Maharashtra News LIVE Update | रिसोड येथे गोडाऊनला भीषण आग, एकाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | रिसोड येथे गोडाऊनला भीषण आग, एकाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 22 Nov 2021 00:11 AM (IST)

  रिसोड येथे गोडाऊनला भीषण आग, एकाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

  वाशिम : जिल्ह्यातील रिसोड येथे सराफा लाईन परिसरातील एका गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील दोन जण भाजले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झालाय. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या आगीमुळे गोडाऊनमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. परीसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले व नंतर रिसोड येथील अग्निशमक दलाचे पाचारण करण्यात आले

 • 21 Nov 2021 22:58 PM (IST)

  संपूर्ण अकोला जिल्ह्यात कलम 144 लागू 

  अकोला : संपूर्ण अकोला जिल्ह्यात कलम 144 लागू

  आज रात्री 12 वाजतापासून ते 23 च्या रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हात 144 कलम लागू

  संपूर्ण जिल्हात दिवसा जमावबंदी तर

  अकोला आणि अकोटमध्ये रात्रीची संचारबंदी

  सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यास प्रतिबंध

  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

 • 21 Nov 2021 22:57 PM (IST)

  भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

  नागपूर : भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांचा राजीनामा

  – काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

  – काँग्रेसच्या तिकिटावर विधानपरिषद निवडणूक लढणार

  – गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये प्रवेशाची होती चर्चा

 • 21 Nov 2021 21:38 PM (IST)

  एसटी कामगारांच्या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा 

  बारामती : एसटी कामगारांच्या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा

  – सरकारने एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा

  – विलीणीकरणाच्या मागणीबाबतही विचार गरजेचा

  – माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला

  – माध्यमातून चुकीच्या पद्धतीने बातमी चालवली

  – राष्ट्रीय समाज पक्ष एसटी कामगारांच्या पाठीशी

  – माजी मंत्री तथा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा खुलासा

 • 21 Nov 2021 20:14 PM (IST)

  पालघरमध्ये विजांच्या कडकटासह अवकाळी पावसाची दमदार हजेरी 

  पालघर : विजांच्या कडकटासह अवकाळी पावसाची दमदार हजेरी

  पालघर तालुक्यातील केळवे आणि सफाळेच्या अनेक भागात दमदार पावसाची हजेरी

  केळवे येथील दांडा -खटाळी,केळवे बाजार, मांगेल वाडा परिसारत मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ

 • 21 Nov 2021 19:20 PM (IST)

  ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

  ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

  वयाच्या 58 व्या वर्षी घेतली अखेरचा श्वास

 • 21 Nov 2021 18:15 PM (IST)

  नांदेड, मालेगाव, अमरावती घटनेच्या निषेधार्थ उद्या भाजपचं राज्यभरात धरणे आंदोलन

  मुंबई : नांदेड, मालेगाव आणि अमरावतीमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या राज्यभरात भाजपचं धरणे आंदोलन

  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मविआ सरकारच्या विरोधात भाजप करणार आंदोलन

  उद्या पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

 • 21 Nov 2021 18:13 PM (IST)

  बावनकुळेंना 2 वर्षानंतर मिळालं, संघटनेची जबाबदारी आम्ही जास्त महत्वाची मानतो : चंद्रकांत पाटील

  मुंबई : पक्षावर नाराज असणाऱ्यांसाठी चंद्रकांत पाटलांच मोठं वक्तव्य

  बावनकुळेंना दोन वर्षानंतर मिळालं

  संघटनेची जबाबदारी आम्ही जास्त महत्वाची मानतो

  तावडेंची जबाबदारी खूप मोठी आहे

  पंकजांचं आणि विनोदजींचही होईल या वर्षभरात, खूप स्कोप आहे

  चंद्रकांत पाटलांच मोठं विधान

 • 21 Nov 2021 17:27 PM (IST)

  पंकजा मुंडेंबाबत चुकीचे अर्थ लावण्याचे कारण नाही- चंद्रकांत पाटील

  पंकजा ताईंचं असा कोणताही विषय नाही. त्यांना अखील भारतीय कामाच्या दृष्टीकोनातून त्यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून काम दिलेलं आहे. त्या खूप प्रवास करत आहेत. परवाच्या प्रदेश कार्यकारिणीला त्या पूर्ण दिवस उपस्थित होत्या. त्यामुळे चुकीचे अर्थ लावण्यात काही अर्थ नाही.

 • 21 Nov 2021 17:04 PM (IST)

  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी पळ काढला : एकनाथ खडसे

  जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चांगले उमेदवार असूनही सहकार क्षेत्रात टिकाव लागणार नसल्यामुळे गिरीश महाजन यांनी माघार घेवून पळ काढला अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली. तसेच यावर्षीही महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

 • 21 Nov 2021 16:52 PM (IST)

  रत्नागिरी जिल्हा बँक निवडणूक निकाल

  रत्नागिरी जिल्हा बँक निवडणूक निकाल

  रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील (विजयी) 33 विरूद्ध प्रल्हाद महादेव शेट्ये 8. एकूण 41

  लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रय आंबोळकर 16, विरूद्ध महेश रवींद्र खामकर (विजयी) 18
  एकूण 34

  गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी (विजयी) 13, विरूद्ध चंद्रकांत धोंडू बाईत 8
  एकूण 23

  दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गणेश यशवंत लाखण 10, विरूद्ध अजित रमेश यशवंतराव (विजयी) 25. एकूण 35

  नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज (विजयी) 66, विरूद्ध ॲड. सुजित भागोजी झिमण 56.

  मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते 48 (विजयी), विरूद्ध राकेश श्रीपत जाधव 45. एकूण 93

 • 21 Nov 2021 16:49 PM (IST)

  धुळ्यात आगारातून निघालेल्या 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या  

  धुळे : आज सकाळी धुळे आगारातून सोडण्यात आलेल्या 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या

  गेल्या चौदा दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

  परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना न जाणून घेता, बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

  तब्बल 14 दिवसांनंतर आज धुळे एसटी आगारातून लालपरी मार्गस्थ करण्यात आली होती.

  सकाळी पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये या बसेस आगाराबाहेर पडल्या होता. परंतु या बसेस आपल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना अज्ञातांनी या बसेसवर दगडफेक केली आहे.

  त्यामध्ये एक एसटी चालक जखमी देखील झाला असल्याची माहिती समोर आली आहे

 • 21 Nov 2021 13:17 PM (IST)

  हिंदूत्त्ववादी संघटनेशी संबंधित असलेल्यांवर मुद्दाम कारवाई केली जात आहे – देवेंद्र फडणवीस

  देवेंद्र फडणवीस

  – चुकीच्या घटनेचं लांगूनचालन होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही

  – भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अटक झालीय

  – जे लोकं नव्हती त्यांनाही अटक होत आहे

  – निष्पाप लोकांना पोलीस अटक करत आहे. ३०७ कलम लावत आहेत

  – अनेक लोकांवर एकतर्फी केसेस लावल्या जात आहेत. टार्गेट करुन केसेस होत आहेत

  – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लाखनीला गेलेल्यांच्या याद्या मागवून गुन्हे दाखल करत आहेत

  – हिंदूत्त्ववादी संघटनेशी संबंधित असलेल्यांवर मुद्दाम कारवाई केली जात आहे

  – पोलीसांना आम्ही मदत करायला तयार आहोत. राजकीय दबावात पोलीस एकतर्फी कारवाई करत असेल तर भाजप जेलभरो आंदोलन करणार

  – दबाव टाकून एकतर्फी कारवाई करण्याची बाब गृहमंत्र्यांना सांगणार

  – हनुमान नगर भागात पोलीस स्टेशनची मागणी आहे

 • 21 Nov 2021 13:15 PM (IST)

  फेक न्यूजच्या आधारावर मोर्चे कशे निघाले? याची चौकशी व्हावी – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस

  – अमरावती येथे झालेला घटनाक्रम दुर्दवी आहे

  – १२ तारखेला निघालेला मोर्चा चुकीचा होता

  – त्रापुरात न घडलेल्या घटनेचे मीम सोशल मिडियावर तयार करण्यात आला

  – त्रिपुरात अशी घटना घडली नाही, चुकीच्या फोटोवरुन हे तयार केले. समाजाला भडकवण्यात आला

  – १२ तारखेला निघालेले मोर्चे नियोजीत होते. याची चौकशी व्हावी.

  – फेक न्युज च्या आधारावर मोर्चे कशे निघाले? याची चौकशी व्हावी

  – हा संपूर्ण कट होता का? याची चौकशी व्हावी

  – १२ तारखेच्या मोर्चाला परवानगी होती का? किती लोकांची होती? कुणी परवानगी दिली? याची चौकशी व्हावी

  – यातून दंगा घडवायचा होता म्हणून एका विशिष्ट धर्माचे दुकानं फोडण्यात आली

  – १३ तारखेच्या हिॅसेचं समर्थन नाही. हे १२ तारखेची रिॲक्शन होती

  – पालकमंत्री, प्रशासन १२ तारखेची घटना डिलिट करत आहेत.

  – १२ तारखेच्या घटनेवर कुठलीही कारवाई नाही, एकंही नेता बोलत नाही

 • 21 Nov 2021 12:16 PM (IST)

  श्री संत निळोबाराय अभंग गाथा आणि निळोबाराय वाडा, मंदिर जीर्णोद्धार शुभारंभ

  अहमदनगर

  श्री संत निळोबाराय अभंग गाथा आणि निळोबाराय वाडा, मंदिर जीर्णोद्धार शुभारंभ

  दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी

  ज्यांनी दोन डोस घेतले नसतील त्यांनी घेऊन टाका

  सध्या अशांत वातावरण तयार करणं सुरू आहेय

  समाज्यात विघटन ,दुरी निर्माण करायचा काम देशात सुरू आहेय, त्याला कोणी बळी पडू नये

 • 21 Nov 2021 11:50 AM (IST)

  भारतीय नौदलाची ताकद वाढणार, INS विशाखापट्टनम काही वेळातच नौदलात दाखल होणार

  भारतीय नौदलाची ताकद वाढणार

  INS विशाखापटनम काही वेळातच नौदलात दाखल होणार

  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आईएनएस विशाखापटनम भारतीय सैन्यदलात दाखल होणार

  भारतीय बनावटीची आयएनएस विशाखापटनम नौदलाची ताकद वाढवणार

  केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईतल्या कार्यक्रम स्थळी दाखल

 • 21 Nov 2021 10:55 AM (IST)

  विश्रामगृहातील भाजपा नेत्यांची फडणवीसांसोबत बैठकी झाली

  अमरावती देवेंद्र फडणवीस दौरा

  – विश्रामगृहातील भाजपा नेत्यांची फडणवीसांसोबत बैठकी झाली

  – फडणवीस थोड्याच वेळात जखमी व्यापाऱ्यांशी संवाद साधणार

  – फडणवीस थोड्याच वेळात मसानगंज, हनुमाननगर, पठवा चौक या भागाची पाहणी करणार

  – देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महापौर चेतन गांवडे सह भाजप नेते उपस्थित

  – शहरातील पाहणी केल्यानंतर पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्याकडून आढावा घेणार

 • 21 Nov 2021 10:19 AM (IST)

  पालघरमध्ये वाळू माफियांचा धुडघुस

  पालघरमध्ये वाळू माफियांचा धुडघुस

  वैतरणा नदी पात्रात , हालोली येथील पाटील पाडा येथे सुरू आहे अवैध वाळू उपसा

  बेकायदा नदी पोखरून मोठ्या प्रमाणात वाळूचा सुरू आहे उपसा

  वाळू उपसा करणाऱ्या माफियांना पोलीस व महसूल प्रशासनाचे अभय

  महसूल आणि पोलीस प्रशासनाचा अवैध वाळू उपसाकडे दुर्लक्ष

  वैतरणा नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास वाळू मुंबईकडे ट्रकद्वारे वाहतूक

 • 21 Nov 2021 10:10 AM (IST)

  देवेंद्र फडणवीस अमरावतीत दाखल, सोबत चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित

  देवेंद्र फडणवीस अमरावतीत दाखल, सोबत चंद्रशेखर बावनकुळे आहेत

  अमरावतीच्या खासदार नवनित राणा देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेस्ट हाऊसला आल्याय

 • 21 Nov 2021 10:04 AM (IST)

  नवी दिल्ली सिंघू बॉर्डरवर पुन्हा एकदा शेतकरी संघटनांची बैठक

  नवी दिल्ली –

  नवी दिल्ली सिंघू बॉर्डरवर पुन्हा एकदा शेतकरी संघटनांची बैठक

  29 नोव्हेंबरला संसदेवर मोर्चा काढण्यावर शेतकरी ठाम

  किसान सभेच्या आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष

  कृषि विधेयक मागे घेतली तरी एम एस पी साठी शेतकरी आक्रमक

 • 21 Nov 2021 09:50 AM (IST)

  राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांध्यावर

  चंद्रपूर –

  राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांध्यावर

  शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करु

  अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी

  तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

 • 21 Nov 2021 09:49 AM (IST)

  धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी आज मतदान प्रक्रिया

  धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी आज मतदान प्रक्रिया

  मतदानला सुरुवात उमेदवारी बजावला आपला हक्क

  धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ मतदार संघातील 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया

 • 21 Nov 2021 08:53 AM (IST)

  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर

  – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर

  – हिंसाचारात जखमी झालेल्यांची फडणवीस घेणार भेट

  – दुकानांची तोडफोड झालेल्या परिसरात जाणार, व्यापाऱ्यांचीही घेणार भेट

  – अमरावती पोलीस आयुक्तांची घेणार भेट

  – १२:३० च्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

 • 21 Nov 2021 08:45 AM (IST)

  पुणे शहरात 10 महिन्यात 187 अपघातांची नोंद, 199 जणांचा मृत्यू

  पुणे

  पुणे शहरात 10 महिन्यात 187 अपघातांची नोंद तर 199 जणांचा अपघातात मृत्यू,

  रस्त्यावर सुरू असलेली खोदकामं, भरधाव वेगानं गाडी चालवताना नियंत्रण सुटणं अशा अपघातांची नोंद झालीये,

  1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर दरम्यान 199 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झालीये,

  शहरातील अपघातांच प्रमाण कमी व्हावं यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून विविध उपयाययोजना राबविण्यात येतायेत…

 • 21 Nov 2021 08:44 AM (IST)

  महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकांना लसीचे दोन डोस अनिवार्य

  महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकांना लसीचे दोन डोस अनिवार्य,

  सूचना देऊनही शिक्षक प्राध्यापकांनी लसीकरण न केल्यास वेतन कपात करणार उच्च शिक्षण विभागाचा इशारा,

  लसीचे डोस घेतला नसल्याची माहिती असल्यास संबंधित प्राध्यापकाला नोटीस दिली जाईल,

  आणि लस न घेतल्यास वेतन कपात करण्यात येईल..

  उच्च शिक्षण विभगाचा प्राध्यापकांना सुचित इशारा …

 • 21 Nov 2021 08:10 AM (IST)

  उत्तर आणि पूर्व नागपुरात उद्या पाणी पुरवठा नाही

  नागपुर –

  उत्तर आणि पूर्व नागपुरात उद्या पाणी पुरवठा नाही

  जलशुद्धीकरण केंद्राचे शट डाऊन आहे त्यामुळे राहणार पाणी पुरवठा बंद

  28 जलकुंभाचा राहणार पाणी पुरवठा बंद

  30 तासाचे शट डाऊन असल्याने महापालिका आणि ओसीडब्लू ने नागरिकांना पाणी जपून वापरण्याच केलं आवाहन

 • 21 Nov 2021 08:08 AM (IST)

  गेल्या महिना भरापासून नाशिक जिल्ह्यात अवैध मद्य तस्करांचा सुळसुळाट

  – गेल्या महिना भरापासून नाशिक जिल्ह्यात अवैध मद्य तस्करांचा सुळसुळाट

  – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून होतीये कारवाई

  – सातपूर परिसरातुन ही अवैध मद्य साठा केला जप्त

  – जळवळपास 30 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

  – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेलं मद्य येत कोणत्या मार्गी त्याचा शोध घेण्याची गरज

  – मद्य तस्करांचं मोठं रॅकेट असल्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाला संशय

 • 21 Nov 2021 08:07 AM (IST)

  कोल्हापूर तिरुपती विमानसेवा देखील आता दररोज

  कोल्हापूर

  कोल्हापूर तिरुपती विमानसेवा देखील आता दररोज

  1 डिसेंबर पासून होणार अंमलबजावणी

  कोल्हापूर विमानतळाची संचालक कमल कटारिया यांची माहिती

  सध्या आठवड्यातून चार दिवस आहे कोल्हापूर तिरुपती विमान सेवा

  मात्र प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसाद असल्याने आठवड्याचे सातही दिवस विमान सेवा देण्याचा प्रशासनाचा निर्णय

  कोल्हापूर मुंबईनंतर आता कोल्हापूर तिरुपती विमान सेवा देखील दररोज सुरू होणार असल्याने भाविक आणि व्यापाऱ्यांची होणार सोय

 • 21 Nov 2021 08:06 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याने केळीचा बाग केला भुईसपाट

  औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याने केळीचा बाग केला भुईसपाट

  औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या हिरडपुरी गावातील प्रकार

  शेतातल्या हिरवागार उभा केळीचा बगीचा केला भुईसपाट

  केळीला भाव मिळत नसल्यामुळे केला बगीचा भुईसपाट

  बागवान लोक आणि व्यापारी फसवत असल्यामुळे शेतकरी हवालदिल

  दोन एकर वरील केळीचा बगीचा केला भुईसपाट

 • 21 Nov 2021 08:05 AM (IST)

  सोलापुरातील ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावले

  सोलापुरातील ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावले

  जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून ढगाळ हवामान

  बहार धरलेल्या द्राक्षबागांवर या हवामानाचा विपरीत परिणाम

  मणी गळून पडण्याची शक्यता असल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत

 • 21 Nov 2021 08:05 AM (IST)

  सोलापूर बस स्थानकावरून दारूच्या नशेत चालकाने एसटी पळविली

  सोलापूर बस स्थानकावरून दारूच्या नशेत चालकाने एसटी पळविली

  विभाग नियंत्रकांच्या निवासस्थानाजवळ लावलेली 5030 एसटी गाडी नशेत आपल्या गावाकडे नेली

  दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्याच्या तेलगाव येथील गावात नेऊन लावले

  सोलापूर ते तेलगाव 52 किमी अंतर

  रात्री उशिराची घटना, फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये एसटीच्या अधिकार्‍यांनी दिली फिर्याद

 • 21 Nov 2021 07:00 AM (IST)

  पैठण आगारातून सुटलेल्या बसची तोडफोड

  औरंगाबाद –

  पैठण आगारातून सुटलेल्या बसची तोडफोड

  अज्ञात व्यक्तींनी केली तोडफोड

  पोलीस बंदोबस्तातील एसटी बसची केली तोडफोड

  बस आगारातून बाहेर निघताच राहटगाव फाट्यावर तोडफोड

  तोडफोडीनंतर बस पुन्हा आणली पैठण आगारात वापस

 • 21 Nov 2021 06:57 AM (IST)

  स्वच्छ शहराच्या रँकिंगमध्ये नागपूरचं रँकिंग घसरलं

  नागपूर –

  स्वच्छ शहराच्या रँकिंगमध्ये नागपूरचं रँकिंग घसरलं

  18 वरून 5 अंक घसरून 23 च्या क्रमांकावर गेलं

  घनकचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्याने झाली नाचक्की

  शहरात कचरा संकलनासाठी महापालिकेने दोन एजन्सी नेमल्या असताना सुद्धा झाली नाचक्की

 • 21 Nov 2021 06:55 AM (IST)

  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वाचायला आणि ऐकायला शिकवले – रोखठोक

  रोखठोक –

  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वाचायला आणि ऐकायला शिकवले

  कोणाच्या अंगी देव येतो,निघून जातो पण बाबासाहेबांच्या अंगी शिवशाहीचा इतिहास येत असे तो आयुष्यभर शरीराचा मनाचा भाग बनून राहिला

  बाबासाहेबांसारखा शिवभक्त होणे नाही

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI