Maharashtra News LIVE Update | राज्य सरकारकडून एमपीएससी गट ‘ब’ परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | राज्य सरकारकडून एमपीएससी गट 'ब' परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 02 Sep 2021 23:15 PM (IST)

  राज्य सरकारकडून एमपीएससी गट ‘ब’ परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा

  4 तारखेला होणाऱ्या एमपीएससी गट ब परीक्षेसाठी सरकारकडून लोकल प्रवासाला परवानगी,

  एमपीएससी परीक्षेच ओळखपत्र विद्यार्थ्यांना जवळ ठेवावं लागणार,

  विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा देण्यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र,

  परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना करता येणार लोकल प्रवास,

  राज्य सरकारने काढलं परीपत्रक

 • 02 Sep 2021 20:25 PM (IST)

  नागपुरात दिवसभरात 6 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर कोरोना अपडेट –

  नागपुरात आज 6 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  शून्य मृत्यू , तर 8 जणांनी केली कोरोना वर मात

  एकूण रुग्ण संख्या – 493042

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482879

  एकूण मृत्यू संख्या – 10119

 • 02 Sep 2021 19:34 PM (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 136 नवे कोरोनाबाधित, 4 जणांचा मृत्यू

  नाशिक :

  आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 86

  आज पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 136

  नाशिक मनपा- 51
  नाशिक ग्रामीण- 80
  मालेगाव मनपा- 00
  जिल्हा बाह्य- 05

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8587

  आज झालेल्या मृत्यूची नोंद :- 04
  नाशिक मनपा- 03
  मालेगाव मनपा- 00
  नाशिक ग्रामीण- 01
  जिल्हा बाह्य- 00

 • 02 Sep 2021 19:32 PM (IST)

  नागपूरच्या हिंगणा टी पॉईंट जवळ भीषण अपघात, टिप्पर आणि दुचाकीची धडक

  नागपूर :

  नागपूरच्या हिंगणा टी पॉईंट जवळ अपघात

  टिप्पर आणि दुचाकीचा अपघात

  अपघातात एसआरपीएफ ग्रुप 13 डी चे जवान सुरेश सोनकुसरे यांचा मृत्यू

  आज सुट्टी असल्याने ते दुचाकीवरून कामा निमित्त जात होते बाहेर

  मात्र त्यांचा अपघात झाला, टिप्परच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला

 • 02 Sep 2021 18:10 PM (IST)

  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित 7 ठिकाणी ईडीच्या धाडी

  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित मालमत्तांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. ईडीने राज्यभरात बँकेशी संबंधित एकूण 7 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

 • 02 Sep 2021 17:15 PM (IST)

  विनायक मेंटेंना वाटेल ते ते बरळण्याचा अधिकार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

  मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया :

  – विनायक मेंटेेना वाटेल ते ते बरळण्याचा अधिकार आहे
  – जातीयवादी कोण आहे राज्यातील जनतेला विनायक मेटेंच्या मागील दोन-तीन वर्षांच्या वक्तव्यातून दिसत आहे
  – दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मेटेंनी स्वतःकडे बघावं
  – मागासवर्ग मंडळे त्या-त्या समाजासाठी भटक्या-विमुक्तांसाठी काम करत असतात
  – विनायक मेटेंनी वेगळा चष्मा लावला आहे
  – ज्याच्या मागे कोणताही आधार नाही असं ते बरळत असतात
  – त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

 • 02 Sep 2021 17:14 PM (IST)

  नागपुरात जोरदार पावसाला सुरवात

  नागपूर :

  नागपुरात जोरदार पावसाला सुरवात

  सकाळपासून पावसाचं वातवरण, काही भागात रिमझिम पाऊस कोसळत होता

  मात्र आता चांगल्या पावसाला झाली सुरवात

  वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

  रस्त्यावर चालणाऱ्यांची तारांबळ

 • 02 Sep 2021 16:03 PM (IST)

  रत्नागिरीत देवरुखजवळ सापडले 18 गावठी बॉम्ब, एकाला अटक

  रत्नागिरी –

  देवरुखजवळ सापडले १८ गावठी बॉम्ब, एकाला अटक

  जिवंत गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी सुरेश आत्माराम किर्वे (४८ ) या संशयित आरोपीला अटक

  त्याच्याकडे ९ हजार रुपये किमतीचे १८ गावठी बॉम्ब सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  जिवंत गावठी बॉम्ब बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेऊन मानवी जीवितास तसेच प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून या संशयितावर देवरुख पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  ही कारवाई दहशदवाद विरोधी पथक, बॉम्ब शोध व नाशक पथक यांच्याकडून संयुक्तरीत्या करण्यात आली आहे.

 • 02 Sep 2021 15:16 PM (IST)

  पुण्यात दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रयत्न

  पुणे :

  – पुण्यात दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रयत्न,

  – दुचाकीवरुन आलेल्या महिला आणि पुरुषाने घोरपडी पेठेतील खडक माळी येथील घराचे कडी तोडून केला चोरीचा प्रयत्न,

  – घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेत असताना घराच्या मालकाने विरोध केल्याने बंदुकीने केली फायरिंग

  – सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी नाही,

  – चोरट्याला पकडण्यात यश मात्र महिला फरार

  – खडक पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु

 • 02 Sep 2021 12:53 PM (IST)

  सिद्धार्थ शुक्ला याच्या मृतदेहाच शवविच्छेदन 12 : 30 पर्यंत केले जाणार

  सिद्धार्थ शुक्ला याच्या मृतदेहाच शवविच्छेदन 12 : 30 पर्यंत केले जाणार..

  पोलिसांच्या माहितीनुसार कूपर रुग्णालयाकडून मृत्यूची माहिती देण्यात आलीय.

  मृत्यूच कारण नक्की काय हे आता सांगण कठीण आहे.

  आतापर्यंतच्या माहितीनुसार सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत..

  सिद्धार्थच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांची चौकशी केली जाईल त्यानंतरच काहीतरी सांगणे शक्य होईल..

 • 02 Sep 2021 12:22 PM (IST)

  केंदीय मंत्री नारायण राणे आज नाशिकमध्ये येण्याची शक्यता कमी

  नाशिक -केंदीय मंत्री नारायण राणे आज नाशिकमध्ये येण्याची शक्यता कमी

  2 सप्टेंबर ला नाशिक मध्ये हजर राहून आपली बाजू मांडण्यासाठी दिली होती नोटीस

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाशिक मध्ये झाला होता पहिला गुन्हा दाखल

  नारायण राणे आपल्या इतर सहकाऱ्याकडून बाजू मांडण्याची शक्यता

 • 02 Sep 2021 11:31 AM (IST)

  बिग बॉस विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

  बिग बॉस विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

  वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं

  हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली

 • 02 Sep 2021 10:38 AM (IST)

  नाशिकच्या काळाराम मंदिरा समोर मनसे कार्यकर्त्यांचं अनोख आंदोलन

  नाशिक –

  काळाराम मंदिरा समोर मनसे कार्यकर्त्यांचं अनोख आंदोलन

  सरकारची आरती करून केला अनोखा निषेध

  पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

  मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

 • 02 Sep 2021 09:57 AM (IST)

  मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटल्यामूळे झालेल्या नुकसानीचे सलामे रात्रीपासून सुरु केलेत

  कोल्हापूर

  मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटल्यामूळे झालेल्या नुकसानीचे सलामे रात्रीपासून सुरु केलेत

  घटना कशामुळे घडली याची चौकशी करणार

  अशा घटना घडू नयेत म्हणून कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सर्व लघु प्रकल्पांसाठी करणार

  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती

 • 02 Sep 2021 09:57 AM (IST)

  पालिका शाळेत शिकलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना आता प्रोत्साहन म्हणून एक वेतनवाढ

  पुणे –

  – पालिका शाळेत शिकलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना आता प्रोत्साहन म्हणून एक वेतनवाढ,

  – स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली,

  – भाजप नागसेविका आणि स्थायी समिती सदस्य अर्चना पाटील यांनी स्थायी समितीसमोर याबाबत प्रस्ताव ठेवला होता,

  – पुढील काळामध्ये पुणे मनपाच्या शाळेमधील पटसंख्या वाढण्यास मदत होईल,या उद्देशाने हा निर्णय.

 • 02 Sep 2021 09:56 AM (IST)

  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा संघटना पुन्हा आक्रमक

  – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा संघटना पुन्हा आक्रमक,

  – शिवसंग्राम आणि मराठा क्रांती मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणार,

  – शिवाय मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी आजचे आंदोलन,

  – सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन.

 • 02 Sep 2021 08:26 AM (IST)

  नाशकात 37 हजार नागरिकांनी लसींचा दुसरा डोस घेतलाच नाही

  नाशकात 37 हजार नागरिकांनी लसींचा दुसरा डोस घेतलाच नाही

  निर्धारित मुदत संपून देखील डोस न घेतल्याने प्रशासनाचा ताण वाढला

  वेळेवर लस उपलब्ध न झाल्याने अनेकांनी केली टाळाटाळ

  दुसरा डोस आवश्यकच आल्याने प्रशासनाचे नागरिकांना पुन्हा आवाहन

 • 02 Sep 2021 08:05 AM (IST)

  मनसैनिकांच्या घरावर मनसेचा झेंडा फडकणार, नाशिक मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

  नाशिक –

  मनसैनिकांच्या घरावर मनसेचा झेंडा फडकणार

  मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

  आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्शवभूमीवर मनसे पुन्हा सक्रिय..

  जेथे मनसैनिक तिथे मनसेचा झेंडा लावण्याचा निर्धार

 • 02 Sep 2021 08:05 AM (IST)

  गंगापूर, दारणा,मुकणे धरणातून 5600 दलघफु पाणी आरक्षणाचा प्रस्ताव

  नाशिक –

  गंगापूर, दारणा,मुकणे धरणातून 5600 दलघफु पाणी आरक्षणाचा प्रस्ताव

  अतिरिक्त पाणी साठ्याची देखील मागणी

  निवडणुकी वेळी पाणी कपात नको म्हणून मनपा प्रशासनाची तयारी असल्याची चर्चा

  पालिका प्रशासनाच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता

 • 02 Sep 2021 08:05 AM (IST)

  स्वच्छ आणि सुंदर शाळा उपक्रमात दक्षिण सोलापूर तालुका अग्रेसर

  सोलापूर –

  स्वच्छ आणि सुंदर शाळा उपक्रमात दक्षिण सोलापूर तालुका अग्रेसर

  लोकसहभागातून 32  लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूप पालटले

  लोकसहभागातून शिक्षक व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने 32 लाख 51 हजार रुपये खर्चून जिल्हा परिषदेच्या 173 शाळांचे रुपडेच पालटले

  कोरोनामुळे जिल्हा परिषद शाळा बंद असल्यामुळे शाळांकडे ,शिक्षक पालक, व ग्रामस्थांशी झाले होते दुर्लक्ष

  मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात स्वच्छ शाळा व सुंदर शाळा उपक्रम सुरू

  या उपक्रमात दक्षिण सोलापूर तालुका ठरला अग्रेसर

 • 02 Sep 2021 08:04 AM (IST)

  सोयाबीन भुईमूग  उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची आगाऊ रक्कम

  सोलापूर – सोयाबीन भुईमूग  उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची आगाऊ रक्कम

  पावसाने ओढ दिल्याने 82 हजार 75  हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

  जिल्ह्यातील 89 हजार 392 शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्याच्या 25 टक्के रक्कम आगाऊ देण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

  सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी 5ते 5 हजार रुपये तर भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना 3 ते 5 हजार रुपयांची रक्कम मिळणार

  एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे पिक विमा कंपन्यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

 • 02 Sep 2021 07:54 AM (IST)

  शिर्डी साईबाबा संस्थानच्या CEO पदी भाग्यश्री बानाईत-धिवरे, बगाटेंच्या जागी नियुक्ती

 • 02 Sep 2021 07:14 AM (IST)

  सोलापुरातील उजनी धरणावर होणार पर्यटन क्षेत्र

  सोलापुरातील उजनी धरणावर होणार पर्यटन क्षेत्र

  धरण परिसरात असलेल्या त्रेचाळीस हेक्‍टर जमिनीवर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येणार

  पक्षी निरीक्षण केंद्र, पक्षी अभ्यास केंद्र , बोटिंग आणि मनोरंजनाची यंत्रणाही उभी करण्यात येणार

  जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र वाढावे , दरवर्षी येणाऱ्या परदेशी पक्षांची ओळख आणि त्यांचे महत्त्व समजण्यासाठी अभ्यास केंद्राची होणार निर्मिती

  उजनी धरणासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीपैकी 43 हेक्टर जमीन शिल्लक

  त्या 43 हेक्टर  जमिनीवर पर्यटन क्षेत्र विकसित होणार

  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

 • 02 Sep 2021 07:13 AM (IST)

  सोलापुरात आरोग्य आणि फ्रंटलाईन अशा 39 हजार जणांनी दुसरा डोस घेतला नसल्याचं आले समोर

  सोलापूर –

  आरोग्य आणि फ्रंटलाईन अशा 39 हजार जणांनी दुसरा डोस घेतला नसल्याचं आले समोर

  10  हजार 226 आरोग्य तर 29 हजार 103 फ्रंटलाईन वर्करनी  मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नाही

  त्यामुळे आरोग्य विभाग हैराण

  आरोग्य विभागामार्फत दुसरा डोस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी

 • 02 Sep 2021 07:12 AM (IST)

  नागपुरातील शिवसेनेत एककल्ली कारभार असल्याचा आरोप

  – नागपुरातील शिवसेनेत एककल्ली कारभार असल्याचा आरोप

  – ‘संपर्कर्प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यप्रणालीवर शिवसैनीकांची नाराजी’

  – मुंबई शिवालय येथे पार पडली खा. अनिल देसाई यांच्यासोबत बैठक

  – बैठकीत नागपूरातील शिवसैनीकांनी चतुर्वेदी यांच्यावर आरोप केल्याची माहिती

  – NIT विश्वस्त नेमण्यावरुन सेनेतील दोन आमदार आमनेसामने

  – संदिप इटकीलवार यांच्या नावाला आ. दुष्यंत चतुर्वेदी यांचा विरोध असल्याची माहिती

  – खा. कृपाल तुमाने आणि आ. जैसवाल यांना शहर संघटनेत लक्ष देण्याच्या सूचना

 • 02 Sep 2021 07:12 AM (IST)

  पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार

  – पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार,

  – लष्कर आणि वडगाव जलकेंद्रांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार,

  – उद्या उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार,

  – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती.

 • 02 Sep 2021 06:51 AM (IST)

  नागपूर विद्यापीठात ‘नॅक’ कमिटी आजपासून

  – नागपूर विद्यापीठात ‘नॅक’ कमिटी आजपासून

  – तब्बल दोन वर्षानंतर विद्यापीठाचे ‘नॅक’ मुल्यमापन होणार

  – पहिल्या दिवशी विद्यापीठाचे कुलगुरु डॅा. सुभाष चौधरी करणार सादरीकरण

  – प्राधिकरण सदस्य आणि विभागांना ‘नॅक’ समिती भेट देणार

 • 02 Sep 2021 06:51 AM (IST)

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक आजपासून नागपुरात

  – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक आजपासून नागपुरात

  – संघ परिवराातील ३६ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आले नागपूरात

  – उत्तर प्रदेश, पंजाब मध्ये होऊ घेतलेली निवडणूक, पश्चिम बंगालमध्ये पराभव यावर चर्चा होण्याची शक्यता

  – बैठकीत संघाच्या सर्व संघटनांच्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार

  – भविष्यातील कामाची रणनिती ठरवली जाणार

  – नागपूरातील संघाच्या स्मृती भवन येथे बैठकीचं आयोजन

  – सरसंघचालक डॅा. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची प्रमुख उपस्थिती

  – भाजपच्या वतीनं बी एल संतोष पक्षाचा लेखाजोखा सादर करणार

 • 02 Sep 2021 06:51 AM (IST)

  ‘गडकरींनी दत्तक घेतलेल्या बुटीबोरी नगर परिषदेला विकासनिधी नाही’

  – ‘गडकरींनी दत्तक घेतलेल्या बुटीबोरी नगर परिषदेला विकासनिधी नाही’

  – नागपूर जिल्ह्यातील बुटीबेरी नगरपरिषदेला राज्य सरकारकडून निधी नाही

  – बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांचा महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप

  – ‘बुटीबोरी नगर परिषद कर्जबाजारी झालीय’

  – ‘निधी वाटपात महाविकास आघाडी सरकार राजकारण करत असल्याचा आरोप’

  – ‘किमान एक लाख लोकसंख्येचा विचार करुन विकास निधी द्यावा’

  – बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांची राज्य सरकारकडे मागणी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI