LIVE | स्टेट सीआयडी अ‌ॅक्शन मोडमध्ये , बुकी सोनू जालान, केतन तन्ना आणि मुनिर खान यांचे जबाब नोंदवणार

| Updated on: May 12, 2021 | 12:17 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | स्टेट सीआयडी अ‌ॅक्शन मोडमध्ये , बुकी सोनू जालान, केतन तन्ना आणि मुनिर खान यांचे जबाब नोंदवणार
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 May 2021 09:24 PM (IST)

    स्टेट सीआयडी अ‌ॅक्शन मोडमध्ये , बुकी सोनू जालान, केतन तन्ना आणि मुनिर खान यांचे जबाब नोंदवणार

    अनिल देशमुख यांच्यावर आज इडीने आयज इसीआयआर दाखल करताच स्टेट सीआयडी अ‌ॅक्शन मोडमध्ये

    बुकी सोनू जालान, केतन तन्ना आणि मुनिर खान तिघांना स्टेट सीआयडीकडून बोलावण्यात आलं

    ऊद्या तिघांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं

    – परमवीर सिंह यांनी साढे तीन कोटी रुपये ऊकळून खोट्या केसमध्ये अडकवल्याचा सोनू जालान आणि इतरांचा आरोप

    – ऊद्या कोकण भवन, नवी मुंबई इथे स्टेटमेंट रेकाॅर्ड करण्यासाठी सकाळी बोलावण्यात आल्याची माहीती

  • 11 May 2021 08:03 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेणे म्हणजे हास्यास्पद : चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर :

    चंद्रकांत पाटील –

    चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारवर टीका

    मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेणे म्हणजे हास्यास्पद आणि दिशाभूल करणारी कृती

    सहा-आठ महिने शिव्या दिलेल्या राज्यपालांना नम्रपणे भेटायला जाणे, निवेदन देणे हा सोपा मार्ग वाटला

    मराठा समाजाला उल्लू बनवणे थांबवा, कायदेशीर खोलात जाऊन कृती करा

  • 11 May 2021 08:02 PM (IST)

    उत्तर प्रदेशात पुणे पोलिसांच्या पथकावर जमावकडून हल्ला

    पुणे -

    उत्तर प्रदेशात पुणे पोलिसांच्या पथकावर जमावकडून हल्ला,

    एका खून प्रकरणातील आरोपीची माहिती घेण्यासाठी पोलिसांचाही पथक उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मध्ये गेले होते..

    त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला...

    पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड...

  • 11 May 2021 07:34 PM (IST)

    तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपूर महापालिकेचे आयुक्त करा, आम आदमी पक्षाची मागणी

    नागपुरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत तुकाराम मुंढे यांनी पालिका आयुक्त म्हणून चांगलं काम केलं आणि कोरोनाला नियंत्रणात ठेवलं. मात्र आता नागपुरात कोरोनाची परिस्थिती बिघडली असल्याने पुन्हा तुकाराम मुंडे यांना नागपुरात आणा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. .याशिवाय शहरात तुकाराम मुंडे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

  • 11 May 2021 07:26 PM (IST)

    चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

    चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू, वनिता गेडाम (53) असं मृतक महिलेचं नाव, 4 मे रोजी तेंदूपत्ता तोडत असताना ही महिला वाघाच्या हल्ल्यात जबर जखमी झाली होती. मूल तालुक्यातील जानाळा गावातील ही महिला गावाजवळील जंगलात तेंदूपत्ता तोडत असताना झाली होती घटना, चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना आज झाला मृत्यू, आजच या गावातील किर्तीराम कुळमेथे या 35 वर्षीय ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय, वाघाच्या हल्ल्यात जानाळा गावातील 2 लोकांचे मृत्यू झाल्याने गावात मोठा तणाव

  • 11 May 2021 07:12 PM (IST)

    आमच्यासोबत सत्तेत असताना मराठा आरक्षणाचा कायदा बनल्यानंतर श्रेय घेणाऱ्यांचा किती हा दुटप्पीपणा? : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका "मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा? मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते. आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?", असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर केला आहे.

  • 11 May 2021 06:06 PM (IST)

    मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी : अनिल देशमुख

    अनिल देशमुख :

    मला मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळत आहे की, माझी ईडीद्वारे चौकशी केली जाणार आहे

    मागच्या काळात सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली. आता ईडीच्या माध्यमातून होणार

    मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होत आहे

    मी गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणात कारवाई केली

    त्याचबरोबर सीबीआयला जी महाराष्ट्रात कोणताही तपास करण्याची मुभा होती त्यावर आम्ही निर्णय घेऊन शासनाच्या परवानगी शिवाय चौकशी करू शकत नाही, असा निर्णय घेतला

    दादरा नगर हवेलीचे खासदार आत्महत्या प्रकरण मी विधानसभेत मत मांडलं. त्यामुळे केंद्र शासन नाराज असू शकते. म्हणून माझी चौकशी होत असावी. मात्र सत्य पुढे येईल

  • 11 May 2021 05:39 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार: उद्धव ठाकरे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत आहेत. मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयां जो निकाल दिला त्यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली. त्या निकालात आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नसून  राष्ट्रपतींना आहेत, असं सांगण्यात आलं. आमच्या भावना राज्यपालांना कळवण्यासाठी आम्ही भेट घेतली. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.

    राज्याचा अधिकार राज्याकडे असावा, याविषयी चर्चा होण आवश्यक आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहू असं सांगितलं होतं. त्याप्रमाणं पहिलं पाऊल टाकलं आहे. मराठा समाजानं पहिल्यापासून समजूतदारपणा दाखवलेला आहे. मराठा समाजाला आपला लढा राज्य सरकारविरोधात नाही हे माहिती आहे. मराठा समाजानं सामंजस्य दाखवल त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.

    विधानपरिषदेच्या 12 जांगाबद्दल चर्चा झाली नाही, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

    मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रुफ असता तर आज राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आली नसती. आम्ही नुकतेचं पत्र दिलं आहे. त्यावर काय निर्णय येतोय ते पाहावं लागेल. राज्यपाल या विषयाशी सहमत आहेत. त्यांच्यामार्फत ते लवकरात लवकर पत्र वर देतील, आम्ही त्याबाबत आवश्यक सहकार्य त्यांना करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    केवळ आम्हालाच नाही तर भाजपला देखील या बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे त्यांना वाटत असेल.

    आम्ही पंतप्रधानांना त्यांना जाऊन भेटणार आहोत. त्यांच्या भेटीची वेळ घेऊ आणि त्यांना भेटू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 11 May 2021 05:29 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणासंदर्भात भेट घेण्यासाठी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारमधील विविध मत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत.

  • 11 May 2021 05:21 PM (IST)

    मराठा आरक्षणाविषयी राष्ट्रपती, पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र राज्यापालांना देण्यात येणार: सूत्र

    राज्य सरकरने पंतप्रधान यांच्या बरोबर राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.  ते राज्यपालांना देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 11 May 2021 05:08 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन देण्याची शक्यता

    मराठा आरक्षणासंबंधित मोठ्या घडामोडी सुरु आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे राजभवावर दाखल झाले आहेत.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन देणार आहेत, अशी माहिती आहे.

  • 11 May 2021 04:48 PM (IST)

    मराठा आरक्षणा संबंधित मोठ्या घडामोडी, अजित पवार राजभवनावर दाखल

    मराठा आरक्षणा संबंधित मोठ्या घडामोडी, उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील हे देखील राजभवावर दाखल होत आहेत, याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे इतर नेतेही राजभवनावर दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन देणार आहेत.

  • 11 May 2021 04:18 PM (IST)

    अनिल देशमुख यांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून पाठराखण

    अनिल देशमुख यांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून पाठराखण, "अनिल देशमुख यांची चौकशी ज्या एजन्सी करत आहेत त्या सीबीआय आणि ईडी या केंद्र सरकारच्या माध्यमातून चालणाऱ्या एजन्सी आहेत. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करणे वेगळी गोष्ट आहे, पण त्यांनी देशमुख यांच्या ऑफिसपासून घर आणि गावापर्यंत रेड केल्या. त्यात सीबीआय आणि ईडी यांना काहीही सिरीयस आढळले, असे आपल्याला वाटत नाही", असं अब्दुल सत्तार म्हणाले.

  • 11 May 2021 03:56 PM (IST)

    अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी ही राजकिय सुडापोटी केलेली कारवाई : नवाब मलिक

    नवाब मलिक  :

    - अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी ही राजकिय सुडापोटी केलेली कारवाई

    - या कारवाईमागे केंद्राचं षडयंत्र आहे. कोविड काळात कोरोना कंट्रोल करण्यात के्राला अपयश येतंय

    - लक्ष विचलित करण्यासाठी ही कारवाई मागे लावण्यात आलीय

  • 11 May 2021 03:55 PM (IST)

    भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत दुपारी अचानक आग

    मीरा भाईंदर:- भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत दुपारी अचानक आग लागली...मीरा भाईंदर मनपा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आगीत नियंत्रण आण्यास यश मिळाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान लवकर आल्याने कैश काउंटर सुदैवाने वाचला आणि मात्र काही कागदपत्र जळाले आहेत. एसीच्या विस्फोटमुळे आग लागली, असं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं.

  • 11 May 2021 03:34 PM (IST)

    अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार, केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा

    अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार म्यानमारने चक्रीवादळाला टाँकटाइ असं नाव दिलं आहे केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता म्यानमार कडून वादळाची आगेकूच सुरू

  • 11 May 2021 03:10 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात म्युकोरमायकोसिस आजाराचा शिरकाव, दहा रुग्णांवर उपचार सुरु

    अमरावती :

    अमरावती जिल्ह्यात म्युकोरमायकोसिस आजाराचा शिरकाव

    जिल्ह्यात कोरोना नंतर आढळले म्युकोरमायकोसिसचे रुग्ण

    अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात म्युकोरमायकोसिसच्या दहा रूग्णांवर उपचार सुरू

    जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांची माहिती

    अमरावती जिल्हात खळबळ

  • 11 May 2021 02:02 PM (IST)

    पुण्यात अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन, 10 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

    पुण्यात अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

    चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात झाले गुन्हे दाखल...

    10 कार्यकर्त्यांवर केले गुन्हे दाखल 353 नुसार केले गुन्हे दाखल,

    कालपासून कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात, आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं आंदोलन

    राज्य सरकारने पदोन्नतीतीलं 33 टक्के आरक्षण रद केल्यानं काल अजित पवारांच्या घरासमोर केलं होतं आंदोलन ....

    कार्यकर्त्यांना आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्याची शक्यता .....

  • 11 May 2021 02:00 PM (IST)

    मुंबई NCBने ड्रग्स माफिया टायगर मुस्तफाचा साथीदार भूपेंद्र नेगीला अटक

    मुंबई एनसीबीने ड्रग्स माफिया टायगर मुस्तफाचा साथीदार भूपेंद्र नेगी याला अटक केली

    एनसीबीने नेगीला उत्तराखंडमधील मंडी भागातून अटक केली

    भूपेंद्र नेगी हे ड्रग्स व्यवसायात टायगर मुस्तफाचा साथीदार तसेच गोव्यातील हॉटेलचा मालक आहे ज्यातून एनसीबीने टायगर मुस्तफाला अटक केला होता

  • 11 May 2021 01:09 PM (IST)

    पुण्यात अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

    पुणे -

    पुण्यात अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

    चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात झाले गुन्हे दाखल

    10 कार्यकर्त्यांवर केले गुन्हे दाखल 353 नुसार केले गुन्हे दाखल

    कालपासून कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात, आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं आंदोलन

    राज्य सरकारने पदोन्नतीतीलं 33 टक्के आरक्षण रद केल्यानं काल अजित पवारांच्या घरासमोर केलं होतं आंदोलन

    कार्यकर्त्यांना आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्याची शक्यता

  • 11 May 2021 12:38 PM (IST)

    काँग्रेस शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, मराठा आरक्षणावर चर्चा

    काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार

    दुपारी चार वाजता महत्त्वपूर्ण बैठक

    मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा

  • 11 May 2021 12:37 PM (IST)

    दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला यांना जामीन मंजूर

    RFO दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला यांना जामिन

    - उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला अंतरिम जामिन

    - नागपूरसोडून न जाण्याचे रेड्डी यांना आदेश

  • 11 May 2021 12:36 PM (IST)

    अनिल देशमुख प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू

    अनिल देशमुख प्रकरणाचा ईडी कडून तपास सुरू

    तक्रारदार यांच्या जबाब घेऊन सुरू होणार तपास

    अनिल देशमुख यांच्या विरोधात ऍड जयश्री पाटील यांनी जनहित याचिका केली आहे

    मुंबई हायकोर्टात ही जनहित याचिका केली आहे.

    त्या या प्रकरणातील तक्रारदार असल्याने प्रथम त्यांना बोलावून त्यांच्या कडून माहिती घेतली जाणार असल्याचं ईडी च्या सूत्रांच म्हणणं आहे

    यामुळे आज तक्रारदार जयश्री पाटील यांना आज समन्स देऊन उद्या माहिती घेण्यासाठी बोलावलं जाणार आहे

  • 11 May 2021 11:27 AM (IST)

    औरंगबादमधील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट 15 दिवसांपासून बंद, भाजपकडून प्लांटची पूजा

    औरंगाबाद :-

    जिल्हा रुग्णालयातील बंद ऑक्सिजन प्लांटची भाजप करणार पूजा

    15 दिवसांपासून तयार झालेला ऑक्सिजन प्लांट सुरू न केल्यामुळे भाजपकडून प्लांटची पूजा

    औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आले आहे ऑक्सिजन प्लांट

    ऑक्सिजन प्लांट तयार होऊनही सिलेंडर द्वारे वापरला जातोय ऑक्सिजन

    ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी भाजप करतंय पूजा आंदोलन

  • 11 May 2021 11:26 AM (IST)

    नांदगाव शहरात सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी

    मनमाड :- नांदगाव शहरात सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

    उद्यपासून जिल्ह्यात कडक लॉक डाऊन लागणार असल्याने किराणा सह इतर समान खरेदी करण्यासाठी नांदगाव शहरातील प्रमुख बाजार पेठेत नागरिकांनी केली गर्दी

    सामान खरेदी करतांना नांदगाव करांना कोरोना चा विसर

    सोशल डिस्टनसिंग चा उडाला फज्जा

    नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाचा मात्र दुर्लक्ष

  • 11 May 2021 10:55 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर दोन अपघातात एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

    रायगड -

    मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर दोन अपघातात एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

    दोन्ही अपघात मुबंईकडे येणाफऱ्या मार्गावर झाले

    अमृतांजन ब्रिजच्या दरम्यान मुंबई लेनवर KA 56 2595 ट्रक चालकाचा ताबा सुटून सदर ट्रक पलटी झाला आहे. सदर अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली

    तर अन्य एक अपघातात बोरघाट उतरताना खोपोली एक्झीट च्या जवळपास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलल पुढे असलेल्या टेम्पो वर धडकल्याने एक जण जागीच ठार

    दोन्ही अपघाता नतंर काही वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती परंतु आय आर बी यत्रंणेने वाहने बाजुला करुन रस्ता मोकळा करुन दिला

  • 11 May 2021 08:17 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे गावात आढळला राजा भोज कालीन तलाव

    कोल्हापूर -

    कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे गावात आढळला राजा भोज कालीन तलाव

    सौर ऊर्जा प्रकल्पासाठी उत्खनन करत असताना अतिप्राचीन आणि रेखीव तळ्याचा शोध

    काही प्राचीन नाणी सुद्धा सापडली

    तळ्याच्या आता काही मंदिर ही असल्याचा अंदाज

    काळाच्या पडद्याआड गेलेला जिल्ह्यातील आणखी एक ऐतिहासिक ठेवा येणार समोर

  • 11 May 2021 08:14 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण 1048 ने अधिक

    नाशिक - जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण 1048 ने अधिक

    नाशिक जिल्ह्यासाठी दिलासादायक चित्र

    तब्बल 54 दिवसानंतर रुग्ण संख्या 2000 च्या खाली

    रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 89.94

    जिल्ह्यात काल 1835 नवीन रुग्ण

  • 11 May 2021 08:14 AM (IST)

    नागपुरात एमडी तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

    - नागपुरात एमडी तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

    - एकाच वेळी सर्जीकल स्ट्राईक करत केली कारवाई

    - एकाच वेळी पोलिसांनी ३२ गुन्हेगारांच्या घरी टाकल्या धाडी

    - रात्री उशीरापर्यंत चालली कारवाई

    - नागपूरातील एमडी तस्करांमध्ये भितीचं वातावरण

    - दोन गुन्हेगाराच्या घरी सापडे एमडी ड्रग्ज

    - पोलीसांनी तीन जणांना केली अटक

  • 11 May 2021 08:13 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये मोक्कातील तीन फरार आरोपींना अटक; काडतुसांसह दोन पिस्तुल, दोन कोयते जप्त

    पिंपरी-चिंचवड

    - मोक्कातील तीन फरार आरोपींना अटक; काडतुसांसह दोन पिस्तुल, दोन कोयते जप्त

    -हैदर जावेद सय्यद , दीपक भीमराव सगर, प्रथमेश ऊर्फ सोन्या यशवंत सावंत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे

    -आरोपी हैदर आणि त्याचे साथीदार आरोपी सगर व सावंत हे तिघेजण पवनाघाट स्मशानभूमी, काळेवाडी येथे थांबले असून त्यांच्याकडे हत्यारे आहेत. तसेच ते पुन्हा भांडणे करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपींना घेतले ताब्यात

  • 11 May 2021 08:07 AM (IST)

    औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट

    औरंगाबाद -

    औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट

    काल दिवसभरात आढळले फक्त 655 रुग्ण

    औरंगाबाद शहरात आढळले फक्त 214 रुग्ण

    तर ग्रामीण भागात आढळले 441 रुग्ण

    शहरांपेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अजूनही मोठी

    एकीकडे रुग्णसंख्या कमी होतेय तर दुसरीकडे मृत्यू संख्या मात्र कायम

    काल दिवसभरात 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 11 May 2021 07:55 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी उपलब्ध झाली लस

    वाशिम :

    आजपासून पुन्हा जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी उपलब्ध झाली लस

    कोविशिल्ड 6800 व कोवॅक्सिन 1660 असे 8460 डोस

    जिल्ह्यातील 33 केंद्रात कोविशिल्ड तर 17 केंद्रात दिल्या जाणार कोवॅक्सिन लस

    तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांकरिता कोविशिल्ड चे 5800 डोस

    18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण धीम्या गतीने होत असल्याने आजपासून 12 केंद्र कार्यान्वित

  • 11 May 2021 07:37 AM (IST)

    नागपूर विभागात 19.35 लाख हेक्टर खरीप पेरणीचं नियोजन

    - नागपूर विभागात 19.35 लाख हेक्टर खरीप पेरणीचं नियोजन

    - बफर साठ्यातून नागपूर विभागासाठी 18,960 मेट्रीक टन युपीया संरक्षित

    - 8 लाख 30 हजार हेक्टर धान पीक, 6 लाख 30 हजार 600 हेक्टर कापसाचं नियोजन

    - नागपूर विभागात 3 लाख 4 हजार हेक्टर सोयाबीनचं नियोजन

    - खतं आणि बियाण्यासाठी कालुकानिहाय नियोजन

  • 11 May 2021 06:21 AM (IST)

    मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार

    मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार, मुख्यमंत्री मंगळवारी संध्याकाळी राज्यपालांची पाच वाजता भेट घेणार, या भेटी दरम्यान मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत राज्यपालांना निवेदन देणार

Published On - May 11,2021 9:24 PM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.