Maharashtra News LIVE Update | आव्हानांना तोंड देण्यासाठी अमेरिका-भारत सोबत काम करतील- मोदी

| Updated on: Sep 25, 2021 | 12:38 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | आव्हानांना तोंड देण्यासाठी अमेरिका-भारत सोबत काम करतील- मोदी
narendra modi

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Sep 2021 12:03 AM (IST)

    भारताच्या सहभागामुळे शांतता, समृद्धी नांदेल याचा मला विश्वास- मोदी

    क्वाड बैठकीच्या सुरुवातील मोदी यांनी भाष्य केलं. क्वाड देश  जागतिक भल्यासाठी काम करेल. क्वाडमधील भारताच्या सहकार्यामुळे हिंद-प्रशांत तसेच संपूर्ण जगात शांतता आणि समृद्धी नांदण्यास मदत होईल, असा मला विश्वास  आहे, असे मोदी म्हणाले.  

  • 24 Sep 2021 11:58 PM (IST)

    मुख्य आव्हानांना तोंड देण्यासाठी अमेरिका-भारत सोबत काम करतील- मोदी

  • 24 Sep 2021 11:53 PM (IST)

    मानवजातीच्या कल्याणासाठी आपण पुन्हा एकदा जमलो आहेत- मोदी

    क्वाड देशांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत.

    आपण क्वाड देश 2004 मध्ये पहिल्यांदा भेटलो होतो.

    सध्या जग कोरोना महामारीतून जात आहे.

    अशा परिस्थितीत आपण येथे भेटत आहोत.

    आपण मानवजातेच्या कल्याणासाठी येथे पुन्हा एकदा जमलो आहेत.

    असे मोदी म्हणाले आहेत.

  • 24 Sep 2021 11:48 PM (IST)

    अमेरिकेत क्वाड देशांच्या बैठकीत मोदींची उपस्थिती, 2 तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड देशांच्या बैठकीत उपस्थित राहिले आहेत.

    जो बायडेन यांच्यादेखील उपस्थिती आहे.

    तसेच जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिशन  हे बैठकीला उपस्थित आहेत.

    ही बैठक 2 तास चर्चा चालणार आहे.

  • 24 Sep 2021 10:17 PM (IST)

    नेरेंद्र मोदी व्हाईट हाऊसधून बाहेर पडले  

    नेरेंद्र मोदी व्हाईट हाऊसधून बाहेर पडले आहेत.

    मोदी आणि बायडेन यांच्यात बैठक झाल्यानंतर मोदी व्हाईट हाऊसच्या बााहेर पडले आहेत.

      यानंतर मोदी  क्वाड शिखर परिषदेला हजेरी लावतील.

  • 24 Sep 2021 10:12 PM (IST)

    मोदी-बायडेन बैठकीला सुरुवात, अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची उपस्थिती

  • 24 Sep 2021 09:10 PM (IST)

    यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश, विनायक नरवदे देशात 37 वा

    मुंबई : यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश

    अहमदनगरचा विनायक नरवदे देशात 37 वा

    नितिषा जगताप या अवघ्या 21 वर्षांच्या मुलीचं पहिल्याच प्रयत्नात यश

    तर अंधत्वावर मात करत पूजा कदम हिने मिळवले यूपीएससीत यश

  • 24 Sep 2021 08:13 PM (IST)

    बीडमध्ये सौताडा धबधबा परिसरात ग्रामसेवकाचा मृतदेह आढळला

    बीड: सौताडा धबधबा परिसरात ग्रामसेवकाचा मृतदेह आढळला

    150 फूट खोल दरीत आढळला मृतदेह

    झुंबर गवांदे असं अधिकाऱ्याचं नाव

    झुंबर हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समितीचे अधिकारी

    अपघात की आत्महत्या अद्याप अस्पष्ट

    पाटोदा पोलीस घटनास्थळी दाखल

  • 24 Sep 2021 07:37 PM (IST)

    अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावात वृक्षारोपण कार्यक्रम

    जळगाव : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. महापालिका प्रशासन, मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. शेतकरी व पर्यावरणासाठी आवश्यक असलेल्या झाडांची रोपवाटिका त्या त्या जिल्ह्यात तयार झाल्या पाहिजेत. यासोबतच देशी वाणांच्या रोपवाटिकेला प्राधान्य देण्यात यावे, राज्य सरकार उत्तम काम करत असल्याची भावना यावेळी सयाजी शिंदेंनी व्यक्त केली.

  • 24 Sep 2021 07:35 PM (IST)

    रस्ताच नसल्याने मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची बीडमध्ये वेळ

    बीड: गेवराई तालुक्यातील अमृता नदीवरील पूल वाहून गेला

    पूल वाहून गेल्याने मृदेहाची अहवेलना

    रस्ताच नसल्याने मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची ओढावली नामुष्की

    गेवराईच्या भोजगाव येथील घटना

    18 वर्षीय तरुणीने केली होती आत्महत्या

  • 24 Sep 2021 06:29 PM (IST)

    ठाण्यातील रस्त्यांची पाहणी केली, कल्याण-डोंबिवलीतील रस्त्याची पाहणी करा, पालकमंत्री आहात, आमच्यासाठीपण वेळ काढा : मनसे आमदार

    नगर विकास मंत्री व पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यामधील रस्त्याची पाहणी केली यादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री शिंदे यांना टोला लगावला .आमदार पाटील यांनी ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना झापले आता कल्याण शीळ रोड आणि कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची पाहणी करावी. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आमच्यासाठी वेळ काढा. लोक त्रस्त आहेत, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलंय.

  • 24 Sep 2021 06:20 PM (IST)

    कोणी माझं नाव घेत असेल तर त्याला मी काय करू? त्यांनी पुण्यात येऊन माझं नाव घेऊ द्या : अजित पवार

    अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    - शक्ती कायदा करत असताना आमच्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत शिवाय त्याचा कुणाला त्रास होता कामा नये, आई वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी काय करते याकडे लक्ष दिले पाहिजे, 70 ते 75 टक्के जवळच्या लोकांकडून अशा घटना घडत असतात, त्यांना एवढं कडक शासन केलं पाहिजे ते बघितल्यावर कुणाच्या मनात तस करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे

    - देवेंद्र फडणवीस 100 अजित पवार खिशात घालतील या चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर मला काहीही बोलायचं नाही. मी फक्त विकासावर बोलेन आणि तुम्ही माध्यमं अशा वादग्रस्त विधानांना विनाकारण प्रसिद्धी देऊ नका, अशी माझी विनंती

    - प्रभाग रचनेबाबत येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, कारण आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलीय - वॉर्ड रचनेबद्दल वाद होणार नाही, काही काळजी करू नका, ज्यांना कोर्टात जायचे ते जाऊ शकतात - पण असल्या विषयात मला रस नाही, मला विकास कामाच्या बाबतीत काय विचारायचे ते विचारा, असले प्रश्न विचारू नका - किरीट सोमय्यांच्या बाबतीत पहिल्या दिवशी घडलं ते चुकीचं घडलं, कुणाला काही पाहणी करायची असेल तर करू द्यावी - निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात - कोणी माझं नाव घेत असेल तर त्याला मी काय करू, त्यांनी पुण्यात येऊन माझं नाव घेऊ द्या किंवा काटे वाडीत येऊन घेऊ द्या, मला त्यावर काही म्हणायचं नाही - आज भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावले गेले, मी पण त्या विरोधात आहे, शहर बकाल करण्याचा अधिकार नाही

  • 24 Sep 2021 04:42 PM (IST)

    किरीट सोमय्यांनी आरोप करण्याआधी नितीन गडकरी यांच्याकडून माहिती घ्यायला हवी होती : हसन मुश्रीफ

    मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    भाजप नेते किरीट सोमय्यांनी दोन कारखान्याबाबत आरोप केले मंगळवारी ते पुन्हा कोल्हापूरला येणार आहेत माझी सर्वांना विनंती त्यांना शांततेत येऊ द्यावं पक्ष बदनाम होईल, असं वागू नका शांतता बिघडू नये, अशी विधाने त्यांनीही करावीत त्यांनी दौरा संयमाने करावा आमच्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी पण सोबतच भारतीय जनता पक्षाच्या कामाचाही आढावा घ्यावा शाहू आणि हमीदवाडा कारखान्यात माझं योगदान मात्र राजकीय परिस्थितीमुळे मला बाजूला व्हावं लागलं आपल्याला मानणाऱ्या शेतकरी वर्गासाठी खाजगी कारखाना काढावा लागला याआधी रेड झाली तेव्हा कागदपत्रे दिली आहेत कारखान्यात एक पैशाचा गैरव्यवहार नाही ब्रिक्स इंडिया या माझ्या मित्राच्या कंपनीला आप्पासाहेब नलवडे कारखाना चालवायला दिला तपासणी करणाऱ्या यंत्रणेने या कंपनीचं हार घालून स्वागत केलं पाहिजे कारण मोठा तोटा सहन करुन त्यांनी कारखाना सुरू ठेवला सोमय्यांनी आरोप करण्याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून माहिती घ्यायला हवी होती

  • 24 Sep 2021 03:57 PM (IST)

    येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार, मुख्यमंत्र्यांची शाळा सुरु करण्यास मान्यता

    येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार, मुख्यमंत्र्यांची शाळा सुरु करण्यास मान्यता, कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु राहणार, याबाबत शिक्षण विभागाने प्रस्ताव पाठवलेला, त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी

  • 24 Sep 2021 03:51 PM (IST)

    पावसाआधी काम करुनही रस्ते वाहून का गेले? मंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं

    ठाणे-नाशिक रस्त्यांची ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाश शिंदेंकडून पाहणी एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पावसाआधी काम करुनही रस्ते वाहून का गेले? काम नीट नसेल तर ब्लॅक लिस्ट करा रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार कोण?

  • 24 Sep 2021 02:19 PM (IST)

    औरंगाबादेत अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा

    औरंगाबादेत अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा

    मोबाईलची अंत्ययात्रा काढत काढला विराट मोर्चा

    मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी

    नादुरुस्त मोबाईलच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी काढला मोर्चा

    शासनाने जिल्हा परिषद मार्फत पुरवले होते मोबाईल

  • 24 Sep 2021 01:11 PM (IST)

    व्होनसळ येथील युवक ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला

    सोलापूर - व्होनसळ येथील युवक ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला

    रात्री झालेल्या पावसामुळे भरला होता तुडुंब

    भरलेला ओढा पाहण्यासाठी गेला होता  होनसळ गावातील

    25 वर्षीय लहू शिरसागरचा गेल्या दोन तासापासून सुरू

    पोलीस आणि महसूल कर्मचारी घेताहेत लव्हू शिरसागरचा शोध

    उत्तर सोलापूर तालुक्यातील व्हनसळ  येथील घटना

  • 24 Sep 2021 12:23 PM (IST)

    आरोपीकडून पोलीस ठाण्यात शर्टच्या साहाय्याने आत्महत्या केल्याने अमरावतीत खळबळ

    अमरावती -

    वलगाव पोलीस ठाण्यात आरोपी आत्महत्या प्रकरण

    अरुन बाबाराव जवजांळ वय 50 रा. आष्टी असे मृतक आरोपीच नाव

    आरोपीने चक्क पोलीस ठाण्यात शर्टच्या साहाय्याने आत्महत्या केल्याने अमरावतीत पुन्हा खळबळ

    कामात हयगय केल्या प्रकरणी जोसना सोळंके या स्टेशन डायरी अंमलदार यांचे निलंबन

    पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ जाधव यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

    पोलीस आयुक्त आरती सिंग यांची कारवाई

  • 24 Sep 2021 12:22 PM (IST)

    2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभा आयोजित करण्यास राज्य सरकारची परवानगी

    2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभा आयोजित करण्यास राज्य सरकारची परवानगी

    कोव्हीड निर्बंध पाळून घेता येणार ग्रामसभा,

    ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीस राज्य सरकारची परवानगी,

    या आधी कोव्हीडच्या प्रादुर्भावामुळे ग्रामसभा आयोजित करण्यास परवानगी नव्हती,

    मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ब्रेक द चेन अंतर्गत ग्रामसभा घेण्यास परवानगी,

    राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं काढले आदेश

  • 24 Sep 2021 12:22 PM (IST)

    नाना पटोले यांनी काल देवेंद्र फडणवीस यांना मारली मिठी

    - नाना पटोले यांनी काल देवेंद्र फडणवीस यांना मारली मिठी

    - आम्ही दोघे मित्र असल्याने मिठी मारल्याची नाना पटोले यांची प्रतिक्रिया

    - आगामी स्थानिक संस्थाच्या निवडणूका स्वबळावर लढणार

    - दोनच्या प्रभाग पद्धतीच्या मागणीमुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

    - सरकारने पुनर्विचार करावा

    - नाना पटोले यांची मागणी

  • 24 Sep 2021 12:20 PM (IST)

    जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन

    परभणी

    जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन

    जलसंपदा विभागाच्या आधिकऱ्यांची घेणार बैठक

    काही वेळात होणार बैठकीला सुरवात

    बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचीही उपस्थिती

  • 24 Sep 2021 12:20 PM (IST)

    पुण्यात 2215 कोटींच्या 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकापर्ण सोहळा

    पुणे -

    - 2215 कोटींच्या 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकापर्ण सोहळा

    - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकापर्ण सोहळा,

    - उपमुख्यमंत्री अजित पवारही सोहळ्याला उपस्थित राहणार,

  • 24 Sep 2021 11:38 AM (IST)

    सोलापुरात धरणे आंदोलनासाठी जमलेल्या अंगणवाडीसेविकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    सोलापूर - धरणे आंदोलनासाठी जमलेल्या अंगणवाडीसेविकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    धरणे आंदोलन करण्याच्या अगोदरच पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना ताब्यात

    विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात येणार होते धरणे आंदोलन

  • 24 Sep 2021 11:37 AM (IST)

    नाशिक नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात

    नाशिक - नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात

    पालकमंत्री छगन भुजबळ, सुहास कांदे बैठकीला उपस्थित

    कांदेच्या आरोपा नंतर बैठक वादळी होण्याची शक्यता

  • 24 Sep 2021 11:28 AM (IST)

    नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तयारीला वेग

    कोल्हापूर

    नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तयारीला वेग

    मंदिराच्या शिखर स्वच्छते सह रंगरंगोटी च्या कामाला सुरुवात

    मंदिराला केली जाणार आकर्षक विद्युत रोषणाई

    उत्सवकाळात भाविकांना प्रत्यक्ष दर्शन मिळण्याची शक्यता नाही

    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मात्र ऑनलाईन दर्शनाची सोय केली जाणार

    समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांची माहिती

  • 24 Sep 2021 11:27 AM (IST)

    कोळशाच्या टंचाई मुळे दिपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 210 मेगावॉट संच बंद

    जळगाव - कोळशाच्या टंचाई मुळे दिपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 210 मेगावॉट संच बंद

    दिपनगर केंद्रात फक्त एक दिवसाचा कोळसा उपलब्ध

    एक दिवस कोळसा पुरवठा खंडित झाल्यास होऊ शकतो वीज निर्मितीवर परिणाम

    7 दिवसांचा कोळशाचा साठा उपलब्ध असणे अपेक्षित

    दिपनगर मधील 3 पैकी एक संच बंद

    सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ सहित स्क्रिप्ट पाठवली होती

  • 24 Sep 2021 11:26 AM (IST)

    भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका निवडणूक

    - भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका निवडणूक

    - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्या भेटीगाठी सुरु

    - बाबुलखेडा परिसरात आज देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

    - कार्यकर्त्यांच्या भेटी आणि निवडणूक तयारी आढावा

  • 24 Sep 2021 11:17 AM (IST)

    अहमदनगरात कोरोनामुळे 1 हजार 689 बालकांनी पालक गमावले

    अहमदनगर

    कोरोनामुळे 1 हजार 689 बालकांनी पालक गमावले तर 24 निराधार,, कोणी आई तर कोणी वडील गमावले,

    या बालकांनी जिल्हा परिषदेने स्वनिधीतून मदत करण्यासाठी शिक्षण समितीकडून ठराव

    आई गमावलेले 105 तर वडील गमावलेल्या बालकांची संख्या 1 हजार 515 तर पूर्ण अनाथ 24

    पहिले ते दहावी शिकत असलेल्या बालकांची संख्या 1 हजार 329

    तर अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकांनी संख्या 360

  • 24 Sep 2021 11:16 AM (IST)

    बारामती तालुक्यातील शेतकरी सुखावला

    बारामती : बारामती तालुक्यातील शेतकरी सुखावला...

    - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काल झाला मोठा पाऊस..

    - यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच मोठा पाऊस..

    - उसासह अन्य पिकांना मिळालं जीवदान..

    - शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकरी समाधानी..

  • 24 Sep 2021 07:09 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 1 रुपयाप्रमाणे फरक देण्याची घोषणा

    पुणे :

    पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 1 रुपयाप्रमाणे फरक देण्याची घोषणा

    जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने (कात्रज डेअरी) केली घोषणा

    या घोषणेनुसार शेतकऱ्यांना यंदाच्या दिवाळीत ७ कोटी ९० लाख रुपयांच्या फरकाचे वाटप केले जाणार

    कोरोना संसर्गाच्या काळातही कात्रज डेअरीला २ कोटी ४९ लाख ४ हजार ३७५ रुपयांचा निव्वळ नफा

    दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांची माहिती

  • 24 Sep 2021 07:09 AM (IST)

    पुणे जिल्ह्य़ातील मतदार यादीमध्ये असलेल्या दुबार मतदारांची नावे वगळण्याची जिल्हा प्रशासनासाची मोहीम

    पुणे :

    पुणे जिल्ह्य़ातील मतदार यादीमध्ये असलेल्या दुबार मतदारांची नावे वगळण्याची जिल्हा प्रशासनासाची मोहीम

    त्यानुसार आतापर्यंत ६० हजार ७३२ मतदार मतदार यादीतून 'बाद'

    त्यामध्ये पुणे शहरातील आठ मतदार संघांतील २४ हजार ५३० मतदार असून सर्वाधिक वगळलेले दुबार ७३९४ मतदार खडकवासला मतदार संघातील

    जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या ७८ लाख ८७ हजार ८७४

    त्यामध्ये जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदार संघांमध्ये १५ जानेवारी २०२१ पर्यंत ८८ हजार ७२४ दुबार मतदार

    त्यापैकी ६० हजार ७३२ मतदारांची नावे वगळली

    मात्र, अद्यापही २७ हजार ९९२ मतदार दुबार असल्याची जिल्हा निवडणूक शाखेची माहिती

  • 24 Sep 2021 07:08 AM (IST)

    गोकुळ दुध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा

    कोल्हापूर

    गोकुळ दुध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा

    सत्तांतरा नंतरची पहिलीच वार्षिक सभा होणार ऑनलाईन पद्धतीन

    ऑनलाईन सभेत सत्ताधारी गटाचा 328 कोटींच्या जागा खरेदीचा प्रस्ताव

    प्रस्तावाला विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा विरोध

    इतक्या मोठ्या रकमेची खरेदीचा प्रस्ताव ऑनलाइन सभेत का

    कोरोना काळात गोकुळ निवडणूक चालली मग ऑफलाईन सभा का नको

    महाडिक यांचा सवाल

    सत्ताधारी गट अनेक बाबीत दूध उत्पादकांनाची दिशाभूल करत असल्याचा ही केला आरोप

  • 24 Sep 2021 06:56 AM (IST)

    नांदेडमध्ये बैलगाडीसह युवा शेतकरी गेला वाहून, अर्धापुर तालुक्यातील महादेव पिंपळगाव इथली घटना

    नांदेडमध्ये बैलगाडीसह युवा शेतकरी गेला वाहून, अर्धापुर तालुक्यातील महादेव पिंपळगाव इथली घटना

    आसना नदीला आलेल्या पुरातून मार्ग काढण्याचा प्रयत्न

    दोन्ही बैल मृतावस्थेत आढळले

    युवा शेतकरी सुदर्शन झुंजारेचा शोध सुरू

  • 24 Sep 2021 06:55 AM (IST)

    गणेशोत्सवानंतर रत्नागिरीत कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला

    रत्नागिरी -

    गणेशोत्सवानंतर रत्नागिरीत कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला

    गेल्या तीन दिवसात दरोरोज सापडतायत शंभऱीच्या घरात कोरोनाचे रुग्ण

    गेल्या चौविस तासात ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर चिंतेचा विषय

    जिल्ह्याचा मृत्यूदर ३.११टक्यांवर, ६९ कोरोना रुग्ण आँक्सिजनवर

Published On - Sep 24,2021 6:45 AM

Follow us
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.