Maharashtra News LIVE Update | मालेगावची घटना हा प्रयोग, देशात अराजक माजवण्याचा हा डाव; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

| Updated on: Nov 17, 2021 | 4:32 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मालेगावची घटना हा प्रयोग, देशात अराजक माजवण्याचा हा डाव; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Nov 2021 11:01 PM (IST)

    पुणे

    – अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या तयारीत,

    – 26 नोव्हेंबरला अमित शहा पुणे दौऱ्यावर,

    – यावेळी महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन,

    – तसेच पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार,

    – शिवाय शहांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन,

    – अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भात आज महापौर बंगल्यावर बैठक पार पडली.

  • 16 Nov 2021 09:44 PM (IST)

    गोवा

    गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी

    काँग्रेसकडून गोवा निवडणुकीसाठी समिती स्थापन

    दिनेश गुंडू राव यांच्या नेतृत्वाखाली समिती

    गोवा निवडणुकीसाठी विशेष समिती

  • 16 Nov 2021 09:19 PM (IST)

    किशोरी पेडणेकर बाईट

    रश्मी उद्धव ठाकरे तेजस उद्धव ठाकरे हे रुग्णालय प्रशासनाच्या नियमानुसार उपस्थित राहणार की नाही डॉक्टरांच्या परवानगीने उपस्थित राहू शकतात

    मुख्यमंत्री ऑनलाइन या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार

    केजी बाळासाहेबांच्या विचारांना मानतात ते उपस्थित राहतील शरद पवारांनी बाळासाहेबांची वेगळी माहिती होती तर ते मुंबईत असतील आणि त्यांना वेळ असेल तर ते नक्कीच येतील

    करोणाच्या नियमाप्रमाणेच शिवसैनिकांना आणि इतरांना दर्शन घेता येणार आहे

  • 16 Nov 2021 09:09 PM (IST)

    डोंबिवली 

    दुचाकी स्वारावर तिघांनी केला हल्ला..

    या हल्ल्यात दुचाकी स्वार काशिनाथ भोईर गंभीर जखमी..

    घटना सीसीटीव्हीत कैद..

    अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून विष्णूनगर पोलिसांनी सुरू केला तपास...

  • 16 Nov 2021 08:41 PM (IST)

    पुणे

    पुणे, सांगली ,सातारा या जिल्ह्यात म्हाडाच्या माध्यमातून 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात,

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला शुभारंभ,

    जानेवारी 2022 मध्ये निघणार ऑनलाईन सोडत,

    गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे सचिव मिलींद म्हैसकर यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ

  • 16 Nov 2021 08:31 PM (IST)

    संजय राऊत

    “माझा प्राईम टाईमचा सकाळी 9:30 ते 10 चा स्लॅाट आहे. बातमी तुम्हांला सकाळीच मिळेल” आशिष शेलार हे आमच्या कोअर कमिटीतील आहेत. कारण त्यात मोजके असतात. कारण त्यांना अंदर कि बात माहीत असते. - हल्ली मी शेलार बोलतात तेव्हा मी ऐकत असतो. - मी राजकारणात काही तरी मिळाव म्हणून मी काहीही करत नाही. फक्त बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करतो. - शेलार मी तुमच दुःखं समजू शकतो तुम्हांला पाच वर्ष मंत्रीपद मिळायला हव होत मात्र तुम्हांला शेवटच्या पाच महिण्यासाठी मिळालं. आशिषजी आता शक्य नाही हवेची दिशा बदलली आणि 3 वर्षे तीच रहाणार ज्या दिवशी राजकिय पातळी सोडून नको त्या प्रश्नाकडे आपण भरकटत चालो आहोत. हि महाराष्ट्राची संस्कृती नाही. - मी आशिष शेलार यांच भाषण काळजी पूर्वक ऐकल मात्र आता बोलून फायदा नाही. - कारण आता हवेची दिशा बदलेली आहे हि हवा तीन वर्षीच अशीच राहणार - राजकारण अत्यंत चंचल असत. - मी सांगितल होत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार मला तुमही गांभीर्याने घेतल नाही. - कोणी १०५ जिंकले म्हणून सरकार आणतात असं नाही - महाराष्ट्रात जगावेगळं घडल अस नाही - देशात मुख्यमंत्री येतील जातील, पंतप्रधान येतील जातील मात्र माहत्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,सावरकर, बाळासाहेब ठाकरे हे मात्र राहतील. यांच मोठ योगदान आहे. - सरकार बनतात कोणत्या परीस्थितीत बनतात तुम्ही पाहा कॅाग्रेस वर जहरी टिका मी केली. - हा देश सर्वाचा आहे.महाराष्ट्र टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केल पाहीजें - “ दंगली कोण पेटवत आहे दंगली हिंन्दुना ना ही परवडणार नाही आणि मुसलमान यांनाही परवडली नसती” - मराठी माणसांने राष्ट्राच नेतृत्व केल पाहीजे.

  • 16 Nov 2021 08:28 PM (IST)

    नांदेड

    तीन हजाराची लाच घेताना ग्रामसेवक, सरपंच, सेवकाला रंगेहाथ पकडले मुदखेड च्या इजळी येथील घटना...नमुना ८ साठी मागीतले होते पैसे नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

  • 16 Nov 2021 08:28 PM (IST)

    सिंधुदुर्ग

    दोडामार्ग तिलारी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून दोन गव्या रेड्यांचा दुर्दैवी मृत्यू.

    झूंजी दरम्यान दोन गवेरेडे पडले होते तिलारीच्या उजव्या कालव्यात

    गोवा राज्यातील वनविभागाकडून गव्यांना वाचवण्यासाठी करण्यात आले शर्थीचे प्रयत्न

    मात्र जखमी झालेल्या दोन्ही गव्यांचा झाला मृत्यू.

  • 16 Nov 2021 07:43 PM (IST)

    पुणे

    - पुण्यात रिक्षा भाडे करण्याचा निर्णय,

    - रिक्षा भाडेवाढीत तीन रुपयांची वाढ,

    - रिक्षाचे किमान भाडे आता 21 रुपये होणार

    - 22 तारखेपासून नविन भाडेवाढ लागू होणार

  • 16 Nov 2021 06:27 PM (IST)

    अजयकुमार गुजर, अध्यक्ष, राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना

    - काल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्याचे मुख्य सचिवांबरोबर बैठक झाली

    - न्यायालयात जे म्हणणे मांडले तेच मुख्य सचिवांसमोर मांडले

    - एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा अशी आम्ही मागणी केली आहे

    - तसंच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी आमची मागणी आहे

    - यासाठी जेवढा काळ लागेल तेवढा काळ संप सुरू राहिल

    आम्हाला राज्य सरकारची समिती मान्य नाही पण न्यायालयाच्या आदेशानुसार आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं

  • 16 Nov 2021 06:17 PM (IST)

    नवी दिल्ली

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बाईट

    कोल्हापूर चंदगड तालुक्यात सापडले ड्रग्ज

    काही दिवसांपूर्वी आदेश देण्यात आला होता

    अवैध धंद्याविरोधात मोहीम हाती घेतली होती, हा त्याचाच भाग होता

    अनेक ठिकाणी अशी कारवाई केली जात आहे - वळसे पाटील

  • 16 Nov 2021 05:38 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस

    अजितदादा तुमच्याकडे उत्पन्नासाठी दारुचा स्त्रोत मंदिरं सुरु करण्याआधी मंदिरालय सुरु केली

    280 दिवसांमध्ये मोदींमुळे 100 कोटींचं लसीकरण तुमच्याहून लहान राज्यांकडे जरा बघा गरीब राज्यांनीही इंधनावरील वॅट कमी केला सर्वाधिक कुपोषित बालकं महाराष्ट्रात कुठे आणि कोण कमी पडतंय हे लक्षात घ्या कोविन अॅपमुळे लसीकरण सुलभ झाले लसीकरणात भारत सर्वात पुढे पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त लसी दिल्या डिजिटल साईन सर्टिफिकेट दिलं

  • 16 Nov 2021 05:26 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस

    राज्य सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा तिटकारा शेतकऱ्याला कुठलीही मदत दिली जात नाही एकाही आदिवासीचं सरकारला समर्थन नाही वॉटर ग्रीड बंद आहे वैधानिक मंडळाचा खून केला कुणीही मदत करायला तयार नाहीत येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही मविआ सरकारमध्ये महिला असुरक्षित काहीही झालं तरी बोट केंद्राकडे दाखवतात केंद्राने पेट्रोल डिझेलचा दर कमी केला इंधनदर कमी केल्यावर देशातील 25 राज्यांनी वॅट कमी केला

  • 16 Nov 2021 05:18 PM (IST)

    पुणे

    शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या 28वर्षीय मुलाने केली आत्महत्या

    निखील मालुसरे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव

    निखील यांनी राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या

    आत्महत्येच कारण समजू शकले नाही

    खडक पोलिस ठाण्यात करण्यात आली आत्महत्येची नोंद

  • 16 Nov 2021 05:06 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस

    कोटी कोटी रुपये घेऊन अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात मोर्चे काढण्यासाठी कोणी पैसे दिले याची मलिकांना कल्पना भाजपचा कार्यकर्ता कधीही दंगल करणार नाही गडचिरोलीत आमचे पोलीस शहिद एसआरपीएफच्या जवानांना कोणी जखमी केलं?

    आम्ही कुणाला घाबरत नाही आमच्याकडे इनामी पण नाही आणि बेनामी पण नाही त्यामुळे आम्हाला घाबरण्याची गरज नाही भ्रष्टाचाराविरोधात थेट लढाई लढणार अधिकारीच सांगतात यांनी बाजार मांडलाय

    देशात अराजकता तयार करण्यासाठी दंगलीचा प्रयोग मोर्चे सरकारच्या समर्थनाने निघाले हे षडयंत्र दाबण्यासाठी मलिकांचे आरोप महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न

  • 16 Nov 2021 05:02 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस

    या सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे, वाटमारी सुरू आहे. पण सामान्य लोकांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही सुधीर भाऊंनी चांगला राजकीय प्रस्ताव मांडला या सरकारचे कपडे काढले पण सुधीर भाऊ यांचे कितीही कपडे काढले तरी या निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरवेच लागेल आता कोरोना आहे म्हणून थांबवू शकत नाही दोन वर्ष कोरोना आहे म्हणून ते आम्हाला रोखत होते. आमच्यावर गुन्हे दाखल करत होते

  • 16 Nov 2021 05:00 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस

    मविआची फक्त गांजा, हर्बल तंबाखूवर चर्चा मविआ सरकार आतापर्यंतच भ्रष्टाचारी सरकार फडणवीसांचा मविआ सरकारवर हल्लाबोल रस्त्यावर संघर्ष करण्याची वेळ आलीय ठाकरे सरकार 'काय ते द्याचं राज्य' देशद्रोह्यांसोबत यांची पार्टनरशीप सुरु

  • 16 Nov 2021 04:55 PM (IST)

    पुणे रुपाली चाकणकर

    - ससून रुग्णालयात तृतीय पंथीयांवर उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केला जाणार,राज्यातील पहिलं असं रुग्णालय असणार ज्यामध्ये तृतीय पंथीयांयाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे,

    - एसटी कामगारांच्या पाठीशी कायम राष्ट्रवादी राहली आहे,विलंब होतोय मात्र अन्याय होणार नाही,

    - विरोधकांचा विरोध करणे हा एककलमी कार्यक्रम आहे, सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांना झोप नाहीय, महाराष्ट्रात दुफळी निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केलं जातंय,

  • 16 Nov 2021 04:54 PM (IST)

    औरंगाबाद

    केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी चक्क विमानात केले रुग्णावर उपचार

    विमानात चक्कर आलेल्या रुग्णावर भागवत कराड यांनी केले तातडीचे उपचार

    दिल्ली मुंबई प्रवासादरम्यान एका प्रवाशाला झाला होता रक्तदाबाचा त्रास

    रक्तदाब वाढल्यामुळे चक्कर येऊन रुग्ण पडला होता बेशुद्ध

    बेशुद्ध पडलेल्या रुग्णावर डॉक्टर भागवत कराड यांनी केले प्राथमिक उपचार

    प्राथमिक उपचारानंतर रुग्णाची प्रकृती झाली स्थिर

    भागवत कराड यांच्या प्रयत्नामुळे विमानातील प्रवाशाला मिळाले जीवनदान

    भागवत कराडांच्या अनोख्या रुग्णसेवेमुळे विमानातील सहप्रवासी भारावले

  • 16 Nov 2021 03:50 PM (IST)

    पुणे

    राज्य सरकारने आजी माजी सैनिकांच्या पत्नी यांच्या नावाने असलेल्या मिळकतींवरील कर माफ करावा असे आदेश दिलेत,

    मात्र राज्य सरकारने आदेश देऊनही पुणे महापालिका अंमलबजावणी का करत नाही याविरोधात शिवसेनेच आंदोलन,

    पुणे महापालिकेच्या भवनासमोर कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन,

    घोषणाबाजी न करता हातात फलक घेऊन करतायेत आंदोलन

  • 16 Nov 2021 03:32 PM (IST)

    पुणे

    - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ससून रुग्णालयाला भेट देणार

  • 16 Nov 2021 03:32 PM (IST)

    हाजी अराफत आॅन एसटी आंदोलन वन टू वन

    - मराठी भुमिपुत्रांना आंदोलन करावं लागतंय…. अनिल परबांमुळे एसटी कर्मचारी रस्त्यावर…

    - भाजप नव भारतिय शिववाहूक युनियन या आंदोलनात ऊतरणार… सात लाख बसेस आहेत… सगळ्यात मोठी संघटना आहे…

    - आजपासून खाजगी बसेस आम्ही बंद करत आहोत… राज्यात खाजगी युनियनच्या बसेस बंद करणार…

    केवळ नॅशनल परमिट बसेस चालणार… राज्यातील बसेस जो पर्यंत निर्णय होत नाही बंद राहणार…

    - अनिल परबांना माझं आव्हान आहे एकही खाजगी बस राज्यात चालवून दाखवा…

    - आम्ही बस बंद ठेवू…

  • 16 Nov 2021 03:31 PM (IST)

    नांदेड

    शुक्रवारच्या हिंसाचार प्रकरणी 83 आरोपी निष्पन्न, त्यापैकी 50 जण आतापर्यंत अटक

    10 आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे

    अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली माहिती

    नांदेड पोलिसांनी चांगल काम केल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाकानी केले स्पष्ट

  • 16 Nov 2021 03:30 PM (IST)

    पुणे

    ऑनलाईन पद्धतीने झालेला 19 वा पुणे इंटरनँशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफलाईन पद्धतीने होणार,

    जानेवारी महिन्यात होणार फिल्म फेस्टिव्हल कोरोनामुळं पुढे ढकलण्यात आला होता,

    मात्र ऑनलाईन पद्धतीने झालेला फेस्टिव्हल ऑफलाईन पद्धतीने पाहता येणार,

    उद्या पिफचे अध्यक्ष जब्बार पटेल पत्रकार परिषद घेऊन वेळापत्रक करणार जाहीर,

  • 16 Nov 2021 03:30 PM (IST)

    नांदेड

    रजा अकादामीच्या व्यासपीठावर जाऊन अनेक राजकीय नेत्यांनी भाषणे केली

    प्रक्षोभक भाषण करणाऱ्या सर्वच जणांवर होणार गुन्हे दाखल,

    अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली माहिती,

    संजय कुमार यांनी घेतला आज शुक्रवारच्या घटनेचा आढावा

  • 16 Nov 2021 03:29 PM (IST)

    सुहास कांदे 121

    - मुख्यमंत्र्यांनी नुसता टेक्स्ट मेसेज जरी केला तरी भुजबलांविरोधातील याचिका मागे घेईल

    - मी पक्षाचा आदेश मानणारा शिवसैनिक

    - आजच्या बैठकीत मिळालेले आश्वासन हवेत विरतात का पूर्ण होतात हे कळेल

    शिवसेनेच्या आमदारांचे काम होत नसतील,तर महाविकास आघाडीतील दरी वाढतच जाणार

  • 16 Nov 2021 03:29 PM (IST)

    अमरावती 

    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 15 दिवसानंतर अमरावतीत यावं

    अमरावती मध्ये किरीट सोमय्या यांना येऊन भडकायचं का आहे का?

    अमरावतीत हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर

    किरीट सोमय्या यांच्या उद्याच्या अमरावती दौऱ्यावर पालकमंत्री यशोमती ठाकूर ठाकूर यांची प्रतिक्रिया

  • 16 Nov 2021 01:45 PM (IST)

    राज्य सरकारनं एमपीएससीला 77 हजार 168 पदांसाठी एमपीएससीला दिलं मागणीपत्र

    एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

    राज्य सरकारनं एमपीएससीला 7 7 हजार 168 पदांसाठी एमपीएससीला दिलं मागणीपत्र,

    एमपीएससीला राज्य सरकारचं मागतीपत्र प्राप्त,

    गट अ पदांसाठी 2 हजार 827 , गट ब साठी 2641 जागा , गट क साठी 1700 जागा अशा एकूण 7 हजार 168 पदांच मागणीपत्र दिलं एमपीएससीला

    सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची माहिती,

    लवकरच एमपीएससीमार्फत विविध विभागांमध्ये होणार भरती,

    एक वर्षाची वयोमर्यादा वाढवण्याचं परिपत्रक एमपीएससीकडून लवकरच जारी होणार

  • 16 Nov 2021 01:45 PM (IST)

    बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीबाबत म्हणणे सादर करण्याचे राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश

    - बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीबाबत म्हणणे सादर करण्याचे राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश,

    - राज्य निवडणूक आयुक्त तसेच राज्य सरकार यांना नोटीस जारी,

    - दोन आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे आदेश,

    - महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणाऱ्या याचिकांची कोर्टाकडून दखल,

    - पुण्यातील तन्मय कानिटकर, माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या वतीने अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दोन याचिका हायकोर्टात दाखल.

  • 16 Nov 2021 01:44 PM (IST)

    आमदार सुहास कांदे भुजबळ वादावर काही काळ पडदा?

    नाशिक -

    आमदार सुहास कांदे भुजबळ वादावर काही काळ पडदा?

    सध्या तरी समाधान झाले आहे

    गैरव्यवहारा बाबत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी दिल आहे आश्वासन

    डीपीडिसीच्या निधी नियोजनासाठी 5 आमदारांची कमिटी तयार केली आहे

    नांदगाव मतदार संघाला 73 कोटी निधी देण्याचे आश्वासन

    आश्वासन प्रत्यक्षात उतरले नाही, तर पुन्हा आंदोलन

    आमदार सुहास कांदे यांची माहिती

  • 16 Nov 2021 11:53 AM (IST)

    हिवाळी अधिवेशन नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता

    हिवाळी अधिवेशन नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता

    विधान परिषद निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता

    जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता

    त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित

    हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार

  • 16 Nov 2021 10:53 AM (IST)

    औरंगाबाद शहरात आजही एसटी कर्मचाऱ्यांचा कडकडीत संप सुरूच

    औरंगाबाद शहरात आजही एसटी कर्मचाऱ्यांचा कडकडीत संप सुरूच

    एकही कर्मचारी कामावर रुजू नाही

    औरंगाबाद स्थानकातून एकही बस सुटली नाही

    एसटी कर्मचारी अजूनही कडकडीत संपावर ठाम

    आंदोलन स्थळी एसटी कर्मचाऱ्यांचा स्वयंपाक सुरू

    रात्रंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा बस स्थानकात ठिय्या सुरूच

  • 16 Nov 2021 10:25 AM (IST)

    मनसे पदाधिकाऱ्याला दमदाटी, सहकार विभागाच्या बड्या महिला अधिकाऱ्याकडून अरेरवीची भाषा

    पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

    मनसे पदाधिकाऱ्याला दमदाटी सहकार विभागाच्या बड्या महिला अधिकाऱ्याकडून अरेरवीची भाषा

    पुणे विभागाच्या सहनिबंधक यांच्याकडून दमदाटी

    पुणे शहर मनसे पदाधिकारी निलेश निकम यांना दमदाटी

    अरेरावीच्या भाषेत बघुन घेईल, अशी धमकी

    सर्व प्रकाराची व्हीडीओ क्लीप व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ सहकार विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    सोशल मीडियावर व्हायरल

    सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे केली महिला अधिकार्या विरोधात तक्रार

  • 16 Nov 2021 10:24 AM (IST)

    स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे थोड्याच वेळात होणार विसर्जन

    नाशिक -

    स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे थोड्याच वेळात होणार विसर्जन

    नाशिकच्या रामकुंड परिसरात होणार अस्थी विसर्जन

    अस्थी विसर्जनाची तयारी पूर्ण

  • 16 Nov 2021 09:00 AM (IST)

    म्हसवड येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी यांचा पारंपारिक शाही विवाह सोहळा संपन्न

    सातारा -

    म्हसवड येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी यांचा पारंपारिक शाही विवाह सोहळा संपन्न

    दरवर्षी तुलसी विवाह कार्तिक बारस दिवशी श्री चा विवाह सोहळा रात्री 12 वाजता संपन्न होतो

    सोहळ्यानिमित्त गजी नृत्याचे आयोजन

    म्हसवडच्या सिद्धनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

  • 16 Nov 2021 08:59 AM (IST)

    शिरुर तालुक्यातील ढोक सांगवी गावात आढळला भला मोठा अजगर

    पुणे

    शिरुर तालुक्यातील ढोक सांगवी गावात आढळला भला मोठा अजगर

    वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांकडून जीवदान

    वनविभागाच्या मदतीने अजगरला निसर्गाच्या सानिध्यात आलं सोडण्यात

  • 16 Nov 2021 08:58 AM (IST)

    सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

    सोलापूर -

    सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

    संपाचा आजचा एकविसावा दिवस

    मागणी मान्य होईपर्यंत संप चालूच ठेवणार असल्याचा एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा

    आजही सोलापूर विभागातील एकही बस धावली नाही

    गेल्या एकवीस दिवसापासून रोजचा 350 हुन  अधिक बसच्या फेऱ्या झाल्या रद्द

  • 16 Nov 2021 08:58 AM (IST)

    कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

    कोल्हापूर

    विधान परिषद निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

    आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

    23 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार तर 24 नोव्हेंबर ला होणार अर्जांची छाननी

    10 डिसेंबरला होणार मतदान

    कोल्हापूर विधान परिषदेसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण

    मालकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील रिंगणात तर भाजपच्या उमेदवाराचा निर्णय आज मुंबईत शक्य

  • 16 Nov 2021 08:57 AM (IST)

    एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा नववा दिवस

    पुणे

    एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा नववा दिवस

    स्वारगेट एस टी डेपोत कर्मचारी आज काळे झेंडे दाखवून करणार शासनाचा निषेध

  • 16 Nov 2021 08:57 AM (IST)

    नागपुरात वाढणार रेशन दुकानाची संख्या

    नागपूर -

    नागपुरात वाढणार रेशन दुकानाची संख्या

    ग्रामीण भागात तालुका निहाय,तर शहरात झोन निहाय प्रस्ताव मागविले

    नागपूर जिल्ह्यात सध्या 1968 रेशन धान्य दुकान आहेत

    यात ग्रामीण मध्ये 1290 तर शहरात 678 दुकान आहेत

    अनेक वर्षे पासून नवीन रेशन दुकानांना परवानगी नव्हती ती आता मिळाल्याने मार्ग झाला मोकळा।

    प्रस्तावा नंतरच कळणार नेमकी संख्या

  • 16 Nov 2021 08:03 AM (IST)

    साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग, पालकमंत्री भुजबळ यांनी केली साहित्य नगरीची पाहणी

    नाशिक - साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग

    पालकमंत्री भुजबळ यांनी केली साहित्य नगरीची पाहणी

    शरद पवार करणार संमेलनाचा समारोप

    900 कवींचे विक्रमी संमेलन चालणार तब्बल 72 तास

  • 16 Nov 2021 07:44 AM (IST)

    नागपूर मनपा हद्दीत 10 लाख लोकांनी घेतले कोरोना लसीचे दोन्ही डोज

    - नागपूर मनपा हद्दीत 10 लाख लोकांनी घेतले कोरोना लसीचे दोन्ही डोज

    - नागपूरातील ८७ नागरीकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोज

    - मनपा हद्दीत १७.३० लाख नागरिकांनी घेतला पहिला डोज

    - नागपूर शहरात १६६ केंद्रांवर सुरु आहे लसीकरण

  • 16 Nov 2021 07:42 AM (IST)

    खवल्या मांजर घुसले नागरी वस्तीत, कोल्हापूर जिल्ह्यतील शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील घटना

    कोल्हापूर -

    खवल्या मांजर घुसले नागरी वस्तीत

    कोल्हापूर जिल्ह्यतील शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील घटना

    नागरी वस्तीत खवल्या नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांची घाबरगुंडी

    रात्री दहाच्या सुमारास घुसले खवल्या मांजर

    तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून मांजर पकडले

  • 16 Nov 2021 07:38 AM (IST)

    ध्वनी प्रदूषणात नाशिक राज्यात टॉप टेनमध्ये

    नाशिक -

    ध्वनी प्रदूषणात नाशिक राज्यात टॉप टेन मध्ये

    राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून यादी जाहीर

    नाशिक मध्ये दिवसा 75.2 डेसीबल तर रात्री 68.2 डेसीबल पर्यंत ध्वनी प्रदूषण

    नाशिकचे ध्वनी प्रदूषण सुरक्षा मानक मर्यादेच्या पातळी पलीकडे

    जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ दाखल घेण्याची अपेक्षा

  • 16 Nov 2021 07:37 AM (IST)

    लक्ष्मी बँकेच्या प्रशासक मंडळाने पाच लाखापर्यंत च्या ठेवी देण्याच्या दृष्टीने सुरू केल्या हालचाली

    सोलापूर -

    लक्ष्मी बँकेच्या प्रशासक मंडळाने पाच लाखापर्यंत च्या ठेवी देण्याच्या दृष्टीने सुरू केल्या हालचाली

    या संदर्भातील प्रस्ताव ठेवी महामंडळाकडे पाठविला जाणार

    लक्ष्मी बँकेवर रिझर्व बँकेने आर्थिक निर्बंध लावून संचालक मंडळ केले आहे बरखास्त

    एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता नसल्यामुळे ठेवीदारांची वाढली होती चिंता

    मात्र प्रशासक ठेवीदारांना दिलासा देण्याचा केला आहे प्रयत्न

    ग्राहकांच्या तातडीच्या कामासाठी पाच लाख पर्यंतच्या सुरक्षित ठेवी मिळाव्यात यासाठी  ठेवी महामंडळाकडे प्रस्ताव

  • 16 Nov 2021 07:36 AM (IST)

    ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू

    नंदुरबार:- ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गावर अपघात...

    - मोदलपाडा गावाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर

    - अपघातात दोन ठार, दोन गंभीर जखमी

  • 16 Nov 2021 07:35 AM (IST)

    गंगापूर गावातील शिंदोरी गावात बिबट्याचा वावर

    नाशिक - गंगापूर गावातील शिंदोरी गावात बिबट्याचा वावर

    ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

    रहिवासी क्षेत्रात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत

    बिबट्या आणि त्याची मादी देखील असल्याचा संशय

    वनविभागाने तात्काळ पिंजरा बसवावा अशी मागणी

  • 16 Nov 2021 07:07 AM (IST)

    इयत्ता दहावीसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 16 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार

    पुणे :

    इयत्ता दहावीसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 16 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार

    यासाठी १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार

    तर १ ते ७ डिसेंबर या कालावधीत लेट फी सह अर्ज भरता येणार

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची माहिती

  • 16 Nov 2021 06:48 AM (IST)

    बेपत्ता बोटीच्या तपासासाठी पाणबुडे आणा, जयगड मधल्या मच्छीमारांची मागणी

    रत्नागिरी -

    जयगड बंदरामधून बेपत्ता झालेल्या नावेद-2 मच्छीमारी बोट प्रकरण

    बेपत्ता बोटीच्या तपासासाठी पाणबुडे आणा

    जयगड मधल्या मच्छीमारांची मागणी

    26 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे नावेद मच्छिमारी नौका

    मालवाहू जहाजांची टक्कर झाल्याने नावेदला अपघात झाल्याची वर्तवली जाते शक्यता

    पाणबुड्यांच्या साह्यानं समुद्राच्या तळाशी जाऊन तपास करण्याची मच्छीमारांची मागणी

  • 16 Nov 2021 06:48 AM (IST)

    जिल्हा नियोजनची आज बैठक, बैठक वादळी होण्याची शक्यता

    सिंधुदुर्ग -

    जिल्हा नियोजनची आज बैठक, बैठक वादळी होण्याची शक्यता

    शिवसेना आणि भाजपचे नेते एकाच व्यासपीठावर येणार

    पालकमंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, दिपक केसरकर, नितेश राणे, वैभव नाईक उपस्थित राहणार

    जिल्हा नियोजनच्या बैठकीला नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दोन वेळच्या जेवणाचा डबा घेऊन येण्याचा इशारा दिला आहे इशारा

    यापूर्वी झालेल्या बैठकीत नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक वादावादी

    त्यानंतरची ही पहिलीच बैठक, दुपारी 11 वाजता आहे जिल्हा नियोजन ची बैठक

Published On - Nov 16,2021 6:28 AM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.