Maharashtra News LIVE Update | भाजप नेत्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी का होत नाही? एकनाथ खडसे यांचा सवाल

| Updated on: Oct 01, 2021 | 10:45 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | भाजप नेत्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी का होत नाही? एकनाथ खडसे यांचा सवाल
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Oct 2021 09:01 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये उद्या भेट होणार

    पुणे :

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये उद्या पुणे विमानतळावर भेट होणार

    सकाळी 9 वाजता दोघांची भेट होणार

    पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भात होणार दोघांमध्ये चर्चा

  • 01 Oct 2021 07:26 PM (IST)

    भाजप नेत्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी का होत नाही? एकनाथ खडसे यांचा सवाल

    भाजप नेत्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी का होत नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा सवाल, मास्तरांच्या मुलाची 1 हजार कोटींची संपत्ती कशी? एकनाथ शिंदे यांचा रोख गिरीश महाजनांकडे असल्याची चर्चा

  • 01 Oct 2021 07:12 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 8 नवे कोरोनाबाधित, दहा जणांची कोरोनावर मात

    नागपूर :

    नागपुरात आज 8 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    शून्य मृत्यू , तर 10 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्ण संख्या - 493311

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 483120

    एकूण मृत्यू संख्या - 10120

  • 01 Oct 2021 06:47 PM (IST)

    मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी सईद खानची ईडी कोठडी 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवली

    भावना गवळी मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी सईद खानची ईडी कोठडी 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सईद खान हा भावना गवळी यांचा निकटवर्ती आहे. एनजीओचं रुपांतर व्यवसायात केल्याचा आरोप सईद खानवर आहे.

  • 01 Oct 2021 06:36 PM (IST)

    चेहऱ्यावर मास्कचा वापर, सामाजिक अंतर बंधनकारक, ठाण्यात धार्मिक स्थळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

    ठाण्यात धार्मिक स्थळे सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  ठाणे महानगरपालिका हद्दीत कोविड 19 सकारात्मक दर (Positivity rate) व ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर (Oxyzen Bed Occupancy) विचारात घेऊन नवीन सुधारित मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :

    अ) ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळे दि.०७/१०/२०२१ संबंधित धार्मिक स्थळांचे विश्वस्त / मंडळ / प्राधिकरण यांनी नेमून दिलेल्या वेळेत कोरोना पासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली राहतील. ब) अशा धार्मिक स्थळी जाताना चेहऱ्यावर मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, थर्मल स्कॅनिंग, हॅण्डवॉश किंवा सॅनिटायझर ची व्यवस्था करणे बंधनकारक राहील.

    क) शासनाकडील  सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल.

  • 01 Oct 2021 06:17 PM (IST)

    सिंहगडावर VIP असो किंवा VVIP असो कुणाचेही वाहन वर येणार नाही : अजित पवार

    अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    आढावा बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मला सांगितलं की, आपण एकदा सिंहगडावर जाऊ त्यानुसार आम्ही आज आलो सिंहगडावर ट्राफिक होतं, त्यामुळे इलेक्ट्रिक बसचा पर्याय, आज पीएमपीएलच्या ट्रायल बेसबर आज आम्ही आलो वेगवेगळ्या टपऱ्या आहेत, कुणीही कशाही पद्धतीने टपऱ्या लावल्या आहेत. त्यामुळे बकालपणा आलाय, आम्हाला त्यांच्या रोजी रोटीवर परिणाम होऊ द्ययाचा नाही, त्यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही सध्या 71 स्टोल आहे पण चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू

    अतिक्रमण झाले असतील तर ती काढली जाणार, गेस्ट हाऊस चुकीच्या पद्धतीने झालंय ते काढून टाकू राज्यात किल्ले गड सर्वाधिक आहे, ते कसं जतन करता येतील याचा प्रयत्न पर्यावरणाचा विचार करून पर्यटनाच्या दृष्टीने सिंहगडाचा विकास होणार

    VIP असो किंवा VVIP असो कुणाचे वाहनवर येणार नाही

    सुरक्षिततेच्या दृष्टीने किती सीटची बस असावी याचा विचार करून निर्णय आजूबाजूच्या गावातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा उद्देश गडावर आणखी झाडं लावण्याचा प्रयत्न

  • 01 Oct 2021 06:11 PM (IST)

    शरद पवारांची पुण्यातील सारथीच्या बैठकीला अचानक हजेरी

    पुण्यामध्ये विधान भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सारखीच या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक हजेरी लावली आहे. पुण्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या सारथीच्या इमारतीची माहिती घेण्यासाठी खुद्द शरद पवार उपस्थित राहिले.या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,

    सारथीचे अधयक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते.गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला सारथी संस्थेचा जागेचा प्रश्न अखेर सुटला असून, शासनाने सारथी संस्थेला शिवाजीनगर, भांबुर्डा येथील गट क्रमांक 1737 /1 मधील 4163 चौ.मी शासकीय जागा कार्यालय बांधण्यासाठी प्रदान केली आहे. यामुळे आता सारथी संस्थेला हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे सादरीकरण शरद पवारांना दाखवण्यात आले.सारथीसंबंधीत इतर प्रलंबित विषय त्वरीत मार्गी लावून तळागाळातील मराठा समाजासाठी सारथी संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करावी, या मागणीसही सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना शरद पवार यांनी सूचना केल्या.

  • 01 Oct 2021 06:01 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

    अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी हिंगोली जिल्हा दौरऱ्यावर

    दुपारी 01 ते सायंकाळी 5.00 पर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त भागाची करणार पाहणी

  • 01 Oct 2021 04:55 PM (IST)

    हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात

    हिंगोली : जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात

    दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरू

    शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

  • 01 Oct 2021 04:54 PM (IST)

    बीडमधील शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन मागे

    बीड: शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन मागे

    परळीचे तहसीलदार घटनास्थळी दाखल

    शेतकऱ्यांची मागणी संदर्भात प्रशासनाला काळविण्याचे आश्वासन

    शेतकऱ्यांनी आंदोलन घेतलं मागे

  • 01 Oct 2021 03:37 PM (IST)

    खासदार भावना गवळींना वर्षांवर नो एन्ट्री, अर्धा तास वाट बघून, गवळी वर्षावरून परतल्या

    मुंबई : खासदार भावना गवळींना वर्षांवर नो एन्ट्री

    अर्धा तास वाट बघून, गवळी वर्षावरून परतल्या

    अर्धा तास भावना गवळी वर्षा बंगल्यावर वाट बघत होत्या

    भावना गवळी सध्या ईडीच्या रडावर आहेत

    गवळी भेट घेण्यासाठी गेल्या होत्या वर्षा बंगल्यावर

  • 01 Oct 2021 03:36 PM (IST)

    शेतकरी संघर्ष समितीचे परळी तालुक्यातील पोहनेर येथे जलसमाधी आंदोलन, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

    परळी: ओला दुष्काळ जाहीर करा

    शेतकरी संघर्ष समिती आक्रमक

    परळी तालुक्यातील पोहनेर येथे जलसमाधी आंदोलन

    आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी

  • 01 Oct 2021 02:40 PM (IST)

    प्रियसीचे ऐकून मोबाईलवर स्टेटस ठेवले, अल्पवयीन प्रियकराला नातेवाईकांची मारहाण

    सोलापुर -

    प्रियसीचे ऐकून मोबाईल स्टेटस ठेवणे अल्पवयीन प्रियकराला पडले महागात

    मुलीच्या नातेवाईकांनी अल्पवयीन प्रियकराला केली मारहाण

    पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पवयीन  मुलाची बालसुधारगृहात रवानगी

  • 01 Oct 2021 11:46 AM (IST)

    सोयाबीन तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचा टेम्पो उलटला, 1 महिलेचा मृत्यू, 10 जखमी

    चंद्रपूर -

    सोयाबीन तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचा टेम्पो उलटला

    1 महिला ठार तर 10  जखमी

    चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील महाकाली नगर जवळ रात्री झाला अपघात

    गंभीर जखमींना गडचिरोली सामान्य रुग्णलयात भरती

    सर्व मजूर जिल्ह्यातील उपरी येथील रहिवासी, लताबाई टिकाराम थोराक 55 रा. उपरी मृत महिलेचे नाव,

  • 01 Oct 2021 10:58 AM (IST)

    6 ऑक्टोबरला राष्ट्रवादीची बैठक, शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक

    6 ऑक्टोबरला राष्ट्रवादीची बैठक

    शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक

    राष्ट्रवादीचे सगळे मंत्री बैठकीला उपस्थित राहणार

    पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा पवार आढावा घेणार

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांनी बैठकीला हजर राहण्याचे निर्देश

    6 ऑक्‍टोबरला मुंबईत बैठक होण्याची शक्यता

  • 01 Oct 2021 10:57 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत स्वर्णीम विजय दिन सोहळा

    पुणे -

    - उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत स्वर्णीम विजय दिन सोहळा

    - विधानभवन परिसरात कार्यक्रमाचे आयोजन

    - कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त उपस्थित

    - थोड्याच वेळात अजित पवार कार्यक्रमस्थळी येणार

    - एव्हीआयवरुन लाईव्ह फ्रेम चेक करा

  • 01 Oct 2021 10:57 AM (IST)

    अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

    औरंगाबाद -

    अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

    नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचं शेतातल्या पाण्यात लोटांगण आंदोलन

    औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या धामोरी गावात लोटांगण आंदोलन

    अनेक शेतकरी शेतात साचलेल्या पाण्यात उतरून घालतायत लोटांगण

    पाऊस उघडून चार दिवस उघडले तरी शेतात साचलय पाण्याचं तळ

    अजूनही पीक विमा कंपन्या आणि सरकार कडून पंचनामे होत नसल्यामुळे शेतकरी संतप्त

  • 01 Oct 2021 10:56 AM (IST)

    सर्वसामान्यांना पुन्हा गॅस दरवाढीचा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी सिलेंडरचे दर पुन्हा वाढवले

    सर्वसामान्यांना पुन्हा गॅस दरवाढीचा झटका

    पेट्रोलियम कंपन्यांनी सिलेंडरचे दर पुन्हा वाढवले

    व्यवसायिक सिलेंडर त्रेचाळीस रुपयांनी वाढले

    19 किलोचे सिलिंडर दिल्लीत 1736 रुपयांना मिळणार

    आजपासून नवे दर लागू होणार

  • 01 Oct 2021 10:56 AM (IST)

    नवी दिल्ली मुख्यमंत्री चन्नी नवी दिल्लीत येणार

    नवी दिल्ली मुख्यमंत्री चन्नी नवी दिल्लीत येणार

    पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांचा आज दिल्ली दौरा

    काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता

    पंजाब काँग्रेस मधील दुसरा अध्याय आज काय असणार ?

    राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

    सिद्धूच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच दिल्लीत येणार

  • 01 Oct 2021 10:55 AM (IST)

    पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला, राष्ट्रपतींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

    नवी दिल्ली

    पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला

    राष्ट्रपतींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

    राष्ट्रपती भवनात जाऊन मोदींकडून शुभेच्छा

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज वाढदिवस

    पुष्पगुच्छ देऊन मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छा

  • 01 Oct 2021 09:16 AM (IST)

    राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे आणि शरद पवार एकाच मंचावर

    अहमदनगर

    राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे आणि शरद पवार एकाच मंचावर

    एकमेकांचे राजकीय विरोधक येणार एकाच मंचावर

    लोकसभेला सुजय विखेना जागा सोडण्यावरून पवारांनी केला होता विरोध

    केंद्र सरकारच्या कामांच्या भूमीपूजन सोहळ्यात शरद पवार तर रोहित पवारांच श्रेय, सुजय वीखे नाराज असल्याच्या चर्चा

  • 01 Oct 2021 09:15 AM (IST)

    विविध मागण्यांसाठी मोर्चा डॉक्टरांचा संप सुरु

    लातूर -

    विविध मागण्यांसाठी मोर्चा डॉक्टरांचा संप सुरू

    राज्याच्या मार्ड संघटनेने पुकारला आहे एक दिवसाचा संप

    कोव्हीड भत्ता मिळाला पाहिजे, शैक्षणिक शुल्क माफ झाले पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी एक दिवसाचा संप

    अत्यावश्यक वार्डातील डॉक्टर वगळता 58 डॉक्टर संपामध्ये सहभागी

  • 01 Oct 2021 08:23 AM (IST)

    नागपुरात पोलिसांनी सुरू केली भयमुक्त मोहीम

    नागपुरात पोलिसांनी सुरू केली भयमुक्त मोहीम

    भरोसा सेलच्या माध्यमातून निर्माण करणार महिला व तरुणींसाठी भयमुक्त वातावरण

    भरोसा सेल आणि गुन्हे शाखा राबविणार खास मोहीम

    पाचही झोन मध्ये गस्त वाढवून निर्जन स्थळ , उद्यान वर विशेष लक्ष केलं जाणार केंद्रित

    महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार

  • 01 Oct 2021 08:22 AM (IST)

    नाशकात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

    नाशिक

    - बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

    - शिवन्या बाळू निंबेकर या चिमुरडीचं नाव

    - अवघ्या 5 वर्षीय शिवन्यावर,घराच्या पडवीत घातली बिबट्यानं झडप

    - तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून धावत आले घरातील सदस्य

    - गंभीर जखमी शिवन्याला नेले सरकारी दवाखान्यात

    - मात्र,रस्त्यातच तिचा झाला मृत्यू

    - गिरनारेजवळील वाडगावची घटना

    - वन्यजीव सप्ताहाच्या पूर्वसंध्येला घडलेली दुर्दैवी घटना

    - वनअधिकाऱ्यांनी घेतली घटनास्थळी धाव

    - या भागात लावला पिंजरा,गस्त सुरू

  • 01 Oct 2021 08:21 AM (IST)

    नाशकातील कळवणमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

    नाशिक -

    कळवणमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

    पायी चालणाऱ्या इसमाच्या गळ्यातील सोन्याचा गोफ चोरांनी लांबवला

    चोरी करून चोरटे फरार

    घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद..

    चोरांचा शोध सुरू

  • 01 Oct 2021 08:20 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकं येणार

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकं येणार

    5 ऑक्टोबर रोजी हे पथक कोल्हापुरात येण्याची शक्यता

    केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आठ सदस्याचा पथकात समावेश

    तब्बल 3 महिन्यांनंतर केंद्रीय पथक येणार असल्याने नेमकी कशाची पाहणी करणार असा सवाल..

  • 01 Oct 2021 08:20 AM (IST)

    लसीकरणाडे दुर्लक्ष करणे गावातील लोकप्रतिनिधींच्या येणार अंगलट

    कोल्हापूर

    लसीकरणाडे दुर्लक्ष करणे गावातील लोकप्रतिनिधींच्या येणार अंगलट

    सरपंचांचा ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाईची शक्यता

    ग्रामपंचायत अधिनियम 39 चा वापर करून सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू

    गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला मिळतोय अल्प प्रतिसाद

    जिल्ह्यातील सात लाख लोकांचं आजून ही लसीकरण नाही

    डोस उपलब्ध मात्र दुसरी लाट ओसरल्यानं नागरिकांकडून फिरवली जाते पाठ

    ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींच्या सहभागाची आवश्यकता

  • 01 Oct 2021 08:20 AM (IST)

    राज्यातील 12 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर

    सोलापूर - राज्यातील 12 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर

    आजपासून अधिकृत प्रक्रिया सुरू

    जिल्ह्यातील 148 संस्थांचा यामध्ये समावेश

    कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 2019 मध्ये संपले असले तरी आल्या होत्या पुढे ढकलण्यात

  • 01 Oct 2021 08:19 AM (IST)

    करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्था आता पोलिसांच्या ताब्यात

    कोल्हापूर

    करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्था आता पोलिसांच्या ताब्यात

    नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

    घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील मंदिर खुली होत असल्यानं अंबाबाई मंदिरात गर्दीची शक्यता

    संभाव्य गर्दीचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून केले जाणार

    नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी संबंधित यंत्रणांची उद्या बैठक होणार

    नवरात्र उत्सव काळातील देवीचा पालखी सोहळा मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीतच करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार

  • 01 Oct 2021 08:19 AM (IST)

    राज्यात दुसऱ्या टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक आजपासून सुरू

    पुणे -

    - राज्यात दुसऱ्या टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक आजपासून सुरू,

    - ज्या सहकारी संस्थांवर प्रशासक कार्यरत आहेत त्या संस्थांच्या निवडणुकांचाही समावेश दुसऱ्या टप्प्यात,

    - राज्यात एकूण 14 हजार 739 सहकारी संस्थांच्या निवडणुका या टप्प्यात होणार,

    - पुढील दोन महिन्यांत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.

  • 01 Oct 2021 08:18 AM (IST)

    तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंकावती तिर्थकुंड अखेर सरकारचेच, जिल्हा भुमी अधीक्षक यांचा आदेश

    उस्मानाबाद

    तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंकावती तिर्थकुंड अखेर सरकारचेच, जिल्हा भुमी अधीक्षक यांचा आदेश

    तुळजापूर येथील भाजपचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी यांनी बनावट कागदपत्रे करून केले होते कुंड हडप

    तिर्थकुंड ची नोंद सरकारच्या नाववर घेऊन संबंधित घोटाळेबाज कर्मचारी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश

    रोचकरी यांच्या अडचणीत वाढ, सध्या ते 25 ऑगस्टपासून उस्मानाबाद जिल्हा कारागृहात

  • 01 Oct 2021 08:18 AM (IST)

    महिला प्रवाशी असल्यास रात्री एसटी बसचे लाईट सुरु राहणार

    - महिला प्रवाशी असल्यास रात्री एसटी बसचे लाईट सुरु राहणार

    - महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळांचा निर्णय

    - महिला प्रवाशांच्या मागणीनुसार सुरु राहणार लाईट

    - समाजकंटकाकडून बसमध्ये अंधाराचा गैरफायदा घेत छेडखानीच्या प्रकाराला आळा बसणार

    - महिला संघटनांकडून एसटी महामंडळाच्या निर्णयाचं स्वागत

  • 01 Oct 2021 08:17 AM (IST)

    अंबरनाथ शहरावर पसरली धुक्याची दाट चादर, दृष्यमानता 50 फुटांपेक्षाही कमी

    अंबरनाथ :

    अंबरनाथ शहरावर पसरली धुक्याची दाट चादर

    दृष्यमानता 50 फुटांपेक्षाही कमी

    अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच अंबरनाथमध्ये इतकं गडद धुकं

  • 01 Oct 2021 08:14 AM (IST)

    कोरोना ॲंटीबॅाडीज तपासण्यासाठी नागपुरात ‘सिरो सर्वेक्षण’ सुरु

    - कोरोना ॲंटीबॅाडीज तपासण्यासाठी नागपुरात ‘सिरो सर्वेक्षण’ सुरु

    - ‘सिरो सर्वेक्षणा’त आतापर्यंत ७५० जणांचे घेतले नमुने

    - सिरो सर्वेक्षणात ६ ते १० वयोगटातील ६४० मुलांचा समावेश

    - सर्वेक्षणात ४०८० जणांचा होणार सहभाग

    - ॲाक्टोबर शेवटपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार

    - ॲाक्टोबरच्या शेवटी कळेल नागपुरात किती जणांना ॲंटीबॅाडीज

  • 01 Oct 2021 08:13 AM (IST)

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात न्यायालयात 13 पुरावे सादर

    - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात न्यायालयात 13 पुरावे सादर,

    - घटनास्थळाचा पंचनामा, मृत्यूचे कारण, मृत्यूची वैद्यकीय सूचना, न्यायवैद्यक प्रयोगशाळांचे अहवाल, दोन लॅपटॉप आणि कागदपत्रांच्या पुराव्यांचा समावेश,

    - खटल्याशी संबंधित कागदपत्रांची यादी सीबीआयने न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सादर केलीत,

    - या गुन्ह्यात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात आली.

  • 01 Oct 2021 08:13 AM (IST)

    जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 3 फुटांनी उघडले

    जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 3 फुटांनी उघडले

    धरणातून 56 हजार क्यूसेक्स ने विसर्ग सुरू

    धरणात अवाक वाढल्यामुळे विसर्ग वाढवला

    गोदावरी नदी पत्रात पूरस्थिती कायम

  • 01 Oct 2021 06:50 AM (IST)

    मोकाट गाईचा 20 जणांवर हल्ला, कोल्हापुरतील राजारामपुरीतल्या शाहूनगर मधील घटना

    कोल्हापूर

    मोकाट गाईचा 20 जणांवर हल्ला

    कोल्हापुरतील राजारामपुरीतल्या शाहूनगर मधील घटना

    हल्ल्याची घटना सीसीटिव्हीत कैद

    महिला आणि लहान मुलांना गायीने केले लक्ष

    गाई कडून वाहनधारकांनावर ही हल्ल्याचा होतोय प्रयत्न

    राजारामपुरी परिसरात भीतीच वातावरण

    शहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी

  • 01 Oct 2021 06:49 AM (IST)

    वसमत तालुक्यातील पुर्णा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाची नोटीस

    हिंगोली- वसमत तालुक्यातील पुर्णा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाची नोटीस

    86 कोटींचा आयकर थकल्या संदर्भात नोटीस

    पूर्णा सह इतर 60 साखर करखान्यानां नोटीस

Published On - Oct 01,2021 6:29 AM

Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.