Maharashtra News Live Update : महाराष्ट्रात तब्बल 11000 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण, पाहा आजची आकडेवारी

Maharashtra News And Omicron Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रात तब्बल 11000 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण, पाहा आजची आकडेवारी
Breaking-

| Edited By: सागर जोशी

Jan 02, 2022 | 11:54 PM

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट धिरोदात्तपणे हाताळलण्यानंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra ) तिसऱ्या लाटेचे ढग गडत होत आहेत. रोज रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉनबाधित (Omicron)  रुग्णदेखील वाढत असल्याचं समोर आलं आहे. या दुहेरी संकटामुळे आता राज्य लॉकडाऊनच्या (Lockdown) उंबरठ्यावर असल्याचं मंत्र्यांकडून म्हटलं जातंय. राज्यात दिवभरात 9 हजार 170 नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.  एकट्य़ा मुंबईतल्या कोरोना (Mumbai Corona Update) रुग्णांचा आकडा 6 हजारांच्या पुढे गेला आहे, राज्यात शनिवारी 7 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी म्हणजेच महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकाणात सध्या नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shivsena) वाद हा चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रासह या तसेच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 02 Jan 2022 09:29 PM (IST)

  सांगलीत ओमाक्रॉनचे 2 रुग्ण आढळले

  सांगलीतील 100 फुटीवरील गुलाब कॉलनीत वास्तव्यास असलेले दोन जण ओमिक्रॉन बाधित असल्याचा रिपोर्ट प्रशासनाला आज मिळाला

  दोघेही पती -पत्नी, परदेशी प्रवास नाही. दोघानाही सध्या कोणताही त्रास नसल्याची सांगली महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

 • 02 Jan 2022 07:46 PM (IST)

  महाराष्ट्रात आज 11 हजारपेक्षाही जास्त नव्या रुग्णांची भर

  महाराष्ट्रात आज 11 हजार 877  नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 2,069 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दिवसभरात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

 • 02 Jan 2022 07:19 PM (IST)

  गोव्यातही रुग्णवाढीची चिंता, 388 नवे कोरोना रुग्ण

  गेल्या 24 तासांत 377 नव्या कोरोना रुग्णांची गोव्यात भर पडली आहे, तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला गोव्यात एकूण 1671 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 • 02 Jan 2022 07:17 PM (IST)

  कल्याण डोंबिवलीत आज 214 रुग्णांची भर

  कल्याण डोंबिवलीत आज 214 रुग्णांची भर पडली असून सक्रिय रुग्णसंख्या 756वर पोहोचली आहे. 38 जण आज बरे झाले असून रविवारी (2 जानेवारी) एकाही कोविड मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही.

 • 02 Jan 2022 07:14 PM (IST)

  आज मुंबईत (Mumbai) तब्बल 8 हजार 63 नवे कोरोना रुग्ण

  आज मुंबईत (Mumbai) तब्बल 8 हजार 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. कालही मुंबईत 6 हजार 347 रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे.

 • 02 Jan 2022 06:58 PM (IST)

  मुंबई पाठोपाठ ठाण्यातही 500 चौ. फुटापर्यंत घरांना करमाफी मिळणार

  1 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. असाच निर्णय लवकरच ठाणे महापालिकेत घेतला जाणार असल्याची माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांबाबत कर माफीचा निर्णय लवकरच होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनाही लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.

 • 02 Jan 2022 01:39 PM (IST)

  हिंगोलीत पाणी प्रश्नासाठी आंदोलन पेटले, तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा

  हिंगोली-हिंगोलीत पाणी प्रश्नासाठी आंदोलन पेटले

  कळमनुरी येथील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा

  मोर्चात सर्व पक्षीय नेते सहभागी

  मागील अर्ध्या तासापासून मुख्य नांदेड-हिंगोली महामार्गावर ट्रॉफिक जाम

  सापळी धरण रद्द करा. शिंचनाचा अनुशेष दुर करा. या मागणीसाठी काढला ट्रॅक्टर मार्च

 • 02 Jan 2022 01:04 PM (IST)

  नागपुरात बोलेरो-पिकअप व्हॅनचा भीषण अपघात, चार महिला मजुरांचा मृत्यू  

  नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यात बोलेरो-पिकअप व्हॅनच्या भीषण अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू

  इतर पाच महिला मजूर गंभीर जखमी

  आज पहाटे काटोल तालुक्यातील ईसापूर-घुबडमेट रस्त्यावर अपघात

  परिसरातील संत्राच्या बागेत संत्रा तोडण्यासाठी  या महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने जात होत्या

  पहाटे चारच्या सुमारास बोलेरो वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली

  त्याच्यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला

  तर एक महिला मजुराचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला

  इतर पाच जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

 • 02 Jan 2022 11:45 AM (IST)

  अंकिता पटील यांना कोरोनाची लागण

  मुंबई : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिलीय

 • 02 Jan 2022 11:15 AM (IST)

  दुसऱ्या लाटेच्या तिप्पट ऑक्सिजनची निर्मिती करण्याचं यापूर्वीच सांगितलं- अजित पवार

  मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दुसरी लाट संपली तेव्हापासूनच आम्ही आढावा घेत होतो. सगळ्या जिल्हाधिकारी, आरोग्य विभागांना तिसरी लाट येणार हे गृहित धरून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधे बेड यांची तजवीज करा असं सांगत आहोत. उद्योगांना लागणारा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला. दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त ऑक्सिजन लागलेला आहे त्याच्या तिप्पट ऑक्सिजनची व्यवस्था आपापल्या भागात करावी, असं आम्ही सांगितलं होतं. पुणे जिल्ह्यात आपण ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला सक्षम करण्यासाठी आपण ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक रुग्णालयांना मंजुरी दिली.  त्यांना निधीदेखील चांगला दिला आहे. परवाच चारेचार हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महानगपरपालिका, नगरपालिका यांच्याकडे जी रुग्णालये आहेत, त्यांनासुद्धा आपण कोरोनाविरोधात लढण्यासाठी तजविज करावी असं आम्ही सांगितलं होतं.

  पहिला आणि दुसरा डोस सर्वांनी घ्यावा असा आपला आग्रह होता. पहिल्या डोसबाबत नागरिक जागरुक होते. मात्र आता दुसऱ्या डोसबाबत नागरिकांना गांभीर्य लक्षात येत नाहीये. ग्रामीण भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे घरोघरी जाऊन तपासणी करुन लसीकरण करायला सांगितले आहे. असे अजित पवार म्हणाले.

 • 02 Jan 2022 11:06 AM (IST)

  तीस वर्षांपासून बँक चांगल्या प्रकारे चालवत आहोत, जनतेने यावेळी सहकार्य करावे- अजित पवार

  मुंबई : काही लोक वेगळा प्रचार करत आहेत. काही जागा मी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने आम्हाला यश आले नाही. आम्ही आमच्या परीने आमच्या विचाराचे लोक निवडूण आणण्याचा प्रयत्न करतोय. हवेली पुणे, पिंपरी चिंचवडनंतर विचार करायचा झाल्यास सर्वात जास्त मतदान बारामती येथे झाले आहे. बारामती येथे सातशे मते आहेत. गेली तीस वर्षांपासून आम्ही बँक चांगल्या प्रकारे करत आहोत.  यावेळी लोकांनी सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे. दोन महिला, क आणि ड वर्गात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत कोणी जातीवादाचा तर कोणी पाहुणे असल्याचा आरोप केला आहे. आम्ही पाच लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना देतो. जनरल निवडणुकीत सोपे जाते. मात्र येथे मतदार कमी असल्यामुळे ही निवडणूक जिकरीची होते. काही प्रलोभने मिळाली तर अवघड होऊन जातं.

 • 02 Jan 2022 10:46 AM (IST)

  पुण्यात औषधांचा ओव्हरडोस देऊन आईचा खून, मुलाचाही गळफास

  पुणे - पुण्यात 76 वर्षाच्या आईचा औषधांचा ओव्हरडोस देऊन चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून केला खून,

  - त्यानंतर तरुणाने स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या

  - गणेश मनोहर फरताडे (वय 42) आणि त्याची आई निर्मला मनोहर फरताडे अशी दोघांची नावे

  - गणेशला काही कामधंदा नव्हता. तसेच त्याच्यावर कर्जही झाले होते. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे तो त्रासला होता.

  - सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

 • 02 Jan 2022 10:27 AM (IST)

  नागपूरमध्ये चर्चेत असलेल्या मगरीला रेस्क्यू करण्यात यश

  नागपूर - नागपूरमध्ये चर्चेत असलेल्या मगरीला रेस्क्यू करण्यात यश

  कोल्हापूरवरून आलेल्या वन विभागाच्या टीमने रात्री तीन वाजताच्या दरम्यान केलं रेस्क्यू

  साधारणतः 4 फुटाची होती फिमेल मगर

  वन विभाग आणि एनजीओ गेल्या दीड महिन्यापासून ठेऊन होते लक्ष

  कॅमेरे आणि ट्रॅप लावण्यात आले होते

  नागपुरात मगर असल्याची मोठी होती चर्चा

 • 02 Jan 2022 10:09 AM (IST)

  नाशिकमध्ये आश्रम शाळेत 5 विच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

  नाशिक : आश्रम शाळेत 5 विच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

  - आश्रम शाळेत मन न रमल्यानं, आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

  - निवासी आश्रमशाळेतचं गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या

  - अनिता भोये असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव

  - सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर निवासी आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार

 • 02 Jan 2022 09:07 AM (IST)

  - साहित्य संमेलनाची तारीख, अध्यक्ष निवडीसाठी साहित्य महामंडळाची आज उदगीर येथे बैठक 

  पुणे - साहित्य संमेलनाची तारीख, अध्यक्ष निवडीसाठी साहित्य महामंडळाची आज उदगीर येथे बैठक

  - आजच्या बैठकीत संमेलनाच्या तारखा आणि अध्यक्षाची निवड केली जाणार आहे

  - 95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन यंदा उदगीर येथे होणार आहे

  - संमेलनाध्यक्षपदी मराठवाड्यातील साहित्यिकाची निवड होण्याची शक्यता

 • 02 Jan 2022 09:01 AM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायतींसाठी 18 जानेवारीला होणार मतदान 

  गडचिरोली : जिल्ह्यातील नगरपंचायतींसाठी 18 जानेवारीला होणार मतदान

  ओबीसी आरक्षित जागांवर 21 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत स्थगिती देण्यात आली होती

  या जागांवर आरक्षण वगऴता सर्वसाधारण प्रवर्गातून होणार जागांवर मतदान प्रक्रिया

  नामांकन दाखल करणे गडचिरोली जिल्ह्यात सुरू

  उरलेल्या जागांसाठी अनेक पक्षांमध्ये राजकारण सुरूच आहे

  9 पंचायतीतील 27 जागांसाठी होणार आहे निवडणूक प्रक्रिया

 • 02 Jan 2022 08:26 AM (IST)

  ट्रान्स हार्बर लाईनवरील एसी लोकल बंद, अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेचा निर्णय

  मुंबई : ट्रान्स हार्बर लाईनवरील एसी लोकल बंद

  प्रवाशांचा एसी लोकलला अल्प प्रतिसाद

  अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेचा निर्णय

  मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांची माहिती

 • 02 Jan 2022 07:56 AM (IST)

  फेसबुकने हटवला दीड कोटी खात्यांवरील आक्षेपार्ह मजकूर

  भारतातील नवीन आयटी नियमांमुळे सोशल मिडिया सतर्क

  फेसबुकने हटवला दीड कोटी खात्यांवरील आक्षेपार्ह मजकूर

  द्वेश पसरवणारे किंवा वादग्रस्त मजकुर फेसबुककडून डिलीट

  तर इन्स्टाग्रामने 35 लाखपेक्षा जास्त खात्यांवरील डिलीट केल्या पोस्ट

  नव्या नियमांमुळे सोशल मिडीया कंपन्यांची कसरत

  गेल्या वर्षी मे महिन्यात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रासंदर्भात आली होती नियमावली

 • 02 Jan 2022 07:55 AM (IST)

  औरंगाबादकरांनी पुन्हा फिरवली लसीकरणाकडे पाठ, साडेचार लाख नागरिकांचा लस घेण्यास नकार

  औरंगाबादकरांनी पुन्हा फिरवली लसीकरणाकडे पाठ..

  साडेचार लाख नागरिकांनी दाखवला लस घेण्यास नकार..

  वीस हजार नागरिकांना रोज फोन करूनही येत नाहीत लसीकरणासाठी नागरिक..

  नागरिकांच्या मनात भीती तर काहीं नागरिकांकडे नाही वेळ..

  ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरनाकडे पाठ फिरवल्याने आरोग्य विभागाची वाढली चिंता..

 • 02 Jan 2022 07:32 AM (IST)

  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, देशभरातील शिक्षण संस्थांत 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प 

  - देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जानेवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प

  - देशभरातील 30 हजार शिक्षण संस्थांद्वारे 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्यात येणार

  - विद्यापीठ अनुदान आयोगाची माहिती

  - तरुणांमध्ये योगाभ्यासाविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन

 • 02 Jan 2022 06:56 AM (IST)

  नागपुरात 24 तासात 54 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

  नागपूर : 50 दिवसानंतर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू

  चंद्रपूर जिल्ह्यातील हा रुग्ण असून नागपुरात सुरू होते त्याच्यावर उपचार

  मृत्युमुळे प्रशासनाची वाढली चिंता

  नागपुरात 24 तासात 54 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  तर 3 जणांनी केली कोरोनावर मात

  4662 जणांच्या करण्यात आल्या चाचण्या

 • 02 Jan 2022 06:41 AM (IST)

  दादरच्या भाजी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन

  मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

  शनिवारी मुंबईत कोरोनाचे 6000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले

  त्यानंतरही दादरच्या भाजी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे.

  येथे ना कोरोनाचे नियम पाळले जात आहेत, ना सोशल डिस्टन्सिंग दिसत आहे

  या गर्दीतील बहुतांश लोक मास्कशिवाय दिसत आहेत.

Published On - Jan 02,2022 6:25 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें