवाल जिनोमिक सिक्वेंसिगचे येणं बाकी,

  राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती

 • 11 Dec 2021 06:21 PM (IST)

  पुणे

  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची शिवसेनेवर टिका,

  सामनातल्या हे मुखपत्रातून पारदर्शक मोदी सरकारवर टिकेची झोड उठवण्यात आली,

  मात्र राज्यात मविआ सरकारने अराजक माजवलंय,

  राज्यात 11 महिन्यात2 हजार 270 शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या,

  मराठा आणि ओबीसी समाजात निराशा पसरवली,

  आरोग्य विभागातील,एमपीएससी विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात घालवलं,

  जाऊ तिथं खाऊ हे धोरणं राबवलं,

  आपल्या डोळ्यातील मुसळ झाकून दूसऱ्याच्या डोळ्यात कुसळ पेरू नका,

  अन्यथा राज्यातील आपलं सरकार जनता उलथवल्याशिवाय राहणार नाही,

  चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारवर हल्लाबोल !

 • 11 Dec 2021 05:25 PM (IST)

  चांदवड

  - अखेर धुळे मालेगाव मधील MIM कार्येकर्ते फिरले माघारी - गेल्या चार तासापासून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्य सुरू होती बाचाबाची - मुंबईच्या दिशेने जात असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी MIM कार्येकर्त्याना चांदवड टोलनाक्यावर घेतलं होतं ताब्यात

 • 11 Dec 2021 04:59 PM (IST)

  चंद्रपूर

  भद्रावती चे तहसीलदार डॉ.निलेश खटके यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक...

  नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई,

  तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयातच लाच घेतांना रंगेहात अटक,

  विटा भट्टी साठी लागणाऱ्या लाल मातीच्या उत्खननाची परवानगी देण्यासाठी तहसीलदार यांनी फिर्यादीला २५ हजार रुपयांची मागितली होती लाच,

  2 महिन्यांपूर्वीच पोंभुर्णा तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत खटके यांची भद्रावती येथे झाली होती बदली,

  खटके यांना अटक झाल्याने महसूल विभागात प्रचंड खळबळ

 • 11 Dec 2021 03:49 PM (IST)

  सिंधुदुर्ग

  विनायक राऊत बाईट ऑन जितेंद्र आव्हाड

  जितेंद्र आव्हाड हे अभ्यासू आणि सुज्ञ नेते आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच निवडणूका लढवल्या पाहीजेत या विचाराचे ते आहेत मात्र कुठे काही वैचारीक मतभेद किंवा गॅपींग असेल तर ती नक्कीच दुर केली जाईल परंतु कोणत्याही परिस्थितीत मोठ्या निवडणूका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात असं सर्वांचे मत आहे तसे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हे स्वतंत्र आहेत त्यांना कोणी बंधन केलेलं नाही मात्र प्रत्येक जन परिस्थिती नुसार युती महायूती करतील आणि भविष्यातील निवडणूका लढवतील कोणावर बंधन नाहीत सत्ता स्थापन झाली म्हणजे शंभर टक्के महाविकास आघाडीत आलचं पाहीजे असं बंधन नाही परंतु एक संकेत आहे आणि सर्वाना वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका झाल्यातर चांगलं आहे. मात्र भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील अंतर मी पाहीलेलं नाही किती आहे ते म्हणत आव्हाडांना टोला.

  ऑन नारायण राणे लोकसभा इंग्रजी प्रश्न

  लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्याअंतर्गत प्रश्न होता कनी मोझी यांनी तो प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता. लोकसभेत बोलण्याची राणेंची पहिलीच वेळ होती. अभ्यास तेव्हढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पध्दतीने उत्तर दिले. यावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढं देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये. लोकसभेत मला सुध्दा राणेंना प्रश्न विचारता आला असता, पण ते आपलेच गाववाले आहेत. आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. असं म्हणतं नारायण राणेंना विनायक राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.

 • 11 Dec 2021 03:35 PM (IST)

  अजित पवार

  कोरोनाने अनेक जण गमावले

  मास्क लावा असे सांगत किती जणांनी घातला

  कोरोना जीव घेतो तो गंभीर आहे

  लस घ्या नियम पाला नाहीतर कडक निर्बंध लावावे लागतील

  लातूर जिल्ह्यात 34 टक्के नागरिकांनी दुसरा डोस तर 74 टक्के पहिला डोस

  यात राजकारण नाही निवडणूक वेळी राजकारण करू

  2 वर्ष शाळा बंद, त्यांचे शिक्षण कधी पूर्ण होणार

  ही सगळ्यांची सार्वजनिक जबाबदारी आहे

 • 11 Dec 2021 03:24 PM (IST)

  अजित पवार

  नियोजनबद्ध विकास करावा लागतो शहरं मोठी झाली की प्रश्न आ वासून उभी राहतात नोकरी प्रत्येकला देण्यास मर्यादा, रोजगार देण्यासाठी काम सुरु लातूर उस्मानाबादला रेल्वेने पाणी त्यामुळे पाणी जिथल्या तिथे जिरवणे, साठविणे, अडवणे या कामाला प्राधान्य स्वतंत्रला 75 वर्ष झाली तरी शौचालयाला उघड्यावर बसतात ही लाजिरवाणी बाब आहे संत गाडगेबाबा यांच्या नावाने स्पर्धा आणली, पारितोषिक मिळाले की झाले असे नाही

  आगामी काळात निवडणूक येतील, आश्वासन देतील, सरकार कोणाचे आहे हे पहा ?

  राज्य सरकारच्या निधीची जोड मिळेल तरच विकास होऊ शकतो

  विकास कामे दमदार व दर्जेदार असावीत ती वेळेत पूर्ण झाली पाहिजेत

 • 11 Dec 2021 03:16 PM (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण

  मराठवाड्यात औसा ऐतिहासिक दीड हजार वर्षांची पार्श्वभूमी आहे जातीय एकता धार्मिक सलोखा आहे

  भाषण टीका करून प्रश्न सुटत नाहीत

  महाविकास आघडी सरकार काम करीत आहे, विचार सारणी वेगळी असली तरी ध्यास एक विकास आहे

  सर्व संकटांना सामोरे जात आहोत, न खचत जनतेला उभारणी देण्याचे काम करावे

  गारपीट, कोरोना अनेक अडचणी येत आहेत

  नियोजन बद्द विकास करावा लागतो

  शहर मोठी झाली की प्रश्न आ वासून उभी राहतात

 • 11 Dec 2021 02:38 PM (IST)

  महापौर

  भाजप ने माझ्या पत्रावर उलट उत्तर दिली आहेत

  न्यायालय आणि संविधानाला आपण म्हणतो

  माझी खंत जिथे मांडायला हवी तिथे मंडळी

  कुटुंबप्रमुख प्रमाणे मुख्यमंत्री आम्हाला सांभाळतात तेही याला प्रचंड चिडले आगेत

  महिलांचा आदर करा अस आपल्या मोठ्या लोकांचा विचारातून आम्ही घडलो

  बाळासाहेबांचे विचार आणि संस्कार आमच्यात आहे

  काल थोडं व्यतिथ होत आई आणि कणखर स्थिर म्हणून मला मेल रहात आला नाही

  आई म्हणून हळवी झाले

  मी शिवसेनेची रणरागिणी आहे मला काही झालं तरी हरकत नाही

  आम्हाला ऊर्जा देणारी कवचकुंडले आहे

  मला पाठिंबा देणारे माझे पती आणि मुलगा यांच्याबाबत केलेलं हे विधान

  कोणीतरी क्रूरकर्मा असावा ज्याने राजकीय पक्षांचा आडून पत्रच धाडस केले

 • 11 Dec 2021 02:38 PM (IST)

  महापौर ऑन अमित ठाकरे

  विचित्र पद्धतीने मिडियासमोर राहणार

  निगेटिव्ह विचार पुढे येत आहे

  अमित साटम पण आहे

  25 वर्षात थालिनाड करत होता का

  अमित ठाकरे लहान आहे भाजप ने स्क्रिप्ट लिहिली असेल

  अमित ठाकरे सुसंस्कृत आहे ते अस बोलणार नाहीत

 • 11 Dec 2021 02:38 PM (IST)

  महापौर

  ओमायक्रोन भयंकर असा नाहीय

  घाबरण्याची गरज नाही काळजी घेण्याची गरज आहे

  धारावीत झालेली नारंबाल होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे

  काही आजाराची परिणाम शरीरावर होतात

  कोविड त्रिसूत्री कारेक्रम पाळा

  ऐरपोर्ट ट्रेनमधून चुकवून कोणी आले तर सगळ्यांनी सजग असायला हवं

 • 11 Dec 2021 02:37 PM (IST)

  पिंपरी चिंचवड

  - एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचे रावेतमध्ये आगमन

  - जेवणासाठी रावेतच्या समीर लॉन्समध्ये दाखल

 • 11 Dec 2021 02:36 PM (IST)

  आरपीआय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला

  - भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांचं मोठं वक्तव्य

  - आज आरपीआयचा उत्तर भारतीय मेळावा

  - येत्या मनपा निवडणुकांमध्ये आता आरपीआयकडून उत्तर भारतीयांना गळाला लावण्याचा प्रयत्न

  - येत्या मनपा निवडणुकांमध्ये भाजपच्या चिन्हावरच आरपीआय निवडणुका लढणार

  - देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली बैठक, बैठकीत फाॅर्म्युला ठरला

  - येत्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्येही आरपीआय कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार

  - जागा ठरल्यायत, ती घोषणा येत्या 10 दिवसांत करणार

  - मुंबईत महापौर हा भाजपचा असेल पण उपमहापौर हा आरपीआयचा असणार

 • 11 Dec 2021 02:28 PM (IST)

  कल्याण

  शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांना दाेन वर्षाची शिक्षा

  कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दिला निकाल

  माजी नगरसेवक सदानंद थरवळ, शरद गंभीरराव आणि तात्या माने अशी या माजी नगरसेवकांची नावे

  2006 साली केडीएमसीचे तत्कालीन उपायुक्त रविंद्र वाघ यांना करण्यात आली हाेती मारहाण

  डाेंबिवलीच्या रामनगर पाेलिस ठाण्यात झाला हाेता गुन्हा दाखल

  तिघांनी जामिनावर सुटका

  मारहाण झाली नव्हती या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार

  कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांची माहिती

 • 11 Dec 2021 02:00 PM (IST)

  मुंबईतल्या जमिनी विकू नका हा विचार शरद पवारांनी मांडला: संजय राऊत

  शरद पवार यांचं नेतृत्त्व आम्ही शालेय जीवनापासून पाहतो. आम्ही त्यांच्यावर अनेकदा टीका केली. यशवंतराव चव्हाण यांची भाषणं वाचताना मला ते आपल्याशी बोलताना वाटलं. या पुस्तकातील भाषण वाचताना मला असं वाटलं की यशवतंराव चव्हाणांनी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहतो. त्यावेळी यशवंतरावांनी  महाराष्ट्राचे जे चित्र रंगवलं होतं. त्या चित्राप्रमाणं  शरद पवार यांनी गेल्या 40 वर्षात काम केलं आहे. शरद पवार यांच्या मनात महाराष्ट्र, देश, समाज , माणुसकी यांच्याविषयी सद्भाव दिसून आला आहे.

  या देशात अनेक माणसं होऊन गेली. पवार साहेबांची अनेक भाषण टिपणं लिहून काढली आणि आता पुस्तक तयार केलं आहे. बाळासाहेबांच्या शंभर भाषणांचं टिपण आणि त्याचं पुस्तकात आम्ही रुपांतर केलं आहे. लोकमान्य टिळकांच्या भाषणांची टिपणं कुणी केली असती. दादासाहेब खापर्डे यांनी टिळकांची भाषण स्वराज्याची मोहीम या नावानं पुस्तक तयार केलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांची पुस्तकं झाली आहेत.

  शरद पवारांनी 20 ते 25 वर्षापूर्वी जे विचार मांडलेले आहेत. त्यावेळी मांडलेले विचार बदलेले नाहीत. शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना शरद पवार पंतांचं सरकार असल्याचं म्हणाले होते. मात्र, ते ठाकरे सरकार होतं. शरद पवार यांनी यापूर्वी मुंबईतील मराठी माणसांना  जागा विकू नका असं सांगितलं होतं. गेल्या काही महिन्यापूर्वी पुन्हा त्यांनी तोच विचार मांडला. महाराष्ट्रात मराठी माणसाची पकड कायम ठेवण्यासाठी त्यांनी विचार मांडले आहेत.

  मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी भाषेचा अवमान होऊ नये, म्हणून त्यांनी विचार मांडलेले आहेत. शरद पवारांनी सावरकरांविषयी नाशिकला भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील सुपुत्राविषयी थोडेफार मतभेद असूनही त्याचा सन्मान कसा करता येईल, हे पाहिलं पाहिजे.

 • 11 Dec 2021 12:47 PM (IST)

  पुण्यात एकीकडे ओपन मॉल तर दूसरीकडे मनसेचं आंदोलन

  पुण्यात एकीकडे ओपन मॉल तर दूसरीकडे मनसेचं आंदोलन,

  शहरातील फुटपाथ दुरुस्त करा नागरिकांना चालणं मुश्किल,

  महापौर बाणेर, लक्ष्मी रस्ता, म्हणजे पुणे का ? मनसेचा सवाल,

  आजच्या कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी झाली मनसेचा आरोप

  शनीपार चौकात केलं आंदोलन

 • 11 Dec 2021 12:09 PM (IST)

  मालेगावमधून तिरंगा यात्रेला निघालेल्या एम आय एम च्या कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध

  नाशिक - मालेगावमधून तिरंगा यात्रेला निघालेल्या एम आय एम च्या कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध..

  -उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.खालिद परवेज यांच्यासह कार्यकर्त्यांनां त्यांच्याच फार्महाऊसवर केले स्थानबद्ध...

  -मोर्चेकरी मोर्चात सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ठाम...

  -मालेगांव मध्य चे आमदार मुफ्ती इस्माईल मात्र मालेगांवात नाहीत..

  -धुळ्याच्या एमआयएम च्या आमदारांनीही हजेरी लावून कार्यकर्ते यांना मोकळे सोडण्याची धरणा आंदोलन करत केली मागणी...

  -पोलीस मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम...

 • 11 Dec 2021 11:59 AM (IST)

  नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे आतापर्यंतचे सर्वात हतबल प्रदेशाध्यक्ष: चंद्रशेखर बावनकुळे

  - नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे आतापर्यंतचे सर्वात हतबल प्रदेशाध्यक्ष

  - दोन मंत्र्यांच्या दबावात नागपूर विधान परिषदेचा उमेदवार काँग्रेसने बदलला

  - नाना पटोले यांनी आजच्या आज राजीनामा द्यावा

 • 11 Dec 2021 10:43 AM (IST)

  वर्ध्यात विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नास्त्यात अळ्या

  वर्धा फ्लॅश

  - वर्ध्यात विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नास्त्यात अळ्या

  - वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील सरस्वती मुलीच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

  - दररोज जेवणात अळ्या निघत असल्याने विद्यार्थाना राहावं लागतंय उपाशी

  -  एक दिवसानंतर जेवणात अळ्या निघत असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रोष

 • 11 Dec 2021 10:30 AM (IST)

  जोधपूर पॅसेंजर मधून धूर निघू लागल्याने प्रवाशांची तारांबळ

  पालघर -

  जोधपूर पॅसेंजर मधून धूर निघू लागल्याने प्रवाशांची तारांबळ .

  पश्चिम रेल्वेच्या वाणगाव रेल्वे स्थानकानजीक ची घटना.

  डायनामेंट च्या बेल्टच घर्षण झाल्याने आग सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन निघाला धूर . घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत.

  धुरावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

 • 11 Dec 2021 10:15 AM (IST)

  राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते विना मास्क बिनदास्त , पोलीस सुद्धा त्यांना हटकत नाहीत

  लातूर

  राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते विना मास्क बिनदास्त , पोलीस सुद्धा त्यांना हटकत नाहीत

  अजित पवार घेणार कार्यकर्ते बैठक

  कोरोना अनुषंगाने कोणतीही उपाययोजना बैठक ठिकाणी नाही

 • 11 Dec 2021 10:14 AM (IST)

  गोंदियात लस घेतल्याशिवाय पगार मिळणार नाही...

  गोंदिया

  गोंदियात लस घेतल्याशिवाय पगार मिळणार नाही.

  जिल्हाधिकार्‍यांनी दिले निर्देश...

  कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ...

 • 11 Dec 2021 10:11 AM (IST)

  गोंदियात लस घेतल्याशिवाय पगार मिळणार नाही...

  गोंदिया

  गोंदियात लस घेतल्याशिवाय पगार मिळणार नाही...

  जिल्हाधिकार्‍यांनी दिले निर्देश...

  कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ.

 • 11 Dec 2021 10:05 AM (IST)

  थोड्याच वेळात एमआयएमची रॅली अहमदनगर मध्ये दाखल होणार

  अहमदनगर

  थोड्याच वेळात एमआयएमची रॅली अहमदनगर मध्ये दाखल होणार

  मुंबईच्या सभेला निघालेल्या रॅलीला नगरमध्ये अडवण्याची शक्यता

  औरंगाबाद वरून शकडो गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या

  थोड्याच खासदार इम्तियाज जलील यांच्या सह शेकडो गाड्यांचा ताफा नगर शहरात दाखल होणार.

 • 11 Dec 2021 10:01 AM (IST)

  कलम 144 चं उल्लंघन करु नका, इम्तियाज जलील यांच्याशी बोलून मार्ग काढणार: गृहमंत्री

  मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची रॅली, सभा आणि मोर्चे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मी इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी बोलणार आहे. मुंबई पोलीस देखील त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता आदेशाचा भंग करु नका, असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

 • 11 Dec 2021 09:45 AM (IST)

  मेस्माची कारवाई झाली तरी चालेल आम्ही कामावर जाणार नाही, पगारवाढ नको आम्हाला एसटी महामंडळाचं विलीनीकरण हवंय

  मेस्माची कारवाई झाली तरी चालेल आम्ही कामावर जाणार नाही,

  ज्या दिवशी मेस्मा कारवाई केली जाईल त्या दिवशी 90 हजार कर्मचाऱ्यांची लेकरं ,बायका रस्त्यावर उतरतील कर्मचाऱ्यांचा इशारा,

  पगारवाढ नको आम्हाला एसटी महामंडळाचं विलीनीकरण हवंय,

  पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या महिलांची मागणी,

 • 11 Dec 2021 08:48 AM (IST)

  अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर रोखला ताफा

  एमआयएमच्यावतीनं औरंगाबादमधून काढण्यात आलेला ताफा पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बॅरिगेट लावून अडवला आहे.

 • 11 Dec 2021 08:38 AM (IST)

  ओमिक्रॉनच्या भीतीने नाशिक मध्ये लसीकरणाचा वेग वाढला

  ओमिक्रॉनच्या भीतीने नाशिक मध्ये लसीकरणाचा वेग वाढला

  8 दिवसात तब्बल 80 हजार नागरिकांच झालं लसीकरण

  लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांची नव्या व्हेरिएंट ने वाढवली धास्ती

  आरोग्य विभागाच आवाहन लसीकरण करून घ्या,टाळाटाळ करू नका

 • 11 Dec 2021 08:15 AM (IST)

  शिर्डी शहरातील दुकानाला आग

  शिर्डी शहरातील दुकानाला आग.. रिंग रोड लगत असणाऱ्या दुकानाला लागली आग... ओम साई ट्रेडिंग या दुकानाला आग... मध्यरात्री 12 च्या सुमारास लागली होती आग... 10 लाखांचे प्लास्टिक मटेरिअल आगीत भस्मसात... दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश ... आगीच कारण अद्याप अस्पष्ट...

 • 11 Dec 2021 07:39 AM (IST)

  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आदिवासी महिलांबरोबर धरला ठेका,

  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आदिवासी महिलांबरोबर धरला ठेका,

  गडचिरोली दौऱ्यावर असताना महिलांनी रुपाली चाकणकरांच केलं स्वागत

  यावेळी आदिवासी नृत्य सादर करून स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनीही त्यांच्यासोबत ठेका धरला

  इथली संस्कृती मनाला भावणारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली ...

 • 11 Dec 2021 07:13 AM (IST)

  नागपूरमध्ये निवडणुकीत तटस्थ राहण्याची बसपाची घोषणा हवेतच

  - नागपूर जिल्हा विधानपरिषद निवडणुकीत बसपाच्या तटस्थतेची घोषणा ठरली फोल

  - निवडणूकीत तटस्थ राहण्याची बसपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केली होती घोषणा

  - तटस्थ राहणाऱ्या बसपाच्या नगरसेवकांनीच केलं सर्वाधिक मतदान

  - पक्षादेश मोडणाऱ्या बसपाच्या नगरसेवकांवर कारवाईची शक्यता

 • 11 Dec 2021 06:58 AM (IST)

  कोरेगाव भीमा येथील मानवंदना कार्यक्रमाचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

  1 जानेवारीला कोरेगाव भीमा इथं होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा,

  लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता नियोजन करण्याच्या दिल्या सूचना,

  लाईट, रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्था याची काम पुर्ण करण्याया सूचना देण्यात आल्यात,

  गर्दीचं नियोजन करण्याच्या दृष्टीने कामं वेळेत पुर्ण करा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात !

 • 11 Dec 2021 06:54 AM (IST)

  पोलीस आमच्यावर दडपशाही करत आहेत: इम्तियाज जलील

  आम्ही आज मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी मोर्चा काढणार आहोत

  आम्हाला चांदीवली येथील एका खाजगी शाळेत सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. तिथे आमची सभा होणार आहे.

  पोलीस आमच्यावर दडपशाही करत आहे. तिरंगा झेंडा लावायला विरोध करत आहे, आम्ही हे जगाला दाखवू की आम्हाला कसा विरोध होतोय

  देशाने आजपर्यंत कधीही पाहिलं नाही असं चित्र आज पाहायला मिळेल

 • 11 Dec 2021 06:52 AM (IST)

  भाजप आमदाराच्या बॅनरवरुन पक्षाचे नेते गायब

  जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे भाजपा आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या बॅनर वरून भाजपचे नेते गायब झाल्याचे दिसून येत असून बॅनर वर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा फोटो असल्याचे बॅनर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याने राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

 • 11 Dec 2021 06:13 AM (IST)

  एमआयएमच्या वतीने काकासाहेब शिंदे यांना दिली जाणार श्रद्धांजली

  एमआयएमच्या वतीने काकासाहेब शिंदे यांना दिली जाणार श्रद्धांजली

  मुस्लिम आरक्षणासाठीच्या मोर्चा दरम्यान एमआयएम देणार काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली

  गोदावरी नदीवरील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकावर एमआयएम देणार श्रद्धांजली

  मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम देणार मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली

  मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचे कायगाव टोका इथे आहे स्मारक

  300 गाड्यांचा ताफा थांबवून एमआयएम देणार काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली

 • 11 Dec 2021 06:12 AM (IST)

  मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी एमआयएम काढणार मोर्चा

  मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी एमआयएम काढणार मोर्चा

  महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबई वर निघणार मोर्चा

  आज सकाळी सात वाजल्यापासून मोर्च्याला होणार सुरुवात

  औरंगाबाद शहरातून शेकडो वाहनांनी कार्यकर्ते होणार मुंबईला रवाना

  एमआयएमच्या मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी

  परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मोर्चा काढण्यावर एमआयएम ठाम

  पोलिस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

Published On - Dec 11,2021 6:09 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें