Maharashtra News Omicron LIVE Update | श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर अतिरेक्यांचा अंदाधुंद गोळीबार; 14 पोलीस जखमी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या -

Maharashtra News Omicron LIVE Update | श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर अतिरेक्यांचा अंदाधुंद गोळीबार; 14 पोलीस जखमी
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 14, 2021 | 6:27 AM

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron)  वेरियंटचे रु्ग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी राज्यातील 6 रुग्ण बरे झाले आहेत. काल नागपूरमध्ये ओमिक्रॉन बाधित आढळून आला आहे.  तर, राजस्थानमध्ये  9 रुग्ण आढळले आहेत. राजधानी नवी दिल्लीतही एक रुग्ण आढळून आला आहे. गोव्यातही ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे. नाशिकमध्ये आज शाळा सुरु होत आहे. तर, पंतप्रधान  नरेंद्र मोदी (Narendra Modi ) उत्तर प्रदेशच्या दौैऱ्यावर जाणार आहेत.  महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 13 Dec 2021 08:04 PM (IST)

  सातारा 

  सातारा: फलटण येथे दक्षिण आफ्रिकेतुन आलेल्या दोघांचा अहवाल आला कोरोना पॉझिटीव्ह…

  दोघांना ओमायक्रोन झाला आहे का याबाबत केली जात आहे तपासणी…

  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांची माहिती

 • 13 Dec 2021 07:34 PM (IST)

  पुणे

  राज्यात आज ओमिक्रॉनच्या रुग्णाच्या रुग्णसंख्येत 2 जणांची भर,

  पुणे आणि लातूर मधील रुग्णांचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह,

  पुण्यात दूब ईवरून आलेल्या महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह,

  दोन्ही रुग्णांच लसीकरण झालंय,

  पुण्यातील रुग्णाच्या संपर्कातील 3 जणांचा अहवाल निगेटिव्ह …

 • 13 Dec 2021 07:32 PM (IST)

  औरंगाबाद

  राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यामुळे औरंगाबाद शहरात ट्राफिक जाम

  औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंप चौकात तुफान ट्राफिक जाम

  औरंगाबाद नगर महामार्गावर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

  ट्राफिक जाम मध्ये शेकडो वाहने अडकली

 • 13 Dec 2021 07:32 PM (IST)

  लातूर : जिल्ह्यात ओमीक्रोनचा पहिला रुग्ण आढळला, दुबई वरून परतलेल्या 35 वर्षीय रुग्णांत आढळली लक्षणे, लातुर मनपाच्या कोविड सेंटर मध्ये ओमीक्रोनच्या रुग्णांवर उपचार सुरू, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली माहिती, परदेशातून आलेल्या 51 पैकी एका रुग्णाचा स्वॅब पाठवला होता तपासणी साठी, आज आला ओमीक्रोन पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट, रुग्णाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती,रुग्ण लातूर जिल्ह्यातल्या औसा येथील रहिवाशी.

 • 13 Dec 2021 07:01 PM (IST)

  जम्मू-काश्मीर

  पोलिसांच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला

  11 जवान जखमी 3 जणांची प्रकृती गंभीर

  काश्मीर टायगर या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

  जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट

 • 13 Dec 2021 06:09 PM (IST)

  नवी दिल्ली 

  नवी दिल्ली सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला फटकारले

  कोरोनायामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई

  महाराष्ट्र राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्यास विलंब केलाय - कोर्ट

  गुजरात सरकारनेही नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत

  महाराष्ट्र राज्य सरकार 30 डिसेंबर पर्यंत 50 हजार अर्जदारांना नुकसान भरपाई देणार - कोर्टात स्पष्टीकरण

 • 13 Dec 2021 05:29 PM (IST)

  नवी दिल्ली

  नवी दिल्ली ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही

  उद्या होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

 • 13 Dec 2021 05:28 PM (IST)

  लातूर

  उदगीरच्या सरकारी रुग्णालयात बाळांतपणासाठी आलेल्या महिला रुग्णा सोबत गैरवर्तन, चेकअपच्या नावाखाली कर्मचारी करायचा बंद खोलीत गैरवर्तन, पोलिसात गुन्हा दाखल, आरोपी ब्रदर -कर्मचारी फरार, पिडीत महिलेची पोलिसात धाव तर दुसऱ्या एका महिला रुग्णा सोबतही घडला प्रकार..

 • 13 Dec 2021 05:28 PM (IST)

  पुणे

  पुणे जिल्ह्यातील संपात सहभागी असलेल्या तीन कामगारांनी एसटीवर केली दगडफेक

  काच फुटून दगड लागल्यानं चालकाच्या हाताला झाली जखम,

  तीन कर्मचाऱ्यांनी शिरूर तालुक्यातील आंधळगाव फाट्यावर 11 तारखेला रात्री 12 वाजता केली होती दगडफेक,

  शिरूर पोलीस ठाण्यात तीन कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल

  आगार व्यवस्थापकानं दिला महामंडळाला अहवाल ..

 • 13 Dec 2021 12:37 PM (IST)

  Raj Thackeray Live : एसटी कर्मचाऱ्यांना समजावून घेण्याऐवजी अरेरावी काय करताय? राज ठाकरेंचा सवाल

  नाशिक महापालिका निवडणुकीसंदर्भातील मनसेची रणनीती पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगेन, पत्रकार परिषदेत असं कोण सांगत नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

  ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, कोरोनाचे प्रश्न आहेत. मात्र, आगामी निवडणुकींच्या दृष्टीनं काम तर करावं लागणारचं आहे. नाशिक दौरा संपल्यानंतर मी कोकण दौऱ्यावर जाणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

  एसटी कर्मचाऱ्यांनी सगळ्या यूनियन बाजुला ठेऊन ते एकत्र आलेले आहेत. जे राज्य तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी ते लोकांच्या सेवेसाठी दिलं आहे हे समजायला हवं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांनी बोलायला हवं. एसटी कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार नाहीत. त्यांची दिवाळी पगाराअभावी गेली. एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती समजावून घेण्याऐवजी अरेरावी काय करताय,असं राज ठाकरे म्हणाले.

  देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते त्यावेळी मी बोललो होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्यानं पत्र लिहिलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले. एसटी चालवण्यासाठी खासगीकरण करण्याऐवजी प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी नेमण्याऐवजी दम देण्याचं काम केलं जात आहे. एक लाख कर्मचारी आहेत, त्यांचं ऐकल नाही तर ते अंगावर येतील, असं राज ठाकरे म्हणाले.

 • 13 Dec 2021 11:58 AM (IST)

  नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधीन अनेक कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 • 13 Dec 2021 11:53 AM (IST)

  महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना फासलं काळ

  महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना फासलं काळ

  बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात अज्ञातांचे कृत्य

  हिवाळी निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा

  उद्या बेळगाव बंदची हाक

  सीमाभागातील मराठी भाषिक संतप्त

 • 13 Dec 2021 11:51 AM (IST)

  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे निदर्शने

  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे निदर्शने

  म्हाडाचे पेपर कॅन्सल झाल्याने अखिल भारतीय सेना आक्रमक

  निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त

  अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते आणि पोलिस आमने-सामने

  पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले

 • 13 Dec 2021 10:42 AM (IST)

  रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम

  रत्नागिरी- जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम

  कामावर हजर व्हा असं शेवटचे अल्टीमेटम देऊनही जिल्ह्यातील 3 हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी

  3779 रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण कर्मचारी

  आज केवळ 600 हून अधिक एसटी कर्मचारी कामावर

  रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य रत्नागिरी डेपो शंभर टक्के बंद

  दापोली देवरुख राजापूर एसटी बस स्थानकातून 30 टक्के एसटी वाहतूक सुरू

  एसटी प्रशासनाचा दावा

 • 13 Dec 2021 09:56 AM (IST)

  सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, बदल्याच्या भावनेतून गुन्हा दाखल: संजय राऊत

  संजय राऊत लाईव्ह

  मी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ मुर्ख आणि बुद्धू असा आहे. सरकार आणि मान्यताप्राप्त शब्दकोषांमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे. मोठ्या साहित्यिकांनी त्याचा अर्थ सांगितला आहे. माझ्या विरोधात दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली पोलिसांचं नियंत्रण करते.  बदल्याच्या भावनेतून आणि राजकीय बदल्याच्या भावनेतून करण्यात आलं आहे. सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

  महाराष्ट्रात तुम्ही काही करु शकत नाही. यंत्रणा माझ्या विरोधात बोलू शकत नाहीत. हे अशा प्रकारचे हातखंडे वापरून आमच्या विरोधात एफआयर दाखल केली जाते. मी त्यांना सांगू इच्छितो की  ही शिवसेना आहे त्यांनी लक्षात ठेवावं, असं संजय राऊत म्हणाले.

  सध्या संसदेचं सत्र सुरु आहे. माझ्यावर एफआयर दाखल करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, संजय राऊत म्हणाले.

  दोन्ही राजकीय पक्षात युती आघाडीसंदर्भात चर्चा सुरु असतात, मात्र सध्या दोन्ही पक्षात यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

 • 13 Dec 2021 08:36 AM (IST)

  ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

  नवी दिल्ली ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

  सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी कडे राज्याचे लक्ष

  महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर आजच्या सुनावणीच सावट

  आरक्षण मिळणार की स्थगिती कायम राहणार

 • 13 Dec 2021 07:33 AM (IST)

  मनसेचे प्रमुख राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर

  मनसेचे प्रमुख राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर

  आज सायंकाळी पाच वाजता राज ठाकरे येणार औरंगाबाद दौऱ्यावर

  उद्या दिवसभर चालणार राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक आणि कार्यक्रम

  आज सायंकाळी पाच वाजता औरंगाबादच्या बाबा चौकात होणार राज ठाकरे यांचे जंगी स्वागत

  मोटरसायकल रॅली द्वारे राज ठाकरे यांचं होणार सुभेदारी विश्रामगृहात आगमन

  आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे घेणार बैठका

  मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची होणार बैठक

 • 13 Dec 2021 07:09 AM (IST)

  नऊ लाख 71 हजार 662 पुणेकरांचा कोरोना लसीचा दुसरा डोस बाकी

  पुणे शहरात नऊ लाख 71 हजार 662 पुणेकरांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही

  तर जिल्ह्यातील 26  लाख 75 हजार 599 जणांचा डोस बाकी

  जिल्ह्यातील नागरिकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे एक कोटी 39 लाख 30 हजार 891 डोस दिले

  या एकूण डोसपैकी 83 लाख 53  हजार 245 नागरिकांचा पहिला डोस पूर्ण, पहिल्या डोसचे प्रमाण 100 टक्के

  पहिला डोस घेतलेल्यांपैकी आतापर्यंत 55 लाख 77 हजार 464 जणांनीच दुसरा डोस घेतला

  67 टक्के नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस

 • 13 Dec 2021 07:07 AM (IST)

  राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद रविवारी पुण्यात

  राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद रविवारी पुण्यात झाली

  शहरात १४.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर २८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

  पुढील तीन दिवस शहरात अंशतः ढगाळ वातावरणाची आणि धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली ,

 • 13 Dec 2021 06:48 AM (IST)

  नागपुरात ओमिक्रॅानचा पहिला रुग्ण आढळल्यावर मनपा प्रशासन अलर्टवर

  - नागपुरात ओमिक्रॅानचा पहिला रुग्ण आढळल्यावर मनपा प्रशासन अलर्टवर

  - ओमिक्रॅानचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी कोव्हिड नियमांचे पालन करण्याचं आवाहन

  - मास्क, शारीरिक अंतर आणि हात वेळोवेळी सॅनिटायजर करीत राहण्याचे आवाहन मनपा आयुक्तांचं आवाहन

  - सर्दी, खोकला, ताप असणाऱ्यांनी त्वरित तपासणी करण्याचा मनपाच्या सुचना

  - अजूनही लस न घेतलेल्या व्यक्तींनी लस घेण्यासाठी पुढे यावे. असे आवाहनही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

 • 13 Dec 2021 06:11 AM (IST)

  वाकोला पोलिसांकडून ग्रँड हयात हॉटेलमधील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल

  वाकोला पोलिसांनी ग्रँड हयात हॉटेलमधील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल केला

  ग्रँड हयात येथे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला गर्दी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन कार्यक्रम बंद पाडला.

Published On - Dec 13,2021 6:10 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें