Maharashtra News Live Update | ममता बॅनर्जी उद्यापासून मुंबई दौऱ्यावर, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दक्षिण आफ्रिकेवरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे चिंता वाढली आहे.

Maharashtra News Live Update | ममता बॅनर्जी उद्यापासून मुंबई दौऱ्यावर, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दक्षिण आफ्रिकेवरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे चिंता वाढली आहे. अशावेळी आता डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. तर, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेत कोरोनाच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, अशा सूचना प्रशासनला दिल्या आहेत. तसंच, पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावी लागतील, असं इशारावजा आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे. यासोबतच महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती पाहा एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 29 Nov 2021 21:27 PM (IST)

  ममता बॅनर्जी उद्यापासून मुंबई दौऱ्यावर, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

  मुंबई : ममता बॅनर्जी उद्यापासून मुंबई दौऱ्यावर

  3 दिवसांचा ममता यांचा मुंबई दौरा

  शरद पवार, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

  उद्या ममता बॅनर्जी मुंबईत दाखल होणार

 • 29 Nov 2021 19:45 PM (IST)

  विदेशातून आलेल्या लोकांची माहिती मागवण्यात आलीय : राजेश टोपे

  विदेशातून किती लोक आलेले आहेत, याची माहिती मागवण्यात आलेली आहे. प्रवाशांचे पासपोर्ट्स तपासायला हवे. बाहेर देशातून आलेल्या प्रवाशांवर नजर ठेवावी लागेल.

 • 29 Nov 2021 19:44 PM (IST)

  संस्था, उद्योग बंद करण्याचा कोणताही विचार नाही : राजेश टोपे

  आरटीपीसीआर चाचण्यांची जास्तीची उपलब्धता ठेवावी लागेल. आपल्या देशात ओमिक्रॉन हा व्हेरिएंट सापडलेला नाही. हा धोकादायक विषाणू असे समजून घाबरून जाण्याचे कारण नाहीये. अनलॉक अंतर्गत सुरु  करण्यात आलेल्या संस्था, उद्योग बंद करण्याचा कोणताही विचार नाही. आयसीएमआर राज्याला कळवेल त्या प्रमाणे आपण काम करु.

 • 29 Nov 2021 19:41 PM (IST)

  धोकादायक देशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात यावी- राजेश टोपे

  आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलत आहेत. ओमिक्रॉन हा नवा कोरोना विषाणू जास्त वेगाने पसरतो. तो किती पसरतो त्याची अद्याप माहिती आलेली नाही. या विषाणूसाठी ट्रिटमेंट प्रोटोकॉल काय असेल हे अजून आलेले नाहीये. जागतिक आरोग्य संघटनेने उपचार कसे करावे यासाठीची प्रोजिसर सांगण्यासाठी वेळ मागितला आहे. हाय रिस्क असलेल्या देशातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली पाहिजे. तसेच केंद्राल लिहू. धोकादायक देशातून येणाऱ्या प्रवाशांना काही नियमावली घालून देण्यात आलीय.

 • 29 Nov 2021 18:01 PM (IST)

  औरंगाबादेत राजेश टोपे यांच्यासह पाच मंत्र्यांच्याविरोधात तक्रार दाखल

  औरंगाबाद : राजेश टोपे यांच्यासह पाच मंत्र्यांच्याविरोधात तक्रार दाखल

  जाहीर कार्यक्रमात मास्क न वापरल्याप्रकरणी तक्रार दाखल

  औरंगाबाद बहुजन विकास आघाडीच्यावतीने तक्रार दाखल

  कोविड प्रतिबंधक नियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

  सिंचन विभागाच्या गौरव सोहळ्यात महाविकास आघाडीच्या पाच मंत्र्यांना पडला होता मास्कचा विसर

 • 29 Nov 2021 17:35 PM (IST)

  19 व्या इंटरनँशनल पुणे फिल्म फेस्टिव्हलला 2 डिसेंबरपासून होणार सुरुवात 

  पुणे : 19 व्या इंटरनँशनल पुणे फिल्म फेस्टिव्हलला 2 डिसेंबरपासून होणार सुरुवात

  फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी, इंग्रजी ,चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार

  ऑनलाईन झालेला फिल्म फेस्टिव्हल ऑफलाईन पद्धतीने होतोय

  2 ते 8 डिसेंबरदरम्यान चालणार पिफ फेस्टिव्हल

  50 टक्केच प्रेक्षक क्षमतेमध्येच पिफ करण्याचा विचार

  पिफचे अध्यक्ष जब्बार पटेल यांची माहिती

 • 29 Nov 2021 17:10 PM (IST)

  राज्यात आतापर्यंत 19 हजार 163 एसटी कर्मचारी कामावर हजर 

  मुंबई : राज्यात आतापर्यंत 19 हजार 163 कर्मचारी कामावर हजर

  अजूनही 73 हजार 103 कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी

  परिवहन मंत्र्यांचा आवाहनाला कर्मचाऱ्यांचा अल्प प्रतिसाद

  महामंडळाकडून निलंबनाच्या कारवाईला सुरुवात

  आतापर्यंत 6 हजार 497 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

 • 29 Nov 2021 17:04 PM (IST)

  गडचिरोलीत 4 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार

  गडचिरोली :यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित 30819 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30068 वर

  तसेच सध्या 4 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

  आतापर्यंत जिल्हयात एकूण 747 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

  जिल्हयात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.56 टक्के

  सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यूदर 2.42 टक्के झाला आहे

  आज कोरोनामुक्त झालेल्या 01 रुग्णामध्ये चामोर्शी तालुक्यातील 01, जणांचा समावेश आहे.

 • 29 Nov 2021 16:08 PM (IST)

  कृषी कायदे मागे घेताना राज्यसभेत गोंधळ, 12 खासदार निलंबित

  नवी दिल्ली : राज्यसभेच्या खासदारांचे निलंबन

  12 खासदार निलंबित

  सभागृहात गोंधळ घातल्याने कारवाई

  कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक मांडताना गोंधळ

 • 29 Nov 2021 13:46 PM (IST)

  १६ दिवस आमचे आमदार तिथे झोपले – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस –

  १६ दिवस आमचे आमदार तिथे झोपले

  सरकारने दोन पाऊलं पुढे घेतले

  म्हणून आमच्या आमदारांनी माघार घेत, सामंजस्यपणाची भूमिका घेतली

  मला आश्चर्य वाटतं, विरोधीपक्ष अनेकदा विरोधासाठी विरोध करतो, इतकी प्रगल्भता दाखवत नाही

 • 29 Nov 2021 13:43 PM (IST)

  पवार साहेब हे केंद्रीय यंत्रणांना इशारा देत आहेत – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस –

  पवार साहेब हे केंद्रीय यंत्रणांना इशारा देत आहेत

  जे काही आहे ते पुराव्यांच्या आधारे आहे

  कुणालाही विक्टिमाईज केलं जात नाहीये

 • 29 Nov 2021 13:42 PM (IST)

  रोज खोटं बोललं की ते खरं वाटू लागतं – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस –

  रोज खोटं बोललं की ते खरं वाटू लागतं

  त्यामुळे उत्तर द्यावंच लागतं

 • 29 Nov 2021 13:41 PM (IST)

  नवाब मलिक शेतकऱ्यांवर, अतिवृष्टीवर, रुग्णालयाला लागलेल्या आगीवर बोलले नाही – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस –

  नवाब मलिक शेतकऱ्यांवर, अतिवृष्टीवर, रुग्णालयाला लागलेल्या आगीवर बोलले नाही

  त्यांच्यासाठी मुद्दा कुठला ड्रग्ज आणि गांजा

  त्याच्याशी शेतकऱ्यांना काय घेणदेण

 • 29 Nov 2021 13:38 PM (IST)

  समजा आमच्या पक्षातील कोणी चूक केली असेल तर पुरावा द्या – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस –

  समजा आमच्या पक्षातील कोणी चूक केली असेल तर पुरावा द्या

  आम्ही देतोय ना पुरावा, माझ्याविरोधात असतील पुरावे तर द्या

  केंद्रीय यंत्रणेला द्या पुरावा ते काम करतील

  तुम्ही माझ्यावर कितीही शिंतोडे उडवा मी उत्तर देण्यास सक्षम आहे

  मी तक्रार करणार नाही

 • 29 Nov 2021 13:36 PM (IST)

  राज्यात काळ्या पैशातून कशाप्रकारे साम्राज्ये स्थापन झाली, हे सहन करायचं आपण, हे चालू द्यायचं – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस –

  किरीट सोमय्यांनी आरोप लावलेत ते खोटे निघाले का, ते खरे निघालेत

  राज्यात काळ्या पैशातून कशाप्रकारे साम्राज्ये स्थापन झाली, हे सहन करायचं आपण, हे चालू द्यायचं

  केवळ विरोधीपक्षावर आरोप करतात म्हणून हे सर्व साम्राज्य चालू द्यायचं

  जर पुरावे मिळत असतील तर एजन्सी शांत बसणार नाही, बसूही नये

  हा फक्त कांगावा आहे

 • 29 Nov 2021 13:30 PM (IST)

  आम्ही सर्व भ्रष्टाचार करु पण केंद्रीय यंत्रणांनी आमच्याकडे येऊ नये – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस –

  अनिल देशमुखांविरोधात त्यांच्याच कमिशनरने पत्र दिलं

  सीबीआय न्यायालयाने लावली

  या सरकाने सीबीआय चौकशीवर बॅन लावला

  जर तुम्ही पाक साफ असाल तर चिंता का

  हजारो कोटी रुपयांचे अॅसेट कशे सापडतात, टाटा, बिरला अंबानीकडे पैदा झालात का?

  400-500 रुपयांचे कॅश ट्रान्झक्शन कुठून सापडतात

  आम्ही सर्व भ्रष्टाचार करु पण केंद्रीय यंत्रणांनी आमच्याकडे येऊ नये

 • 29 Nov 2021 13:26 PM (IST)

  आग प्रतिबंधक गोष्टी लालफितीत अडकल्या आहेत – फडणवीस

  गुजरातमध्ये एखादी गोष्ट झाली म्हणजे ती महाराष्ट्रात समर्थनीय आहे का?

  पहिली आग लागली समजू शकतो दुसरी आग लागली, या सर्व आगीत गुजरातमध्ये काय मला माहीत नाही, या सर्व आगीत सरकारची चूक आहे

  आग प्रतिबंधक गोष्टी लालफितीत अडकल्या आहेत

  भंडाऱ्यात लहान बालके दगावल्यानंतरही दीड वर्ष तुम्ही कारवाई केली नाही

  मुख्यमंत्री जाऊन आल्यानंतरही चार वेळा मी तिथे गेलो

  आग प्रतिबंधक व्यवस्था तिथे नव्हती, आता थोड्या प्रमाणात आहे

  पण आताही आग लागली तर तीच परिस्थिती तयार होईल, प्रश्न हा आहे

  आग लागू शकते, पण आग लागते कशामुळे हे शोधून काढणार नाही

  प्रतिबंधात्मक उपाय करणार नाही तर त्याला तुम्ही जबाबदार आहात

 • 29 Nov 2021 13:25 PM (IST)

  दोन वर्षात रुग्णालयाला आगी लागून लोकं मरण्याची संख्या वाढली – फडणवीस

  आरोग्य व्यवस्था चांगली झाली म्हणजे नेमकं काय झालं

  या दोन वर्षात रुग्णालयाला आगी लागून लोकं मरण्याची संख्या वाढली, ही अभूतपूर्व आहे, ही चांगली आरोग्य व्य्वस्था आहे का या पूर्वी हे होत नव्हतं

  इतक्या मोठ्या प्रमाणावर आग लागल्यानंतर भावनिक आवाहन येतं आम्ही आग लागू देणार नाही

  पण पुढे काहीच होत नाही

  चार-चार घटना घडल्यानंतरही लालफित शाहीत अडकून ठेवत असाल तर योग्य नाही

  या सर्व व्यवस्थेला केंद्र सरकार कसं जबाबदार आहे

  पीएम केअर सेंटर कसं जबाबदार आहे

  व्हेंटिलेटर कसं जबाबदार आहे सांगितलं जात आहे

  हे जे काही आहे ना ते संकटाचं संधीत रुपांतर नाही तर संधी साधूंनी संकटाचं संधीत रुपांतर करून भरपूर पैसा कमावण्याचं काम आणि भ्रष्टाचार करण्याचं काम केलं

 • 29 Nov 2021 13:19 PM (IST)

  कोरोनाकाळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेत – फडणवीस

  देवेंद्र फडणवीस –

  ही संधी कुठली समजलं नाही

  कोरोनाकाळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेत

  देशात ३५ टक्के मृत्यू महाराष्ट्रातील

  ४० टक्के रुग्ण राज्यात, सर्वाधिक प्रसार राज्यात

  हे सगळं होत असताना तुम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही

  १२ बलुतेदारांना पैसे दिले नाही

  शेजारच्या छोट्या राज्यांनी तिथल्या १२ बलुतेदारांना पैसे दिले

  राज्य सरकारने शेतकऱ्यांना काहीही मदत केली नाही

  त्यामुळे संधीचं नेमकं काय केलं हे कळालं नाही

  पण या सरकारमध्ये संधीसाधू खूप पाहिले

 • 29 Nov 2021 13:16 PM (IST)

  ओमिक्रॉनबाबत अद्याप लॉकडाऊनची परिस्थिती नाही – फडणवीस

  ज्यावेळी जो निर्णय घेणं अपेक्षित आहे त्यावेळी निर्णय घ्यावा, आम्ही समर्थन दिलं आहे, ओमिक्रॉनबाबत अद्याप लॉकडाऊनची परिस्थिती नाही किंवा चर्चा नाही

  आपल्याकडे दोन्ही लसी घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दोन्ही लसी घेतल्या तरी कोरोना होतो पण जीवघेणा ठरत नाही

  दुसरी लस घेतली नाही हर घर दस्तक अंतर्गत केंद्र सरकार दोन्ही लसी देणार आहे, त्यामुळे फायदा होईल

  आता अर्थव्यवस्था खुली झाली आहे, अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे

  त्यामुळे पुन्हा निर्बंध येऊ नये म्हणून नागरिकांनी लसीकरणावर भर दिला पाहिजे

 • 29 Nov 2021 10:30 AM (IST)

  सरकार खुली चर्चा करण्यास तयार, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार – पंतप्रधान मोद

  पंतप्रधान नरेंद्र मोदी –

  आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन

  सरकार कृषी कायदे रद्द केल्याचा विधेयक मांडणार

  देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु

  संसदेचं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं

  सरकार खुली चर्चा करण्यास तयार

  प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार तयार आहे

  संसदेत देशहिताच्या चर्चा होतील

  संसदेत सकारात्मक निर्णय घेतले जातील

  संसदेत प्रश्न विचारा, पण शांततेत सर्व चर्चा होऊ द्या

 • 29 Nov 2021 10:21 AM (IST)

  कॅबिनेटची बैठक सुरु, मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे बैठकीला हजेरी

  कॅबिनेटची बैठक सुरु

  मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे बैठकीला हजेरी

 • 29 Nov 2021 10:19 AM (IST)

  महाराष्ट्र सरकारने शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत

  महाराष्ट्र सरकारने शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत

  शाळेत बायोमेट्रिक हजेरी न घेण्याच्या सूचना दिल्या

  ज्या शाळा कंटेनमेंट झोनमध्ये आहेत त्यांना त्या तात्काळ बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  मुलांना त्यांच्यामध्ये किमान 6 फूट अंतर ठेवण्यास सांगितले होते

  मुल एकत्र येतात असे खेळ खेळू नयेत असे सांगितले आहे

 • 29 Nov 2021 09:40 AM (IST)

  ज्यांनी लस घेतली त्यांना सौम्य लक्षणं आहेत – डॉ. राहुल पंडित

  ओमिक्रॉन टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित –

  दक्षिण आफ्रिकेत लस घेतलेल्यांमध्ये संसर्ग आहे

  ज्यांनी लस घेतली त्यांना सौम्य लक्षणं आहेत

  त्यामुळे लस घेणं गरजेचं आहे

  परदेशातून हा आपल्याकडे आहे, त्यामुळे प्रवाशांचे तपासणी महत्त्वाची, गेल्या १४ दिवसांत कुठे गेले हेही पाहावं लागेल

  क्वारंटाईन करणे गरजेच, आरटीपीसीआर गरजेचं

  शाळा सुरु करण्याबाबत घाईघाईत निर्णय घेऊ नये

 • 29 Nov 2021 09:09 AM (IST)

  नागपूरच्या उप्पलवाडीत अग्नितांडव, तीन गोदाम जळून खाक

  नागपूरच्या उप्पलवाडीत अग्नितांडव, तीन गोदाम जळून खाक

  नागपूरच्या उप्पलवाडी परिसरात मोठी आग लागली आहे

  प्लास्टिकच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे

  नागपूरच्या कामठी रोड परिसरात ही घटना घडली आहे

  भीषण आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे

  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत

  आगीत परिसरातील 3 गोदामं जळून खाक

 • 29 Nov 2021 08:54 AM (IST)

  पिंपरी चिंचवड शहरात आज कोरोना प्रतिबंधक लसीचे 31 हजार 800 डोस उपलब्ध

  – पिंपरी चिंचवड शहरात आज कोरोना प्रतिबंधक लसीचे 31 हजार 800 डोस उपलब्ध

  -कोव्हीशिल्ड लसीचे 29 हजार तर कॉव्हक्सीन लसीचे 2800 डोस उपलब्ध

  -शहरातील विविध 66 केंद्रावर होणार लसीकरण

 • 29 Nov 2021 08:18 AM (IST)

  आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा होण्याची शक्यता

  आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक

  कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा होण्याची शक्यता

  मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला रुग्णालयातून उपस्थिती लावणार आहे

  सकाळी १० वाजता ही बैठक सुरु होईल

 • 29 Nov 2021 07:37 AM (IST)

  नागपूर जिल्हयात सर्रास सुरु आहे रेतीची तस्करी 

  – नागपूर जिल्हयात सर्रास सुरु आहे रेतीची तस्करी

  – वलनी आणि रोहना रेतीघाटावरुन रेतीची तष्करी
  – पर्यावरनाचे मियम धाब्यावर बसवत पोखलॅंडने रेतीचा उपसा
  – राज्य सरकारच्या लाखो रुपयांच्या महसूलाची चोरी
  – महसूल विभागाच्या डोळ्यादेखत सुरु आहे रेती तष्करी
  – रेती स्टॅाकची परवानगी घेऊन रेतीची तष्करी
  – महसूल विभागाच्या भुमिकेवरंही प्रश्नचिन्ह?
 • 29 Nov 2021 07:37 AM (IST)

  पुण्यात मध्यरात्री नांदेड गावातील निर्मला हाईटमधील हॉटेल भावेशला आग

  पुणे

  मध्यरात्री नांदेड गावातील निर्मला हाईटमधील हॉटेल भावेशला आग

  पीएमआरडीए आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आग

  आगीत कोणतीही जिवीतहानी नाही

 • 29 Nov 2021 07:17 AM (IST)

  लोखंडी वस्तू म्हणून मजुराने हॅंडग्रेनेड जवळ ठेवला, नागपुरात खळबळ

  – नागपुरातील वैशालीनगरात मजुराजवळ आढळला हॅंडग्रेनेड

  – मजुराजवळ हॅंडग्रेनेड आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ

  – लोखंडी वस्तू म्हणून मजुराने हॅंडग्रेनेड जवळ ठेवल्याची माहिती

  – पोलिसांनी बॅाम्बनाशक पथकाच्या मदतीनं हॅंडग्रेनेड केला निष्क्रिय

  – रस्त्या खोदकाम करताना मजुराला आढळला होता हॅंडग्रेनेड

  – काही दिवस घरात ठेवल्यानंतर मजुर हॅंडग्रेनेड भंगारवाल्याला विकायला गेला

  – घाबरुन भंगारवाल्याने कपीलनगर पोलीसांना दिली माहिती

 • 29 Nov 2021 07:05 AM (IST)

  ओमीक्रोनचे संक्रमण रोखण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज

  – ओमीक्रोनचे संक्रमण रोखण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज

  – आंतराष्ट्रीय विमान प्रवास करून आलेल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला कळविणे बंधनकारक

  – प्रवास तपशिलाची माहिती लपविल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

  – कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

 • 29 Nov 2021 07:01 AM (IST)

  पुण्यासह राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा

  पुणे

  पुण्यासह राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा

  अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान

  त्यामुळे 30 नोव्हेंबर पासून पुढील तीन दिवस पुणे वेधशाळेने वर्तवली राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

  मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

 • 29 Nov 2021 07:00 AM (IST)

  पुणे जिल्ह्यातील जवळपास 443 गावांतील नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण केल्याने ही गावे 100 टक्के लसवंत

  पुणे

  पुणे जिल्ह्यातील जवळपास ४४३ गावांतील नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण केल्याने ही गावे १०० टक्के लसवंत

  वाढत्या लसीकरणामुळे जिल्ह्याचा कोरोनाबाधित आणि मृत्यूदरातही घट

  राज्यात लसीकरणाच्या बाबतीत पुणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर

  मुळशी तालुक्यातील १३४ गावे १०० टक्के लसीकरण

  तर वेल्हे तालुक्यात ५४, भोरमध्ये ४१, तर इंदापूर तालुक्यात ३८ गावात ही शंभर टक्के लसीकरण पूर्ण

  जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात सर्वात कमी लसीकरण

 • 29 Nov 2021 07:00 AM (IST)

  वातानुकूलित लोकलचा अनुभव आता हार्बरवासीयांनाही मिळणार आहे

  वातानुकूलित लोकलचा अनुभव आता हार्बरवासीयांनाही मिळणार आहे

  सीएसएमटी ते पनवेल मार्गावर १ डिसेंबरपासून वातानुकूलित लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या होतील.

  सामान्य लोकलच्या १२ फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

  याशिवाय मध्य रेल्वेने हार्बरवरील काही लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल केले असून त्यानुसार गोरेगाव व पनवेल प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे.

  प्रथमच गोरेगाव ते पनवेल लोकलही सोडल्या जाणार आहेत. त्याच्या १८ फेऱ्या १ डिसेंबरपासून होतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

  हार्बरवर अंधेरीपर्यंत होणाऱ्या लोकल फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. अशा ४४ लोकल फेऱ्यांचा समावेश आहे.

 • 29 Nov 2021 06:51 AM (IST)

  चंदगड तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह झोन मध्ये वाघाचे अस्तिव पुन्हा अधोरेखित

  कोल्हापूर

  चंदगड तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह झोन मध्ये वाघाचे अस्तिव पुन्हा अधोरेखित

  वाघाने केली जंगली प्राण्याची शिकार

  शिकार करताना वाघ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

  कंजर्व्हेशन रिझर्व्ह झोनमुळे जोडला गेलाय वाघांचा भ्रमण मार्ग

  भ्रमण मार्ग जोडल्याने वारंवार समोर येतंय वाघच अस्तित्व

 • 29 Nov 2021 06:23 AM (IST)

  मतदार फुटू नये म्हणून भाजपचे नागपूर महापालिकेतील नगर सेवक सहलीला रवाना

  नागपूर विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजारमध्ये आपले मतदार फुटू नये

  घोडेबाजार होऊ नये या साठी भाजप ने आखली रणनिती

  नागपूर महापालिकेतील नगर सेवक सहलीला रवाना

  26 नगर सेवक गोव्यासाठी रात्री 1 वाजताच्या फ्लाईटने गोव्यासाठी रवाना झाले

  बाकी नगर सेवक उद्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाणार

 • 29 Nov 2021 06:19 AM (IST)

  अनधिकृत फेरीवाल्याचा अधिकाऱ्यावर हल्ला

  भाईंदर पश्चिम बॉम्बे मार्केटजवळ रस्त्यावर बसत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करता गेलेल्या पथक अधिकाऱ्यावर हल्ला

  एका फेरीवाल्याने चक्क लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे

  या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Published On - 6:15 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI