Maharashtra News LIVE Update | ममता बॅनर्जी यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडलेला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra News LIVE Update | ममता बॅनर्जी यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडलेला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडलेला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच असल्याचं बच्चू कडू म्हणाले. यसोबतच महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 01 Dec 2021 16:05 PM (IST)

  मुंबई

  ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपली सिव्हर ओकवर एक तास चालली बैठक राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित

 • 30 Nov 2021 21:22 PM (IST)

  आदित्य ठाकरे बाईट

  – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत – जेव्हाही मुंबईच्या दौऱ्यावर येतात त्यावेळेस आम्ही त्यांची भेट घेत असतो – आमच्यात एक वेगळे नाते आहे – आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, ओपचारिक चर्चा या बैठकीत झाली – दोन्ही राज्यामध्ये चांगलं संवाद आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट त्यांना घ्यायची होती मात्र मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही

 • 30 Nov 2021 18:54 PM (IST)

  अजित पवार

  ओमिक्रॉनच्या विषाणूंचा संसर्ग पाहता नियम पाळण्याचं उपमुख्यमंत्र्यांच आवाहन

  नवीन विषाणू पुढे आलाय, देशपातळीवर आढावा बैठक घेतली आहे

  मुख्यमंत्री जरी आजारी असले तरी त्यांनी जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त यांची बैठक घेतली आहे

  आम्ही लक्ष ठेवून आहोत

  तुम्ही जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते

  उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नागरिकांना इशारा

  त्यामुळे मास्क वापरा

  जे वापरत नसतील त्यांना सांगा

 • 30 Nov 2021 18:48 PM (IST)

  पुणे

  आज राज्यभरात 610 एसटी कर्मचारी निलंबित,

  तर 80 जणांच्या सेवा केल्या समाप्त,

  आतापर्यंत एकुण 8 हजार 196 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई,

  तर 1827 जणांच्या सेवा केल्या समाप्त

 • 30 Nov 2021 18:48 PM (IST)

  अजित पवार

  जिल्ह्यात एक कार्यक्रम होता त्यामुळे थांबावं लागलं त्याबद्दल दिलगिरी

  अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका अशा 45 जणांना आपण गौरविण्यात येणार आहे,

  आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरी समाजानं आपल्या पाठीवर कौतुकाची थाप दिली कि आपला हूरूप वाढतो कामाचं चीज होतं असं वाटतं

  प्रेरणा देणारा काम आहे,

  45 जणांना देतोय मात्र इतरांनीही काम कराव त्यांनाही मिळेल, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतो,

  ज्यांना मिळाल त्यांनी चांगल काम करावे,

  संत गाडेगबाबा ग्रामस्वच्छता अभियाआनात 25 लाख रुपये मिळायचे, त्यामधूध काही गावात चांगल काम झालं,

  मात्र काही ठिकाणी झालं नाही,

  आपण शौचालयांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली..

  पुढच्या वाटचालीकरीता त्यांना शुभेच्छा

  या भगिनींच्या कामात कुटुंबियांचा मोठा वाटा त्यांनाही मी शुभेच्छा देतो,

  20 21 वर्ष आपलं कोरोनाच्या लढाईत गेलं,

  या भगिनींनी आपलं या लढाईत मोठं योगदान दिल

  त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो

  अंगणवाडी म्हटलं की तुटपूंजा पगार होता,मंत्रालयात मंत्री आणि सचिव जरी बसून काम करत असले तरी भगिनी, आशा वर्कर योगदान देत असतात,

  यावर त्यां योजनेचं यश अवलंबून असतं,

  आपला कारभार लोकाभिमुख झाला पाहिजे असं आपण म्हणतो मात्र ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी मन लावून काम केलं पाहिजे,

  महाविकास आघाडीचा हा सत्कार आहे

  खूप अडचणी येतात,

  नवीन विषाणू पुढे आलाय, देशपातळीवर आढावा बैठक घेतली आहे,

  मुख्यमंत्री जरी असले तरी बैठक घेतवी आहे,

  आम्ही लक्ष ठेवून आहोत,

  तुम्ही जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकतो,

  त्यामुळे मास्क वापरा ..

  जे वापरत नसतील त्यांना सांग

  राज्याचा गाडा हा भगिनी चालवत असतात

  जिल्हा परिषदेत 30 ते 33 टक्के आरक्षण आणलं,

  काही जणांनी खूप आढेवढे घेतले

  मात्र आता चित्र बदललंत्र, 50 टक्के आरक्षण दिलंय,

  निर्णय प्रक्रियेत सहभाग घ्यायला मिळतेय,

  अलीकडच्या काळात सेवक म्हणून घ्यायचं ही फँशन निघालीये,

  सेवक म्हणून घ्यायचं मात्र काही करायचं नाही,

  यामध्ये पुरुषांच प्रमाण जास्त आहे

  iIMP

  बारामतीरून बांद्याला जाताना हेलिकॉप्टर महिला पायलट होती,

  मात्र ती महिला होती जेव्हा तीनं जहूवरून निघाली तेव्हा तीनं बिघाडं आहे असं जाणवलं

  आणि तिनं हेलिकॉप्टर खाली घेतलं महिला होती म्हणून खाली घेतलं

  नाहीतर गडी असता तर मला तसंच वर नेलं असतं असं म्हणताच सभागृहात हशा पिकला

  शरद पवार संरक्षणमंत्री असताना महिलांना संरक्षण क्षेत्रात संधी दिली,

  तेव्हा काही म्हणाले की महिला विमान चावलत असतात का ?

  मात्र इतर राष्ट्र वाकडी नजर करून बघतात

  मात्र अशा क्षेत्रात महिलांना संधी मिळाली..

  ज्यांना पुरस्कार मिळालाय त्यांना उपमुख्यमंत्र्यांकडून पुरस्कार मिळालाय असं लोक म्हणतील

  त्यांनी चांगल काम करावं,

  पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो,

 • 30 Nov 2021 18:46 PM (IST)

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 78 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ – दिवसभरात 84 रुग्णांना डिस्चार्ज – पुणे शहरात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01 – 97 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 506699 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 824 – एकूण मृत्यू – 9103 -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 496772 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 3869

 • 30 Nov 2021 18:44 PM (IST)

  शिर्डी

  साईबाबा संस्थान नुतन विश्वस्त मंडळाला कारभार पाहण्याची परवानगी… राज्य सरकारने नेमलेल्या अध्यक्ष व विश्वस्तांना दिलासा…. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी… राज्य सरकारने नेमलेल्या मंडळाचे उच्च न्यायालयाने अधिकार गोठवले होते.. या विरोधात संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या याचिकेवर सुनावणी… अनेक दिवसांपासुन निवड होऊन ही कारभार करता येत नसल्याने केली होती याचिका दाखल… साई संस्थानचा कारभार पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय…

 • 30 Nov 2021 18:20 PM (IST)

  नाशिक

  लोका शिकवी ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण

  मालेगावात अनेक नगरसेवकांचेच लसीकरण नाही..

  लसीकरण न झाल्याने महापालिकेची सभा ऑनलाईन घेण्याची नामुष्की

  आरोग्य विभागाकडून नगरसेवकांच्या लसीकरणाची माहिती गोळा करण्याचे काम सुरू

 • 30 Nov 2021 18:04 PM (IST)

  ममता बॅनर्जी यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

  मुंबई

  ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं

  बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते. मी मंदिर समितीला, ट्रस्टीचे आभारी आहे. पंडित, गुरुजी आणि महाराष्ट्र सरकारचे आभारी आहे

  उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात आले. मला इथे येऊन बरे वाटले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. मी खूप आनंदी आहे जय मराठा, जय बांग्ला

 • 30 Nov 2021 17:46 PM (IST)

  सोलापूर

  उद्यापासून बातमी शहरातील प्राथमिक शाळा सुरू होणार

  प्रशासन अधिकारी यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर उशिरा घेतला पालिका आयुक्तांनी निर्णय

  शहरातील 368 प्राथमिक शाळा उद्या पासून सुरू होणार

  सकाळी 11 वाजता सुरू होणार पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शाळा

  पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढले शाळा सुरु होण्याबाबतचे  आदेश

 • 30 Nov 2021 17:43 PM (IST)

  औरंगाबाद

  जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचं निधन

  आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाले निधन

  औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

  भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामात घेतला होता सहभाग

  वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने झाले निधन

  भारतीय स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया च्या माध्यमातून गोर गरिबांसाठी केलं होतं मोठं कार्य

  भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही केलं होतं काम

 • 30 Nov 2021 17:19 PM (IST)

  नवी दिल्ली

  वेगळ्या विदर्भाचा कुठलाही प्रस्ताव नाही – केंद्र सरकारकडून लोकसभेत उत्तर

  केंद्राकडून लेखी उत्तरावर स्पष्टीकरण

  विदर्भवादी नेते काय भूमिका घेणार ?

 • 30 Nov 2021 17:19 PM (IST)

  कराड

  कराड आटपाडी एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक

  दगड फेकीत एसटी बसच्या मागील काचांचे नुकसान कोणीही जखमी नाही

  सुरली घाटातून बस कराड ओगलेवाडी जवळ आल्यानंतर अज्ञाताने मागून केली दगडफेक

  एसटी बस सांगली आटपाडी आगराची

  कराड तालुका पोलिसांकडुन दगडफेक करणार्याचा शोध सुरु

 • 30 Nov 2021 17:19 PM (IST)

  बुलडाणा

  रविकांत तुपकर सह कार्यकर्त्यांना जमानात मंजूर,

  जिल्हा न्यायालयाचा निकाल,

  प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जात मुचालक्यावर दिली जमानात,

  बुलडाणा पोलिसांनी केली होती आज सकाळी अटक,

  अन्नत्याग आंदोलन दरम्यान केली होती तोडफोड आणि जाळपोळ

 • 30 Nov 2021 17:18 PM (IST)

  नागपूर

  नागपुरातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत च्या शाळा 10 डिसेंबर पर्यंत सुरू होणार नाही,

  महापालिका आयुक्तांची माहिती

  कोरोनाच्या नवीन व्हेरिएन्ट च्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय,

  10 तारखे नंतर आढावा घेऊन घेतला जाणार निर्णय

  महापालिका हद्दीतील शाळा 10 डिसेंबर नंतर शाळा सुरू होण्याची शक्यता

 • 30 Nov 2021 16:19 PM (IST)

  पुणे

  शिवाजी नगर डेपोतील एसटी चालक अत्ता बापू मारुती गडसुल यांना हृदयविकाराचा झटका

  निलंबनाची ऑर्डर दिल्याने आला ह्रदयविकाराचा झटका आल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणं

  उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं दाखल

 • 30 Nov 2021 15:43 PM (IST)

  पुणे

  ओमिक्रॉनच्या धास्तीनं 1 तारखेपासून सुरू होणारं राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पडलं लांबणीवर,

  प्राणिसंग्रहालय सुरु न करण्याच्या महापालिकेच्या सूचना,

  1 तारखेपासून सुरु होणारं होतं प्राणिसंग्रहालय,

  मात्र महापालिकेनं सुरू करण्यास दिला नकार…

 • 30 Nov 2021 15:18 PM (IST)

  पुणे विभागात दूपारपर्यंत 22 एसटी कर्मचाऱ्यांच निलंबन,

  कालपर्यंत 414 कर्मचाऱ्यांच झालं होतं निलंबन,

  आजही कारवाई सुरुच,

  महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन….

  मात्र कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम .

 • 30 Nov 2021 15:09 PM (IST)

  नवी दिल्ली

  नवी दिल्ली प्रचंड गोंधळामध्ये लोकसभेचे कामकाज सुरू

  विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

  वुई वॉन्ट जस्टीसचे सभागृहात जोरदार नारे

 • 30 Nov 2021 15:07 PM (IST)

  नवाब मलिक ऑन सोमय्या

  वरतून म्हणजे अमित शहांचे आदेश होते का हे सौमय्या यांनी स्पष्ट करावं

  अमरावतीची दंगल भाजपने घडवून आणले, त्यासाठी बाहेरून माणस आणली होती

  ऑन चंद्रकांत पाटील

  निराशेतून चंद्रकांत पाटील काहीही बोलत आहेत

  आमची तीन पक्षाची आघाडी कधीही संपणार नाही

  हे खरं आहे की भाजप हा मोठा पक्ष होता, एक फुगा होता

  सर्व आयात केलेले होते, आता हळूहळू त्यातली हवा कधी निघून जाईल हे त्यांना कळणार नाही

 • 30 Nov 2021 14:50 PM (IST)

  नवी दिल्ली 

  नवी दिल्ली विरोधी पक्षांची पुन्हा एकदा बैठक

  संध्याकाळी पाच वाजता होणार बैठक

  बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता

  खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावली बैठक

  12 खासदारांच्या निलंबनाबाबत होणार पुन्हा चर्चा

 • 30 Nov 2021 14:50 PM (IST)

  नवाब मलिक

  * ममता बॅनर्जी उद्या तीन वाजता सिल्व्हर ओक ला येऊन पवारांना भेटणार. * मुख्यमंत्र्यांना भेटण्यास कोणालाही परवानगी नाही. त्यामुळे ममता बॅनर्जींची भेट होणे अवघड. * कॉंग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधे दुरावा निर्माण होत असेल तर शरद पवार तो दुर करतील.

 • 30 Nov 2021 14:49 PM (IST)

  नागपूर

  नागपूर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी देशांतर्गत सर्व प्रवाशांचे लसीकरण आवश्यक असेल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक असेल, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.

  कोणत्याही संमेलनासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या 1 हजारांपेक्षा अधिक असल्यास स्थानिक प्रशासनास त्याची माहिती देणे अनिवार्य.

  नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये 500 इतका दंड, संस्थांना किंवा आस्थापनांना 10,000 रुपये दंड.

  सार्वजनिक बंदिस्त स्थळी कार्यक्रमात एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती तर उघड्या जागी ( लॉन, मैदान) क्षमतेच्या 25 टक्के उपस्थिस असणार परवानगी..

 • 30 Nov 2021 14:49 PM (IST)

  किरीट सोमय्या प्रेस

  शनी मंदिराच दर्शन घेतलं; मारुतीच दर्शन घेतलं,पुजारीशी बोललो…

  महिलांशी बोललो,तेथील महिलांनी जे वर्णन केले ते ऐकून भीती वाटते..

  दंगलखोर यांनी महिलांवर हला करन्याचा प्रयत्न केला.

  जर बाळासाहेब असते तर हे दगेखोर यांनी असे केले नसते..

  उध्वव ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या विचारांचा विश्वासघासत केला..

  93 मध्ये महिलांना वाचवण्यासाठी बाळासाहेब पूढ आले होते..

  13 तारखेचा हिंसाचारचा हिशोब मागता;12 तारखेचा हिशोब कोण देनार।।।

  12 तारखेचा हिंसाचाराला पोलिसांनी परवानगी दिली होती का..

  हिंदू मंदिराची पूजा करणाऱ्या पुजाराच्या हत्येचा प्रयत्न झाला..

  आज बाळासाहेब नसेल पण आम्ही तेव्हा हिंदूना वाचवन्यासाठी एकत्र होतो..

  हिंदूवर कर पुढे हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची राहील….

  घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी मी अमरावती ला आलो आहे.

  ठाकरे सरकार चे घोटाळे काढण्याची माझ्यावर जबाबदारी आहे.

  28 मोठे घोटाळे मी बाहेर काढले आहे..

  31 डिसेंबर 40 घोटाळे जनतसमोर आणणार आहे.

  चार मोठे मंत्री यांच्या तक्रारि मी विविध संस्थान केल्या आहे..

  दोन शिवसेनेचे आहे.यापैकी एक मुख्यमंत्री मित्र परिवारतील सदस्य आहे..

  विदर्भातील काँग्रेसच्या एका मंत्र्याची फाईल तयार आहे….

  एक मंत्री राष्ट्रवादीचे त्यात राहणार आहे..

  उद्या मी जालना ला जाणार आहे.अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांना लुटले…

 • 30 Nov 2021 14:30 PM (IST)

  सांगली 

  एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यास सुरुवात

  कामावर हजर झालेल्या कर्मचार्यांचे निलंबन मागे

  आतापर्यंत 380 कर्मचाऱ्यांचे एस्टीकडून निलंबन

  आजअखेर 139 कर्मचार्यांचे निलंबन मागे

  139 कर्मचारी कामावर हजर झाल्याने निलंबन मागे

  सांगलीच्या एसटी प्रशासनाकडून माहिती

 • 30 Nov 2021 11:13 AM (IST)

  नियमांप्रमाणे परमबीरांवर कारवाई होईल – दिलीप वळसे पाटील

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

  नियमांप्रमाणे परमबीरांवर कारवाई होईल

  परमबीर सध्या दाखल गुन्ह्यांवर जबाब देत आहेत

  राज्य सरकार आणि सीबीआय आपलं काम करत आहेत

  परमबीर-वाझे भेटीच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत

  परमबीर सिंग यांनी कुठलाही पदभार हाती घेतलेला नाही

  त्यांनी राज्य सरकारला त्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही

 • 30 Nov 2021 10:14 AM (IST)

  कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईला पुन्हा सुरुवात

  कोल्हापूर

  कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईला पुन्हा सुरुवात

  मध्यवर्ती बस स्थानक परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी सकाळपासून सुरू झाली दंडात्मक कारवाई

  जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर महापालिका कर्मचारी कारवाईसाठी पुन्हा रस्त्यावर

  दंड भरू न शकणाऱ्या लोकांना काढायला लावल्या उठाबशा

 • 30 Nov 2021 09:10 AM (IST)

  एसटी आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर, कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रशासनाची तयारी

  नाशिक – एसटी आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर

  एसटी कर्मचाऱयांना बडतर्फ करण्याची प्रशासनाची तयारी

  सलग तिसऱ्या दिवशी 25 कर्मचाऱयांना नोटीस

  तब्बल 24 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

  आतापर्यंत 306 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

  तर 22 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई

 • 30 Nov 2021 08:43 AM (IST)

  पंढरपूर तालुक्यात  वाळूसाठी माफियांनी काढले पुळूज बंधाऱ्याची दारे

  सोलापूर-

  पंढरपूर तालुक्यात  वाळूसाठी माफियांनी काढले पुळूज बंधाऱ्याची दारे

  बंधारा रिकामा झाल्यास दहा ते पंधरा गावातील शेतीच्या पाण्याचा  प्रश्न  होणार निर्माण

  बंजारा तरुण ठेवलेल्या पाण्यामुळे भीमा नदीतील वाळू उपसा करता येत नसल्यामुळे माफियांचे कृत्य

  वाळू उपशासाठी दारे काढून पाणी सोडून दिल्याचे आले समोर

  एकाबाजूला वीज वितरण कंपनीची वसुली मोहीम आणि त्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू असताना

  वाळूतस्करांनी बंधारे मोकळे करण्याचा सुरू केला आहे प्रयत्न

  संबंधितांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करणार असल्याची प्रशासनाची माहिती

 • 30 Nov 2021 08:42 AM (IST)

  नवी दिल्लीत आज काँग्रेस पक्षाची बैठक

  नवी दिल्लीत आज काँग्रेस पक्षाची बैठक

  सकाळी दहा वाजता बैठक

  बारा खासदारांच्या निलंबनाबाबत होणार चर्चा

  काँग्रेससह विरोधी पक्ष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार ?

  बैठकीला तृणमूल काँग्रेस अनुपस्थित राहणार

 • 30 Nov 2021 08:36 AM (IST)

  मंदिर आणि दर्ग्यातल्या दानपेट्या चोरणाऱ्यांना अटक

  पुणे

  मंदिर आणि दर्ग्यातल्या दानपेट्या चोरणाऱ्यांना अटक

  पाच मंदिरात शिरून चोरल्या दानपेट्या

  पोलीस हवालदार नामदेव रेणुसे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरटे जेरबंद

  पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने या चोरत्यांकडून आणले चार गुन्हे उघडकीस

  चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद

 • 30 Nov 2021 08:11 AM (IST)

  सोलापूर ग्रामीण भागात पाच पेक्षा जादा लोक एकत्र येण्यास बंदी

  सोलापूर ग्रामीण भागात पाच पेक्षा जादा लोक एकत्र येण्यास बंदी

  शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून 12 डिसेंबर 2021 च्या रात्री 8 वाजेपर्यंत बंदी

  पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळता ग्रामीण भागात राहणार बंदी

  महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3 ) अनुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी केले आदेश जारी या आदेशानुसार पाच किंवा पाचपेक्षा जागा लोक एकत्र येण्यास बंदी

 • 30 Nov 2021 08:10 AM (IST)

  सरसंघचालक मोहन भागवत आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर

  कोल्हापूर

  सरसंघचालक मोहन भागवत आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर

  उद्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहांच कणेरी मठ येथे चिंतन शिबीर

  शिबिरात मोहन भागवत करणार मार्गदर्शन

  भागवत यांचं आज सायंकाळी चार वाजता होणार कोल्हापूर विमानतळावर आगमन

  पाच वाजता घेणार करवीर निवासिनी अंबाबाई दर्शन

  आज कणेरी मठ येथील सिद्धगिरी गुरुकुलम उपक्रमाला लावणार हजेरी

 • 30 Nov 2021 07:28 AM (IST)

  जिल्ह्यात नो मास्क नो एन्ट्री मोहीम होणार पुन्हा कडक

  कोल्हापूर –

  जिल्ह्यात नो मास्क नो एन्ट्री मोहीम होणार पुन्हा कडक

  ओमायक्रॉन च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची खबरदारी

  जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यंत्रणांची बैठक

  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला लसीकरणाचाही आढावा

  लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या ही सूचना

 • 30 Nov 2021 07:19 AM (IST)

  नागपूर विधानपरिषद निवडणुकीतील भाजपचे 334 मतदार सहलीला

  – नागपूर विधानपरिषद निवडणुकीतील भाजपचे 334 मतदार सहलीला

  – भाजपचे 334 मतदार सहलीला गेल्याने काँग्रेसच्या हाती कुणी लागेना

  – 334 मतदार सहलीला गेल्याने भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे निश्चिंत

  – काँग्रेसकडून घोडेबाजार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याने भाजपचे सावध पावलं

  – सहलीला गेलेले भाजपचे मतदार 9 डिसेंबरला रात्री परतणार

  – नागपूर विधानपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी 256 मतांची गरज

  – विजयासाठी लागणारे मतदार पर्यटनाला गेल्याने भाजप निश्चिंत

 • 30 Nov 2021 07:18 AM (IST)

  ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिका झाली सज्ज

  औरंगाबाद –

  ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिका झाली सज्ज

  औरंगाबाद शहरात 20 ठिकाणी स्वब कलेक्शन सेंटर सुरु

  रेल्वे स्टेशन, विमानतळसह 20 ठिकाणी स्वब कलेक्शन सुरु

  बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान या पर्यटन स्थळावरही स्वब कलेक्शन सुरु

  बाहेर गावावरून शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी सुरु

  परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर महापालिका ठेवणार विशेष लक्ष

 • 30 Nov 2021 06:54 AM (IST)

  सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

  सोलापूर –

  सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

  एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम

  रोजच्या साडेतीनशे हुन अधिकच्या फेऱ्या रद्द

  लांब पल्ल्याच्या प्रवाशांना घ्यावा लागत आहे खासगी वाहनांचा आधार

 • 30 Nov 2021 06:41 AM (IST)

  आयर्मन स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

  नाशिक –

  आयर्मन स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

  – चिंतेत पडलेल्या पालिका प्रशासनाला दिलासा

 • 30 Nov 2021 06:18 AM (IST)

  रावसाहेब दानवे यांनी सहकाऱ्यांसोबत लुटला बॅडमिंटनचा आनंद

  दिल्ली –

  रावसाहेब दानवे यांनी सहकाऱ्यांसोबत लुटला बॅडमिंटनचा आनंद

  खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास

  खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका निभावतो

  बॅडमिंटन खेळतांनाच व्हिडिओ केला फेसबुकवर शेअर

 • 30 Nov 2021 06:17 AM (IST)

  राज ठाकरेंच्या नव्या ‘शिवतीर्थ’त  पाहुण्यांच्या सदिच्छा भेटीचा सिलसिला सुरूच

  राज ठाकरेंच्या नव्या ‘शिवतीर्थ’त  पाहुण्यांच्या सदिच्छा भेटीचा सिलसिला सुरूच

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांची रविवारी ‘शिवतीर्थ’त लंच डिप्लोमसी

Published On - 6:14 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI