Maharashtra News Live Updates : अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडून दिला: रामदास कदम

| Updated on: Dec 19, 2021 | 6:05 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Updates : अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडून दिला: रामदास कदम
Breaking

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron)  वेरियंटचे रु्ग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे.   तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आली त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील तापण्याची शक्यता वर्तवली जातेय.   महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Dec 2021 06:58 PM (IST)

    कराची पुन्हा स्फोटांनी हादरलं, 12 जणांचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

    पाकिस्तानातील कराचीत सीवेज सिस्टममध्ये आज एक मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यावरून या स्फोटाची दाहकता समजून येते. यात आणखी काही लोकांचे मृतदेह सापड्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढवण्याची शक्यता आहे.

  • 18 Dec 2021 06:30 PM (IST)

    भिवंडीत मोठी कारवाई, 75 किलो गांजा जप्त

    भिवंडीत 75 किलो गांजा जप्त, भिवंडी क्राईम ब्रांचची कारवाई, फातमा नगरमधील एका घरात सापडला 75 किलो गांजा, एकाला अटक

  • 18 Dec 2021 05:44 PM (IST)

    26 जानेवारीला महाराष्ट्र दौरा करणार, पंकजा मुंडेंची मोठी घोषणा

    26 जानेवारीला महाराष्ट्र दौरा करणार असल्याची पंकजा मुंडेंनी मोठी घोषणा केली आहे. ही महाराष्ट्रातील काळी निवडणूक आहे, अशा शब्दात ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यावर पंकजा मुंडेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने इंपेरिकल डेटा द्यावा, असेही त्या म्हणाल्या आहेत. तसेच धनंजय मुंडेंवर टीका करताना, बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला मणक्याचा आजार झाला. मी पालमंत्री असताना कोट्यवधींचा निधी दिला, मात्र दोन वर्षात काहीही निधी नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. राज्यात आघाडीचे सरकार असले तरी राज्यात केंद्र निधी द्यायला कमी पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

  • 18 Dec 2021 04:07 PM (IST)

    क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची दखल घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

    छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता  स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 18 Dec 2021 03:57 PM (IST)

    राम कदम ना घरके ना घाटके, निलेश राणेंची टीका

    भाजप नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना, राम कदम यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे, असे ते म्हणाले. रामदास कदम यांनी राणेंवर टीका करण्याचं काम केलं कारण त्यांना मातोश्रीतून बक्षीस हवे होतं. त्यांनी ते विरोधी पक्षनेते पद मिळवलं आणि ते पद फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच होतं आणि आज त्यांची शिवसेनेमधे ना घर का ना घाटका अशी अवस्था झाली. असा शब्दात निलेश राणे यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतलाय.

  • 18 Dec 2021 12:36 PM (IST)

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी माफी मागावी : एकनाथ खडसे

    कर्नाटक बेळगाव-शिवाजी महाराजांची विटंबना घटना अत्यंत दुर्दैवी यामुळे देशभरातील अस्मितेला धक्का पोहोचला

    कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात की ही छोटी गोष्ट आहे यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

    कर्नाटक मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे सरकारचे प्रमुख जर असे म्हणत असतील की ही छोटी गोष्ट आहे.  शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माफी मागावी

  • 18 Dec 2021 12:25 PM (IST)

    सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं : रामदास कदम

    दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि मला मंत्रिपद नको म्हणालो होतो. मात्र,  सुभाष देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं.

  • 18 Dec 2021 12:13 PM (IST)

    सुनील तटकरेंच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न चालल्याचं सांगितलं : रामदास कदम

    बाडग्यांना परब यांनी पदं दिली. उद्धव ठाकरेंना त्याची माहिती नसेल. योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंना सांगितलं. सुनील तटकरेंच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न चालल्याचं सांगितलं. मी सुभाष देसाई आणि अनिल देसाईंनाही सांगितलं.

  • 18 Dec 2021 12:10 PM (IST)

    वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना पाठिशी घालण्याचा अनिल परब यांचा प्रयत्न : रामदास कदम

    अनिल परब यांचं उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही. त्यांनी योगेश कदम म्हणजेच माझ्या मुलाला विधानसभेचं तिकीट दिलं. माझ्या मुलाचा दोन वर्षात एक फोनही अनिल परब यांनी घेतला नाही. ज्या भागात वैभव खेडेकर हा मनसेचा खेडचा नगराध्यक्ष आणि संजय कदम यांना अनिल परब यांनी पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला.

    अनिल परब  पक्षाशी गद्दारी करुन आमच्या मुळावर उठलाय, असा आरोप रामदास कदम यांनी केला. दापोली आणि मंडणगड येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमदेवारांच्या मुलाखती घेतल्या.

    संजय कदम हा शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेला होता. संजय कदम यांनं भगवा झेंडा जाळून पाया खाली तुडवला होता. आम्ही संजय कदमला पराभूत केलं. सूर्यकांत दळवी आणि संजय कदम यांनी शिवसेना भाजप विरोधात काम केलं.

  • 18 Dec 2021 12:07 PM (IST)

    अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडून दिला: रामदास कदम

    माझी बाजू महाराष्ट्राच्या शिवसैनिकांसमोर यावी, मला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ते किती चुकीचं आहे, मला राजकीय दृष्ट्या उद्धवस्त करणारं हे सांगण्यासाठी माझी बाजू मांडणार आहे. जी तथाकित ऑडिओ क्लिप आली त्यात मी शिवसेना, शिवसेना प्रमुख यांच्याबद्दल काही बोललेलो नाही. मी पक्षाला हानी होईल असं मी काहीही बोललो नाही. शिवसेना पक्ष प्रमुखांना जे पत्र दिलं होत त्याची प्रत मी आपल्यासमोर देत आहे. दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून काही मत मांडली होती. मी शिवसेना प्रमुखांसमोर मी मतं मांडली आहेत.

    अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यात येतात. संपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडलाय. तालुकाप्रमुखांची नावं माहिती नाहीत. अनिल परब यांच्या हॉटेल यांच्या विरोधात बोलणं मी पक्षाविरोधात बोलणं आहे का?, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनधिकृत होता तो त्यांनी पाडला. वैयक्तिक संपत्ती पाडली तरी पक्षाविरोधात कसा काय, असा सवाल रामदास कदम यांनी केला.

  • 18 Dec 2021 11:53 AM (IST)

    बंगळुरुतील घटनेमुळं कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक

    बंगळुरुतील घटनेमुळं कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. कोल्हापूरमधील पुणे बंगळुरु महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूरमध्ये कर्नाटकाच्या वाहनांना काळं फासणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

  • 18 Dec 2021 11:34 AM (IST)

    समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करा : उदयनराजे भोसले

    संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमठत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

  • 18 Dec 2021 11:24 AM (IST)

    देशाला सहकाराची 100  वर्षाची परंपरा मात्र सहकार मंत्रालय नव्हतं

    देशामध्ये सहकारिता मंत्रालय पहिल्यांदा स्थापन झालंय. देशाला सहकाराची 100  वर्षाची परंपरा आहे. तिथं सहकार मंत्रालय नव्हत. नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय स्थापन करुन अमित शाह यांच्याकडे अनुभव असल्यानं त्यांना जबाबदारी दिली. प्रवरानगर हा सहकाराची भूमी असल्यानं इथं सहकार परिषद आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.य

  • 18 Dec 2021 11:13 AM (IST)

    बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवा, संभाजी छत्रपतींनी ठणकावलं

    संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

  • 18 Dec 2021 11:12 AM (IST)

    टीईटी परीक्षेत पैसे देऊनही काम न झालेल्या विद्यार्थ्यांनी गुन्ह्याचा तपास कामी पुढे यावं

    पुणे पोलिसांच्या सायबर शाखेचे आवाहन

    टीईटी परीक्षेत पैसे देऊनही काम न झालेल्या विद्यार्थ्यांनी गुन्ह्याचा तपास कामी पुढे याव

    आरोग्य पेपर फुटी, महाडा पेपर फुटी आणि टीईटी परीक्षेचे झालेला गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे 70 कर्मचारी करतायेत तपास

    फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन द्यावी तक्रार

  • 18 Dec 2021 11:11 AM (IST)

    महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रणरागिणींनी अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला

    महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रणरागिणीनींनी अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला

    बेळगाव मध्ये शिवाजी गार्डन या ठिकाणी दुग्धाभिषेक घालत केल अभिवादन

    सकाळपासून शिवाजी गार्डन परिसरात शिवप्रेमींना पोलिसांकडून केला जात होता मज्जाव

    मात्र महिला मोर्चाने दुग्धाभिषेक घालत विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना दिल चोख प्रत्युत्तर

    पोलिसांच्या दडपशाहीला भीक घालणार नाही

    महिला शिवप्रेमींनी व्यक्त केल्या भावना

  • 18 Dec 2021 10:18 AM (IST)

    बेळगावात उद्यापर्यंत कलम 144 लागू

    बंगळुरु घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या काहींकडून हिंसक वळण दिलं गेलं

    आम्ही समजूत काढली मात्र सरकारी आणि खाजगी गाड्यांची तोडफोड झाली

    संगोळी रायन्ना यांच्याही पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न झालाय

    वेगवेगळ्या चार गुन्ह्यात 27 जणांना ताब्यात घेतल

    उद्यापर्यंत 144 कलम लागू असेल

  • 18 Dec 2021 09:45 AM (IST)

    बैलगाडा शर्यतीसाठी 50 हजारांचे डिपॉझिट ठेवणे बंधनकारक

    पुणे -

    - बैलगाडा शर्यतीसाठी 50 हजारांचे डिपॉझिट ठेवणे बंधनकारक,

    - 50 हजार रुपयांची ठेव जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवून नियमांचे पालन करण्याची हमी दिल्यानंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी,

    - शर्यत आयोजित करण्याच्या किमान 15 दिवस अगोदर बँक हमी द्यावी लागणार,

    - न्यायालयाच्या आदेशानुसार अधिसूचना जारी.

  • 18 Dec 2021 09:10 AM (IST)

    बंगळूर येथील रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशी गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करा : सचिन खरात

    बंगळूर येथील रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशी गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करा... सचिन खरात

    रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटाकांचा निषेध करत असून या समाजकंटाकांना तात्काळ अटक करावी महाराष्ट्र राज्यातील जनता कदापिही असे कृत्य खपवून घेणार नाही तात्काळ महाराष्ट्र राज्यातील माननीय मुख्यमंत्री यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी बोलून समाजकंटाकावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करावी अशी विनंती करत आहे.

  • 18 Dec 2021 07:53 AM (IST)

    बंगळुरुतील घटनेचा तीव्र निषेध करतो: एकनाथ शिंदे

    कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो.

    म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे.

  • 18 Dec 2021 07:48 AM (IST)

    बेळगाव शहरात तणावपूर्ण शांतता

    बेळगाव शहरात तणावपूर्ण शांतता

    शहरातील संभाजी चौकात पोलिसांचा बंदोबस्त

    बंगरुळू इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेची पडसाद

    बेळगाव सह सीमाभागात काल सायंकाळी होते

    घटनेच्या निषेधार्थ आज मराठी भाषिकांचा बेळगाव मध्ये मोर्चा

    सकाळी 10 वाजता शिवाजी उद्याना पासून होणार मोर्चा ला सुरवात

  • 18 Dec 2021 07:30 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यातील तापमान घटलं

    नंदुरबार फ्लॅश :  जिल्ह्यात तापमानात घट धडगाव तालुक्यातील डोंगराळ भागात तापमान 8 अंश सेल्सिअस तर नंदुरबार सह सपाटी च्या भागात तापमान 11 अंश पर्यंत..... आठ दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान विभागाची माहिती...

  • 18 Dec 2021 07:25 AM (IST)

    नागपूरातील अनेक बडे सुपारी तस्कर पोलीसांच्या रडारवर

    नागपूरातील अनेक बडे सुपारी तस्कर पोलीसांच्या रडारवर

    - आरोग्याला घातक सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करुन विक्री

    - नागपूरात सडकी सुपारी तस्करी करणारे अनेक बडे व्यापारी रडारवर

    - नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेनं जप्त केली 620 पोती सुपारी

    - पोलीसांच्या कारवाईनंतर अनेकांनी गोदामातील सुपारी सुरक्षित स्थळी हलवली

  • 18 Dec 2021 06:53 AM (IST)

    एफआरपीची मोडतोड करणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका

    एफआरपीची मोडतोड करणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका

    15 टक्के व्याजासह शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी लागणार

    एफआरपीची मोडतोड करणाऱ्या कारखान्यांवर त्वरित कारवाई करण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राजू शेट्टी यांना दिल आश्वसन

    चालू गळीत हंगामात कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी बेकायदेशीर रित्या केलेत 'एफआरपी'चे तुकडे

  • 18 Dec 2021 06:14 AM (IST)

    मुंबई पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन ऑल आऊट सुरु

    मुंबई पोलिसांनी थर्टी फस्ट डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन ऑल आऊट सुरू केला आहे हा आपरेशन मध्ये रेकॉर्ड असलेले आरोपींची शोध घेत आहे आणि नाकाबंदी करून वाहनांची तपासणी आणि बिना मास्क फिरणारे लोकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे

Published On - Dec 18,2021 6:12 AM

Follow us
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.