Maharashtra News LIVE Update | सिडको कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | सिडको कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 16 Sep 2021 20:09 PM (IST)

  अमरावती : मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणावर पर्यटनाला जाणे जीवावर बेतलं

  अमरावती :

  मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणावर पर्यटनाला जाणे जीवावर बेतलं

  सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात ४० वर्षीय युवक वर्धा नदी पात्रात पाय घसरून वाहून गेला

  प्रफुल अशोक वाकोडे रा.शिरजगाव बंड असं वाहून गेलेल्या इसमाच नाव

  वाकोडे कुटुंब अप्पर वर्धा धरणावर गेलं होतं पर्यटनाला

  अप्पर वर्धा धरणाचे ७ गेट उघडल्याने धरणावर पर्यटकांची तुफान गर्दी

  वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरू

 • 16 Sep 2021 19:23 PM (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 28 नवे कोरोनाबाधित रुग्ण

  उस्मानाबाद जिल्ह्यात आज 28 नवीन रुग्ण सापडले तर 49 रुग्ण बरे झाले

  आज 1 हजार 480 नमुने तपासले त्यापैकी 28 पॉझिटिव्ह म्हणजे दर हा 1.89 %

  उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 514 कोरोना रुग्णवर उपचार सुरू

 • 16 Sep 2021 18:16 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 215 नवे कोरोनाबाधित रुग्ण

  पुणे :
  दिवसभरात २१५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात १६१ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.
  – १८८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९८८८२.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १९०८.
  – एकूण मृत्यू -८९९०.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८७९८४.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९४२०.

 • 16 Sep 2021 18:12 PM (IST)

  सिडको कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

  नवी मुंबई :

  सिडको कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

  सिडको भवनमध्ये प्रवेश नाकारल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते नाराज

  पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक

  आज संध्याकाळी 5.30 ला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सिडको कार्यालयात होणार बैठक

  पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

 • 16 Sep 2021 17:22 PM (IST)

  महाराष्ट्राने संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवला : मुख्यमंत्री

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या भाषणातील मुद्दे :

  मला सहकार क्षेत्राची कल्पना नाही. पण संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणारा महाराष्ट्र राज्य आहे. या क्षेत्रात सर्वसामान्य माणूस हा मूळ आहे. हे क्षेत्र तळागळात रुजलेलं आहे. या क्षेत्राला समृद्धीसाठी मदत करणं, थोडसं पाणी करणं हे सरकारचं काम आहे. राज्याची समृद्धीचं घटक हे सहकार क्षेत्र आहे. त्यामुळे त्याच्यात सुधारणा आणि त्याचं वैभव कसं होईल, हे पाहणं सरकारचं कर्तव्य आहे.

 • 16 Sep 2021 16:58 PM (IST)

  वर्धा नदीतील झुंज येथील बोट अपघात प्रकरण, 11 जणांचे मृतदेह सापडले

  अमरावती :

  वर्धा नदीतील झुंज येथील बोट अपघात प्रकरण

  अखेर शेवटचा आणि अकरावा मृतदेह शोधण्यात बचाव कार्याला यश

  बोट दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू

  तीन दिवसांपासून सुरू होती शोद मोहिम, 60 पेक्षा अधिक जवानांकडून शोधकार्य

  आज एकूण 8 मृतदेह सापडले

  प्रशासनाने थांबवले शोधकार्य

 • 16 Sep 2021 15:54 PM (IST)

  नागपुरात अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

  नागपूर :

  नागपुरात अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

  नागपुरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील घटना

  बलात्कार करणाऱ्या आरोपीला बेड्या

 • 16 Sep 2021 14:47 PM (IST)

  चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या

  कोल्हापूर –

  चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या

  करवीर तालुक्यातील कणेरीमधील धक्कादायक घटना

  कोमल शशिकांत चव्हाण असे मृत महिलेचे नाव

  पती शशिकांत चव्हाण याला केलं अटक

  पत्नीची हत्या करून आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

 • 16 Sep 2021 14:39 PM (IST)

  नागपूर पोलिसांनी दिलं एका महिलेला आणि बाळाला जीवदान

  नागपूर –

  नागपूर पोलिसांनी दिलं एका महिलेला आणि बाळाला जीवदान

  गरोदर मतिमंद महिला वेदनेने तडफडत फिरत होती रस्त्यावर

  ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांनी तिला पोहोचवले रुग्णालयात

  रुग्णालयात दाखल होताच, महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

  आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित

  महिलेच्या परिवाराला शोधून केलं त्यांच्या हवाले

  मतिमंद असल्याने महिला रात्रीच्या वेळी गेली होती घरातून निघून

  पोलिसांच्या तत्परतेने महिला पोहोचली रुग्णालयात

 • 16 Sep 2021 14:38 PM (IST)

  समुद्रात पोहण्याचा मोह अंगलट, रत्नागिरी जवळच्या गणपतीपुळे इथं दोन पर्यटक बुडाले

  रत्नागिरी – पर्यटकांना समुद्रात पोहण्याचा मोह आला अंगलट

  रत्नागिरी जवळच्या गणपतीपुळे इथं दोन पर्यटक बुडाले

  दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश

  बुडालेले पर्यटक साताऱ्याचे, पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना

 • 16 Sep 2021 12:54 PM (IST)

  मनोहरमामाच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

  बारामती :

  – मनोहरमामाच्या पोलीस कोठडीत वाढ

  – न्यायालयाने ठोठावली तीन दिवसांची पोलीस कोठडी

  – दोन आरोपी फरार असल्याने आणि तपास पूर्ण झाला नसल्याने पोलिस कोठडी वाढवली

 • 16 Sep 2021 11:52 AM (IST)

  मंडणगड जवळच्या पंणदूरी घाटात रस्त्यावर दरड कोसळली, माहरळ रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

  रत्नागिरी – मंडणगड जवळच्या पंणदूरी घाटात रस्त्यावर दरड कोसळली

  दरड कोसळल्यामुळे मंडणगड माहरळ रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

  दरड कोसळली मुळे 7 गावांचा संपर्क तुटला संपर्क तुटला

  आताच गणपती साठी आलेले मुंबई कर या दरडी मुळे आडकले

  बांधकाम विभागाची टीम घटनास्थळी

 • 16 Sep 2021 11:51 AM (IST)

  नाशकात मतदार याद्यांमध्ये 2 लाख 87 हजार दुबार मतदार

  नाशकात मतदार याद्यांमध्ये 2 लाख 87 हजार दुबार मतदार

  मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणूका घेऊ नका

  शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

  मतदार याद्यांमधल्या दुबार मतदारांमुळेचं भाजपचे तीन आमदार विजयी

  बडगुजर यांच्या आरोपामुळे सेना-भाजप वाद चिघळला

 • 16 Sep 2021 11:50 AM (IST)

  मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यासाठी करमाळा पोलीस बारामतीला रवाना

  सोलापूर –

  मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यासाठी करमाळा पोलीस बारामतीला रवाना

  मनोहर भोसलेला आज पोलीस कोठडी संपल्याने बारामती पोलीस करणार आहेत  न्यायालयात हजर

  बारामतीतील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालावर करमाळा पोलिसांचे लक्ष

  मनोहर भोसलेला मिळाली होती पाच दिवसांची पोलिस कोठडी
  मनोहर भोसलेच्या विरोधात  शारीरिक आणि आर्थिक फसवणुकीचा झाला आहे करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

 • 16 Sep 2021 10:27 AM (IST)

  नाशिक शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुरुच

  नाशिक शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुरुच

  हॉस्पिटलमध्ये आपल्या पती वर उपचारासाठी आलेल्या महिलेचा एका इसमाने केला विनयभंग

  तर दुसरीकडे अंबड परिसरात एका अल्पवयीन मुलीला घरातुन अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस

  गेल्या काही दिवसांपासून शहरात विनयभंग आणि मुलींच्या अपहरण करण्याचा घटना वाढत आहेत

  पोलिसांकडून या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष महिला पोलीस पथकांची निर्मिती

  गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरावर करण्यात येत आहे कारवाई

 • 16 Sep 2021 10:18 AM (IST)

  पिंपरी-चिंचवड महानगरपालिके मधील सत्ताधारी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिला धक्का

  पिंपरी-चिंचवड –

  – पिंपरी-चिंचवड महानगरपालिके मधील सत्ताधारी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिला धक्का

  – भाजप संलग्न असलेले अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश करत दिला धक्का

  – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश झालाय

  – कैलास बारणे हे भाजप संलग्न अपक्ष गटाचे गटनेते असून त्यांना भाजपकडून स्थायी समितीचे सदस्य पद ही दिलं गेले होतं

  – मात्र गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाराज होते

  – आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही नाराजी त्यांनी उघड केली

 • 16 Sep 2021 10:17 AM (IST)

  30 सप्टेंबरपर्यंत सोलापूर शहरात जमावबंदी

  सोलापुर –

  30 सप्टेंबरपर्यंत सोलापूर शहरात जमावबंदी

  गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाटणार नाही या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी

  पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्रित फिरता येणार नाही

  आदेश मोडणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत होणार गुन्हा दाखल

  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढला जमावबंदीचा आदेश

 • 16 Sep 2021 09:12 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगावात शेतकरी कुटूंबाला बेदम मारहाण

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगावात शेतकरी कुटूंबाला बेदम मारहाण

  गावातील दहा ते 12 गुंडाकडून बेदम मारहाण

  मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

  मारहाणीत शेतकरी काकासाहेब तुपे झाले होते गंभीर जखमी

  मारहाण प्रकरणी शिउर पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल

  7 ते 8 कलमानखाली आरोपींवर गुन्हा दाखल

  गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून आरोपींना अद्याप अटक नाही

 • 16 Sep 2021 08:56 AM (IST)

  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन, टोल कंपनीच्या मॅनेजरला पुष्पहार घालून केली आरती

  नाशिक – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोख्या पद्धतीचे आंदोलन

  टोल कंपनीच्या मॅनेजरला पुष्पहार घालून केली त्याची आरती

  रस्स्त्यांची चाळणी झालेली असताना टोल घेतला जात असल्याने केलं आंदोलन..

  नाशिकरोड ते सिन्नर दरम्यानच्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी

  आठ दिवसात जर रस्ते दुरुस्त झाले नाहीत, तर टोल फोडो आंदोलनाचा इशारा

 • 16 Sep 2021 08:55 AM (IST)

  मराठवाड्यातील पंधरा लाख हेक्‍टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान

  मराठवाड्यातील पंधरा लाख हेक्‍टरवरील पिकांचे झाले अतिवृष्टीमुळे नुकसान

  प्राथमिक पाहणीच्या अंदाजा नुसार आकडेवारी आली समोर

  आठ दिवसानंतर किती क्षेत्रफळाचे नुकसान झाले हे येणार समोर येणार असल्याची विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिली माहिती

  नुकसान झालेल्या पिकांमध्ये कापूस, मका, सोयाबीन सह कडधान्य प्रकारातील पिकांचा समावेश

  नुकसानीचा अंदाज बांधणे सध्या अवघड असल्याने प्राथमिक माहिती समोर

 • 16 Sep 2021 08:55 AM (IST)

  मुंबईच्या राजावाडी रुग्णालयाबाहेर वॅक्सिनेशनसाठी तोबा गर्दी

  – मुंबईच्या राजावाडी रुग्णालयाबाहेर वॅक्सिनेशनसाठी तोबा गर्दी

  – राजावाडी रुग्णालयाबाहेर वॅक्सिनसाठी 400 मिटर लांब रांग

  – रेल्वे सुरू झाल्यापायून दुसर्या डोजसाठी मुंबईकरांची मोठी गर्दी

  – कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नागरीकांना रुग्णालयाचै आत प्रवेश वर्ज्य, ९ वाजताच घेणार आत

  – शेकडो लाोकांची रुग्णालयाबाहेर लांबच लांब रांग

  – कोविशिल्डचा पहिला केवळ 50 डोज

  – कोवॅक्सिनचा दुसरा केवळ 50 डोज

 • 16 Sep 2021 08:53 AM (IST)

  चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज

  रत्नागिरी- चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज

  1300 एसटीच्या गाड्यांचे नियोजन

  परतीच्या प्रवासात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातून एक लाख चाकरमानी एसटी घेऊन जाणार

  1300 एसटीच्या गाड्यांचे आरक्षण देखील फुल

  गुहागर आणि चिपळूण बस स्थानकातून सर्वाधिक एसटीच्या गाड्या सोडल्या जाणार

  रत्नागिरी एसटी प्रशासनाची माहिती

 • 16 Sep 2021 08:17 AM (IST)

  पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आज निर्णय

  पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आज निर्णय

  उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,उपसभापती निलम गोरे, संजय राऊत, मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम यांची एकत्रित बैठक,

  ऑनलाईन बैठकीत आज होणार निर्णय,

  पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार का ?.

  राष्ट्रवादी काँग्रेसनंही अजित पवारांची भेट घेऊन आयोग लागू करण्याची मागणी केलीये,

  आज पालिका कर्मचाऱ्यांना भेट मिळणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष

 • 16 Sep 2021 08:16 AM (IST)

  बायको सरपंच असूनही नवराच मारतो शासकीय कागदपत्रांवर सह्या, सिल्लोड तालुक्यातील घटना

  औरंगाबाद –

  बायको सरपंच असूनही नवराच मारतो शासकीय कागदपत्रांवर सह्या

  औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील लिहा खेडी गावातील धक्कादायक प्रकार

  शासकीय कागदपत्रांवर सरपंच बायकोचा नवरा सही करतानाचा व्हिडीओ व्हायरल

  कायद्याचं उल्लंघन करत सरपंचाच्या अधिकाऱ्याचा नवऱ्याकडून गैरवापर

  ग्रामसेवकाच्या देखत सरपंच महिलेच्या नवऱ्याने मारली शासकीय कागदपत्रांवर सही

  बाजीराव माणिकराव दापके असं बेकायदा सही ठोकणाऱ्या सरपंच पतीचे नाव

  तर वंदना बाजीराव दापके असं लिहा खेडी गावच्या महिला सारपंचाचे नाव

 • 16 Sep 2021 08:15 AM (IST)

  कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीवरील आभूषणे चोरीला

  कोल्हापूर

  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीवरील आभूषणे चोरीला

  कोल्हापुरातल्या टिंबर मार्केट परिसरातील धक्कादायक घटना

  चांदीचे तोडेवाळे आणि चार अंगठ्या केल्या अज्ञाताने केल्या लंपास

  चांदीचा मुकुट आणि अन्य दागिने मात्र मूर्तीवरच

  चोरी प्रकरणी अज्ञातांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 • 16 Sep 2021 08:13 AM (IST)

  अक्कलकोट तालुक्यातील 27 हजार कार्डधारकांना रेशन मिळेना

  सोलापूर –  अक्कलकोट तालुक्यातील 27 हजार कार्डधारकांना रेशन मिळेना

  केशरीकार्ड धारकांना मागील पंधरा वर्षापासून रेशन धान्य दिले जात नाही

  पंधरा वर्षांपूर्वी शासनाने त्रीकार्ड योजना अमलात आणली

  त्यावेळी अनेक कुटुंबे दारिद्य्ररेषेखाली असूनही कार्ड वेगळे करून घेतल्याने त्यांना केसरी कार्ड देण्यात आले

  परिणाम म्हणून पूर्वीच्या कार्डवर आणि नवीनकार्डही धान्य मिळणे झाले बंद

 • 16 Sep 2021 08:13 AM (IST)

  मंगळवेढा तालुक्यात वीजचोरीच्या विरोधात वीज वितरण कंपनीने उघडली मोहीम

  सोलापूर – मंगळवेढा तालुक्यात वीजचोरीच्या विरोधात वीज वितरण कंपनीने उघडली मोहीम

  36 जणांकडून 3 लाख 29 हजार रुपये किमतीची वीज चोरी झाल्याचं उघड

  येत्या दोन दिवसात दंडाची रक्कम वीज वितरण कंपनीत भरण्याची वीजचोरांना मुदत

  अन्यथा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा महावितरणचा इशारा

 • 16 Sep 2021 08:12 AM (IST)

  वानवडी येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर मुंबईतही अत्याचार झाल्याचे उघड

  पुणे –

  वानवडी येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर मुंबईतही अत्याचार झाल्याचे उघड

  वानवडी पोलिसांनी तपास करत ठाण्यातून आरोपीला अटक

  बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या 17 झाली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न

  अल्पवयीन मुलीवर बलात्कार रॅकेटचा पूर्ण उलगडा करत पोलिसांनी सात सप्टेंबर रोजी आणखी सहा जणांना अटक

  14 वर्षीय दुर्देवी मुलीवर बलात्कार करणाऱ्यांची संख्या तेव्हा तब्बल 13 इतकी झाली होती. तर बलात्कार झाल्याचे माहिती असून तिला पालकांकडे न सोपवता बिहारला नेणाऱ्या तिच्या मित्रालाही अटक

  या सर्व आरोपींना 16 सप्टेंबर पर्यंत कॅटडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले

 • 16 Sep 2021 07:38 AM (IST)

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती, नागपुरात मजुरांच्या हाताला काम मिळेना

  – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती, नागपुरात मजुरांच्या हाताला काम मिळेना

  – शहरातील लेबर ठिय्यावरुन ५० टक्क मजूर रोज रिकाम्या हाताने जातात परत

  – काम मिळत नसल्याने मजुरांच्या जगण्याचा गंभीर प्रश्न

  – तिसऱ्या लाटेच्या भितीनं नागपुरातील बांधकाम व्यवसायाची गती मंदावली

  – हातवार पोट असणाऱ्या मजुरांना जगण्याचा गंभीर प्रश्न

 • 16 Sep 2021 07:36 AM (IST)

  नागपुरातील पाच विद्यार्थ्यांना सीबीआयने केली अटक

  – नागपुरातील पाच विद्यार्थ्यांना सीबीआयने केली अटक

  – नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवण्याचं प्रकरण

  – मेडीकल कॅालेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी

  – दिल्ली सीबीआयच्या टीमने नागपूरातील कोचिंग क्लासेसवर टाकली होती धाड

  – सक्करदरा परिसरातील कोचिंग क्लासेसच्या संचालकांनाही केली अटक

  – १२ सप्टेंबरला झालेल्या परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याची माहिती

 • 16 Sep 2021 07:15 AM (IST)

  सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस पुणे 2 ऑक्टोबर पर्यंत रद्द

  सोलापूर – हुतात्मा एक्सप्रेस पुणे 2 ऑक्टोबर पर्यंत रद्द

  मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेले भाळवणी -भिगवण दरम्यानचे काम अपूर्ण

  दोन वेळा मुदत वाढूनही दुहेरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय

  दोन वेळा मुदतवाढ देऊनही दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले नाही

 • 16 Sep 2021 07:14 AM (IST)

  नागपुरात विनापरवानी कोचिंग क्लासेस

  – नागपुरात विनापरवानी कोचिंग क्लासेस

  – मनपाच्या उपद्रव शोध पथकाची मोठी कारवाई

  – गेल्या 24 तासांत दोन कोचिंग क्लासेसवर मनपाची धडक कारवाई

  – गांधीबाग झोन अंतर्गत 2 कोचिंग कलासेसवर कारवाई

  – विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या क्लासेसकडून 10,000 चा दंड वसूल

  – मनपाने काल केली 42 प्रतिष्ठाने आणि मंगल कार्यालयांची तपासणी

 • 16 Sep 2021 07:12 AM (IST)

  गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत आलेले तब्बल 53 चाकरमानी कोरोना पाॅझिटिव्ह

  गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत आलेले तब्बल 53 चाकरमानी कोरोना पाॅझिटिव्ह

  रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची माहिती

  1 लाख 20 हजार 428 चाकरमानी गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून आले

  त्यापैकी 11 हजार 549 जणांची केली कोरोना चाचणी

  आरटीपीसीआर चाचणीत 4 तर अँन्टीजेन चाचणीत 49 असे मिळून 53 चाकरमानी पाॅझिटिव्ह

 • 16 Sep 2021 07:11 AM (IST)

  नागपूर शहरातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची RTPCR कोरोना चाचणी सुरु

  – नागपूर शहरातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची RTPCR कोरोना चाचणी सुरु

  – आतापर्यंत ५०० पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पूर्ण

  – पुणे येथून परतल्यानंतर १२ पोलीसांना झाली होती कोरोनाची लागन

  – खबरदारीचा उपाय म्हणून सर्व पोलीसांची होणार कोरोना चाचणी

  – शनिवारपर्यंत चालणार ही मोहिम

 • 16 Sep 2021 07:11 AM (IST)

  मुंबई हायकोर्टात पुणे – सतारा राष्ट्रीय महामार्गवर सुरु टोल वसुलीविरोधात जनहित याचिका

  मुंबई हायकोर्टात पुणे – सतारा राष्ट्रीय महामार्गवर सुरु टोल वसुलीविरोधात जनहित याचिका

  इथे वाहनांकड़ून सुरू टोल वसूली ही बेकायदा असल्याच्या याचिकेत आरोप

  ठेकेदार रिलायंस इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सीबीआयला आदेश देण्याची केली गेली आहे माँगणी

  ह्या प्रकरणात याचिकाकर्ताने पूर्वी सीबीआय कड़े केली होती तक्रार

  मात्र सीबीआयने चार महिन्या पूर्वी गुन्हे
  दाखल करण्यासाठी मागितलेल्या परवानगी बाबत राज्य सरकार कडून अद्याप निर्णय नाही

  म्हणून आरटीआई कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर ह्यानी दाखल केली आहे सदर जनहित याचिका

  मुख्य न्यायधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ति गिरीश कुलकर्णी हयांच्या खंडपीठ समोर सदर याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याची शक्यता

 • 16 Sep 2021 06:43 AM (IST)

  20 तासांनंतर सोनू सूदच्या घरातील आयकर सर्वेक्षण संपले

  अभिनेता सोनू सूदचे घर ऑफिस आणि हॉटेलसह 6 ठिकाणी बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून आयकर सर्वेक्षण सुरू होते.

  सुमारे 20 तासांनंतर आता सोनू सूदच्या घरातून आयकर सर्वेक्षण संपले आणि सर्व आयकर अधिकारी एक एक करून निघून गेले.

  आयकर सर्वेक्षणादरम्यान सोनू सूद आणि त्याच्या कुटुंबाशिवाय, संपूर्ण कर्मचारी सोनू सूदच्या घरी उपस्थित होता.

  जेव्हा आयकर अधिकारी सोनू सूदच्या घरातून बाहेर पडत होते, त्यावेळी काही फाईल्स त्याच्या हातातही होत्या.

  मात्र, सोनू सूदच्या घरातून आयकर अधिकाऱ्यांनी काय साध्य केले आहे, हे अद्याप उघड झालेले नाही.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI