Maharashtra News LIVE Update | नागपुरात आज 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नागपुरात आज 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 28 Sep 2021 20:10 PM (IST)

  ठाण्यात महिलेला कोरोना ऐवजी दिली रेबीजची लस

  ठाणे – ठाण्यात कोरोना ऐवजी दिली रेबीजची लस

  – कळव्यातील आरोग्य केंद्रावर घडला प्रकार

  – लस घेण्यासाठी आलेल्या महिलेला दिली चक्क रेबीजची लस

  – आरोग्य केंद्रावर असलेल्या जबाबदार नर्स, डॉक्टरला कारवाई करत केले निलंबित

  – ठाण्यात नेमके काय सुरू आहे ? असा सवाल उपस्थित

  – काही दिवसांपूर्वी महिलेला तीन डोस दिले होते, त्यानंतर सेलिब्रिटी लसीकरण आणि आता चक्क रेबीजचे इंजेक्शन देण्याचा प्रकार ठाण्यात घडला

 • 28 Sep 2021 20:08 PM (IST)

  नागपुरात आज 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर कोरोना अपडेट –

  नागपुरात आज 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  शून्य मृत्यू, तर 11 जणांनी केली कोरोनावर मात

  एकूण रुग्णसंख्या – 493288

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 483087

  एकूण मृत्यू संख्या – 10120

 • 28 Sep 2021 19:03 PM (IST)

  अंबड पोलीस ठाण्याबाहेर स्थानिक नागरिक, भाजप आमदाराचे आंदोलन

  नाशिक – नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर स्थानिक नागरिक तसेच भाजप आमदाराचे आंदोलन

  – विधवा महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक न झाल्याने आंदोलन

  – काल अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर सराईत गुहेगाराने केला होता बलात्कार

  – चाकूचा धाक दाखवून पीडित महिलेच्या पार्लरमध्ये घुसूने बलात्कार केल्याची पोलिसांत नोंद

 • 28 Sep 2021 18:58 PM (IST)

  अनिल परब ईडी कार्यालयातून बाहेर पडले, सर्व प्रश्नांची उत्तरं दिली- अनिल परब

  अनिल परब ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहेत.  मी आज ईडीच्या कार्यालयात आलो. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न मला विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिले. ईडी ही एक संस्था आहे. एका संस्थेला मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यांनी जे प्रश्न मला विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. कोणत्याही एका व्यक्तीला  मी उत्तरं देण्यास बांधील नाही, असे अनिल परब म्हणाले.

 • 28 Sep 2021 17:17 PM (IST)

  ठाण्यात फेरीवल्याकडून पैसे घेणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याचे निलंबन 

  ठाणे :ठाण्यात फेरीवल्याकडून पैसे घेणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याचे निलंबन

  ठाणे महापालिका अधिकारी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार

  काल मनसे कार्यकर्त्यानी पैसे घेताना रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते

 • 28 Sep 2021 17:10 PM (IST)

  राज्यात एक यूनिफॉर्म व्यवस्था असावी म्हणून जीआर मंजूर केला- मुश्रीफ

  सोलापूर : सोमय्या यांनी आरोप केला आहे. मात्र, ग्रामविकास विभागामध्ये राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र पाठवले होते. यामध्ये पंचायत समिती, ग्रामपंचाती, जिल्हापरिषदेचे कंत्राटदार जिएसटी भरत नाहीत. टीडीएस कापत नाहीत. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला मोठा दंड भरावा लागतो.  त्यामुळे राज्यात एक यूनिफॉर्म व्यवस्था असावी. ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद यांच्यामध्ये लेखापरिक्षक यांना काय पैसे द्यायचे यासाठी मी हा जीआर मंजूर केला.

 • 28 Sep 2021 17:06 PM (IST)

  माझा जावाई आपापला व्यवसाय करतो- हसन मुश्रीफ

  कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत आहेत. ते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर बोलत आहे.  मी सत्र न्यायालयात अब्रुनुकसानीचा दाव दाखल केला आहे. सोमय्या यांनी दुसरा एक घोटाळा जाहीर केला आहे. हे सर्व कारखाने जुने आहेत. त्यांनी एक जावई शोध लावला आहे. मी किरीट सोमय्या यांना मी आवाहन करेन की माझ्या कुटुंबीयांचे नाव घेणे चांगले होणार नाही. माझा जावई आपापला व्यवसाय करतो.

 • 28 Sep 2021 16:24 PM (IST)

  ग्रामपंचायतीचे पैसे मागच्या दारातून मुश्रीफांच्या खिशात गेले- सोमय्या

  खिसा कसा कापायचा ही ठाकरे सरकारची आणखी एक केली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व ग्रामपंचायतीसाठी एक नियम केला. त्यांनी काय आयडीया केली तर. सगळ्या ग्रामपंचायतींसाठी एक ऑर्ड काढली. तुमच्या टॅक्सचं रिटर्न मी सांगेल ती कंपनी भरणार. तुमचं जीएसीटी, टीडीएस रिटर्न मी सांगेल तीच कंपीन आणि मी सांगणार तेवढी फी द्यायची अशी ऑर्डर काढली.  ग्रामविकास मंत्रालयाने जीआर काढला. आणि त्या एका कंपनीला 1500 कोटी रुपये मिळणार. छोटी ग्रामपंचायत असेल तर 3750 रुपये मिळणार.  ग्रामपंचायतीच्या खिशात जाणारे पैसे मागच्या दरवाजातून मुश्रीफ यांच्या खिशात गेले, असा अरोप सोमय्या यांनी केले.

 • 28 Sep 2021 16:17 PM (IST)

  हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाचा 1500 कोटी रुपयांचा घोटाळा- सोमय्या

  मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या माध्यमांशी बोलत आहेत. ते मंत्री हसम मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत आहेत. हसन मुश्रीफ यांनी त्यांचा जावई यांनी मिळून 1500 कोटी रुपयांचा घोटाळा केला.

 • 28 Sep 2021 13:33 PM (IST)

  बलात्काराच्या घटनेनं हादरलं नाशिक, व्यावसायिक महिलेवर बलात्कार

  नाशिक

  – बलात्काराच्या घटनेनं हादरलं नाशिक

  – पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार

  – सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून केला बलात्कार

  – या महिलेचं या भागात ब्युटीपार्लर

  – आपल्या पार्लरमध्ये पूजा करीत नसतांना घुसला संशयीत आरोपी दुकानात

  – आतून दरवाजा लावून दाखवला चाकूचा धाक

  – महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, हात बांधून केली जबरदस्ती

  – हिम्मत करून महिलेनं दिली अंबड पोलिसात तक्रार

  – नितीन सुभाष पवार हे संशयिताचं नाव

  – खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर सुटल्यानंतर संशयित झालाय फरार

  – त्याचा शोध सुरू असतानाच त्यानं केला हा बलात्काराचा गुन्हा

  – फरार संशयिताचा शोध सुरू

  – पोलीस आयुक्त दीपक पांडे अंबड पोलीस ठाण्यात दाखल

  – आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी,पोलोसांचे 4 पथक रवाना

 • 28 Sep 2021 12:44 PM (IST)

  मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरात शेकडो झाडे कोसळली

  औरंगाबाद –

  मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरात शेकडो झाडे कोसळली

  नारळी बाग, निराला बाजार, जिल्हा परिषद कार्यकायल, सरस्वती भुवन कॉलेज परिसरात कोसळली झाडे

  कैक वर्षांपूर्वीची अनेक झाडे झाली भुईसपाट

  अनेक झाडे भुईसपाट झाल्यामुळे औरंगाबादचं वृक्षवैभव गेलं लयाला

 • 28 Sep 2021 12:43 PM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीत पुराचे पाणी घुसले गावात

  औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीत पुराचे पाणी घुसले गावात

  गावातील व्यावसायिकांच्या टपऱ्या गेल्या वाहून

  नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात टपऱ्या गेल्या वाहून

  पुराच्या पाण्याचा वेग इतका तुफाण होता की काही क्षणात वाहिल्या टपऱ्या

 • 28 Sep 2021 12:42 PM (IST)

  सांगली महापालिकेसमोर तरुणाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

  सांगली महापालिकेसमोर तरुणाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

  सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिदकर यांनी आणि पोलिसांनी तरुणाला वेळेत च घेतले ताब्यात

  खनभाग येथील गटार कामाच्या बोगस बिला वर वारवार कारवाई ची मागणी करून ही मनपा प्रसासन कडून कारवाई होत नसले ने

  कारवाई करण्याची मागणी साठी तरुण करत होता आत्मदहन

 • 28 Sep 2021 12:42 PM (IST)

  नांद्राकोळी येथील दुचाकीसह दोघे जण गेले नाल्यात वाहून

  बुलडाणा

  नांद्राकोळी येथील दुचाकीसह दोघे जण गेले नाल्यात वाहून,

  एकाने बाभळीला धरून वाचविले प्राण तर दुसरा अद्याप ही बेपत्ताच,

  बुलडाणा वरून घरी जाताना नाला ओलांडताना गेले होते वाहून,

  राहुल चौधरी असे जीव वाचलेल्या युवकाचे नाव,
  तर भगवान गोरे यांचा शोध सुरू,

  आज सकाळी शोध घेताना झुडुपला अडकलेल्या अवस्थेत सापडला राहुल चौधरी

 • 28 Sep 2021 12:41 PM (IST)

  अंबाजोगाई तालुक्यातील अपेगावसह चार गावं पाण्यात

  बीड : अंबाजोगाई तालुक्यातील अपेगावसह चार गावं पाण्यात

  अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले

  नागरिकांना वाचविण्यासाठी एनडीआरएफ च्या पथकाला पाचारण

  एनडीआरएफ च्या टीमने 12 नागरिकांना वाचविले

 • 28 Sep 2021 10:52 AM (IST)

  मला ईडीचं तिसरं समन्स मिळालंय, मी चौकशीला सामोरं जातोय: अनिल परब

  मला आज ईडीचं तिसरं समन्स मिळालेलं आहे. मी आज चौकशीला सामोरं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन काम करतोय. मी आता चौकशीला जात आहे, मला कोणत्या कारणासाठी चौकशीला बोलावलं जात आहे, हे माहिती नाही, असं अनिल परब म्हणाले.

 • 28 Sep 2021 10:27 AM (IST)

  किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगूड शहरात पोलीस बंदोबस्त

  कोल्हापूर –

  किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगूड शहरात पोलीस बंदोबस्त

  पोलीस स्टेशन परिसराची श्वान पथकाकडून पाहणी

  मुरगूड नगरपरिषदेने सोमय्या यांच्या प्रवेश बंदी चा केला होता ठराव

  मात्र मुश्रीफ यांच्या आवाहनानंतर निर्णय घेतला मागे

  किरीट सोमय्या यांना कोणत्याही प्रकारचा विरोध केला जाणार नाही

  मात्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील आठवडी बाजार आज राहणार बंद

 • 28 Sep 2021 10:27 AM (IST)

  मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारा वाघडर्दी धरण शंभर टक्के भरुन झाले ओव्हर फ्लो

  मनमाड –

  मनमाडकरांसाठी आनंदाची बातमी

  शहराला पाणी पुरवठा करणारा वाघडर्दी धरण शंभर टक्के भरून झाले ओव्हर फ्लो

  धरणाच्या सडव्यावरून वाहू लागले पाणी

 • 28 Sep 2021 10:26 AM (IST)

  माजलगावची सिंदफना नदी तुडुंब

  बीड : माजलगावची सिंदफना नदी तुडुंब

  जुन्या पुलापर्यंत पाणी आले

  पाणी पाहण्यासाठी हौसी नागरिकांची पुलावर गर्दी

  जीव धोक्यात घालून नागरिक रस्त्यावर

 • 28 Sep 2021 08:42 AM (IST)

  माजलगाव तालुक्यात पूरपरिस्थिती, उमरी येथील सरस्वती नदीला पूर

  बीड: माजलगाव तालुक्यात पूरपरिस्थिती

  उमरी येथील सरस्वती नदीला पूर

  उमरी गावात पाणी शिरले

  शेतीचेही अतोनात नुकसान

  पुरामुळे अनेक ठिकाणी शेती वाहून गेली

 • 28 Sep 2021 08:41 AM (IST)

  पिंपरी-चिंचवड शहरात काल दिवसभरात 73 कोरोना रुग्ण वाढलेत

  पिंपरी-चिंचवड

  -शहरात काल दिवसभरात अवघे 73 कोरोना रुग्ण वाढलेत

  -विशेष म्हणजे 165 जण कोरोना मुक्त झालेत

  -शहरात आता पर्यंत 2 लाख 73 हजार 523 जणांना कोरोना ची लागण झालीय

  -दरम्यान शहरात आता पर्यंत 18 लाख 87 हजार 157 जणांचे लसीकरण करण्यात आलय

 • 28 Sep 2021 08:40 AM (IST)

  केज तालुक्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती

  बीड : केज तालुक्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती

  मांजरा धरणकाठच्या गावात पूरपरिस्थिती

  मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने केज-अंबाजोगाईचा संपर्क तुटला

  तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी शिरले

 • 28 Sep 2021 08:39 AM (IST)

  येळगाव धरणावरून बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती

  बुलडाणा

  येळगाव धरणावरून बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन ला ठिकठिकाणी गळती,

  कमी दाबामुळे समस्या वाढल्याने पाण्याचा अपव्यवय ही वाढला,

  नगर पालिकेचे कर्मचारी मात्र त्रस्त,

  नेहमीच रस्त्याचे काम आणि केबल टाकण्याच्या नादात पाउपलाइन फुटते,

  तर पाईपलाईन जीर्ण झाल्याने नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज

 • 28 Sep 2021 08:39 AM (IST)

  मागील चार महिन्हात पावसाने घेतला विविध घटनेत 9 जणांचा जीव

  बुलडाणा

  मागील चार महिन्हात पावसाने घेतला विविध घटनेत 9 जणांचा जीव,

  प्रशासनाकडून मृतकांच्या वारसांना 32 लाखांचे मदतीचे वितरण,

  यातील 8 कुटुंबाना मदत मिळाली मात्र एका कुटुंबाला अपात्र ठरवण्यात आलेय,

  नैसर्गिक आपत्ती विभागाने केले मदतीचे वितरण

 • 28 Sep 2021 07:43 AM (IST)

  बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार

  बीड : बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार

  केज, माजलगाव, गेवराई तालुक्याला पावसाने झोडपले

  वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात शेतीचे प्रचंड नुकसान

  केज तालुक्यातील अनेक गावातील पिके वाहून गेली

  मध्यरात्री झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत

 • 28 Sep 2021 07:36 AM (IST)

  गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो यांचा कॉंग्रेसला राजीनामा

  पणजी – माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो यांचा कॉंग्रेसला राजीनामा

  फलेरो आज ममता बॅनर्जी यांना भेटणार

  फलेरो आज कोलकात्याला रवाना

  तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ममतांची भेट

  गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत आप, TMC उतरणार

  भाजप काँग्रेस समोर प्रादेशिक पक्षांचे आव्हान

 • 28 Sep 2021 07:29 AM (IST)

  नाशकातील कुख्यात टिप्पर गँगवरील मोक्का खटल्याचा आज निकाल

  नाशिक – कुख्यात टिप्पर गँग वरील मोक्का खटल्याचा आज निकाल..

  टिप्पर गँगवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल..

  अनेक वर्षे शहरात दहशत पसरवत केले गुन्हे

  2016 मध्ये टिप्पर गँग विरोधात मोक्का अहवाल केला होता सादर..

  तपासी अधिकारी यांनी न्यायालयात दोषारोप पत्र देखील केले होते दाखल

  आजच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

 • 28 Sep 2021 07:28 AM (IST)

  पुणे जिल्ह्यात तीर्थक्षेत्रांच्या गावांमध्ये कोरोना लसीकरणासाठी खास मोहीम

  पुणे –

  – जिल्ह्यात तीर्थक्षेत्रांच्या गावांमध्ये कोरोना लसीकरणासाठी खास मोहीम,

  – मंदिरे उघडण्याबाबत निश्‍चित केलेल्या मुदतीच्या आत या गावांतील लसीकरण होणार,

  – या गावांमधील नागरिक, पुजारी आणि देवस्थानशी संबंधित सर्वांचे लसीकरण होणार,

  – जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचा महत्वपूर्ण निर्णय

 • 28 Sep 2021 07:28 AM (IST)

  रात्रीपासून बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच

  बुलडाणा

  रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच,

  येळगाव च्या धरणाचे दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीला पूर,

  पुलावरून पाणी वाहत असल्याने बुलडाणा – चिखली मार्ग वाहतुकीला बंद,

  पेठ च्या पुलावरून ही पाणी वाहत असल्याने चिखली खामगाव रस्ता ही बंद

 • 28 Sep 2021 07:27 AM (IST)

  इनडोअर दांडियाकडे यंदा आयोजकांचा कल

  नाशिक – इनडोअर दांडियाकडे यंदा आयोजकांचा कल

  दांडिया बाबत शासन आदेश अद्याप नसल्याने आयोजकांनी इनडोअर दांडिया ची तयारी

  अनेक ठिकाणी गरबा च्या ऑनलाईन क्लासेस ला सुरुवात

  सार्वजनिक ठिकाणी गरबा आयोजनाबाबत अद्यापही संभ्रम कायम

 • 28 Sep 2021 07:27 AM (IST)

  काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत

  – काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत

  – चंद्रकांत हंडोरे चौकशी समिती येणार

  – जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत भाजप उमेदवाराचा प्रचार भोवण्याची शक्यता

  – स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली पक्षाकडे तक्रार

  – दोषी आढळल्यास कारवाईचे प्रदेशाध्यक्षांचे संकेत

 • 28 Sep 2021 07:22 AM (IST)

  पुण्यात कोरोनाचा धोका कमी होत असताना डेंग्यूचा संसर्ग मात्र वाढला

  पुणे –

  – कोरोनाचा धोका कमी होत असताना डेंग्यूचा संसर्ग मात्र वाढला,

  – जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ,

  – जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे ८६, ८६ आणि ७० रुग्ण,

  – आरोग्य विभागाकडून डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी

 • 28 Sep 2021 07:21 AM (IST)

  गंगापूर धरण 100 टक्के भरलं, येत्या 1 तारखेला गंगापूर जलपूजन सोहळा

  नाशिक – गंगापूर धरण 100 टक्के भरलं

  येत्या 1 तारखेला गंगापूर जलपूजन सोहळा

  महापौर सतीश कुलकर्णी करणार गंगापूर धरणावर जाऊन जलपूजन

  पिण्याच्या आणि आरक्षित पाण्याचा यंदाच्या वर्षीच प्रश्न मिटला..

  पावसामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता

 • 28 Sep 2021 07:21 AM (IST)

  पुणे पोलिसांनी सुरू केल्यात महिलांच्या सुरक्षेसाठी योजना

  पुणे –

  – पुणे पोलिसांनी सुरू केल्यात महिलांच्या सुरक्षेसाठी योजना,

  – सध्या बंद असलेल्या बडीकॉप, पोलिस काका, पोलिस दिदी, दामिनी या योजना पुन्हा सक्रीय,

  – महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर पुणे पोलिसांना जाग.

 • 28 Sep 2021 07:20 AM (IST)

  नागपूर शहरात 37 लाखांची वीज चोरी उघडकीस

  – नागपूर शहरात 37 लाखांची वीज चोरी उघडकीस

  – महावितरणच्या तपासणी मोहिमेत आढळली वीजचोरी

  – 21 ते 24 सप्टेंबर महावितरणने नागपूरात राबवली मोहिम

  – चार दिवसांत 250 वीज मिटरची तपासणी, 98 मध्ये गडबड

  – वीज चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

 • 28 Sep 2021 07:19 AM (IST)

  नाशकात पुढचे 24 तास पावसाचे, हवामान खात्याच्या अंदाजानंतर प्रशासन अलर्टवर

  नाशिक – पुढचे 24 तास पावसाचे

  हवामान खात्याच्या अंदाजानंतर प्रशासन अलर्टवर

  शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात

  गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  धरण क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास पुन्हा पाण्याचा विसर्ग करावा लागणार

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सतर्क

 • 28 Sep 2021 07:18 AM (IST)

  नागपूर जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण

  – नागपूर जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण

  – दोन सर्कलमध्ये बंडखोरी झाल्याने राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं

  – शिवसेनेची दोन सर्कलमधून माघार, सेनेचे १० उमेदवार रिंगणात

  – जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी एकूण ७९ उमेदवार रिंगणात

  – पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवार रिंगणात

 • 28 Sep 2021 07:17 AM (IST)

  नाशकात स्मार्ट सिटीच्या नवीन कामांना ब्रेक

  नाशिक – स्मार्ट सिटीच्या नवीन कामांना ब्रेक

  सध्या सुरू असलेले काम देखील दिवाळी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

  शहरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधा नंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे आदेश

  स्मार्ट सिटीच्या निकृष्ठ कामांबद्दल शिवसेना आक्रमक

  ठेकेदार आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी

  नाशिक स्मार्ट सिटीचे 52 काम अद्यापही प्रलंबित

  सणासुदीच्या काळात नागरिकांना होणार स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांचा त्रास

 • 28 Sep 2021 07:00 AM (IST)

  मुरगूड आणि परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावली नोटीस

  कोल्हापूर

  मुरगूड आणि परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावली नोटीस

  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा बजावली गेली नोटीस

  विरोध किंवा समर्थनासाठी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी

  कार्यकर्त्यांनी एकत्र येऊ नये,पोलिसांच आवाहन

 • 28 Sep 2021 06:40 AM (IST)

  चक्रीवादळामुळे रात्रीपासून नांदेडमध्ये मुसळधार पाऊस

  नांदेड : चक्रीवादळामुळे रात्रीपासून नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे सगळे नांदेड शहर झाले जलमय, अनेक सखल भागात तसेच जागोजागी रस्त्यावरही साचलय पाणी, अतिवृष्ठीतुन वाचलेले शेतकऱ्यांचे उरले सुरले पीक ही गेले वाया.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI