Maharashtra News LIVE Update | आषाढी वारी परंपरा अनेक वर्षांची, सरकारने योग्य नियोजन न केल्याने परंपरा खंडित : सदाभाऊ खोत

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | आषाढी वारी परंपरा अनेक वर्षांची, सरकारने योग्य नियोजन न केल्याने परंपरा खंडित : सदाभाऊ खोत
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 18 Jul 2021 21:21 PM (IST)

  आषाढी वारी परंपरा अनेक वर्षांची, सरकारने योग्य नियोजन न केल्याने परंपरा खंडित : सदाभाऊ खोत

  सदाभाऊ खोत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  – आषाढी वारी परंपरा अनेक वर्षांची, सरकारने योग्य नियोजन न केल्याने परंपरा खंडित

  – पांडुरंगाची आणि भक्ताची भेट होऊ द्यायची नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे.

  – दोन डोस झालेल्यांना परदेशातून यायला-जायला परवानगी आहे. पण आमच्याच राज्यात प्रवेश नाही.

  – दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना परवानगी द्यायला हवी होती.

  – पण जनतेने एकत्र येऊ नये. उत्सव साजरे करू नये, अशी हुकूमशाही वागणूक सरकार देते

  – वारकऱ्यांना बंदी आणि मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात परवानगी कशी, त्यांची येण्याची परंपरा किती मोठी आहे सांगा

  – वारकरी तुरुंगात आणि मुख्यमंत्री लवाजमा घेऊन पंढरपुरात हे योग्य नाही

  – वारकरी संप्रदाय नक्की तुम्हाला धडा शिकवेल.

  — जो वारकरी आणि पांडुरंगाच्या भक्तीच्या आड आला त्याच काही धड होणार नाही

  – साधू संत वारकरी यांच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही.

 • 18 Jul 2021 19:49 PM (IST)

  राज्यात दिवसभरात 9 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण, 180 जणांचा मृत्यू

  राज्यात आज 9 हजार नव्या रुग्णांचे निदान तर 5 हजार 756 रुग्ण बरे तर 180 रुग्णांचा मृत्यू

 • 18 Jul 2021 18:33 PM (IST)

  नंदुरबारमध्ये बोलेरो गाडी दरीत कोसळली, आठ जणांचा जागीच मृत्यू

  नंदुरबार :

  – तोरणमाळ सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतुक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात – अपघातात आठ जणांचा मृत्यू – मृतांची संख्या वाढण्याची शक्यता – बोलेरो गाडी दरीत कोसळल्याने बचाव आणि मदत कार्याला मोठा अडथळा – स्थानिकांनी घेतली मदतकार्यासाठी धाव – या ठिकाणी कोणत्याही कंपनीचे नेटवर्क नसल्याने माहीती आणि बचाव कार्यास त्रास – स्थानिक पोलीस प्रशासन गावकारांच्या मदतीने करत आहेत बचाव कार्य – पोलीस अधिक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाणा

 • 18 Jul 2021 17:41 PM (IST)

  सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केली नापसंती

  सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केली नापसंती.

  पंतप्रधान बैठकीला शेवटची तीन मिनिटे उपस्थित राहिल्याबद्दल बैठकीतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली नापसंती.

  विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे नेते-खासदार डेरेक ओब्रायन यांनी व्यक्त केली नापसंती

  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक.

  सर्व राजकीय पक्षांच्या भावना समजून घेण्यासाठी पंतप्रधानांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे.

  देशातील कोव्हीड परिस्थिती, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि वाढती महागाई या विषयांवर आपल्याला चर्चा हवी आहे, सरकारने या मुद्यांपासून पळ काढू नये अशी भूमिका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केली.

 • 18 Jul 2021 17:08 PM (IST)

  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ग्लोबल रुग्णालयात दाखल

  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखू लागल्याने ग्लोबल रुग्णालयात दाखल, त्यांच्यावर उपचार सुरु

 • 18 Jul 2021 16:08 PM (IST)

  सांगलीत महापालिकेची मंगल कार्यालयातील गर्दीवर कारवाई, मिरजेत तीन मंगल कार्यालयांना दंड

  सांगली :

  महापालिकेची मंगल कार्यालयातील गर्दीवर कारवाई,

  सांगली मिरजेतील तीन मंगल कार्यालयात दंड ,

  मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार संयुक्त पथकाची कारवाई

 • 18 Jul 2021 15:41 PM (IST)

  वसईत पावसाचा भयानक प्रकोप, चारचाकी गाडी वाहून गेली

  वसई:- वसईच्या मधूबन परिसरात पडलेल्या पावसाने अक्षरश: दैना उडवली आहे. शेकडो कार, मोटारसायकल पाण्यात बुडून खराब झाल्या आहेत. तर एक महिंद्रा कंपनीची xuv500 ही कार तर पुराच्या पाण्यात वाहून एका किनाऱ्यावर लागली आहे. दुपारी 1 च्या नंतर पाणी ओसरायला सुरुवात झाल्याने गाड्यांची झालेली दयनीय अवस्था समोर येत आहे. मधूबन परिसरात अक्षरश: समुद्र निर्माण झाला की काय? अशीच अवस्था निर्माण झाली आहे.

 • 18 Jul 2021 15:32 PM (IST)

  विक्रोळी संरक्षण भिंत दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू

  विक्रोळी संरक्षण भिंत दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झालंय. एका रहिवाशाचा शोध अग्निशामक दल घेत आहे.

  या घटनेवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

  या संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचं होतं त्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे. कंत्राटदार महापालिका अधिकारी यांच्या संगनमतान निकृष्ट दर्जाच कामं करण्यात आल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

  भाई जगताप यांची प्रतिक्रिया

  नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची चौकशी तर होणारच आहे. राज्य सरकारने मदत केली आहे. दुर्घटनेच्या घटनेचे राजकारण करणाऱ्यांना मला सांगायचंय, मग गंगेचं काय झालं? राजकारण करायची ही वेळ नाही

 • 18 Jul 2021 11:08 AM (IST)

  कौडण्यापूरची रुक्मिणी मातेची पालखी आज पंढरपूरसाठी निघणार

  अमरावती

  आषाढी वारीसाठी कौडण्यापूरची रुक्मिणी मातेची पालखी आज पंढरपूरसाठी निघणार…

  दहा मानाच्या पालख्या पैकी विदर्भातील एकमेव पालखी…

  428 वर्ष जुनी पालखी,विठ्ठलाच्या पंढरीत विशेष मान

  पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत सकाळी 10.वाजता सोहळ्याला होणार सुरवात

  40 वारकऱ्यांसह एसटी बसने कोरोना नियम पाळून पालखी होणार मार्गस्थ

 • 18 Jul 2021 10:57 AM (IST)

  सोलापूर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाविरोधात सव्वा कोटींची आरआरसीची कारवाई

  सोलापुर — जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाविरोधात सव्वा कोटींची आरआरसीची कारवाई

  पाणी पुरवठा विभागाकडून 1 कोटी 27 लाख रुपये वसूल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  सहाय्यक कामगार आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग विरोधात जमीन महसूल वसुली प्रमाणपत्र कायद्यान्वये ही रक्कम वसूल करण्याचे प्रमाणपत्र जारी केले

  पाणीपुरवठा विभागातील तत्कालीन कर्मचारी प्रकाश मासाळे यांनी कामगार न्यायालयातून केली होती तक्रार

  माशाळे यांना दोन वर्षाच्या सेवानिवृत्तीनंतर 1989 साली  पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी एकाएकी कामावरून केले होते कमी

  त्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा विभागाविरोधात कामगार न्यायालयात केली होती तक्रार

  कामगार न्यायालयाने माशाळे यांच्या बाजूने दिला होता निकाल

  त्यामुळे कामगार न्यायालयाच्या विरोधात पाणीपुरवठा विभागाने घेतली होती हायकोर्टात धाव

  हायकोर्टातही माशाळे  यांच्या बाजूने लागला निकाल

  निकालानंतरही सेवा काळातील 1 कोटी 27 लाख चार हजार रुपये इतकी रक्कम देण्यासाठी सुरू होते पाणी पुरवठा विभागाकडून टाळाटाळ

  त्यामुळे पाणीपुरवठा विभागाविरोधात सव्वा कोटींची आरआरसीची कारवाई

  शासकीय कार्यालयाविरोधात आरआरसी अंतर्गत कारवाई होत असल्याने नागरिकात उत्सुकता

 • 18 Jul 2021 10:56 AM (IST)

  औरंगाबादमध्ये मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

  औरंगाबाद

  मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू..

  12 वर्षीय अदिल शेख याचा केम्ब्रिजनजीकच्या डोहात बुडून मृत्यू.

  सहा फूट खोल पाण्यात बुडाल्यानंतर मित्रांनी केली आरडाओरड

  मात्र मदतीस उशीर झाल्याने गेले प्राण.

  पाणी गढूळ झाल्याने बराच वेळ मृतदेह सापडण्यास आले अडथळे..

  अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमाने मृतदेह काढला बाहेर

 • 18 Jul 2021 07:29 AM (IST)

  भाजप पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक, चंद्रकांत पाटलांची प्रमुख उपस्थिती

  नाशिक

  भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आज ही भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार – सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांचा संघटनात्मक बैठकांवर भर

 • 18 Jul 2021 07:25 AM (IST)

  पुण्याच्या वार्षिक विकास आराखड्यात यंदा सुमारे 170 कोटी रुपयांची वाढ

  पुणे

  पुणे जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १७० कोटी रुपयांची वाढ

  चालू आर्थिक वर्षासाठी मार्च २०२० मध्ये तयार केलेला ६९५ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा पुढेही कायम

  या ६९५ कोटी रुपयांचा नवीन प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी

  दरम्यान, जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना विकासकामांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीत कोरोनामुळे ३० टक्के कपात केली जाणार

 • 18 Jul 2021 07:20 AM (IST)

  नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावात उद्यापासून शाळा सुरु होणार, शहरात अद्याप निर्णय नाही

  नाशिक

  – नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावातील शाळा उद्यापासून सुरू होणार – 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग होणार सुरू – 1 महिन्यात ज्या गावात 1 ही रुग्ण नाही अशा गावात शाळा सुरू होणार – जिल्ह्यात 1 हजार 24 शाळा त्या पैकी कोरोनामुक्त 335 गावातील 296 शाळा सुरू होणार – एका बेंचवर एकच मुलगा बसणार – शाळेत रुग्ण सापडले तर शाळा तात्काळ बंद करणार – नाशिक शहरातील शाळा सुरू करण्याचा अद्याप निर्णय नाही

 • 18 Jul 2021 07:14 AM (IST)

  नाशिक जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतिक्षाच, बळीराजाची चिंता वाढली

  नाशिक

  – नाशिक जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतिक्षाच – जुलै महिन्याचा पंधरवडा उलटूनही जिल्ह्यात पाऊस नाही – बळीराजाची चिंता वाढली – जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ही अत्यल्प पाणी साठा शिल्लक – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मोजका पाणीसाठा शिल्लक असल्याने नाशिककरांवर पाणी कपातीच संकट – आठवड्याच्या दर गुरुवारी शहरात पाणी राहणार बंद – या आठवड्यापासून पाणी कपातीचा निर्णय – धरणात 50 टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत निर्णय लागू राहणार

 • 18 Jul 2021 07:08 AM (IST)

  पुण्यात पुढील चार महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

  पुणे

  खडकवासला धरणातून खरीप हंगामातील पहिले आवर्तन कालव्यात सोडले

  हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील सोडले पहिले आवर्तन

  खडकवासला धरण साखळीतील चार ही धरणातील सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा साडेनऊ टीएमसी म्हणजे ३२.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

  साडेनऊ टीएमसी पैकी सुमारे चार टीएमसी पाणी खरिपाच्या आवर्तनासाठी आवश्यक

  उर्वरित साडेपाच टीएमसी पाणी पुणे शहरासाठी

  पुणेकरांना पिण्यासाठी पुढील चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक

Published On - 6:50 am, Sun, 18 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI