Maharashtra News LIVE Update | एसटी खासगीकरणाकडे जाण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही- पालकमंत्री गुलाबराव पाटील

| Updated on: Nov 20, 2021 | 12:06 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | एसटी खासगीकरणाकडे जाण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही- पालकमंत्री गुलाबराव पाटील
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Nov 2021 10:11 PM (IST)

    एसटी खासगीकरणाकडे जाण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही- पालकमंत्री गुलाबराव पाटील

    जळगाव : एसटी कर्मचारी बांधवांना सरकारने कोरोना काळा घरबसल्या पगार दिलेला आहे. यांनी ऐन दिवाळीच्या वेळी आदोलन करणं चुकीचं आहे. तरी एसटी बांधवांनी कामावर यावे अन्यथा सरकारला खासगीकरणाकडे जाण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही, असे मत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

  • 19 Nov 2021 07:47 PM (IST)

    यवतमाळ येथे बडतर्फ एसटी कर्मचारी वासुदेव चांदेकर याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

    यवतमाळ- यवतमाळ येथे बडतर्फ कर्मचारी वासुदेव चांदेकर याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

    यवतमाळ आगारात वाहक पदावर होते चांदेकर, 1 वर्षापासून चांदेकर होते बडतर्फ

    आज त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन

  • 19 Nov 2021 06:13 PM (IST)

    शरद पवार तीन दिवसांचा विदर्भ दौरा आटोपून मुंबईकडे रवाना

    नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांचा विदर्भ दौरा आटोपून मुंबईकडे रवाना

    नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये झाला शरद पवार यांचा दौरा

    विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणे , येणाऱ्या महापालिका निवडणूक बघता महत्वाचा ठरला दौरा

  • 19 Nov 2021 05:47 PM (IST)

    पुण्यात एसटी कॉलिनीतील रहिवाशांना भाजपाकडून एक महिन्याचं धान्य वाटप 

    पुणे : पुण्यात एसटी कॉलिनीतील रहिवाशांना भाजपाकडून एक महिन्याचं धान्य वाटप

    भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार धान्याचे वाटप

    गोपीचंद पडळकर साधणार एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद

  • 19 Nov 2021 04:36 PM (IST)

    पुण्यात अलका चौकात काँग्रेस महिला आघाडीचा जल्लोष, तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर जल्लोष 

    पुणे : पुण्यात अलका चौकात काँग्रेस महिला आघाडीचा जल्लोष

    केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयानंतर काँग्रेसकडून जल्लोष

    राहूल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

  • 19 Nov 2021 04:28 PM (IST)

    नागपूरचे माजी महापौर अटल बहादूर सिंग यांचे निधन 

    नागपूर : नागपूरचे माजी महापौर अटल बहादूर सिंग यांचे निधन

    गेल्या काही दिवसांपासून होते आजारी

    खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार

    दोनदा भूषविले नागपूरचे महापौर पद

    फुटबॉल असोसिएशनचे होते अध्यक्ष

    'किंगमेकर' अशी होती त्यांची ओळख

  • 19 Nov 2021 04:21 PM (IST)

    हडपहर सासवड रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांना वैतागून केली फ्लेक्सबाजी  

    पुणे : हडपहर सासवड रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य

    राष्ट्रीय महामार्ग 965 पालखी मार्गावर खड्डेच-खड्डे

    अॅड. अमोल कापरेंनी खड्ड्यांना वैतागून केली फ्लेक्सबाजी

    यमनगरीत तुमचं स्वागत आहे अशा आशयाचे लावले फ्लेक्स

    येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे फ्लेक्स लक्ष वेधून घेतायेत

    रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचही प्रमाण वाढलंय

    खड्ड्यांना वैतागून उपरोधिक फ्लेक्सबाजी करण्यात आलीये

  • 19 Nov 2021 12:07 PM (IST)

    अंधेरीतील प्राईम मॉलला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

    अंधेरीतील विले पार्ले येथील प्राईम मॉलला सकाळी 10.30 वाजता आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.

  • 19 Nov 2021 11:36 AM (IST)

    अंधेरी पश्चिमेतील प्राईम मॉलला भीषण आग

    अंधेरी पश्चिम प्राईम मॉलला लेवल 4 ची भीषण आग लागली आहे

    अल्फा इरला रोड वर प्राईम मॉल असून कूपर हॉस्पिटल च्या बाजूला आहे..

    साडे दहा वाजता ही आग लागली आहे..

    घटनास्थळावर आतापर्यंत अग्निशमन दलाच्या जम्बो टँकर 07, फायर इंजिन 10, श्वसन उपकरण वाहन 01, कंट्रोल पोस्ट 01 एवढे दाखल झाल्याची माहिती आहे

  • 19 Nov 2021 11:18 AM (IST)

    उद्योगाला नेहमी वाढवण्याचा विचार करायला हवा- शरद पवार

    शरद पवार -

    - गावात केल्यावर खरी परिस्थिती कळते.

    - राज्यात दौरे करताना वाहनांचा वापर करण्याला पसंती, हेलीकॅप्टर वापरत नाही. कारण यामुळे ग्राऊंडवरची परिस्थिती कळते

    - उद्योगाला नेहमी वाढवण्याचा विचार करायला हवा

    - कापसावर प्रक्रिया करणारे छोटे खोटे उद्योग उभारण्याची आज गरज

  • 19 Nov 2021 08:41 AM (IST)

    अमरावती संचारबंदी प्रकरण, शहरातील संचारबंदी शिथिलतेत पुन्हा फेरबदल

    अमरावती संचारबंदी प्रकरण

    शहरातील संचारबंदी शिथिलतेत पुन्हा फेरबदल

    आता जीवनावश्यक वस्तू खरेदी व कृषी केंद्र उघडण्यास सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत तर दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत परवानगी

    पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा नवीन आदेश...

    अमरावतीत संचारबंदी शिथिलतेबाबद संभ्रम

    आधीच इंटरनेट बंद असल्याने नव्या नियमांची माहिती लोकांन पर्यंत पोहचत नाही

  • 19 Nov 2021 08:17 AM (IST)

    विधान परिषदेनंतर आता मिनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

    कोल्हापूर

    विधान परिषदेनंतर आता मिनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

    मुदत संपणाऱ्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडून हालचाली

    प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

    आवश्यक माहिती 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याच्या सूचना

    फेब्रुवारी महिन्यात जिल्हापरिषद निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता

  • 19 Nov 2021 08:16 AM (IST)

    नागपुरातील 50 टक्के रस्त्यावर अजूनही खड्डे

    नागपूर -

    नागपुरातील 50 टक्के रस्त्यावर अजूनही खड्डे

    12 मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदी च्या रस्त्यांची अवस्था अजूनही बिकट

    रस्त्यांवर खड्डेच खड्डे

    महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागच्या अहवालात नोंद

    डांबरी रस्त्यांची स्थिती बिकट

    नागपूरकर भोगत आहे त्रास

  • 19 Nov 2021 08:16 AM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्या आज येणार औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद -

    भाजप नेते किरीट सोमय्या आज येणार औरंगाबाद दौऱ्यावर

    महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक घोटाळा करणार उघड

    सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन करणार घोटाळा उघड

    तत्पूर्वी किरीट सोमय्या देणार घोटाळ्याशी संबंधित ठिकाणांना भेट

    किरीट सोमय्या यांच्या औरंगाबाद दौऱ्यामुळे खळबळ

  • 19 Nov 2021 08:07 AM (IST)

    सोलापूर विभागातील बस सेवा ठप्पच

    सोलापूर - सोलापूर विभागातील बस सेवा ठप्पच

    एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

    आजही विभागातून एकही गाडी राहणार धावणार नाही

    सोलापूर विभागातून रोज होतात  350 हून अधिक बसच्या फेऱ्या

    विभागातील सर्व बसच्या फेऱ्या रद्द

    खासगी वाहनातून करावा लागत आहे नागरिकांना प्रवास

  • 19 Nov 2021 07:47 AM (IST)

    गाळप परवाना न घेतलेल्या कारखान्यांना प्रतिटन 500 रुपयांचा दंड लावणार

    सोलापूर -

    गाळप परवाना न घेतलेल्या कारखान्यांना प्रतिटन 500 रुपयांचा दंड लावणार

    विनापरवाना गावात सुरू असलेल्या कारखान्याची विशेष पथकाद्वारे तपासणी होणार

    तपासणीचा अहवाल साखर आयुक्तांकडे पाठविण्यात येणार

    जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी परवानगी न घेताच गाळप सुरू केल्याची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

    गाळप परवाना न घेता सुरू असलेल्या कारखान्यांना प्रतिटन 500 रुपये दंड लावून सक्तीने वसूल करण्याचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा इशारा

  • 19 Nov 2021 07:47 AM (IST)

    कारवाईचा बडगा उगरताच नागपूर महापालिका कर्मचारी घेऊ लागले लस

    नागपूर -

    लसीकरण नाही तर पगार नाही

    कारवाईचा बडगा उगरताच महापालिका कर्मचारी घेऊ लागले लस

    महापालिकेच्या वेगवेगळया विभागातील 8 ते 10 टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याची माहिती

    जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आदेश

    त्याची अंमलबजावणी महापालिकेने केली

    मात्र गंभीर आजार असणाऱ्यांना यातून वगळण्यात आलं

    कर्मचाऱ्यांचा मिळत आहे आता लसीकरणा ला प्रतिसाद

  • 19 Nov 2021 07:46 AM (IST)

    शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांची 137 पद रिक्त

    कोल्हापूर

    शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांची 137 पद रिक्त

    अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांचा समावेश

    प्राचार्यांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांवर होतोय परिणाम

    रिक्त पदांची राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून दखल

    लवकरच सगळ्या पदांची करणार भरती

  • 19 Nov 2021 07:31 AM (IST)

    बांधकाम व्यावसायिक दीपक डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला

    पुणे :

    बांधकाम व्यावसायिक दीपक डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला

    सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयाने हा जामिन अर्ज फेटाळला

    ३२ हजारहून अधिक ठेवीदारांची हजारो कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद कुलकर्णी, पुतणी, जावई यांच्यासह इतरांना २०१९ साली केली अटक

    त्यांच्यावर एमपीआयडी, फसवणूकसह विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल

    शिरीष कुलकर्णी यांनी त्याचे वकील आशिष पाटणकर आणि ॲड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत जुलै महिन्यात जामिनाचा अर्ज केला होता दाखल

  • 19 Nov 2021 07:30 AM (IST)

    पुण्यातील एसटी कर्मचारी संघटनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

    पुणे

    पुण्यातील एसटी कर्मचारी संघटनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

    पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यासंदर्भातले निवेदन कर्मचारी संघटनेचे सदस्य गजानन कच्छवे यांची माहिती

    शासनाच्या आडमुठ्या धोरणास विरोध करण्याकरिता आणि मागणीची पूर्तता होत नसल्याने 390 कर्मचारी आणि त्यांची कुटुंबीय हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार

  • 19 Nov 2021 07:30 AM (IST)

    पुणे शहरातील छोट्या उद्यानांपाठोपाठ मोठी उद्यानेदेखील डिसेंबर महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने खुली केली जाणार

    पुणे शहरातील छोट्या उद्यानांपाठोपाठ मोठी उद्यानेदेखील डिसेंबर महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने खुली केली जाणार

    लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर उद्यान विभागाने पुण्यातील २०४पैकी १३५ उद्याने नागरिकांसाठी आत्तापर्यंत खुली केलीत

    पु. ल. देशपांडे उद्यानही नोव्हेंबरअखेरीस नागरिकांसाठी सायंकाळी खुले होणार

    यामध्ये कात्रजचे राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पेशवे साहसी खेळ उद्यान, पु. ल. देशपांडे उद्यान, मुघल गार्डन आदीं मोठी उद्यानेही लवकरच खुली होणार

  • 19 Nov 2021 06:40 AM (IST)

    नागपूर अधिवेशनावरुन संभ्रम अजूनही कायम

    नागपूर अधिवेशनावरुन संभ्रम अजूनही कायम

    हिवाळी अधिवेशनाच्या कामाला लागतोय ब्रेक

    अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत

    7 डिसेंबर पासून होणार की।पुढे ढकलणार याची स्पष्टता अजूनही सरकार कडून झाली नाही

    त्यामुळे।अधिवेशन तयारी ची कामे करायची की नाही या दुविधेत प्रशासन

    आमदार निवास , रवी भवन , नाग भवन मध्ये अनेक कामाला सुरुवात झाली च नाही

    त्यामुळे नेमकं आशिवेशन नागपूर की मुंबई आणि केव्हा होणार याकडे लागले आहे लक्ष

Published On - Nov 19,2021 6:34 AM

Follow us
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.