Maharashtra News LIVE Update | नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदी, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांचे आदेश

| Updated on: Sep 11, 2021 | 12:00 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदी, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांचे आदेश
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Sep 2021 05:08 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 241 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

    पुणे : दिवसभरात २४१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २३९ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. – २१४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९७८५३. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२२४. – एकूण मृत्यू -८९६९. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८६६६०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८३२९.

  • 10 Sep 2021 05:06 PM (IST)

    भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

    बारामती : भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला पोलिसांनी घेतलं ताब्यात – साताऱ्यात पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई – स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी घेतलं मनोहर भोसले याला ताब्यात – पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांची माहिती – मनोहरमामाच्या अटकेची प्रक्रिया सुरु

  • 10 Sep 2021 03:40 PM (IST)

    पत्रकारांना धक्काबुक्की ही अतिशय निषेधार्थ घटना : देवेंद्र फडणवीस

    मुंबईत पत्रकार धक्काबुक्की प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया :

    - अतिशय निषेधार्थ घटना - पत्रकार त्यांचं काम नियमांचं पालन करून करत होते, त्यांच्याकडे पासही होते - दंडुकेशाही योग्य नाही, कारवाई व्हायला पाहिजे - दंडुकेशाहीवर कायदा आणि सुव्यवस्था राखणं योग्य नाही - हे सरकार माध्यमांवर दबाव टाकत आहे, माध्यमांवर गुन्हे दाखल होत आहेत, अशा घटना लोकशाहीचा गळा दाबायचा प्रकार सरकार करत आहे संबंधितांवर कारवाई करा आणी चौकशी करा

  • 10 Sep 2021 03:38 PM (IST)

    काँग्रेसचे सोलापूरचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल

    सोलापुर :-

    काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल

    धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काल स्वीकारला होता काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार

    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश असताना गर्दी करून नियम भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    भांदवि 143, 188, 269, 336 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (बी) सह भारतीय साथरोग अधिनियम 1897 चे कलम 3 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल

    शहर आयुक्तालयाच्या जेल रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  • 10 Sep 2021 06:32 AM (IST)

    कोकणात गणपती उत्सवासाठी कोकणी माणूस सज्ज

    कोकणात गणपती उत्सवासाठी कोकणी माणूस सज्ज झाला आहे. गणपती विराजमान होणार आहेत. मात्र आज पासूनच गणपती घरी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्त दिसत आहेत. सध्या कोरोनामुळे अनेकजण वाहनांमधून गणपती बाप्पा गणपती करखान्यांमधून भाविकांच्या घरी घेऊन निघाले आहेत.

    कोकणातील बहुसंख्य नागरिक मुंबईला आहेत. मात्र, आपल्या गावी गणपती आणण्यासाठी आपले काम धंदे बाजूला ठेवून वेळा त वेळ काढून गावी येतातच.

  • 10 Sep 2021 06:29 AM (IST)

    'आला आला माझा गणराज आला', राज्यभरात गणेशोत्सवाची धूम

    आपले लाडके बाप्पाला घेण्यासाठी लोक घरातून निघाले आहेत पण कोव्हिड प्रोटोकॉल पालन होताना दिसत नाही. विना मास्क संख्या जास्त आहे. लोकांना असे वाटत आहे की मुंबईमधून कोरोना निघून गेला आहे. कारखान्या जवळ लोकांची मोठ्या संख्येने गर्दी पहायला मिळत आहे. सांताक्रुज मानखुर्द अंधेरी या ठिकाणांवरुन लोक आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन निघालेले आहेत. हा उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रमध्ये साजरा केला जातो. कोरोना आजार वाढल्यामुळे कमी लोक हा वर्षी बाप्पाला स्थापित करत आहे. पण जे कारखाने आहे तेथे मोठ्या संख्येन लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. कुठल्या प्रकारचे कोरोना प्रोटोकॉल पालन होताना दिसत नाही. त्याच्यामुळे कोरोना वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published On - Sep 10,2021 6:17 AM

Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.