Maharashtra News LIVE Update | कसारा घाटात दरड कोसळली, नाशिककडे जाणारी वाहतूक बंद

| Updated on: Jul 22, 2021 | 1:03 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | कसारा घाटात दरड कोसळली, नाशिककडे जाणारी वाहतूक बंद
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 21 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jul 2021 11:03 PM (IST)

    कसारा घाटात दरड कोसळली, नाशिककडे जाणारी वाहतूक बंद

    कसारा घाटात दरड कोसळली, जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली, रेल्वे रुळावरही दरड कोसळल्याची माहिती, कसाऱ्यावरुन नाशिककडे जाणारी वाहतूक बंद, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • 21 Jul 2021 09:14 PM (IST)

    नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात 5 जणांचा मृत्यू

    नाशिक : दोन वेगवेगळ्या अपघातात 5 जणांचा मृत्यू

    यातील कळवण-चांदवड जवळ झालेल्या अपघातात 3 शिक्षकांचा मृत्यू

    तर वाडीव-हे गावाजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू आणि 3 जण गंभीर

    कळवण दिंडोरी अपघातात झाड गाडीवर कोसळले

    तर वाडीवरहे जवळच्या अपघातात कंटेंरची धडक

    पावसामुळे दोन्ही अपघात झाल्याचा अंदाज

  • 21 Jul 2021 08:16 PM (IST)

    विहिरीतून आले गरम पाणी, भूजल सर्वेक्षण विभागाकडून अभ्यास सुरू

    बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील अकोली या गावात एका विहिरीतून अचानक गरम पाणी येण्यास सुरूवात झाली आहे. भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून गेल्या 14 तारखेपासून अचानक गरम पाणी येत आहे. विशेष म्हणजे या विहिरी शेजारी काही अंतरावरच दुसरी विहीर आहे. पण त्यातून नेहमीचे साधारण पाणी येत आहे.

  • 21 Jul 2021 08:15 PM (IST)

    अतिवृष्टीमुळे महाड शहरात पाणी शिरले

    रायगड :

    अतिवृष्टीमुळे महाड शहरात पाणी शिरले

    महाडला लागूनच असलेल्या सावित्री आणि गांधारी नदी मागील ४-५ दिवसांपासून दुथडी भरुन वाहत आहे.

    मात्र पहिल्यादांच महाड शहरात पाणी शिरले असून बाजारपेठा, अतंर्गत रस्ते पाण्याने भरले आहे.

    शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणि साचले असून पावसाचा जोर मात्र कायम आहे

  • 21 Jul 2021 06:19 PM (IST)

    गोंदियात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    गोंदिया :

    गोंदियात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    गोरेगाव तालुक्यातील भडंगा परिसरातील घटना

    पुनाजी मोहन मेश्राम (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव

  • 21 Jul 2021 03:56 PM (IST)

    काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा सरकारवर परिणाम होणार नाही : सुभाष देसाई

    उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    -कोरोना काळात उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी अनेक उपाययोजना - देशात महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे जिथे उद्योग 100 टक्के सुरू आहेत - मोठ्या प्रमाणात कामगारांना यामुळे रोजगार मिळाला - उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्सची निर्मिती

    महाविकास आघाडीवर भाष्य

    - काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा सरकारवर परिणाम होणार नाही -सरकार 5 वर्ष टिकेल

    मोबाईलद्वारे हेरगिरी प्रकरण

    -चुकीचं काम केलं असेल तर ते उघड होईल आणि त्याचं फळ देखील भोगावं लागेल -विरोधकांवर हेरगिरी करणाऱ्यांचा समाचार घेतला जाईल -शिवसेनेचे खासदार या संदर्भात वाचा फोडत आहेत

  • 21 Jul 2021 02:05 PM (IST)

    कोल्हापुरात तृतीयपंथीच्या संशयस्पद मृत्यूने खळबळ, करवीर तालुक्यातील घटना

    कोल्हापूर:

    तृतीयपंथीच्या संशयस्पद मृत्यूने खळबळ

    करवीर तालुक्यातील शिये गावातील घटना

    सतीश पवार उर्फ देवमामा अस मृत तृतीयपंथीचे नाव

    प्राथमिक माहिती नुसार घरातील सोन्याचे दागिने लंपास

    बाहेरून दरवाजाला कढी घातल्याने संशय बळावला

    शिरोली MIDC पोलीस घटनास्थळी

  • 21 Jul 2021 01:09 PM (IST)

    सोलापुरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर डांबून ठेवलेल्या गायी पकडल्या

    सोलापूर -

    बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर डांबून ठेवलेल्या गायी पकडल्या

    नई जिंदगी येथे डांबून ठेवल्या होत्या गायी

    नई जिंदगी पोलीस आणि गोरक्षकांनी केली गायीची सुटका

    मंगळवारी रात्री पोलिसांनी कारवाई करत 16 गायीची केली सुटका

  • 21 Jul 2021 01:06 PM (IST)

    तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे 30 जुलैपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर

    पुणे

    तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे 30 जुलैपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर

    30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान राज ठाकरे यांचा पुणे दौरा

    यादरम्यान, पुण्यातील विकास कामाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले घरी येण्याचे निमंत्रण

    शहराध्यक्ष वसंत मोरे यांची माहिती

  • 21 Jul 2021 12:14 PM (IST)

    सोलापूर-पुणे रस्त्यावर अपघात, तीन जण जखमी

    सोलापूर -

    सोलापूर- पुणे रस्त्यावर अपघात

    मोटरसायकलचा समोरासमोर धडक

    अपघातात तीन जण  जखमी

    बाळे येथे अपघात

    पोलीस घटनास्थळी दाखल

    जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केले दाखल

  • 21 Jul 2021 11:26 AM (IST)

    उस्मानाबादेत उपवासाच्या भगरीच्या पिठातून 12 जणांना विषबाधा

    उस्मानाबाद

    उपवासाच्या भगरीच्या पिठातून 12 जणांना विषबाधा , एकाची प्रकृती गंभीर आयसीयूत ऍडमिट

    उस्मानाबाद तालुक्यातील विठ्ठलवाडी सारोळा व उंबरे कोठा या भागातील नागरिक

    उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, यश प्रोडक्टचे होते भगर पीठ

  • 21 Jul 2021 11:24 AM (IST)

    शिवसेना खासदारांची दिल्लीत आज 'लंच डिप्लोमसी'

    शिवसेना खासदारांची दिल्लीत आज 'लंच डिप्लोमसी'

    शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षाची व्यूहरचना ठरवण्याबाबत होणार बैठकीत चर्चा

  • 21 Jul 2021 11:22 AM (IST)

    पिंपरी चिंचवड एमआयडीसी मध्ये इलेक्ट्रॉनिक वाहन निर्मिती प्लांटच अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

    पिंपरी चिंचवड-

    पिंपरी चिंचवड एमआयडीसी मध्ये इलेक्ट्रॉनिक वाहन निर्मिती प्लांटच अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

    वाहन धोरणा अंतर्गत 2030 पर्यंत बहुतांश वाहन इलेक्ट्रिक करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे

    इंधनामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाची समस्येवर इलेक्ट्रॉनिक वाहन पर्याय मात्र स्पर्धा चायनाशी आहे त्यामुळे वाहन निर्मितीला गती मिळणं आवश्यक

    सर्व महामार्ग बरोबरच

    प्रत्येक सोसायटी पार्किंग मध्ये चार्जिंग पॉईंट अनिवार्य केले जाऊ शकतात

    पेट्रोल डीझल च्या किमती वाढल्या

    अशा काळात इलेक्ट्रॉनिक वाहन परवडतात

  • 21 Jul 2021 10:20 AM (IST)

    साताऱ्यात गुंडाने तलवारीने केक कापून वाढदिवस केला साजरा, गुंड वैभव जाधव पोलिसांच्या ताब्यात

    सातारा -

    चंदननगर येथील गुंड वैभव जाधव ने तलवारीने केक कापून वाढदिवस केला साजरा

    रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने कापला केक

    15 ते 20 जणांनी जोरजोरात गाणी लावून रस्त्यावर केला नाच

    संशयित वैभव जाधव हा शहर पोलिसांच्या ताब्यात

    सातारा शहरात वैभव जाधववर या आधी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल

  • 21 Jul 2021 09:49 AM (IST)

    शेवगावात वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

    अहमदनगर

    शेवगावात वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

    एका तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, असे म्हणत केला विनयभंग

    विशाल विजयकुमार बलदवा अस गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव

    अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून सामाजिक व कौटुंबिक बदनामी ,

    तसेच महिला अधिकाऱ्यांचे पती व मुलीबद्दल फोनवर अश्लील व अर्वाच्च भाषेत संभाषण

    संबंधित महिला अधिकाऱ्याच्या पतीलाही मेसेज पाठवून दिला त्रास

  • 21 Jul 2021 09:13 AM (IST)

    आता एसटीची स्टिअरिंग महिलांच्या हाती, महिला बस चालकांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण

    औरंगाबाद :-

    आता एसटी चालवणार महिला कर्मचारी, एसटीची स्टिअरिंग महिलांच्या हाती ..

    औरंगाबाद आणि नाशिक विभागातील 32 महिला असणार एसटी चालक..

    दोन स्टिअरिंग असलेल्या बस मधून महिला बस चालकांना दिले जातेय वाहन चालवण्याचे प्रशिक्षण..

    100 दिवसांचे वर्ग प्रशिक्षण तर 200 दिवस बस चालवण्याचे दिले जातेय प्रशिक्षण..

    राज्यातील महिला असणार आता एसटीवर चालक

  • 21 Jul 2021 09:03 AM (IST)

    चाकण औद्योगिक वसाहत परिसरात भांबोली फाटा येथे हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट

    पुणे.

    - चाकण औद्योगिक वसाहत परिसरात भांबोली फाटा येथे हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट

    -स्फोटात ATM सह समोरील काचांचा चक्काचुर

    -चोरीच्या उद्देशाने हा स्फोट घडवला असल्याचा पोलिसांचा अंदाज

    -सुदैवाने ह्या स्फोटात कुठलीही जिविहित हानी नाही

    -महाळुंगे पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल.

  • 21 Jul 2021 08:34 AM (IST)

    आंबेजोगाईतील रेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

    औरंगाबाद :-

    आंबेजोगाईतील रेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

    मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केली निर्दोष मुक्तता

    2014 साली झाला होता अंबाजोगाईतील बस कंडक्टरच्या घरी स्फोट

    मुंजाब गिरी यांच्यावर होता रेडिओत स्फोटके भरून बस मध्ये रेडिओ ठेवल्याचा आरोप

    2014 साली या स्फोटाची झाली होती जोरदार चर्चा

    स्फोट प्रकरणातील आरोपीची पुराव्या अभावी झाली निर्दोष मुक्तता

  • 21 Jul 2021 08:23 AM (IST)

    सोलापुरात अकरावीची प्रवेश क्षमता 17 हजारने वाढली

    सोलापूर-- जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता 17 हजारने वाढली

    गतवर्षी जिल्ह्यात अकरावीच्या एकूण प्रवेश क्षमता 59 हजार  40 हजार एवढी

    यंदा त्यात 17 हजाराने वाढ झाल्याने प्रवेश क्षमता आता 76 हजार 736 इतकी

    दहावी मध्ये पास झालेल्या सर्व मुलांना प्रवेश मिळणार मात्र नामवंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा द्यावी लागणार

    राज्य मंडळांकडून प्रवेशासाठी सीइटीची प्रक्रिया सुरू

    परीक्षा ऑफलाइन की ऑनलाईन याची नियमात स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ

  • 21 Jul 2021 08:21 AM (IST)

    नाशिकमध्ये उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद, आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी पाणी कपात

    नाशिक - शहरात उद्या दिवसभर पाणी नाही..

    पाणीकपातीचा उद्या पहिला दिवस..

    आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी असणार पाणी कपात..

    महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना

  • 21 Jul 2021 07:53 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता 17 हजारने वाढली

    सोलापूर  -

    जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता 17 हजारने वाढली

    गतवर्षी जिल्ह्यात अकरावीच्या एकूण प्रवेश क्षमता 59 हजार  40 हजार एवढी

    यंदा त्यात 17 हजाराने वाढ झाल्याने प्रवेश क्षमता आता 76 हजार 736 इतकी

    दहावी मध्ये पास झालेल्या सर्व मुलांना प्रवेश मिळणार मात्र नामवंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा द्यावी लागणार

    राज्य मंडळांकडून प्रवेशासाठी सीइटीची प्रक्रिया सुरू

    परीक्षा ऑफलाइन की ऑनलाईन याची नियमात स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ

  • 21 Jul 2021 07:16 AM (IST)

    छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि सहाय्यक प्राध्यापक उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा तयारीत

    कोल्हापूर :

    छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि सहाय्यक प्राध्यापक उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा तयारीत

    चार महिने वेतन मिळाले नसल्यानं डॉक्टर आणि प्राध्यापक आक्रमक

    पाठपुरावा करूनही सीपीआर प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा

    कोरोना काळात तात्पुरत्या पद्धतीने कार्यरत आहेत डॉक्टर आणि प्राध्यापक

    डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवेवर होणार परिणाम

    वेतन प्रश्नावर आजच तोडगा काढण्याची गरज

  • 21 Jul 2021 06:53 AM (IST)

    किनारपट्टीवरच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने

    पुणे

    किनारपट्टीवरच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने

    त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात पुढील ४८ तासात काही भागात जोरदार पावसाचा हवामान खात्याच्या इशारा

    गेली दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यातच सकाळपासून आकाश ढगाळ

    तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद

    जिल्ह्यात लोणावळा येथे १४९.१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद

  • 21 Jul 2021 06:40 AM (IST)

    अकरावीच्या सीईटीसाठी पहिल्यांच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

    पुणे

    अकरावीच्या सीईटीसाठी पहिल्यांच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने पहिल्यांदाचा अकरावी प्रवेशासाठी घेतली जातीये सीईटी परीक्षा

    ही परीक्षा ऐच्छिक असली तरी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार

    राज्यभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी केली पहिल्या दिवशी अर्ज नोंदणी

    सीईटी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे हेल्पलाईन क्रमांक जाहीर

    विद्यार्थ्यांनी प्रिया शिंदे यांच्याशी ९६८९१९२८९९ तर संगीता शिंदे यांच्याशी ८८८८३३९५३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे केले आवाहन

  • 21 Jul 2021 06:40 AM (IST)

    आई सतत दारूच्या नशेत असल्याने मुलाकडून आईची हत्या

    वसई - वसईत 18 वर्षाच्या सख्या मुलाने आपल्या 59 वर्षाच्या आईची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई सतत दारूच्या नशेत राहत असल्याच्या रागातून मुलाने ही हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरातील आयशा अपार्टमेंट मध्ये मंगळवार रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून, आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

Published On - Jul 21,2021 6:38 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.